सर्व मिपा करांना नमस्कार,
मला मराठी भाषेतील उत्कृष्ट लेख, मग ते सर्वच विषयांवरील असले तरी वाचायला खूप आवडतात. मिपा वर देखील जसा वेळ मिळेल तसा मी येतच असतो. माझ्यामते मिपा मराठी भाषा संवर्धनात मौलिक काम करत आहे.
मी अधिकाधिक लोकांपर्यंत हा खजिना घेऊन जायचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी whatsapp वर लहान लहान संदेशांमार्फत ही सर्व माहिती पोहोचवली जाते.
अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे, संगणक जोडणी वरील अनिरुद्ध दातार यांचा लेख त्यांच्या परवानगीने मी आणि माझा whatsapp समूह (मराठीचे शिलेदार)जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आमचे एकूण ८ समूह आहेत. आम्ही एकूण १००० पेक्षा जास्त लोकांपर्यंत हा खजिना दररोज पोहोचवत आहोत. उद्देश एकच आहे, मराठी भाषेबाबत च न्यूनगंड कमी करणे, मराठीतही भरपूर ज्ञानवर्धक लेख लिहिले जातात त्यांचा प्रसार करणे, आणि अधिकाधिक लोकांना नवनवीन मराठी लेखनासाठी प्रवृत्त करणे.
तुमची मदत - तंत्र जगत मध्ये जर अधिकाधिक तंत्र ज्ञानावर लिखाण झाले तर त्याचा मराठीसाठी खूप फायदा होईल.
याच शिवाय, मला तुम्ही सर्वांनी जर एकत्रित पणे तुमचे लेख whatsapp वर प्रसारित करण्याची परवानगी दिलीत तर माझे काम अजून सोपे होईल.
मला खालील विषयावर अजून कुठे कुठे मराठी लेख मिळू शकतील यावर देखील मार्गदर्शन करा :
संगणक
सामान्य ज्ञान
भाषा
गणित
विज्ञान
इतिहास
Gadgets
कला
संस्कृती
आभार,
सुचिकांत
९०५२३४४४७६
प्रतिक्रिया
21 Sep 2015 - 1:12 pm | जयन्त बा शिम्पि
महाराष्ट्र शासनाच्या सांस्क्रुतिक मंडळातर्फे ४४४ मराठी दुर्मिळ पुस्तके पीडीएफ माध्यमात उपलब्ध आहेत, विना शुल्क. त्यात भरपुर उतारे प्राप्त होतील.त्याचे संकेत स्थळ www.maayboli.com/node/13182 असे आहे.
खजिनाच आहे तेथे ! !
21 Sep 2015 - 1:28 pm | मित्रहो
तंत्रज्ञानविषयी ब्लॉग म्हणजे
https://bolmj.wordpress.com/
मिपावर तंत्रजगत मधे बरेच चांगले धागे असतात. मागे श्रीरंग जोशी यांनी HTML विषयी सुरु केलेल्या धाग्यावर बऱ्याच चांगल्या प्रतिक्रीया होत्या.
21 Sep 2015 - 1:43 pm | सुचिकांत
आपण एखाद्या पुस्तकातील मजकूर whatsapp वर टंकित करून घेऊ शकतो का?त्यात काही कायदेशीर अडचणी आहेत क??
21 Sep 2015 - 1:52 pm | एस
होय आहेत. प्रताधिकाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय व्हॉट्सअॅपवर लोक फॉर्वर्ड करताना मूळ लेखकाचे नाव व स्रोत काढून टाकतात, कित्येकदा त्याजागी स्वतःचे नावही घालतात. अत्रुप्त ह्यांच्या एका लेखाची व्हॉट्सअॅपवर झालेली चोरी मिपावर चांगलीच गाजली होती.
21 Sep 2015 - 4:50 pm | वेल्लाभट
एखाद्याला आपला ब्लॉग, त्यावरचं पोस्ट होणारं सगळं साहित्य कॉपीराईट करून घ्यायचं असेल तर कसं करावं?
21 Sep 2015 - 5:41 pm | एस
तुम्ही लिहिता, बनवता, निर्माण करता त्याक्षणी त्यावर तुमचा प्रताधिकार निर्माण होतो. तो मुद्दामहून व्यक्त करण्याची (इन्सिस्ट) गरज नसते. म्हणजे एखादी ब्लॉगपोस्ट केवळ 'प्रताधिकार सुरक्षित' असे लिहिले नसल्याने प्रताधिकारमुक्त होऊ शकत नाही. प्रताधिकारमुक्त असे लिहिले तरच ती प्रताधिकारमुक्त असते. पण भुरट्या चोरांना घाबरविण्यासाठी मुद्दाम प्रताधिकाराची भीती घातल्याने कधीकधी चोरीला आळा बसतो.
काही तांत्रिक युक्त्या करून ब्लॉगवरील लेखन कॉपी करता येणार नाही असे करता येते, पण असे लेखन जर 'सेव्ह अॅज एचटीएमएल' करून डेस्कटॉपवर साठवले व इंटरनेट कनेक्शन बंद करून ब्राउजरमध्ये उघडले तर ती स्क्रिप्ट बंद होते आणि लेखन कॉपीपेस्ट करू शकतो.
त्यामुळे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लिहिलेली माहिती सुरक्षित ठेव्णे फारच अवघड काम आहे.
22 Sep 2015 - 12:41 pm | वेल्लाभट
अच्छा....
बरेचदा एखादी कविता, एखादी गोष्ट, एखादा फोटो ब्लॉगवर टाकताना काचकूच होते ती याच कारणास्तव. म्हणून कायदेशीर माहिती हवी होती. इंटरनेट वर चोरी रोखणे कठीणच. पण अॅट्लीस्ट काही तसाच गंभीर प्रकार झाला तर कुणाची बकोट पकडता यावी त्यासाठी आपली बाजू भक्कम हवी. असो.
माहितीबद्दल आभार :)
21 Sep 2015 - 3:38 pm | माहितगार
माहिती लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा उद्देश्य स्तुत्य असला तरीही असे काम करू इच्छित व्यक्तींना सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा कॉपीराईट कायद्याची अधिक सविस्तर माहिती असणे श्रेयस्कर असावे. (एम्फसीस अॅडेड)
21 Sep 2015 - 5:24 pm | आदूबाळ
पण जर वाचकांकडे व्हॉट्सअॅप आहेच, तर मिपासारख्या संस्थळांचा दुवा द्यायला काय हरकत आहे?
21 Sep 2015 - 8:03 pm | श्रीरंग_जोशी
उपक्रम स्तुत्य पण स्वतःचे सोडून इतरांचे लेखन अपवादात्मक परिस्थिती सोडता मूळ माध्यमातून दुसरीकडे कॉपी पेस्ट करूच नये असे माझे मत आहे.
लेखन एकदा जालावर प्रकाशित झाले की मूळ ठिकाणचा दुवा पाहिजे तेवढ्या माध्यमांवर द्यावा. सोबत लेखनाबाबत अन जमल्यास लेखकाबाबत थोडक्यात माहिती लिहावी. फेसबुकवर दुवा शेअर केल्यास लेखातला एखादा फोटो व दोन ओळींचे पूर्वपरीक्षण आपोआप दिसत असतेच.
जुन्या काळी इंटरनेट कनेक्शन प्रत्येकाकडे नसायचे. आजकाल चतुरभ्रमणध्वनीमुळे इंटरनेटच्या उपलब्धतेची घनता लक्षणीयरीत्या वाढलेली आहे.
21 Sep 2015 - 11:47 pm | सुचिकांत
प्रश्न हा आहे कि, एक माणूस सर्व विषयांवर लिहू शकत नाही. तेवढा वेळ देखील हवा. म्हणून आम्ही बहुतांशी मूळ लेखकाचे नाव, संकेत स्थळाचे नाव, त्यांच्या संमतीने देतो. पण पुस्तकातील मजकूर अजून कधी whatsapp वर आणला नाही, म्हणून चौकशी.
22 Sep 2015 - 1:27 am | श्रीरंग_जोशी
तुम्हाला नेमके काय म्ह्णायचे आहे ते कळले नाही
माझ्या प्रतिसादातला मुद्दा अधिक विस्तार करून सांगतो.
मूळ लेखन आंतरजालासारख्या खुल्या माध्यमावर उपलब्ध आहे जे कोणीही वाचू शकतो. अट एकच त्याच्याकडे इंटरनेट कनेक्शन असायला हवे.
लेखातला मजकूर दुसरीकडे कॉपी पेस्ट केला (लेखकाच्या नावासकट का होईना) तो पुढे जाऊन लेखकाचे नाव काढून इतर लोक स्वतःच्या नावावर खपवू लागतात. हे काम लोक दुव्यावरचा मजकूर कॉपी करूनही करू शकतातच. परंतु ढकलाढकलीतून वाङमयचौर्य करणारे एवढे कष्ट करत नाहीत असे निरिक्षण आहे.
दुवा शेअर करताना लेखकाची परवानगी घेण्याची गरज नाही. एकदा आंतरजालावरच्या खुल्या संस्थळांवर लेख प्रकाशित केला की तो वाचण्यासाठी व त्याचा दुवा इतरांना पाठवण्यासाठी मूळ लेखकाची परवानगी घेण्याची गरज नाही हे अध्याहृतच आहे.
22 Sep 2015 - 5:38 pm | सुचिकांत
माझ्या हा संकेत स्थळाचा मुद्दा लक्षात आलेला आहे.
माझी शंका - मी एखादे पुस्तक विकत घेतले आणि त्यातला मजकूर लिहून, सोशल मिडीया द्वारे प्रसारित केला, तर त्यावर कोणी आक्षेप घेऊ शकते का? मी माझ्याकडून पाठवताना खाली कॉपीराईट चे चिन्ह तर वापरलेच! शिवाय मूळ लेखकाचे नाव देखील टाकेल, पण पुढे जाऊन कोणी काढले तर त्याची खात्री देऊ शकणार नाही.
22 Sep 2015 - 6:34 pm | राजू
हो घेऊ शकतात.
कॉपीराईट असलेले कोणतेही पुस्तकातील संपूर्ण लेखन,एखादा भाग,पैराग्राफ छापिल,लिखित वा इलेक्ट्रॉनिक माध्यम अशा कोणत्याही प्रकारात पुनःप्रकाशित करता येत नाही.त्या प्रकारची सूचना पुस्तकाच्या प्रथम दर्शनी लिहिलेली असते.
24 Sep 2015 - 12:31 pm | सुचिकांत
आभारी आहे