दोहा कतार संपर्क करावा. नॉट अर्जन्ट

कापूसकोन्ड्या's picture
कापूसकोन्ड्या in काथ्याकूट
21 Sep 2015 - 6:20 am
गाभा: 

प्रिय मिपाकरानो
सप्रेम नमस्कार,
मला खात्री आहे. दोहा कतार इथे कोणीतरी मिपाकर असणारच याची.
मला तिन महिन्या साठी दोहा कतार येथे ऑफर आली आहे. ऑक्टोबर २ तारखेलां मी निघणार आहे.
गुगल बाबा च्या क्रुपेने सर्व माहिती काढली आहे. कंपनी ने राहण्याची सोय केली आहे.
जनरल माहिती आहे. जिसिसि मध्ये काम करण्याचा अनुभव पण आहे.
पण तरिही काही टिप्स असतील तर द्याव्यात.
कोणी मिपाकर दोहा इथे रहात असाल तर कृपया व्य.नी. करावा. तुमचा फोन नं.इमेल आय डी कळवला तर सोयीचे होइल. आपण काय कट्टेकरी नाही पण जमलं तर एखादा कट्टा पण करता येइल.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

स्वप्नांची राणी या बर्याच वर्षापासून कतारमध्ये आहेत.त्यांना व्यनि करता येईल.

कापूसकोन्ड्या's picture

21 Sep 2015 - 10:03 pm | कापूसकोन्ड्या

आपण सुचविल्या प्रमाणे स्वप्नांची राणि याना व्य.नी पाठवत आहे.

धन्यवाद

स्वप्नांची राणी's picture

24 Sep 2015 - 4:07 pm | स्वप्नांची राणी

नोंद घेतली!! काही शंका असल्यास नक्की विचारा. फोन नंबर व्यनिमधे दिलाय.

..फोन लावल्यावर तिथे "आप कतारमें है, कृपया प्रतीक्षा कीजिये" असा मेसेज येत नाही ना?

.. :-)

कापूसकोन्ड्या's picture

24 Sep 2015 - 7:48 pm | कापूसकोन्ड्या

काय माहीत? इथल्या कतार मधूनच तिथल्या कतार मध्ये जायचे आहे. बघूया काय कतार कतार मे फर्क है क्या?

स्वप्नांची राणी's picture

25 Sep 2015 - 12:36 am | स्वप्नांची राणी

एन् शख्स मकसूद ' गैरमौजूद ' हालियान....असा मेसेज येऊ शकतो.... ;)

इरसाल's picture

25 Sep 2015 - 10:56 am | इरसाल

एन् शख्स मकसूद ' गैरमौजूद ' हालियान.
म्हणजे "नतद्रष्ट माणुस जो की मकसुद गैर ठिकाणी उपलब्ध आहे......हाला आता इथुन"

कापूसकोन्ड्या's picture

26 Sep 2015 - 7:07 am | कापूसकोन्ड्या

नतद्रष्ट माणुस ......आणि मक्सुद ! ह हा हा

कानडाऊ योगेशु's picture

26 Sep 2015 - 1:19 pm | कानडाऊ योगेशु

ह्याला म्हणतात परफेक्ट टायमिंग! ;)

कापूसकोन्ड्या's picture

24 Sep 2015 - 7:45 pm | कापूसकोन्ड्या

मी साधारण ऑक्टोबर्च्या १० तारखेस येत आहे. आल्यावर
मला एयर पोर्ट वर च सिम मिळेल त्यानंतर मी संपर्क करेन.
धन्यवाद

दत्ता जोशी's picture

25 Sep 2015 - 10:55 am | दत्ता जोशी

तुम्हाला हे माहिती असेलच तरी पण परत एकदा:
१. तुमची नेहमी लागणारी महत्वाची औषधे ( डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन सह) बरोबर ठेवा.
२. सगळ्या फोन नंबरचा back up ठेवायला विसरू नका. चुकून handset गहाळ झालाच तर.
३. डिसेंबर मध्ये तापमान बर्यापैकी खाली जावू शकते ( मी सर्वात कमी ६ अंश सेल्सियस पाहिले आहे) तेव्हा स्वेटर वगैरे घेऊन ठेवा. थंडीत तिथे पटकन फ्लू पकडतो. ( कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स असेल असे गृहीत धरतो. दवाखाने आणि औषधे महाग आहेत).
४. पासपोर्ट सैझ चे फोटोग्राफ ( निळे आणि पांढर्या पार्श्वभूमीवरील) बरोबर असुदेत. तिथे गरज पडल्यास फोटो काढायला २० ते २५ ( ३५० तव ४०० रु) रियाल खर्च येईल.
५. तुम्ही मांसाहार करत असाल तर प्रश्न नाही पण शाकाहारी असाल तर...अवघड आहे ..खाण्यापिण्याची आबाळ होऊ देवू नका. तिथे हॉटेल्स बर्यापैकी ते चांगल्यापैकी महाग आहेत. (भरपूर खाऊ बरोबर ठेवा.)
नोव्हेंबर डिसेम्बर या दोन महिन्यात हवामान सुंदर असेल तेव्हा एन्जोय ......!!!

नपा's picture

25 Sep 2015 - 1:35 pm | नपा

५. शाकाहारी असाल तर अवघड आहे...असहमत...
अनेक चांगले शाकाहारी उपहार गृह आहेत...आणि इतर हॉटेल्स मध्ये मुबलक शाकाहारी पर्याय आहेत.

मुक्त विहारि's picture

25 Sep 2015 - 2:48 pm | मुक्त विहारि

अनेक चांगले शाकाहारी उपहार गृह आहेत...

शिवाय आपल्या वडा-पाव सारखी, "फिलाफिल-पाव" देणारी पण भरपूर हॉटेल्स आहेत.

कापूसकोन्ड्या's picture

26 Sep 2015 - 7:25 am | कापूसकोन्ड्या

मान्य !मी स्वतः रियाध मधे असताना खूप चांगली शाकाहारी हॉटेले अनुभवली आहेत. (बेटर हाफ पूर्ण शाकाहारी मग काय करणार? ) फलाफल तर खुप कमाल का चिज है. @ मुवि आपली भेट होउ शकली नाही. तेव्हा म्हणजे जुन्/जुलै २०१२ मधे मला यकु ने तुमच सौअ मधला कॉन्टॅक्ट नंबर दिअला दिला होत. तुम्ही तेव्हा कदाचीत सुट्टी वर होता. आणि मी पण ऑगस्ट २०१२ मधे परत आले.
असो.

मुंबईत असाल तर परत एकदा प्रयत्न करून बघू या.

(स्वगतः "यकू" हे नांव कानावर पडले की, काळजात खूप कालवा-कालव होते.आभासी जगात काही व्यक्तींना मनापासून भेटावेसे वाटते.काहींना त्यांच्या ज्ञानामुळे तर काहींना त्यांच्या प्रतिभाशक्तीमुळे. "यकू" तर दोन्ही होता.

इंग्रजीवर प्रभुत्व तर होतेच आणि इथे मिपावर उत्तम लेख पण लिहीत होता.

ह्या पृथ्वीतलावर त्याची आणि माझी प्रत्यक्ष भेट कधी होवू शकली नाही. (आमचे इंदूरला भेटायचे ठरले होते, पण त्याआधीच त्याला बोलावणे आले.) पण आता स्वर्गात मात्र त्याला नक्कीच भेटीन.

कुछ लोग़ हर पल मिलते हय, फिर भी दिल में नहीं बसते.

कुछ लोग जिंदगी भर नहीं मिलते, लेकीन दिल में ही बस जाते हय.

यकू अशाच अनेकांपैकी एक.)

कापूसकोन्ड्या's picture

26 Sep 2015 - 11:15 am | कापूसकोन्ड्या

मी पुण्यात असतो. बघू केव्हा भेटतो ते.

गतः "यकू" हे नांव कानावर पडले की, काळजात खूप कालवा-कालव होते.आभासी जगात काही व्यक्तींना मनापासून भेटावेसे वाटते.काहींना त्यांच्या ज्ञानामुळे तर काहींना त्यांच्या प्रतिभाशक्तीमुळे. "यकू" तर दोन्ही होता.

अगदी अगदी.
मी रियाध मधे असताना खूप वेळा रात्री एकटा असताना मिपा वर पडीक असायचो. यकू चे पोस्ट वाचत असताना त्याला भेटायची खूप इच्छा असायची.
एकदा असेच तो ऑन्लाइन दिसला. पिंग केले. लगेच तत्पर उत्तर आले. त्याचे मंटो बद्दल चे लेख छान असत. एकदम जवळीक निर्माण झाली. गप्पा मारताना मी रियाध मधे आणि तो मध्य प्रदेश मधे. वेळ विचित्र असायची. मी ११-११३० रात्री ठिक पण त्याला ती वेळ असायची पहाटे २.३० ३ ची. मस्त माणूस. कॅलिडोस्कोप सारखे व्यक्तिमत्व. निखळ विनोद चॅट करताना निथळत असायचा.
मंटोचे लेख ठीक पण त्याने नर्मदा परिक्रमा लिहायला सुरूवात केली नि, काय माहित पण एक प्रकारचे गूढ निर्माण झाले. असो.
शेवटी त्याची बातमी आली तेव्हा हे असे तो करेल असे उगीचच वाटले. त्यावेळी डोळ्यातून पाणी आलेच पण आता लिहित असताना कडा ओलावल्याच.
असो.

गतः "यकू" हे नांव कानावर पडले की, काळजात खूप कालवा-कालव होते.आभासी जगात काही व्यक्तींना मनापासून भेटावेसे वाटते.काहींना त्यांच्या ज्ञानामुळे तर काहींना त्यांच्या प्रतिभाशक्तीमुळे. "यकू" तर दोन्ही होता.

+१. मुवींशी चक्क ९९.४२०% ट्क्के सहमत. यकु नावं ऐकले की एक अत्रुप्ततेची विषाद भावना मनात तयार होते... कारण मुवी म्हणतात तसा "यकू" तर दोन्हीही होताच पण त्यांना, मला वा इतरांनाही न समजलेला असा अजुनही तो बरचं काही होता. आणी सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो अतिशय अनपेक्षित होता.

नक्किच यकु त्याच्या लेख रुपाने आजही आपली सोबत करतोच आहे. पण आपण त्याला सोबत दिली\देतोय की नाही हे मात्र कळायला मार्ग नाही. पण पुन्हा त्याची भेट होइलच मे बी इन नेक्स्ट लाइफ... तोपर्यंत ही अत्रुप्ततेची भावना त्याच्या नावासोबत अशीच उभी होणार. यक्या, विषाद तुझ्या नसण्याचा नाही, पण मिपाकर म्हणून उपयोगी न आल्याचा मात्र बराच आहे. Rock In Peace Yaku.

कापूसकोन्ड्या's picture

26 Sep 2015 - 7:13 am | कापूसकोन्ड्या

व्यवस्थीत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
१. मह्त्वाची सूचना... नोटेड.
२. मी गुगल बॅक उप आणि ड्रॉप बॉक्स पण वापरतो.
३. नोटेड.
४. नोटेड.
५. वा वा तेवढाच दिलासा.

श्रीगुरुजी's picture

25 Sep 2015 - 1:48 pm | श्रीगुरुजी

माझा पुण्यातील एक मित्र गेले ४-५ वर्षे कतारमध्ये आहे. तो मिपाकर नाही. हवा असल्यास त्याचा संपर्क क्रमांक पाठवितो.

कापूसकोन्ड्या's picture

26 Sep 2015 - 7:15 am | कापूसकोन्ड्या

तुम्हाला व्य नि करत आहे. संपर्क क्रमांक अवश्य द्या.व्य नि करावा.

palambar's picture

25 Sep 2015 - 4:08 pm | palambar

आॅल द बेस्ट.

कापूसकोन्ड्या's picture

26 Sep 2015 - 7:16 am | कापूसकोन्ड्या

धन्यवाद

कापूसकोन्ड्या's picture

26 Sep 2015 - 7:05 am | कापूसकोन्ड्या

मला खात्री होतीच. त्याचा प्रत्यय आलाच. मिसळपाव चे आभार. सर्व लोकांचे आभार.
मी २००९ ते २०१२ रियाध मध्ये असताना माझा सर्वात जवळ चा मित्र मिपाच होता.
धन्यवाद.

कापूसकोन्ड्या's picture

7 Nov 2015 - 8:45 am | कापूसकोन्ड्या

नमस्कार
ठरल्याप्रमाणे मी दोहा इथे आलो.पण काम असल्यामुळे कुणाचीही भेट घेउ शकलो नाही.हे सांगण्यासाठी फोन करणे प्रशस्त वाटले नाही म्हणून त्यांना संपर्क केला नाही. (आजच व्य.नि, केले आहेत.)
मी आज पुण्यास परत जात आहे.
डिसेंबर मधे परत येणार आहे
मी २००९ ते २०१२ रियाध मध्ये असताना माझा सर्वात जवळ चा मित्र मिपाच होता.
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.