ढोल लेझिम इ. च्या ऑडिओ व्हिडीओ क्लिप्स - मदत ह्वी आहे

सातबारा's picture
सातबारा in काथ्याकूट
18 Sep 2015 - 10:39 am
गाभा: 

मित्रहो,

माझा भाऊ सैन्यदलात अधिकारी असून, पंजाब जम्मू कडे त्याचे पोस्टिंग आहे. यंदा त्यांच्या युनिटमधे त्यांनी फिल्मी गाणी व स्पिकर्स इ. ला फाटा देवून ढोलाच्या गजरात व लेझिम खेळत बाप्पाला आणले व प्रतिष्ठापना केली. तिकडच्या लोकांना भांगडा माहित असल्याने मराठमोळ्या लेझिमचे जरासे भांगडयात रुपांतर झाले.

त्यांचा पाच दिवसांचा गणपती असून विसर्जनाच्या मिरवणुकीत ही चूक टाळून जास्तीत जास्त मराठमोळ्या पद्धतीने सोमवारी संध्याकाळी बाप्पाला निरोप देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

त्यामुळे येत्या दोन दिवसांत तयारी करण्याच्या द्रुष्टीने ढोल लेझिम इ.च्या चांगल्या ऑडिओ / व्हिडिओ क्लिप्स आपल्यापैकी कोणी इथेच डकवू शकलात तर फार बरे होईल. या धाग्याची लिंक त्याला देत असून डायरेक्टली तो हे पाहून त्याप्रमाणे तयारी करवून घेवू शकेल. तुनळीवर समधानकारक मटेरीयल न मिळाल्यामुळे वा अज्ञानामुळे सापडवू न शकल्यामुळे मिपाकरांना साकडे घालीत आहे. त्यासाठी मिपावरील जाल खाणकाम तज्ञ मदत करतील अशी अपेक्षा आहे.

आपणा सर्वांना आगावू धन्यवाद!

(काम झाल्यावर मंगळवारी हा धागा संपादकांनी उडवला तरी चालेल)

प्रतिक्रिया

_मनश्री_'s picture

18 Sep 2015 - 11:52 am | _मनश्री_
सातबारा's picture

18 Sep 2015 - 11:17 pm | सातबारा

मनरंग व नादखुळा, धन्यवाद!

गोंडस बाळ's picture

21 Sep 2015 - 11:17 am | गोंडस बाळ

जाल खाणकाम तज्ञ! +१