काम, प्रवास की मज्जा ...!!!

shawshanky's picture
shawshanky in काथ्याकूट
11 Sep 2015 - 11:52 pm
गाभा: 

घरातून कार्यालयात
जाण्यासाठी निघून कार्यालयात पोचेपर्यंत
आणि कार्यालयातून बाहेर पडल्यावर घरी
पोचेपर्यंत प्रवासासाठी लागणारा वेळ हा
कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच गृहीत
धरण्याचा महत्वपूर्ण निर्णय युरोपीयन
न्यायालयाने दिले आहे. या निर्णयामुळे
कार्यालयात पोचण्यासाठी केलेला
प्रवासही आता कार्यालयीन कामाचाच एक
भाग ठरणार आहे.
. एका कंपनीशी
झालेल्या कायदेशीर लढाईचे प्रकरण निकाली
काढताना न्यायालयाने हा निर्णय दिला
आहे. या निर्णयामुळे ज्या कंपन्यांनी आपल्या
कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयातच
काम करण्यास बंधन घातले आहे, त्यांच्यावर
परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत
आहे.
आत्ता प्रश्न असा आहे की हा निर्णय आपल्याकड़े आणु शकतो का आपण ??
त्याचे काय परिणाम होतील ??
अगोदरच सरकारी काम कासवगतीने चालते त्यात हे म्हंटल तर ...!!!
हे एकून आपल्या कडील कामगार संघटना गप्प बसतील असा वाटत नाही कोणी तरी आवाज उठवेल आणि सुरु होइल ते राजकारण !!!!

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

12 Sep 2015 - 1:03 am | उगा काहितरीच

पूर्ण पाठिंबा !

shawshanky's picture

12 Sep 2015 - 3:34 pm | shawshanky

कोणती हो??