व्यसने - परिणाम आणि दुष्परिणाम

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
8 Sep 2015 - 8:24 pm
गाभा: 

अनादि काळापासून मानवी समाजात काही वस्तून्च्या सेवनाला "व्यसन" म्हणून त्याज्य ठरवले जाते ... त्या गोष्टीन्चा मोरल ग्राउन्ड्स वर निषेध केला जातो ... यात दारु ,तंबाखू, गांजा-भांग-चरस -एल एस डी इत्यादी गोष्टी येतात

उघड आहे की या गोष्टीना नैतिक /सामाजिक व कायदेशीर दॄष्ट्या त्याज्ज्य अथवा प्रतिबंधित करण्यामागे काही ठोस कारणे आहेत . सामाजिक अथवा नैतिक दॄष्ट्या धोकादायक ठरेल असे वर्तन ही द्रव्ये सेवन करणारुया व्यक्तींकडून घडते ,तसेच आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो . हे १००% मान्य आहे ... परंतु......

जे लोक काही मानसिक /आर्थिक अथवा सामाजिक परिस्थितींची शिकार होवून अथवा आध्यात्मिक / सुपरनॅचरल अनुभवांच्या शोधात अशा द्रव्यांचे संयमित स्वरूपात सेवन करतात ,तेव्हा अशा व्यक्तींचे अनुभव निराळे असू शकतात ...

अमेरिकेतील अनेक संघटनांचे / संस्थांचे / संशोधक लोकांचे असे म्हणणे आहे की कॅनाबिज अथवा भांग / गांजा या वनस्पतींचा वापर करून बनवलेली औषधे कॅन्सरवर रामबाण उपाय आहेत . तसेच कॅनाबिज /इन्फेक्टेड मश्रूम / एल एस डी यासारख्या गोष्टींचा वापर "मेडिटेशन बूस्टर" म्हणून करता येतो व त्यामुळे अध्यात्मिक साधना करणार्या व्यक्तीना उच्चतम अनुभव येतात .

परंतु अमेरिकेतील प्रभावी फार्मा कंपन्या , ज्या कॅन्सरवरील पेनकिलर औषधे विकून अब्जावधी डॉलर वर्षाला कमावतात, अशा क्कंपन्यांच्या दबावामुळे सरकार कॅनाबिज ला प्रतिबन्धित ड्रग कॅतेगरी मध्ये टाकत आहे................

आपल्यापैकी कोणाला अशा "प्रतिबन्धित ड्रग"चा अनुभव आहे का? असल्यास कसा?

मला स्वतःला भांग वापरून अतिशय उच्चतम आध्यात्मिक अनुभव आलेले आहेत आणि हे सांगायला मला अजिबात भीती /लाज वाटत नाही
धन्यवाद

प्रतिक्रिया

हेमंत लाटकर's picture

8 Sep 2015 - 8:54 pm | हेमंत लाटकर

बैल,गाय,म्हैस व शेळी तबाखूच्या झाडाला तोंड लावत नाहीत. पण मनुष्य मात्र आवडीने तंबाखू खातो.

भिंगरी's picture

8 Sep 2015 - 11:15 pm | भिंगरी

अहो फक्त हेच नाही तर गाढव, डुक्कर सुद्धा तंबाखुच्या शेतात फिरकत नाहीत.

द-बाहुबली's picture

8 Sep 2015 - 9:14 pm | द-बाहुबली

आपल्यापैकी कोणाला अशा "प्रतिबन्धित ड्रग"चा अनुभव आहे का? असल्यास कसा? मला स्वतःला भांग वापरून अतिशय उच्चतम आध्यात्मिक अनुभव आलेले आहेत आणि हे सांगायला मला अजिबात भीती /लाज वाटत नाही
धन्यवाद

सर्वप्रथम भांग ही भारतात सर्वत्र प्रतिबंधीत आहे का याबद्द शंका म्हणून इथे काय चर्चा करणार कारण तुम्हाला प्रतिबंधीत गोष्टींचा अनुभव हवाय राइट ? भांग अगदी तंबाखु वा गुटख्याप्रमाणे सर्रास प्रत्येक पानपट्टीवर अगदी एक रुपयात विद ब्रांड उपलब्ध्द असलेली शहरेही भारतात आहेत. आणी नशेचा अनुभव म्हणजे अध्यात्मीक अनुभव अजिबात न्हवे. पण नशेच्या सुखद व मनाच्या कमकुवततेमुळे सहन करायला असह्य भासणार्‍या आनंदलहरी मनात जिरवताना निर्माण होणारे आवेग मनाला परमेश्वराचे नाव जोर जोराने घ्यायला भाग पाडू शकतात यावर विश्वास आहे. त्याला तुम्ही अध्यात्मीकता म्हणत असाल तर कल्पना नाही (जय महाराष्ट्र).

एल एस डी पासुन तर लांब रहा मनाला खखणखणीत भास निर्माण होण्यासाठीच ते निर्मीत झाले म्हटले तर अतिशयोक्ती नाही.

कोकाकोला माहीत असेल त्याचे जुने नाव Coke होते. (तशी वॉटरबॅगही मी बालपणी वापरली आहे.) कारण त्यामधे सुरुवातीला कोकेनचा वापर होत असे म्हणुन. म्हणून मी कोकाकोला भरपुर पितो ज्यामुळे बरेच्दा ढेकर येतात असा अनुभव आहे. तसेच रेडबुल च्या कोला वर्शनमधेही कोकेनचा जरासा वापर केला होत म्हणून जर्मनीमधे तो आख्खा स्टॉक जप्त करुन त्यावर बंदी आली होती असे कानावर आले होते म्हणून रेडबुल कोला हुडकायचा खुप प्रयत्न केला पण भारतात मिळाले नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Sep 2015 - 9:28 pm | अत्रुप्त आत्मा

@मला स्वतःला भांग वापरून अतिशय उच्चतम आध्यात्मिक अनुभव आलेले आहेत आणि हे सांगायला मला अजिबात भीती /लाज वाटत नाही>> अरे व्वा! एंडोर्फ़िन बरच वाढलय की.. चान चान प्र गती आहे!

उडन खटोला's picture

8 Sep 2015 - 9:40 pm | उडन खटोला

म्मी ५ वर्षाअपूर्वी उत्तर भारतात गेलो असताना सर्वप्रथम भान्गेच्या ३ गोल्या घेतल्या ....त्यानन्त्६अर माझी कुन्डलिनी जागरुक झाल्याचे जानवले .... तसेच एक एनर्जी प्युर्ण पाठिचाअ कणा शुद्ध्ह करित आहे असे जानवले

त्रूतीय नेत्र जागरण व मेन्दुतील ब्लॉकिन्ग्स निघाल्याचे देखिल जाणवले

मंदार कात्रे's picture

8 Sep 2015 - 9:46 pm | मंदार कात्रे

अहो खटोला महोदय

परंतु त्यापूर्वी कुण्डलिनी म्हणजे काय ते तरी तुम्हाला माहित होते का?

की उगाच आपला मेंदूतला "केमिकल लोच्या?"

मग आता काय परिस्थिती आहे?

तो तिसरा डोळा मिटला जाऊन , मेंदूतले निघालेले ठोकळे जागेवर गेले?

की जैसे थे?

चांगली शिकलीसवरलेली लोकं अस काही लिहीतात, तेव्हा हसावे का रडावे हे कळत नाही.

मारवा's picture

8 Sep 2015 - 10:20 pm | मारवा

उडन खटोला जी
तुम्ही ब्लॅक डॉग ची
अप्रतिम
अद्वितीय
जाहिरात बघितलीय का ?
लाइफ इज इन द पॉज
लेट द वर्ल्ड वेट

सुबोध खरे's picture

9 Sep 2015 - 9:30 am | सुबोध खरे

भांग वापरून अतिशय उच्चतम आध्यात्मिक अनुभव आलेले आहेत आणि हे सांगायला मला अजिबात भीती /लाज वाटत नाही.
दुर्दैवाची गोष्ट आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Psychedelic_drug
https://en.wikipedia.org/wiki/Bad_trip
हे दोन्ही वाचून पहा

सुबोध खरे's picture

9 Sep 2015 - 9:42 am | सुबोध खरे

http://tusharnatu2013.blogspot.in/2013/03/introductory-post.html
एका व्यसनातून दुसर्या व्यसनात जाऊन आयुष्याचा खेळ खंडोबा कसा होतो आणी हि व्यसने सोडणे कठीण का आहेत हे सविस्तर वाचण्यासाठी हा ब्लोग वाचा. (आजही हा मनुष्य व्यसनाच्या छायेतून मुक्त झालेला नाही)

द-बाहुबली's picture

9 Sep 2015 - 2:21 pm | द-बाहुबली

अतिशय भितीदायक वर्णन आहे मेंटल हॉस्पिटलचे. अख्खा ब्लॉगच वाचनीय.