आडनावे, पूर्ण नावे, लेखक आणि साहित्यिकांचे वंशजांचा शोध

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
8 Sep 2015 - 11:30 am
गाभा: 

तुम्ही यात विकिपीडियाला कशी मदत करू शकता ?

१) एखाद्या आडनावाला लेखक असेल तर त्या आडनावाचा मराठी विकिपीडियावर लेख चालू करून, संबधीत आडनाव लेखात लेखकाचे नाव नोंदवणे. अशा आडनाव विषयक लेखांचे मराठी विकिपीडियावर [[वर्ग:मराठी आडनावे]] या वर्गाने वर्गीकरण केले जाते. आणि वर्ग:मराठी आडनावे या वर्ग पानावरच सध्या आपल्याला हव्या असलेल्या आडनावचा लेख आधी पासून आहे की नाही हे ही पहाता येते. सहज गंमत म्हणून तुमच्या आडनावाचा लेख आधी पासून असेल तर त्यातील सध्याची उल्लेखनीय व्यक्तींची नावे तपासता येऊ शकतील. शिवाय ज्यांना आपल्या आडनावा बद्दल मराठी विकिपीडियावर लेख असावा असे वाटते त्यांनी आडनावा बद्दल लेख चालू करता येऊ शकेल. अशा आडनाव विषयक लेखात संबंधीत आडनाव कसे पडले जसे की व्यवसाय/गाव इत्यादी, काही इतिहास उपलब्ध असल्यास त्याबद्दल संक्षीप्त माहिती देता येऊ शकते.

उदाहरण १

अत्रे लेखात

* प्रल्हाद केशव अत्रे - मराठी लेखक, पत्रकार, राजकारणी, चित्रपटदिग्दर्शक. अशी नोंद असते
* प्रभा अत्रे - हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका.

यात प्रभा अत्रेंचे पूर्ण नाव आलेले नाही याचा अर्थ त्यांच्या उर्वरीत व्यक्तीगत माहितीतही कमतरता आणि उणीवा शिल्लक असण्याची शक्यता अधीक.

उदाहरण २

इनामदार

प्रकाश इनामदार (ऑक्टोबर २८, इ.स. १९५० - डिसेंबर २३, इ.स. २००७) मराठी अभिनेते होते. हे नाव अधीक परिचीत आहे.

प्रकाश इनामदार" "द येस फॅक्टर" पुस्तकाचे अनुवादक - हि माहिती अपूरी आहे. अशा अपुर्‍या माहितीमुळे सर्वसाधारणपणे गल्लत होऊन अधिक परिचीत असलेले अभिनेते प्रकाश इनामदार यांनाच पुस्तकाचे लेखक समजले जाण्याची गल्लत सहजपणे होऊ शकते. मराठी विकिपीडियावर अभिनेते प्रकाश इनामदार यांच्या कन्येने स्वतः कल्पना दिल्यामुळे दोन्ही प्रकाश इनामदार वेगळे आहेत हे कळाले. प्रकाश विठ्ठल इनामदारांची स्वतःची मुलगी त्यांचे छायाचित्र विकिपीडियावर चढवते तेव्हा कॉपीराइट मुक्तते बाबत अधीक नि:शंक राहता येते.

"द येस फॅक्टर" पुस्तकाचे अनुवादक प्रकाश इनामदार यांच्या बद्दल आंतरजालावर काहीच माहिती उपलब्ध होत नाही. म्हणून इनामदार आडनावाचा लेख असेल तर कधीना कधी कुणी लेखक इनामदारांच्या एखाद्या परिचीताचे लक्ष जाऊन अधीक माहिती मिळण्याचा संभव वाढतो

यासाठी पूर्ण नाव, जन्म (एखाद्या लेखकाचा मृत्यू झाला असल्यास), निकटचे आप्त जसे कि आई, वडील, मुले माहिती मिळाल्यास लेखातील माहितीत जोडणे. ज्यामुळे प्रताधीकार विषयक साहाय्य मिळवणे दोघांनाही विकिपीडियास आणि लेखकाच्या वंशजांना सोपे होते.

अशी माहिती का हवी असते ?

बरेच लेखक, साहित्यिक त्यांचे लेखन केवळ नावांची अद्याक्षरे+आडनाव अथवा केवळ पहिले नाव आणि आडनाव, एवढे लिहूनच करतात. विकिपीडियावर सदर लेखकांची माहिती पूर्ण करण्यासाठी, एकसारख्या नावाच्या एका लेखकाच्या माहितीची दुसर्‍या लेखकाच्या माहितीत सरमिसळ टाळण्यासाठी, ज्या लेखकांच्या नावावर कॉपीराईट चालू आहे त्यांचा कॉपीराइटची काळजी घेणे आणि ज्यांचा कॉपीराइट संपला आहे त्यांचे लेखन विकिप्रकल्पात आणण्यासाठी लेखकांची वरील प्रकारची माहिती पूर्ण करण्यात साहाय्यची गरज असते.

सध्या काही लेखकांबद्दल अथवा आडनावां माहिती हवी आहे का ?

होय या यादीत अधिक माहिती हव्या असलेल्या लेखकांची नावे जोडत राहीन. हे लेखक आताच्या काळात कुणाला माहित असतीलच असे नाही पण प्रयत्न करून माहिती मिळवणे हे एक काम आहे.

* लेखक: तळवलकर गोपीनाथ, पुस्तकः अनुराधा, प्रकाशन वर्ष: १९४६ प्रकाशक: विद्वांस गो
: हवी असलेली माहिती पुढील पैकी कोणतीही+अधिक : जन्म दिनांक/वर्ष, (मृत्यू झाला असल्यास दिनांक/वर्ष), जन्म स्थळ रहिवास, व्यक्तीगत जीवन-आप्त, शिक्षण, कारकीर्द, साहित्यिक कारकीर्द आणि इतर लेखन, टिका झाली असल्यास त्याबद्दल माहिती.

तसेच खालील आडनावांच्या व्यक्ती बद्दल माहिती हवी आहे

* टिळक
* केळकर
* बाबर सरोजिनी
* कवलगीकर रामचंद्र
*

या धागालेखातील प्रतिसादांचा विकिप्रकल्पातून उपयोग होऊ शकणार असल्यामूळे आपले या धागा लेखास आलेले प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील.

प्रतिसादांसाठी आणि अनुषंगीका व्यतरीक्त अवांतरचर्चा टाळण्यासाथी आभार

प्रतिक्रिया

राही's picture

8 Sep 2015 - 12:56 pm | राही

मराठीतल्या जुन्या-नव्या लेखकांची त्यांच्या अल्प माहितीसह सूचि पॉप्युलर प्रकाशनने दोन किंवा तीन खंडांत प्रकाशित केली आहे आणि ती बरीचशी समावेशक आहे. हा एक कोशच म्हणावा इतके हे कार्य मोठे आहे.

माहितगार's picture

8 Sep 2015 - 1:03 pm | माहितगार

लेखक/लेखीकांची पूर्ण नावे आहेत का त्यात ? पूर्ण नावे देण्याबाब्त सजगता बाळगली असेल तर उत्तमच

सुनील's picture

8 Sep 2015 - 1:48 pm | सुनील

लेखक: तलवलकर गोपीनाथ, पुस्तकः अनुराधा, प्रकाशन वर्ष: १९४६ प्रकाशक: विद्वांस गो

गोपीनाथराव स्वतःचे आडनाव तलवलकर असे लावीत की तळवलकर?

मला तरी तळवलकर असे वाचल्याचे आठवते आहे. खेरीज, त्यांचे इतर नातेवाईक - अभिनेते शरद आणि संपादक गोविंद हे देखिल तळवलकर असेच आडनाव लावीत/लावतात.

माहितगार's picture

8 Sep 2015 - 2:16 pm | माहितगार

टायपो ! तुमचे बरोबर आहे. मी या ऑनलाईन यादीतून नाव उचलले त्यात टायपो होता. त्यांची पुस्तके उस्मानीयाच्या विद्यापीठाच्या ऑनलाईन संग्रहालयात आहेत.

अनुराधा पुस्तक या दुव्यावर तपासले नाव श्री. गोपीनाथ तळवलकर असे आहे. गोपीनाथ तळवलकरांचे पूर्ण नाव आणि जन्म आणि हयात किंवा कसे या बाबत आणि इतर अधिक माहिती मिळाल्यास जरूर कळवावे. आपण त्यांच्या आप्तांबाबत दिलेल्या माहितीसाठी आभार.

(हे उस्मानीयाचे वेबसाईट तपासण्यास बर्‍याचदा उघडत नाही. आज सकाळी उघडले नव्हते. तुमचा हा संदेश वाचल्यावर पुन्हा आत्ता ट्राय केले असता उघडले. :) असेच प्रतिसाद देत राहा तुमचा प्रतिसाद आला की उस्मानीयाचे वेबसाईट असेच विनासायास उघडत राहीले तर छानच :) )

(उस्मानीयाचे वेबसाइट नियमीतपणे न उघडण्यामुळे डिटेस्ल तपासावयाचे राहीले असू शकतात. लेखकांची यादी सध्या मुख्यत्वे तेथून घेत असल्यामुळे अशी अडचण पुढेही उद्भवत राहण्याची अल्पशी शक्यता आहे)

आगरकर हायस्कूल, रास्ता पेठे, पुणे च्या माजी प्राचार्या आणि प्रभाकर रामचंद्र दामले यांच्या पत्नी माहेरच्या कृष्णा देसाई यांच्या बद्दल खालील माहिती हवी आहे

१) त्यांची जन्म तारीख
२) त्यांचे मृत्यू वर्ष ०२ जानेवारी १९८९ असे मिळाले आहे. दुजोरा हवा आहे.
३) कॉम्रेड कृष्णा देसाई म्हणजे कमलिनी देसाई नव्हेत यास दुजोरा हवा आहे.
२) त्यांचा विवाह मिश्र विवाह होता यास दुजोरा हवा आहे.
३) त्यांनी केलेले लेखन, पुस्तके या बद्दल अधिक माहिती असल्यास हवी आहेत
४) Three Leaders: Tilak-Gokhale-Gandhi ग्रंथाचे लेखक कोण प्रभाकर रामचंद्र दामले की कमलिनी प्रभाकर दामले की संयुक्त लेखन ?
५) प्रभाकर रामचंद्र दामले आणि कमलिनी प्रभाकर दामले यांची जमल्यास प्रताधिकारमुक्त छायाचित्रे हवी आहेत.

खालील टिळक आडनावीय व्यक्तीं पूर्ण नावे आणि अधिक माहिती हवी आहे
* कमलाबाई टिळक
* इंदूताई टिळक
* आदिती टिळक
* सुयश टिळक
* चंद्रशेखर टिळक

१) स्त्रीयांचे आडनाव टिळक असल्यास ते सासरचे आहे का माहेरचे ?
२) यांचे कार्यक्षेत्र आणि कारकीर्द
३) साहित्य लेखन केले असल्यास त्याची माहिती
४) जन्म तारीख तसेच हयात किंवा कसे (कुणाचा मृत्यू झाला असल्यास मृत्यूवर्ष)
५) विषीष्ट टिळक घराण्याशी संबंध असल्यास (जसे की बाळ गंगाधर टिळक घराणे अथवा नारायण वामन टिळक घराणे तर त्या विषयी माहिती)

खालील काही प्रश्नातून माझे अज्ञान प्रगट होण्याची शक्यता आहे अ‍ॅडव्हान्समध्ये क्षमस्व.

१) बाळ गंगाधर टिळक घराणे आणि नारायण वामन टिळक घराणे शिवाय इतर काही टिळक आडनावी व्यक्ती अथवा घराणी आहेत का ?

२) नारायण वामन टिळक घराण्यातील अशोक देवदत्त टिळक आणि मुक्ता टिळक-लॉरेन्स - अशोक देवदत्त टिळक यांची मुलगी यांची खाली माहिती हवी आहे.

* जन्म तारीख तसेच हयात किंवा कसे (कुणाचा मृत्यू झाला असल्यास मृत्यूवर्ष)
* यांचे कार्यक्षेत्र आणि कारकीर्द
* साहित्य लेखन केले असल्यास त्याची माहिती)
* मुक्ता टिळक-लॉरेन्स यांचे सासरचे पूर्ण नाव

३) बाळ गंगाधर टिळक घराण्यातील खालील व्यक्तींची माहिती हवी

* गंगाधर रामचंद्र टिळक - बाळ गंगाधर टिळक यांचे वडील
* जयंत श्रीधर टिळक
* दीपक जयंत टिळक
* गौरी दीपक टिळक
* रोहित दीपक टिळक
* मुक्ता शैलेश टिळक

* जन्म तारीख तसेच हयात किंवा कसे (कुणाचा मृत्यू झाला असल्यास मृत्यूवर्ष)
* यांचे कार्यक्षेत्र आणि कारकीर्द
* साहित्य लेखन केले असल्यास त्याची माहिती)
* शैलेश टिळक यांचे पूर्ण नाव
* मुक्ता शैलेश टिळक यांचे शैलेश टिळकांशी नाते

* विजय केळकर - अभियंता आणि अर्थतज्ज्ञ.
* एच. एस. केळकर (भाऊसाहेब) - अत्तर उद्योग [१]
* गिरिजाबाई केळकर - लेखिका आणि मराठीतल्या पहिल्या स्त्री नाटककार [ संदर्भ हवा ]
* मंजिरी केळकर
* कमलाकांत वामन केळकर - भारतीय भूवैज्ञानिक
* के. एन्. केळकर
* ल.भ. केळकर
* विजय केळकर

पूर्ण नाव, जन्म-(हयात स्थिती/ मृत्यू दिनांक); कार्यक्षेत्र; कारकीर्द; साहित्य लेखन असल्यास

उत्तरा केळकरांची सुद्धा पूर्ण नाव, जन्म- हयात स्थिती; कार्यक्षेत्र; कारकीर्द; साहित्य लेखन असल्यास माहिती हवी.

अर्थतज्ज्ञ विजय केळकरांचे पीएचडी गाईड अजून एक मराठी अर्थतज्ज्ञ अविनाश दीक्षित होते. केळकरांनी बर्कली विद्यापीठातून पीएचडी मिळवली.

(उगाचच रँडम माहितीचा हा तुकडा डोक्यात अडकून बसला होता.)

माहितगार's picture

17 Sep 2015 - 3:04 pm | माहितगार

हो रँडम माहिती सुद्धा चालेल त्यामुळे धागा लेख चर्चेत राहून अधिक माहिती येण्यास मदतच होईल.

वाचक्नवी's picture

1 Jan 2016 - 11:12 pm | वाचक्नवी

जन्म : सप्टेंबर, इ.स. १८८६; मृत्यू : २५ फेब्रुवारी, इ.स. १९८०

माहितगार's picture

17 Sep 2015 - 2:30 pm | माहितगार

मनोरंजन या पहिल्या मराठी दिवाळी अंक काढण्याचा मान मिळणारे काशीनाथ रघुनाथ मित्र यांचे मूळ आडनाव आजगावकर होते.

१) काशीनाथ रघुनाथ मित्र (आजगावकर) यांचे मृत्यूवर्ष काय ? त्यांचा मृत्यू कुठे झाला ?
२) केनीया देशाच्या न्यायिक विभागात कुणी काशीनाथ रघुनाथ मित्र होऊन गेले, ती व्यक्ती आणि काशीनाथ रघुनाथ मित्र (आजगावकर) या दोन व्यक्ती वेगवेगळ्या असल्यास तसा दुजोरा हवा आहे.
३) काशीनाथ रघुनाथ मित्र हे जगन्नाथ रघुनाथ आजगावकर (ज्ञानांजन मासिक संपादक) यांच्या प्रमाणे कोकणातले आणि समकालीन संदर्भ दिसतात. या दोघांचे परस्परात काही नाते होते का ? या दोघांचे मूळगाव आजगाव एकच का की नाव एकच असलेली हि वेगवेगळी गावे आहेत ?
४) जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचे जन्मवर्ष काय ?

वाचक्नवी's picture

1 Jan 2016 - 11:10 pm | वाचक्नवी

आजगावकर (जन्म: २ नोव्हेंबर, १८७१ मृत्यू : इ.स. १९२०)

वाचक्नवी's picture

1 Jan 2016 - 11:07 pm | वाचक्नवी

गोपीनाथ तळवलकर (जन्म : २९ नोव्हेंबर इ.स. १९०७; मृत्यू : ७ जून, इ.स. २००० हे मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक होते. अधिक माहितीसाठी https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E... पहा

वाचक्नवी's picture

1 Jan 2016 - 11:45 pm | वाचक्नवी

पूर्ण नाव - गोपीनाथ गणेश तळवलकर