आढावा...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
19 Nov 2007 - 12:53 pm
गाभा: 

राम राम मंडळी,

साधारण महिन्याभरापूर्वी आम्ही खालील समभाग सुचवले होते -

1) ABC Bearings (89 - 92) - ९० ला मिळत होता.
2) Canfin Home ( 55-58) - ५५ ला मिळत होता.
3) Omax Auto ( 58 -63 ) - ५९ ला मिळत होता.
4) City Union Bank ( 208 - 211) - २०९ ला मिळत होता.
5) First Leasing ( 45 - 47) - ४५ ला मिळत होता.
6) Deccan Cement ( 225 - 228) - २१८ ला मिळत होता.
7) Deepak Nitrate ( 100 - 105) १०० ला मिळत होता.
8) Savita Chemicals ( 260 - 266) २६३ ला मिळत होता.
9) SRF ( 127 - 133) --------> STRONG BUY!! - १२८ ला मिळत होता.
10) Sukhjit's Strach ( 138 - 142) - १३८ ला मिळत होता.
11) India Nippon Batterys ( 144 - 150) - १४६ ला मिळत होता.
12) Micro Tech ( 208 - 212 ) - २०३ ला मिळत होता.
13) Seshasayee Paper ( 161 - 170) - १६५ ला मिळत होता.

आजचा आढावा -

1) ABC Bearings (89 - 92) आजचा भाव ८५, ६% घट
2) Canfin Home ( 55-58) आजचा भाव ८४, ३४ % वाढ
3) Omax Auto ( 58 -63 ) आजचा भाव ७१, २०% वाढ
4) City Union Bank ( 208 - 211) आजचा भाव २४५, १७% वाढ
5) First Leasing ( 45 - 47) आजचा भाव ५४, २०% वाढ
6) Deccan Cement ( 225 - 228) आजचा भाव ३५८, ६४% वाढ
7) Deepak Nitrate ( 100 - 105) आजचा भाव ११८, १८% वाढ
8) Savita Chemicals ( 260 - 266) आजचा भाव ३२०, २२% वाढ
9) SRF ( 127 - 133) --------> STRONG BUY!! आजचा भाव १५३, २०% वाढ
10) Sukhjit's Strach ( 138 - 142) काहीही फरक नाही. शून्य % वाढघट
11) India Nippon Batterys ( 144 - 150) आजचा भाव १५६, ७% वाढ
12) Micro Tech ( 208 - 212 ) आजचा भाव २३६, १६% वाढ
13) Seshasayee Paper ( 161 - 170) आजचा भाव २०२, २२% वाढ

अरे बाबा कुणी पैशे कमावले की नाही? :)

अरे तात्याचं जरा ऐकत जा रे! खूप वर्ष काढली मार्केटमध्ये!

आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जरी वरील समभाग वाढले नसते तरी ते घेऊन बसून राहून वाट पाहण्यात विशेष काही रिस्कही नव्हती/नाही! कारण ह्या कुणा खबरीलाल तिवारीच्या खबरा नसून आम्ही स्वत: काही अभ्यास करून शोधून काढलेल्या टिपा आहेत!

बरेचसे खबरीलाल तिवारी आणि त्यांचे फॉलोअर्स आम्ही या बाजारात उठलेले पाहिले आहेत!असो...

आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई २३.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

19 Nov 2007 - 1:01 pm | विसोबा खेचर

डेक्कन सिमेंट आणि कॅनफिनहोम ने बाकी मजा आणली बॉस! :)

ABC Bearings ही चांगला आहे, पण अभि तलक कुछ बढाही नही, उलटा घटा! :))

म्हणूनच नेहमी 'never put ur all eggs in a single basket' या नियमानुसार काम करावे!

कोई बात नही, माल लेके बैठ जाओ! :)

तात्या.

मनिष's picture

19 Nov 2007 - 3:04 pm | मनिष

जर नवीन काही टिप्स असतील तर अवश्य सांगा!

माझी दुनिया's picture

19 Nov 2007 - 3:58 pm | माझी दुनिया

.तात्या,

मला वाटतं तुम्ही जीएमार पण १४७ सुचवला होतात,मी १७५ ला घेतला होता,
पण तुम्ही टार्गेट न दिल्याने २५ - ३०% कमावून विकला. अजून काही टिप्स असतील तर अवश्य द्या

विसोबा खेचर's picture

20 Nov 2007 - 12:22 pm | विसोबा खेचर

अजून काही टिप्स असतील तर अवश्य द्या

नक्की!

माझी दुनिया's picture

20 Nov 2007 - 1:00 pm | माझी दुनिया

मात्र कालावधी आणि टार्गेट देण्यास विसरू नका.

जुना अभिजित's picture

19 Nov 2007 - 4:42 pm | जुना अभिजित

Deepak Nitrate ( 100 - 105) आजचा भाव ११८, १८% वाढ

तात्या
दिपक गेल्या ३-४ दिवसात वाढला आहे. गेले सहा-सात महिने यात पुरेसे व्यवहारसुद्धा होत नव्हते.
पण एक वर्षापूर्वी हा १६० वगैरे होता.

आता तुमचं काय मत आहे? ही वाढ परत दिपक ला जुन्या उच्चांकाकडे घेऊन जाईल काय?

अभिजित

विसोबा खेचर's picture

20 Nov 2007 - 12:20 pm | विसोबा खेचर

आता तुमचं काय मत आहे? ही वाढ परत दिपक ला जुन्या उच्चांकाकडे घेऊन जाईल काय?

शक्यता नाकारता येत नाही. जाईल असे वाटते!

तात्या.

वाटाड्या...'s picture

19 Nov 2007 - 10:20 pm | वाटाड्या...

SRF 133 ला घेतलेला..१४५ ला विकला...५ दिवसात ९% परतावा...काहि वाइट नाहि..काय म्हणता..??

विसोबा खेचर's picture

20 Nov 2007 - 12:20 pm | विसोबा खेचर

आज एस आर एफ ने १७० चा टॉप मारला! :)

तात्या.

झकास's picture

20 Nov 2007 - 9:52 pm | झकास

माझ्याकडे टाटा स्टील आहेत आधीचेच, त्यावर आता rights (५:१) आणि compulsarily convertible pref shar५:१ (९:१०) ची ऑफर आली आहे. त्यात दिलेल्या ह्या ऑफर पेक्षा जास्त शेअर्स साठी सुद्धा अर्ज करता येतोय. त्यात किती टाकले तर थोडे तरी शेअर्स मिळण्याची शक्यता आहे?

गारंबीचा बापू's picture

23 Nov 2007 - 1:06 pm | गारंबीचा बापू

तात्या,

हे हिरवे आणि लाल रंग बदलून कसं काय लिहीता येतं? मला तर एकही बटण सापडलं नाही.

(अडाणी) बापू

झकासराव's picture

23 Nov 2007 - 6:09 pm | झकासराव

इकडे झकास पण आहे काय????????
झकासराव वेगळा आणि झकास वेगळा बर मंडळी.