कोकणातील भटकंती.... माहिती पाहिजे....

बाबा योगिराज's picture
बाबा योगिराज in भटकंती
6 Sep 2015 - 4:34 pm

मित्रांनो,
पुढील महिन्याच्या १,२,३ आणि ४ तारखेस कोकणात फिरायला जायचा विचार आहे....
आम्ही दोघे आणि पिल्लू + साडूसाहेब, मेहुणी आणि त्यांच पिल्लू.
१ तारखेला सकाळीच औरंगाबादवरुन निघून ४ तारखेला संध्याकाळी परत असा साधारण कार्यक्रम आहे..

मुक्काम नागाव (अलीबाग जवळ), कशिद या परिसरात करण्याचा विचार आहे.
तरीही या परिसरात कुणी आधी जाऊन आलय का? येथे जवळपास बघण्यासारखे काय काय आहे???

फणसाड अभय अरण्य आणि मुरुड जंजिरा शक्यतो टाळन्याचा प्रयत्न राहिल....
१) अभयारण्यात दोन छोटे पिल्लू घेउन जाता येणार नाही.
२) मूरुड च्या किल्ल्यावर तिथले स्थानीय लोक नीट (सम्पूर्ण) माहिती देत नाहीत म्हनुन जाणार नाही.

आता या दोन्ही शिवाय जवळपास काय ठिकाने आहेत?
सर्वात महत्वाचे येथे खादाडी साठी काही विशेष ठिकान प्रसिद्ध आहे का?
या परीसरात काय काय आवर्जुन खावे? / बघावे?
काही धोका? (अर्थात समुद्र किनारी)

सोबत सोबत ४ चाकी असल्याने अलीबाग च्या पुढे १०० किमी पर्यंत जाण्याची तयारी आहे.
या विषयीचा एखादा जुना धागा असल्यास कळवावे.
गूगल बाबावर काही विशेष सापडले नाही.
जानकार लोकांनी प्रकाश टाकावा.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

खाली एक लिंक देत आहे.मानस यांची कोकण संबधी विचारणा आणी त्यावर गविंचा अप्रतिम प्रतिसाद.
अवांतर -अश्या विचारणे साठी खफ चा वापर करावा .
www.misalpav.com/node/19703

बाबा योगिराज's picture

6 Sep 2015 - 6:27 pm | बाबा योगिराज

जेपी भौ,
धन्यवाद.....
मी खफ वरच खरड्नार होतो पन, २-३ दिवसात जर लेखन उडाल असत तर फजिती व्हायला नको, म्हनुन धागाच काढला.....
धन्यवाद.
औरंगाबाद वरुन मला गणपतीपुळे / मालवण फार जास्त लांब होत. त्यामुळे गणपतीपुळे / मालवणचा विचार केलेला नाही.
तरीही वाचन खुन साठ्वून ठेवतो.

स्वप्क००७'s picture

7 Sep 2015 - 9:02 pm | स्वप्क००७

रेवदन्दा सोदलत कि एक पुल लगेल त्याच्या दाव्या बजुस बिर्ला मन्दिर आहे नक्कि बघा.
किहिम परिसराच्या जवलपास दोन्गरावर कुनकेश्वर्/कनकेश्वर (गनपती) मन्दिर आहे.
चौल परिसरात दोन्गरावर दत्ताचे मन्दिर आहे.
अलिबाग परिसरात फिरत आहात म्हन्जे कोर कोकनात तुम्हि फिरत नाहि आहात. जमल्यास रत्नागिरी च्या आजु बाजुचा परिसर बघावा पन दिवस कमी आहेत.

बाबा योगिराज's picture

8 Sep 2015 - 1:36 pm | बाबा योगिराज

नक्की बघेन........
वेळ कमी आहे. आणि तारखा लवकर जुळत नसल्याने थोडी कसरत आहे, म्हनुन ह्या वेळेस कोकणात जास्त खाली उतरनार नाही.

माझीही शॅम्पेन's picture

8 Sep 2015 - 1:44 pm | माझीही शॅम्पेन

मूरुड च्या किल्ल्यावर तिथले स्थानीय लोक नीट (सम्पूर्ण) माहिती देत नाहीत म्हनुन जाणार नाही.

जंजीरा किल्ला वर नाही गेलात तरी मुरुड बीच एकदम छान आहे , नागाव आणि अलिबाग दोन्ही खूप व्यवसाइक (Over Commercial) झाले आहेत त्यापेक्षा थोड आत आलात तर चांगल राहील .. ट्रिप साठी शुभेच्छा !!!

सतिश पाटील's picture

10 Sep 2015 - 12:17 pm | सतिश पाटील

योगी भाऊ

नागाव काशीद ची गर्दी सोडा...तिथून पुढे १०० किमीच्या आत असलेल्या दिवेआगार- श्रीवर्धन -हरिहरेश्वर चा विचार करा.

गणपती चोरीला गेल्यापासून या तिन्ही ठिकाणचीची गर्दी खूप कमी झालीये.निसर्गाच्या कुशीत निवांतपणा मिळेल.
धोक्याबद्दल म्हणाल तर इकडे तसं काही नाही.खादाड्यांची भरपूर सोय आहे.पिल्लांची खूप छान सोय होईल. इथून पाय काढता घेण मुश्किल होईल अशी जागा आहे.

हि घ्या हॉटेलची लिंक.http://www.srushtivilla.com/ContactUs.aspx
चांगली माणसं, अप्रतिम जेवण, आणि छान हॉटेल.

सत्याचे प्रयोग's picture

10 Sep 2015 - 5:00 pm | सत्याचे प्रयोग

दिवेआगार १ नं गर्दी नाही बीच पण खूप छान .आम्ही २० लोक गेलो होतो श्री परकर म्हणून गृहस्थ आहेत तेथे राहलो होतो . म्हातारा खडूस आहे पण कुटुंबाची सोय छान संपर्क 9403094674

बाबा योगिराज's picture

10 Sep 2015 - 6:03 pm | बाबा योगिराज

धन्यवाद. एकदा ट्राय करुन बघेन....

बाबा योगिराज's picture

10 Sep 2015 - 6:06 pm | बाबा योगिराज

सतिश भौ... तुमी पन चला की राव.....

सतिश पाटील's picture

11 Sep 2015 - 10:51 am | सतिश पाटील

लडाखमध्ये सगळे खिशे रिकामे करून आलोय...क्रेडीट कार्ड ची बिले चुकली कि मग विचार करेन...

कोकण अनुभववावा लागतो, एक दोन दिवसांत हॅाटेलात राहून पकडता येत नाही.

@श्रीवर्धन: प्रसाद भोजनालयात ऊत्कृष्ट जेवण मिळतं.

बाबा योगिराज's picture

10 Sep 2015 - 6:04 pm | बाबा योगिराज

हेच तर पहिजे होत. काय काय खायला हव???? कहि पेशल मेनु???

मी-सौरभ's picture

14 Sep 2015 - 1:15 pm | मी-सौरभ

जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा थाळिच खाल्लीये. पण बाकी जेवण पण मस्त असेल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

30 Sep 2015 - 3:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

दिवेआगरला राहिलात तर श्री.सुहास बापट यांच्या कडे अवश्य जेवा. (जि.प. शाळेजवळ) त्यांच्या कडे जे उकडीचे मोदक मिळतात ते लाजवाब आहेत. एकावेळी फारतर १५० माणसे जेवतात तिथे. सौ. बापट स्वतः जातीने लक्ष ठेवुन असतात .
गरम मोदक आणि वर तुपाची धार..तोंपासु.

विशाल कुलकर्णी यांचा धागापण वाचा. हे ही मंदीर फार छान आहे दिवेआगर ला.

http://www.misalpav.com/node/31589

जोडुन हरिहरेश्वर, श्रीवर्धनही करु शकता एक एक दिवस.

प्रचेतस's picture

30 Sep 2015 - 4:46 pm | प्रचेतस

अगदी अगदी.

बापटांकडचं जेवण साधंच पण प्रचंड सुंदर आहे.

बाबा योगिराज's picture

30 Sep 2015 - 4:50 pm | बाबा योगिराज

धाग्या बद्दल धन्यवाद. मस्त जागा आहे. अवश्य जाईन तिथे.
उकडीचे मोदक. वाह जम्या ना भौ.

बाबा योगिराज's picture

10 Sep 2015 - 5:52 pm | बाबा योगिराज

श्रीवर्धनलाच जान्याच बघतो..........
.
.
.
कंजुस भौ... खर आहे तुमच म्हनन..... पन वेळच मिळत नाही हो. जमेल तस जातोय.
कोकण तुकड्या तुकड्यात अनुभवतोय............

तुकड्या तुकड्यातच केलाय एकेक भाग.

चैतन्यमय's picture

10 Sep 2015 - 6:15 pm | चैतन्यमय

हेच म्हणणार होतो. मुरूड-नागावला फिरण्यापेक्षा हरिहरेश्वर-दिवेआगार केव्हाही चांगलेच. तिथून वेळासही जवळ आहे...अगदी नक्की जाण्यासारखं.

बाबा योगिराज's picture

10 Sep 2015 - 6:41 pm | बाबा योगिराज

बनकोट चा किल्ला आहे का तिथे???? कुठेतरी वाचल्यासारख वाटतय......

मुक्त विहारि's picture

10 Sep 2015 - 7:31 pm | मुक्त विहारि

वेळास पण एक उत्तम ठिकाण आहे.

राहण्याची सोय घरगूती.

कुटुंबासोबत रहायला फार उत्तम.

वेळासला गेलात तर, तिथे "मिरे" फार चांगले मिळतात.

श्रीवर्धन ते बाणकोट, सागरी वाहतूक आहे.गाडी सकट बोटीत जावू शकता.

सध्या पावसाळी वातावरण असल्याने, बोटीची वाहतूक सुरु आहे की नाही, ते माहीत नाही.

वेळासला राहिलात तर बाणकोट किल्ला सकाळच्या सत्रात करता येईल.

येत्या डिसेंबर-जानेवारीत, परत एकदा वेळासला जायचा बेत आहे.

मांत्रिक's picture

10 Sep 2015 - 10:38 pm | मांत्रिक

वेळास फार वेळ खाईल! खेडपासून वेळासपर्यंत जायचं तर वेळ फार लागेल, हेही लक्षात ठेवा! असो, माझ्या माहितीनुसार वेळासला नाना फडणवीसांची समाधी आहे. मिपाकर, बरोबर का?

होय...

कोकणात जागोजागी गोड शहाळी ( थोडी मलई-पातळ खोबरे असलेला आणि गोड पाणी असलेला नारळ) खायला मिळतील हा गोड गैरसमज दूर ठेवा.
त्यासाठी म्हैसूला जावे लागेल.

रुस्तम's picture

11 Sep 2015 - 2:00 pm | रुस्तम

हे "म्हैसू" कोठे आहे?

बाबा योगिराज's picture

11 Sep 2015 - 8:51 pm | बाबा योगिराज

ख्या ख्या ख्या.........

कंजूस's picture

11 Sep 2015 - 9:17 pm | कंजूस

म्हैसूर वाचा.

मला वाटतं अलिबाग मध्ये फारस कोणास ठाऊक नसलेला पण सुरेख आणि नितांतसुंदर समुद्रकिनारा म्हणजे नांदगावचा समुद्रकिनरा.
हा किनारा काशीद आणि मुरुड-जंजिरा यांच्यामध्ये आहे. काशीदहून जंजिर्या कडे जाताना वाटेत नांदगाव आहे. गावात श्री सिद्धिविनायकाचे सुरेख मंदिर आहे.
घरगुती राहण्याची व्यवस्था होऊ शक्ते. किनारा अत्यंत शांत आणि गजबजाटापासून दूर आहे.
खर्याखुर्या अस्सल कोकणाची अनुभूती इथे मिळते.

बाबा योगिराज's picture

14 Sep 2015 - 11:20 am | बाबा योगिराज

खुपच सुंदर मंदिर आहे ते.......... एकदम शांत जागा आहे..... गूगल बाबा वर शोधल्यावर लक्षात आल... परंतु तेथील समुद्र बघितलेला नाही........

अ.रा.'s picture

14 Sep 2015 - 12:16 pm | अ.रा.

नांदगावचा समुद्रकिनारा खूपच सुरक्षित आहे. खोलवर चालत जाता येते. कुटुंबासाठी अगदी योग्य जागा आहे. कारण इथे गर्दी अजिबात नसते .
मी ४ वर्षात ३ वेळा तेथे जाऊन आलो आहे. माझं ते आवडीचं ठिकाण झाले आहे.
मंदिराजवळच राहण्याची उत्तम सोय होऊ शकते. राहण्याची सोय (तांबडकर - ९४२२३५९०२८)

उपेन्द्र's picture

17 Sep 2015 - 11:07 pm | उपेन्द्र

अलिबागच्या जवळ वरसोली नावाचा समुद्र किनारा अधिक शान्त आहे. अलिबागचाच भाग म्हटल तरी चालेल. ६ किमी वर शिल्पकार करमरकर यान्चे सासवणे गाव आहे. (किहिमच्या दिशेने) तिथे त्यान्च्या शिल्पान्चे एक सुन्दर पण आटोपशीर सन्ग्रहालय आहे. कोर्लईचा किल्ला आणि त्यावरचे लाईट हाऊस पण पहाण्यासारखे आहे.

कपिलमुनी's picture

30 Sep 2015 - 4:34 pm | कपिलमुनी

किती वर्षांपूर्वी गेला होतात?

दिवेआगर, श्रीवर्धन बेस्ट!!वे़ळास जमत असेल तर उत्तमच!!

मांत्रिक's picture

30 Sep 2015 - 5:17 pm | मांत्रिक

ओ बूटीवाले बाबाजी, सहल झाली की फोटु तेवढे टाका.

बाबा योगिराज's picture

30 Sep 2015 - 6:37 pm | बाबा योगिराज

वॉक्के रिपोर्ट.