मिपावर विडंबने वाढत आहेत

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
3 Sep 2015 - 8:22 pm
गाभा: 

आपल्या मिपावरील विडंबनांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने विडंबनांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारची विडंबने बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन लेखन दुरापास्त होत आहे.

ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या विडंबनकारांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील. चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते.

प्रत्येक विडंबनकाराने हा विचार करावा की ज्यांनी मिपाच्या भल्यासाठी पुर्ण वेळ दिला त्यांच्यावर आपल्यामुळे मिपापासुन दूर जाण्याची वेळ येऊ नये.

एवढे बोलुन मी माझा निबंध संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.

प्रतिक्रिया

दमामि's picture

3 Sep 2015 - 8:27 pm | दमामि

खिक्क!

मामोऑ- अरे दमाम्या मी पयला संघटना कदीचीच बुडाली रे.
असो अरे श्रीगुरुज्या बोलले असते पण..
जाऊदे इतकेच बोलते.
का हि हं श्री..- मामोऑ.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Sep 2015 - 8:52 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

परत वेगळा धागा काढू नकोस असा ह्यांचा आग्रह त्यामुळे-
आपल्या मिपावरील भक्तांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने भक्तांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या विरोधकांना मखरात सजवले जाते, तिथे असे भक्त पाहून बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके भाजपाळलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन विचार करणे दुरापास्त होत आहे.

ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या भक्तांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले विरोधक उत्तमोत्तम लेख देत राहतील. चांगल्या लेखकांना फक्त दोन डझन चांगल्या प्रतिसादांची अपेक्षा असते व वाचकांचे प्रेम हवे असते.

प्रत्येक भक्ताने हा विचार करावा की ज्यांनी मिपाच्या भल्यासाठी पुर्ण वेळ दिला त्यांच्यावर आपल्यामुळे मिपापासुन दूर जाण्याची वेळ येऊ नये.

एवढे बोलुन मी माझा निबंध संपवते.जय हिंद

कपिलमुनी's picture

3 Sep 2015 - 11:22 pm | कपिलमुनी

माईंचा षटकार

पगला गजोधर's picture

4 Sep 2015 - 8:30 am | पगला गजोधर

ठ्ठो, या वेळी माईंनी पदर खोचून,काष्टा खवून, बांगड्या कोपऱ्यापर्यंत मागे सारून, गगनभेदी फटका मारल्यामुळे चेंडू नागपुरात पोहोचला.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2015 - 10:49 am | कैलासवासी सोन्याबापु

हे आवडले !!! कुठल्याही अतिरेकामुळे नुकसानच होणार मग ती मोदींची अंधभक्ति असो किंवा त्यांना अतिशय खालच्या पातळी वर जाऊन केलेला विरोध असो, धार्मिक टोकदार भावना असो वा सेक्युलर विचारअसो, अतिरेक वाईटच

(अतिरेकी सरासार)बाप्या

बेक्कार हसतोय जबरदस्त...!!!

श्रीगुरुजी's picture

4 Sep 2015 - 3:07 pm | श्रीगुरुजी

>>> परत वेगळा धागा काढू नकोस असा ह्यांचा आग्रह त्यामुळे-

माईसाहेब,

जबरी षटकार मारलात. चेंडू एकदम मैदानाबाहेर. परंतु षटकार मारला तुम्ही आणि धावा मात्र तुमच्या 'ह्यां'च्या म्हणजे नानांच्या नावावर जमा होतील की काय असं वाटतंय.

तुम्ही नानांच्या पदराआड किती लपणार? कधीतरी बाहेर या. तुमच्या 'ह्यां'चे आजवर असंख्य आयडी झाले, त्यांनी असंख्य धागे काढले पण तुम्ही एकही धागा काढायची 'ह्यां'ची परवानगी नाही हे खूप खटकतंय.

द-बाहुबली's picture

3 Sep 2015 - 9:31 pm | द-बाहुबली

लिखाण आवडले. धन्यवाद.

आस्तिक शिरोमणि's picture

4 Sep 2015 - 12:54 am | आस्तिक शिरोमणि

हे एकसारखेच लेखन वाटते आहे.

पळून जाणारे विडंबनाला घाबरून पळून जात आहेत हे हे सिद्ध करा.

नाखु's picture

4 Sep 2015 - 8:33 am | नाखु

इथे वरीजनल मालाचीच वानवा तिथे विडंबन काय पडणार कप्पाळ !~!!!

लाट (कर) आल्यासारखे रतीब लेख येतायत आणि लोकं त्यात काठाकाठाने भिजतायत झालं इतकच काय ते ही "ज्योत" ही फडफडून जावू नये हीच अपेक्षा !

अभामिपाभरताडखोगीर्भरतीरद्दीसुमार्लेखन्हटाव्सासंसचालीत्लेखकाडवालिखाणजिरवा अभियान अंतर्गत मिपाकर चाचक पत्रेमधून साभार.

नुसती लांबी बघूनच खिदळत सुटलोय...वाचायची हिंमत होत नैये....

अभामिपाभरताडखोगीर्भरतीरद्दीसुमार्लेखन्हटाव्सासंसचालीत्लेखकाडवालिखाणजिरवा

जिभेला गाठ बसली वाचता वाचता =]]]

खटपट्या's picture

4 Sep 2015 - 10:44 am | खटपट्या

या लेखाचे विडंबन नाही आले म्हणजे मिळवली...

आनन्दा's picture

4 Sep 2015 - 11:36 am | आनन्दा

हे घ्या -

खटपट्या's picture

4 Sep 2015 - 11:44 am | खटपट्या

अरारारा! एवढ्या लवकर तर हाटेलात ऑर्डर दीलेला चहा पण येत नाय वो. काय ती तत्परता ....

सामान्यनागरिक's picture

4 Sep 2015 - 12:31 pm | सामान्यनागरिक

मला तर विडंबने आवडतात. आणि ती योग्य त्या खेळीमेंळीच्या स्पिरीट ने वाली तर आनंददायक असतात ।