अगा ते ब्रम्हकमळ उमलले दारी...

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
3 Sep 2015 - 4:23 pm

आमच्या टेरेसवरच्या छोट्याश्या बागेत अनेक वर्षे एक ब्रह्मकमळाचे (Epiphyllum oxypetallum) रोपटे एक कोपरा पकडून झोपाळू अनामिक सदस्यासारखे चूपचाप पडून आहे. हिमालयात आणि श्रीलंकेत मूळ घर असलेली ही वनस्पती भारताच्या अनेक घरांच्या बागेत रोपट्यांच्या स्वरूपात वाढवली जाते. तिचा भारतापेक्षा थोडा वेगळा प्रकार (Phyllocactus purpusii) मेक्सिको, ब्राझील, इ अमेरिकन खंडातील देशांतही सापडतो.

बागेतल्या इतर नखरेल वृक्षवल्लींना सांभाळताना आणि त्यांच्या सुंदर रूपरंगाचे कौतुक करताना या कार्टूनमध्ये रोडरोलर अंगावर जाऊन सपाट झाल्याप्रमाणे दिसणार्‍या बिचार्‍या वनस्पतीकडे बर्‍याचदा लक्षही जात नाही. कारण Epiphyllum oxypetallum असे भारदस्त शास्त्रीय नाव आणि ब्रम्हकमळ असे दैवी भारतीय नाव असलेल्या या झुडुपाला फार आकर्षक रूपरंग नाही. ऑर्किड-कॅक्टस (Family Cactaceae) प्रकारात मोडणार्‍या या झुडुपाच्या फांद्या लांबलचक पानांसारख्या दिसतात (phylloclade) आणि त्यांच्या कडांत असलेल्या खाचांसारख्या दिसणार्‍या डोळ्यांतून नवीनं फांद्या फुटतात. याला Jungle cactus व Dutchman's Pipe या नावानेही ओळखले जाते...

अशी ही वनस्पती आमच्या टेरेस बागेत जवळ जवळ तीन वर्षे निद्रावस्थेत राहिल्यावर अचानक जागी होवून काही दिवसांपूर्वी आपले अस्तित्व जाणवून द्यायला लागली. तिच्या सर्वात समोरच्या फांदीच्या एका डोळ्यामधून अगदी डोळ्यात भरेल अश्या मोक्याच्या जागी एक पिटुकले बाळ डोकावू लागले आणि त्याने "मी सर्वसामान्य फांदी नसून एक बालकलिका आहे" हे जाहीर केले. हे कवतिक हा हा म्हणता सर्वसामान्य झाडांच्या कळ्यांना स्वतःबद्दल न्यूनत्व वाटावे इतके मोठे झाले. ती कलिका अर्थातच घरातल्या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र झाले यात काहीच आश्चर्य नव्हते !

 ......

तिचे फूल हे या वनस्पतीचे सर्वात मोठे आकर्षण आहे. या वनस्पतीला अनेक (३ ते ५) वर्षांतून एखादेवेळेस फुल येते आणि ते कधी येणार याचा अंदाज कळी दिसायला लागल्यावरच येतो, हे कारणही तिच्याबाबतची उत्सुकता वाढवते. १० ते ३० सेमी लांब देठावर १५ ते ३० सेमी लांब आणि १५ ते २० सेमी रुंदीचे असलेले हे फूल विशालकाय तर असतेच, पण त्याच्या गुंतागुंतीच्या पण नाजूक रचनेने त्याला जगप्रसिद्धी मिळवून दिली आहे. याला त्यात असलेल्या benzyle salisylate मुळे मंद गोडसर वास असतो. या फुलाचा अजून एक विशेष म्हणजे ते सर्वसाधारण फुलांच्या विपरित संध्याकाळी उमलायला लागते, मध्यरात्री पूर्ण उमलते आणि सकाळपर्यंत कोमेजून गळूनही पडते ! थोडक्यात, हे फूल उमलण्याचा प्रवास आणि त्याचे पूर्ण उमललेले रुपडे पहायचे असेल तर जागरण करायला लागते.

आम्ही रात्री जागून पाहिलेल्या या अनवट फुलाची जीवनयात्रा तुम्ही दिवसाउजेडी आरामात खुर्चीत बसून खालील चित्रांच्या रूपात पहा...

 ......
ब्रह्मकमळ : ०१ व ०२ : संध्याकाळी ५ व ६ वाजता

.


ब्रह्मकमळ : ०३ : रात्री ९ वाजता

.


ब्रह्मकमळ : ०४ : रात्री ९ वाजता

.


ब्रह्मकमळ : ०५ : रात्री १० वाजता

.

 ......
ब्रह्मकमळ : ०६ व ०७ : रात्री १० व ११ वाजता

.


ब्रह्मकमळ : ०८ : रात्री १२ वाजता पूर्ण फुललेले फूल

.


ब्रह्मकमळ : ०९ : रात्री १२ वाजता पूर्ण फुललेले फूल

.


ब्रह्मकमळ : १० : १२ वाजता पूर्ण फुललेले फूल

.

मध्यरात्रीनंतर हे फूल कोमेजू लागते आणि सकाळपर्यंत हे एका रात्रीचे आश्चर्य संपून जाते !


ब्रह्मकमळ : ११ : सकाळी कोमेजलेले फूल

.

सकाळी १० वाजेपर्यंत फूल झाडावरून गळून गेले होते आणि ते झुडूप जणू काहीच घडले नाही असे पूर्वीप्रमाणे टेरेसच्या एका कोपर्‍यातिल तटस्थ सदस्य झाले होते...


ब्रह्मकमळ : १२ : दुसर्‍या दिवशी सकाळी दिसणारे ब्रह्मकमळ झुडूप

.

इतके दिवस दुर्लक्षित असलेल्या या झुडुपाने त्याचा प्रसिद्ध चमत्कार दाखविल्यामुळे आता दुसरी कळी आली की काय हे पाहण्यासाठी त्याच्या दर फांदीचे रोज मोठ्या कुतूहलाने निरीक्षण केले जाणार आहे हे काय सांगायलाच हवे काय ?!

.

मौजमजास्थिरचित्रबातमीविरंगुळा

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

3 Sep 2015 - 4:27 pm | मांत्रिक

मस्त! आवडला प्रवास त्या फुलाचा! छायाचित्रे पण छान आहेत!
शास्त्रीय माहिती विशेष आवडली!

खेडूत's picture

3 Sep 2015 - 4:30 pm | खेडूत

वाह!
यावरून हा आणि हा धागा आठवला ....

याची रोपे मिळ्तात का?
कधी लावायची असतात?

मांत्रिक's picture

3 Sep 2015 - 5:07 pm | मांत्रिक

पानाचा तुकडाच लावतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2015 - 8:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही वनस्पती कॅक्ट्स कुटुंबातील आहे. तिचा पानासारखा दिसणारा भाग खोड असते. ते लावून नविन रोप तयार करता येते.

सौंदाळा's picture

3 Sep 2015 - 4:36 pm | सौंदाळा

मस्त
१० वर्षापुर्वीच्या आमच्या ब्रह्मकमळाच्या आठवणी ताज्या झाल्या.
एकंदर ३/४ वेळा फुले आली पण नंतर झाडाला किड लागली यथावकाश आम्हीपण नविन घरी शिफ्ट झालो. आता इ़कडे मोठा टेरेस आहे पण आज्/उद्या करत कोणतेच झाड (तुळशीचे रोप सोडुन) अजुन लावले नाही.
तुमच्या बाकीच्या रोपट्यांबद्दल पण माहिती द्या.

अमृत's picture

3 Sep 2015 - 4:38 pm | अमृत

गेल्या आठवड्यात हा उमलण्याचा लाइव सोहळा बघितला शेजार्यांकडे.घरी अनंताच रोप आहे नुकतच त्यालापण छान्दार फुल येउन गेलं. तेपण असच एक दिवस राहुन गळून पडलं. मात्र सुगंध पूर्ण गच्चीत भरून राहीला होता.

कालच क्रुष्णकमळ बघितले आज हे...

छान.

सस्नेह's picture

3 Sep 2015 - 5:12 pm | सस्नेह

सुरेख सोहळा !

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2015 - 5:21 pm | अत्रुप्त आत्मा

मस्त स्टोरी आणि फोटूही.

मस्तच. आमच्याही घरी असे एक झुडूप होते. एकेकावेळी वीसवीस फुले पाहिली आहेत. अतिशय सुंदर आणि नाजुक फूल. रच्याकने, ब्रह्मकमळ ही वेगळी वनस्पती आहे आणि ती अंदाजे ४००० की काहीतरी उंचीवर आढळते. जमिनीलगत वाढते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2015 - 8:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

ब्रम्हकमळ हे नाव एकापेक्षा जास्त वनस्पतींना दिलेले आढळते :

१. लेखातली वनस्पती Epiphyllum oxypetalum.

२. फक्त हिमालयात आढळणारी Saussurea obvallata ही वनस्पती...

३. Nelumbo nucifera या कमळाच्या एका जातीलाही ब्रम्हकमळ या नावाने ओळखले जाते...

(वरची दोन्ही चित्रे जालावरून साभार)

नूतन सावंत's picture

3 Sep 2015 - 6:41 pm | नूतन सावंत

अतिशय आवडते फुल.सुरेख लेख.

प्यारे१'s picture

3 Sep 2015 - 8:46 pm | प्यारे१

मस्त फुलं उमललीत.
(मोबल्यावरनं दिसत नव्हती नीट)
बेष्ट!

प्रचेतस's picture

3 Sep 2015 - 8:52 pm | प्रचेतस

सुरेख.
अतिशय नाजूक फूल.

रेवती's picture

3 Sep 2015 - 9:02 pm | रेवती

माझा गणेशा झालाय.

नाव आडनाव's picture

3 Sep 2015 - 9:12 pm | नाव आडनाव

तीन मशीन वर आणि तीन वेगवेगळ्या ब्राऊजर वर बघून झालं - एक क्लायंट नेट्वर्क मधलं, एक हापिसातलं आणि एक घरचा लॅपटॉप, तरी चित्रं काय दिसंना.

पद्मावति's picture

3 Sep 2015 - 9:12 pm | पद्मावति

मला फोटो दिसत नाहीये. डॉ. म्हात्रे यांच्या प्रतिसादातले फोटो दिसताहेत पण मूळ लेखातले दिसत नाहीये.

दिव्यश्री's picture

3 Sep 2015 - 9:17 pm | दिव्यश्री

रेवाक्का शांती करुण घे बै आधी. मगच फोटु दिसतील तुला...
मला सगळे फोटु दिसत आहेत. मस्त आहेत .

आमच्य ओळखीतील एका तैकडे एका वेळेस २१ आणी ५१ फुले आली होती ब्रह्म्कमळाची. :)

मस्त! माझ्या घरीही एकदा हा सोहळा झाला होता.आमच्या शेजारचे लोक तर पूजा करुन गेले होते!

माझिया मना's picture

3 Sep 2015 - 11:47 pm | माझिया मना

छान!

लेखातले फोटो दिसत नाहीत परंतू प्रतिक्रियांतले दोन दिसत आहेत.

नंदन's picture

4 Sep 2015 - 4:48 am | नंदन

मस्त! 'एक एक नक्षत्राचा दिवा लागताना, आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना' ही (एरवी अ‍ॅनाक्रोनिस्टिक वाटणारी) ओळ आठवून गेली.

स्पंदना's picture

4 Sep 2015 - 5:12 am | स्पंदना

सुरेख प्रतिसाद!!

श्रीरंग_जोशी's picture

4 Sep 2015 - 4:52 am | श्रीरंग_जोशी

निसर्गाची ही अद्भुत किमया आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

स्पंदना's picture

4 Sep 2015 - 5:15 am | स्पंदना

इतक रसभरीत वर्णन वाचून डोळ्याचे पारणे फिटले.

आमच्याकडे दरेक वर्षी फुलायची ही फुलं!! त्यामुळे ३-४ वर्षातुन एकदा वाचून आश्चर्य वाटल.

एक खुराक सांगते झाडांना.
आपण रोज ज्या भाज्या बनवतो त्याचा फेकून द्यायचा भाग, म्हणजे देठ, साले, पाने हे सगळ डायरेक्ट मिक्सरवर फिरवा आणी कुंडीत ओता. झकास वाढतात रोपं.

पिशी अबोली's picture

4 Sep 2015 - 3:29 pm | पिशी अबोली

सुरेख!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Sep 2015 - 4:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकांना अनेकानेक धन्यवाद !

@ चित्रे दिसत नाहीत : मी परत परत ताडून पाहिले. मला व बहुतेक वाचकांना चित्रे नीट दिसत आहेत.

चिगो's picture

4 Sep 2015 - 4:06 pm | चिगो

अत्यंत रोचक आणि काही अंशी थरारकपण आहे ह्या ब्रम्हकमळाची कथा.. शेअर केल्याबद्दल धन्यवाद डॉक्टरसाहेब..

pradnya deshpande's picture

4 Sep 2015 - 6:20 pm | pradnya deshpande

मराठवाड्यात ब्रम्हकमळ उमलले कि पुरणपोळी करतात. शेजारी पाजारी बोलावून कौतुकाने फुललेले कमळ दाखवले जाते. पेढेही वाटले जातात.

हेमंत लाटकर's picture

5 Sep 2015 - 11:36 am | हेमंत लाटकर

छान माहिती. डाॅ. म्हात्रे तुम्ही छान लिहता.

कलंत्री's picture

5 Sep 2015 - 12:24 pm | कलंत्री

सर्वच वृतांत वाचुन अतिव आंनद झाला. तुमच्या बागेत यायचा नक्कीच आवडेल. बागेचा आंनद सर्वजण घेतातच परन्तु शास्त्रीय माहितीचा आग्रह फारच कमी लोक करत असतात.
अभिनंदन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2015 - 8:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद ! तुमचे स्वागतच असेल.

आमच्या छोट्याच्या टेरेसवर अगदी इटुकलीच बाग आहे. तिचे फोटो खालच्या दुव्यांवर पाहू शकाल...

पुष्पांजली
पुष्पांजली २

अरुण मनोहर's picture

5 Sep 2015 - 1:19 pm | अरुण मनोहर

क्रोम ब्राउझर मध्ये लेखातली चित्रे दिसलीच नाहीत , पण प्रतिक्रियामधली दिसली
मात्र आय ई मध्ये सगळी चित्रे छान दिसली !

डॉ सुहास म्हात्रे , धन्यवाद !

छायाचित्रे दिसत नाहीत , पण खूप चांगली माहीती सांगीतलीत.

खटपट्या's picture

5 Sep 2015 - 8:35 pm | खटपट्या

खूप छान.

हे ब्रह्म कमळ कीती रात्र असते? की एकाच रात्रीत गळून पडते ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2015 - 8:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकच रात्र असते. संध्याकाळी उमलू लागते, रात्री बारापर्यंत पूर्ण उमलते आणि सकाळपर्यंत कोमेजून जाते.

हुप्प्या's picture

6 Sep 2015 - 12:50 am | हुप्प्या

फूल हे वनस्पतीच्या पुनरुत्पादनाकरता निर्माण होते असे वनस्पतीशास्त्र शिकवते. तीन चार वर्षातून एकदा अल्पकाळ फुलणार्‍या ह्या फुलाचा पुनरुत्पादनाकरता काय उपयोग होणार? साधारणपणे निसर्गाचा असा कल असतो की एका झाडाचे पुंकेसर दुसर्‍या झाडाच्या फुलात पडावेत जेणेकरून जास्त सुदृढ वनस्पती बनतील. इथे तसे होणे फार शक्य वाटत नाही. मग ही वनस्पती क्रॉस पॉलिनेशन न होता इतका टिकाव कशी धरू शकली? ही फुले उभयलिंगी असतात का? ह्यातून काही फलनिष्पत्ती होते का?
कुणाला माहीत असेल तर सांगा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2015 - 5:14 am | डॉ सुहास म्हात्रे

ही वनस्पती तिच्या पानासारख्या दिसणार्‍या खोडाच्या तुकड्यापासून दुसरीकडे वाढते. फुलांचा वंशवृद्धिला उपयोग होत नाही. एकाच फुलात पुंकेसर व स्त्रीकेसर असतात, हे जवळून घेतलेल्या फोटोत दिसत आहे.

हुप्प्या's picture

6 Sep 2015 - 7:23 am | हुप्प्या

खोडाच्या तुकड्यापासून होणारे पुनरुत्पादन एका बाबतीत कमी असते ते म्हणजे मूळ झाडाच्याच जीन्स जशाच्या तशा बाळगून असते. त्यात कुठलाही बदल, कुठलीही सुधारणा होत नाही. असा बदल न होणार्‍या वनस्पती परिस्थितीशी जुळवून घेण्यात मागे पडतात. लैंगिक पुनरुत्पादन न करता ही वनस्पती इतकी वर्षे टिकली कशी हे माझ्या लेखी गूढ आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2015 - 10:29 am | डॉ सुहास म्हात्रे

नैसर्गिक अलैंगिक वंशविस्तार (नॅचरल असेक्शुअल प्रोपॅगेशन) ही वनस्पतींमध्ये (प्लँट किंगडम) मध्ये फारशी विरळ नसलेली गोष्ट आहे. ही वनस्पती त्याचेच एक उदाहरण आहे. निम्नस्तरीय प्राणीवंशांतही नैसर्गिक अलैंगिक वंशविस्तार आढळतो. अर्थात, जसजसे आपण जीवसृष्टीच्या वरवरच्या स्तरांवर जातो तसतसे नैसर्गिक अलैंगिक वंशविस्तार विरळ होत जातो आणि उच्च्स्तरावर सर्वसाधारणपणे नाहीसा होतो.

जीवांमधले पुढच्या पिढीत संक्रमित होऊ शकणारे बदल जनुकांतील उत्परिवर्तनांमुळे होतात. उत्परिवर्तने सक्रियपणे घडवून आणली जात नाहीत, ती डीएनएच्या नविन शिड्या (डबल हेलिक्स) बनवले जात असताना होणार्‍या चुका/अपघातांमुळे घडत असतात. जनुकांमध्ये होणारी उत्परिवर्तने (म्युटेशन्स) केवळ लैंगिक वंशविस्तारामद्ध्येच होत नाहीत तर स्वयंस्फूर्त उत्परिवर्तनांमुळेही (स्पॉंंटॅनिअस म्युटेशन्स) होऊ शकतात. किंबहुना मेंडेलियन इन्हेरिटन्स थिअरी आणि डार्विनियन नॅचरल सिलेक्शन थिअरीमध्ये असलेल्या मोठ्या तृटी स्वयंस्फूर्त उत्परिवर्तनांच्या शोधाने भरून काढल्या आहेत.

फुले येणार्‍या पण केवळ असेक्शुअल प्रोपॅगेशन होणार्‍या वनस्पतींबाबत खालील शास्त्रीय अंदाज करता येईल :

इतकी गुंतागुंतीची आणि सुंदर रचना असलेल्या फुलाला काही लाख/कोटी वर्षांपूर्वी या वनस्पतीच्या लैंगिक वंशविस्तारामद्ध्ये महत्वाचे स्थान असूही शकेल (या फुलाचे स्वरूप पाहता ते बहुदा असावेच). पण पुढच्या काळातील काही उत्परिवर्तनांच्या अपघातात ते नाहीसे झाले असावे. त्याअगोदरच्या अथवा त्याबरोबरच्या काळात झालेल्या इतर उत्परिवर्तनामुळे या वनस्पतीत असेक्शुअल प्रोपॅगेशन शक्य झाले असावे आणि त्यामुळेच ती आजही आस्तित्वात राहू शकली आहे. त्याचबरोबर, फुलाची जनुके वनस्पतीत अजूनही शिल्लक असल्याने त्या वनस्पतीच्या वंशविस्तारात काहीही महत्व नसतानाही तिला आजही फुले येत आहेत.

मांत्रिक's picture

6 Sep 2015 - 11:26 am | मांत्रिक

सुंदर! हुप्प्या व डॉक्टर यांच्या संवादातून खूप मस्त माहिती मिळाली.
जनुकांमध्ये होणारी उत्परिवर्तने (म्युटेशन्स) केवळ लैंगिक वंशविस्तारामद्ध्येच होत नाहीत तर स्वयंस्फूर्त उत्परिवर्तनांमुळेही (स्पॉंंटॅनिअस म्युटेशन्स) होऊ शकतात. ही माहिती विशेष आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2015 - 12:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजून एक...

अलैंगिक पुनरुत्पादन दर वेळेस वाईटच ठरेल असे नाही... विशेषतः ते कृत्रीमरित्या केले जाते तेव्हा त्याचा मुख्य उद्येशच मूळ वनस्पतीचे सर्व गुणधर्म तसेच्या तसे ठेवणे हा असतो.

उदा: हापूस आंबा हा कलम केला तरच नवीन झाडाच्या फळांची गुणवत्ता उत्तम असेल याची खात्री असते. ती खात्री बाठ्यापासून तयार केलेल्या आंब्याच्या झाडाबद्दल देता येत नाही. याशिवाय कलमाचा अजून एक फायदा म्हणजे नवीन झाड (तीन ते चार वर्षांत) बाठ्यापासून बनवलेल्या झाडापेक्षा (पाच ते आठ वर्षे) लवकर फळे देते.

हुप्प्या's picture

6 Sep 2015 - 11:22 pm | हुप्प्या

किडे, अळ्या अन्य जीवजंतूंनी झाड नष्ट होऊ नये म्हणून ती वनस्पती आपल्या अंगात काही गुणवैशिष्ट्ये बाळगून असते. काही झाडांना काटे असतात, काहींच्या खोडात विशिष्ट रसायन असते जे किड्यांना दूर ठेवते. काहींची पाने तर काहींच्या बिया विषारी असतात. हे गुणधर्म उत्क्रांत होतच असतात. पण दुसरीकडे किडेही उत्क्रांत होत असतात. अशा प्रतिरोधकांना पुरुन उरणारे किडे टिकाव धरतात आणि त्यांच्या वंशांची भरभराट होते. जर झाडातली उत्क्रांती अलैंगिक पुनरुत्पादन कमी करून थांबवली वा मंदावली तर अशी झाडे किड्यांच्या धाडीला बळी पडू शकतात. माझ्या माहितीनुसार केळ्याला असा धोका आहे. जगभर लागवड केल्या जाणार्‍या ह्या अत्यंत लोकप्रिय वनस्पतीत आता जैविक वैविध्य उरलेले नाही. साधे केळे (सोनकेळे वगैरे नाही) म्हणून जे विकले जाते ते सर्वत्र एकाच जातीचे असते.
कलम प्रकारात गुणवत्तेची खात्री असते तशीच झाडावर तुटुन पडणारे जीवजंतू किडे, हवामानातील चढउतारांना तोंड न देता येण्याचा दुबळेपणा हाही पुढील पिढीत उतरेल ह्याची खात्री असते तेव्हा ती एक दुधारी तलवार आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2015 - 12:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

कलम प्रकारात गुणवत्तेची खात्री असते तशीच झाडावर तुटून पडणारे जीवजंतू किडे, हवामानातील चढउतारांना तोंड न देता येण्याचा दुबळेपणा हाही पुढील पिढीत उतरेल ह्याची खात्री असते तेव्हा ती एक दुधारी तलवार आहे.

मूळ पेशींतले सर्व चांगले वाईट गुणधर्म कलम / टिश्शू कल्चर वापरून बनवलेल्या वनस्पतींत येणार हे स्पष्ट आहे. त्यामुळेच अशी पैदास शास्त्रीय पद्धतीने करताना मूळ वनस्पती उत्तम गुणसंपन्न आणि (निदान न परवडणार्‍या दोषांबाबत) दोषरहित असल्याची खात्री करून केली जाते. यात (आणि इतर कशातच) "१००% उत्त्तम गुण असलेले व १००% टक्के अवगुण काढून टाकलेले" वाण मिळणे वास्तवात शक्य नसतेच. तेव्हा काही सर्व अधिक-उणे जोडल्यावर जास्तीत जास्त फायदेशीर वाण मिळविताना काही तडजोडी कराव्याच लागतात... फक्त त्या तडजोडी करताना दूरगामी परिणाम जमेस धरून शास्त्रीय पद्धतीने करणे हेच आपल्या हातात असते.

अर्थात सद्या जनुकीय शास्त्र ज्या वेगाने पुढे चालले आहे ते पाहता, दूरच्या भविष्यात केवळ उत्तम जनुके निवडून आणि नको असलेली जनुके वगळून आदर्श जीव बनविता येण्याची शक्यता नाकारता येत नाही... तो पर्यंत एकुणात (नेट रिझल्ट) फायदेशीर असलेल्या तडजोडी करणे भाग आहे.

हेच सर्व नैसर्गिकरीत्या "घडण्यासाठी" हजारो/कोट्यवधी वर्षे लागतात, शिवाय निसर्गाचे बदल हे स्वैर (रॅंडम) तत्त्वावर चालत असल्याने, इतक्या मोठ्या कालानंतरही, "१००% उत्त्तम गुण असलेले व १००% टक्के अवगुण काढून टाकलेले" वाण तयार होईल याची खात्री नसतेच. नैसर्गिक पद्धतीत, बदलत्या परिवेशात (एन्व्हिरॉन्मेंट) जीवाला तगण्यासाठी आणि वंशवृद्धीसाठी आवश्यक ते गुणधर्म त्याच्यात योगायोगाने आले, तरच तो तगतो नाहीतर नष्ट होतो. जरी तगला तरी त्यात मानवाला आवश्यक वाटणारे गुणधर्म असतीलच याची खात्री नसते. किंबहुना जीवाला तगण्यासाठी उपयोगी पडलेले गुणधर्म मानवाला व इतर जीवांना धोकादायकही असू शकतात... अनेक वनस्पती आणि प्राणी अश्याच गुणधर्मांमुळे आजवर तगून आहेत, उदाहरणार्थ : वनस्पतींमधील काटे, कडू चव, विषे आणि प्राण्यांतील विषे, नखे, आक्रमकपणा.

मुख्य म्हणजे मानवाला उपयोगी असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या विकासात मानवाचा हस्तक्षेप ही काही आधुनिक काळातली गोष्ट नसून ती प्राचीन काळापासून चालत आलेली प्रथा आहे. आजच्या मानवी जीवनात उपयोगी ठरलेले सर्वच प्राणी व वनस्पती या "मानवाच्या हस्तक्षेपामुळेच" "मानवाला उपयोगी अश्या गुणधर्माच्या" झाल्या आहेत. या मानवी हस्तक्षेपामुळेच केवळ १०,००० वर्षांत मानव प्रगतीची फार मोठी झेप घेऊ शकला. या हस्तक्षेपाला मानववंशशास्त्रात "वनस्पतींचे व प्राण्यांचे घरगुतीकरण अथवा पाळीव बनवणे (डोमेस्टीकेशन)" असे म्हणतात. डोमेस्टीकेशनच्या काही शे ते हजार वर्षांच्या टप्प्यात, मानवाने निसर्गात रानटी अवस्थेत असलेल्या अनेक वनस्पती व प्राण्यांमध्ये अलगीकरणाचे (सेपरेशन) व संकराचे (हायब्रिडायझेशन) प्रयोग करत निकष-चूक (ट्रायल अँड एरर) पद्धतीने "उत्तम अन्नधान्य व फळे देणार्‍या वनस्पती" आणि "शेतकाम, वाहतूक, व्यापार व युद्धाला उपयोगी प्राणी" विकसित केले आहेत*. तसे झाले नसते तर आजच्या मानवाच्या वापरातल्या सर्व वनस्पतींच्या व प्राण्याच्या जाती आजच्या इतक्या सुधारीत व इतक्या मानवोपयोगी नक्कीच झाल्या नसत्या. आधुनिक शात्रीय प्रगतीमुळे हल्ली त्या मूळ प्राचीन प्रक्रियेत नवीन प्रगत पद्धतींची भर पडत चालली आहे, इतकेच.

असो हा फार मोठा विषय आहे. पण वरील स्पष्टीकरण मुद्दा समजण्यास पुरेसे ठरावे.

======

* : आपल्या नेहमीच्या व्यवहारात वापरल्या जाणार्‍या सर्वच वनस्पती व प्राणी ही डोमेस्टीकेशनची उदाहरणे आहेत. त्यातली दोनच प्रातिनिधिक उदाहरणे अशी आहेत:

१. मानवाने रानटी घोडा माणसाळवून त्याचे मानवोपयोगी पाळीव घोड्यांच्या वाणांत परिवर्तन घडवून आणले नसते तर प्राचीन व मध्ययुगीन आंतरखंडीय व्यापार व प्रचंड साम्राज्ये उभी राहणे अशक्य होते व पुढचा मानवी विकासही शक्य झाला नसता.

२. जवळ जवळ ४,००० वर्षे अलगीकरण आणि संकराचे प्रयोग करून अमेरिकेतील प्राचीन मानवाने इंचभर लांब कणीस आणि मोहरीइतके दाणे असलेल्या एका रानटी वनस्पतीला, फूटभर लांब कणीस व मूळातल्यापेक्षा २०-२५ पट मोठे दाणे असलेल्या मका या आजच्या आधुनिक वनस्पतीत विकसित केले आहे. अन्नधान्य देणार्‍या सर्व वनस्पती कमी अधिक फरकाने याच पद्धतीतून विकसित झाल्या आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2015 - 2:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

कर्मधर्मसंयोगाने याच विषयावर एक उत्तम मालिका मिपावर चालली आहे. वरच्या चर्चेच्या संदर्भात त्यातला हा लेख तर अत्यंत उल्लेखनीय आहे.

फोटो आता दिसले. मस्तच आलेत.

अजुनही काही केल्या कमळ दिसेना ! :(

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रातील दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा, अशी शरद पवारांची कधीच इच्छा नव्हती.:- बाळासाहेब विखे-पाटील

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2015 - 11:26 am | डॉ सुहास म्हात्रे

बहुदा पुण्य कमी पडत असावे ! ;) :)

(हघ्या. हेवेसांनल)

एकदोघांना सोडून सर्वांना चित्रे दिसत आहेत. काहींना अगोदर दिसत नव्हती पण आता दिसत आहेत. असे का होत आहे हे बहुदा आयटी जाणकारच सांगू शकतील.

नाव आडनाव's picture

8 Sep 2015 - 11:54 am | नाव आडनाव

बहुदा पुण्य कमी पडत असावे
अशी शंका आली होती पण लोकांना कशाला सांगायचं (की मी पापी आहे) म्हणून लिहिली नाही इथं :)
क्लायंट नेटवर्क आणि आमच्या हापिसातल्या पॉलिसी एकदम वेगळ्या आहेत आणि लॅपटॉप अजून वेगळा. क्लायंट नेट्वर्क मधे अजिबात रिस्ट्रिक्शन नाही, पण तरी सुध्धा दिसत नाहीत चित्रं. परत तीन वेगवेगळ्या ब्राऊजर वर चेक केलं (आयई, क्रोम, फायर्फॉक्स). कशावरंच चालत नाही.

<मेन्टॉस जिंदगी>
"दिसत आहे" असं म्हणनारे सारे खोटं बोलत आहेत का - बाय डीफॉल्ट पुण्यवान होण्यासाठी? :) (शेवटी स्मायली आहे हे कॄपया लक्षात घावे)

नाव आडनाव's picture

8 Sep 2015 - 11:56 am | नाव आडनाव

अर्रर्र, "मेन्टॉस जिंदगी" चा पहिला टॅग उडला वाटतं.

मदनबाण's picture

9 Sep 2015 - 1:00 am | मदनबाण

हा.हा.हा.... :)
ब्रम्हदेव दिसण्याची शक्यता नाही, त्यामुळे कमळाचे दर्शन सुद्धा कसे होइल ? असे खरे तर लिहणार होतो. ;)
आमच्या घरी अनेक वर्ष हे झाड होते... आता फुल येइल... आता फुल येइल म्हणुन अनेक वर्ष वाट पाहिली... शेवटी कळी लागली.पण च्यामारी हे कमळ रात्री उमलले आणि मला पाहताच आले नाही. :(

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra: 69 talukas facing drought-like conditions to get relief

वेल्लाभट's picture

8 Sep 2015 - 12:06 pm | वेल्लाभट

मस्तच!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2015 - 11:33 am | डॉ सुहास म्हात्रे

चित्रे न दिसणार्‍यांसाठी किमान पूर्ण फुललेले ब्रम्हकमळ तरी दिसावे म्हणून हा अजून एक प्रयत्न...

.

नाव आडनाव's picture

9 Sep 2015 - 11:49 am | नाव आडनाव

आताचे हे दोन्ही फोटो दिसले. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2015 - 12:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

मूळ दुवा जरा जास्त वेळ उघडा ठेवून पहा. हाय रेझोल्युशन फोटो असल्याने ते लोड होण्यास उशीर लागत असावा, कदाचित्.

प्रभाकर पेठकर's picture

9 Sep 2015 - 12:09 pm | प्रभाकर पेठकर

अजी मी ब्रह्मकमळ पाहिले, अssssजी मी ब्रह्मकमळ पाहिले....

फटू दिसेनत, घरी जाऊन पाहतो.

पैसा's picture

9 Sep 2015 - 4:43 pm | पैसा

क्रोमवर गूगल लॉग इन केलेले असेल तरच दिसताहेत. अँड्रॉईडसारखे क्रोमवर लॉग इन करून रहायचे असे काही तरी नव्याने सुरू झालंय का देवजाणे. क्रोममधेच काहीतरी बदल झालेत हल्ली. माझ्या ऑनलाईन ट्रेडिंग अकाउंटचे जावा अ‍ॅपलेट अचानक चालत नाहीसे झालंय. कुछ तो गडबड है.

डॉक. नी फोटो दिलेत त्यावर राईट क्लिक केले तर नेहमी जे मेनु यायचे तेही येत नाहीयेत.

नाव आडनाव's picture

9 Sep 2015 - 5:10 pm | नाव आडनाव

आता आले फोटू - क्रोम मधे मिसळपावच्या बाजुच्या टॅब मधे जीमेल लॉगिन केल आणि मिसळपावचं पान रिफ्रेश केलं.

प्रियाजी's picture

13 Sep 2015 - 4:27 pm | प्रियाजी

'नाव आडनाव' तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले आणि जादू झाल्यासारखे फोटो दिसायला लागले. आता हीच युक्ती नेहमी वापरत जाईन.
डॉ. सुहास, तुमचा माहितीपूर्ण लेख, डोळे निववणारे फोटो अतिशयच आवडले. तुमची पुष्पांजली १/२ अतिशय मन्मोहक आहे. ह्यामागे तुमच्या घरच्यांचे कष्त्ट असणारच. तुम्हीही फोटो टाकून त्यांच्या प्रयत्नांना दाद दिलीत. खूप छान.

अप्रतिम फोटो. निसर्गाचा खरंच चमत्कार आहे. रात्रभर जागून फोटो काढून ते आमच्याबरोबर शेअर केल्याबदद्ल खूप आभार तुमचे. खूप सुंदर माहीती आणि फोटो.
नाव आडनाव, तुम्ही सांगितल्या प्रमाणे जीमेल लॉग इन करून मिपा रीफ्रेश केलं. अक्षरश: जादू झाल्यासारखे सगळे फोटो दिसायला लागले आहेत. थॅंक्स सो मच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Sep 2015 - 7:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:(

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Sep 2015 - 8:58 am | डॉ सुहास म्हात्रे

जीमेल चालू असताना दुसर्‍या टॅबमध्ये मिपा उघडल्यास चित्रे पहायला समस्या येत नाही.

स्वगत : गुगल फोटोतला नवीन (?मुद्दाम ठेवलेला) बग दिसतोय.

दिसले फोटो दिसले.मस्त प्रसन्न फुल.सुरेख दिसताहेत.