माणसाचं मन ही मोठी अजब आणि व्यामिश्र गोष्ट आहे. ते शरीरात नक्की कुठं असतं ह्यावर बराच उहापोह देशोदेशीच्या शास्त्रज्ञानी केलेला आहे परंतु ठोस असा निष्कर्ष निघालेला नाही. एवढं असूनही त्याचा प्रभाव माणसाच्या आयुष्यात जन्मापासून मरणापर्यंत कायम आणि प्रचंड असतो. मनासंदर्भात हजारो म्हणी विविध भाषेत अस्तित्वात आहेत. मराठीतसुद्धा "चोराच्या मनात चांदणं", "मन चिंती ते वैरी न चिंती", "मनात मांडे खाणे" आणि अशा अनेक म्हणी आहेत.
मनाची (म्हणजेच पर्यायाने अंतर्मनाची ) ताकद प्रचंड असते आणि ती एका व्यक्तीचं आयुष्य आमूलाग्र बदलू शकते पण हेच मन कमकुवत किंवा द्विधा अवस्थेत असेल तर एकही काम सुरळीत अथवा आत्मविश्वासाने पार पडत नाही . एखादी गोष्ट करू कि नको करू ह्या "ग्यानबा तुकाराम" पद्धतीमुळे हातातला मौल्यवान वेळ निघून जातो आणि शेवटी काहीच उरत नाही. अतिविचार करणे हे म्हटलं तर फायदेशीर किंवा म्हटलं तर विनाशक ! अंतर्मनाचा कौल बर्याचदा योग्य मार्ग दाखवतो पण त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा ते मेंदू ठरवतो. ह्या दोघांच्या झटापटीत होणारा निर्णय अंतिम असतो पण तो झाला तरच… मनाला पटलेलं मेंदूला पटतंच असं नाही. त्यामुळे कधी असं करावं तर कधी तसं करावं असं वाटत राहतं आणि ह्यामुळे माणसाला दोन्ही बाजूने बोलायची सवय लागते. आपल्या नकळत आपण बऱ्याचदा विसंगत गोष्टी बोलून जातो पण त्या विसंगत आहेत हे आपल्याला जाणवत नाही. हळूहळू हीच सवय आपल्या वागण्यालाही लागते आणि मग इतर लोक आपल्याला दुतोंडी, डबल ढोलकी असली शेलकी विशेषणं चिकटवतात.
मग प्रश्न असा आहे की ही मनाची नैसर्गिक परिस्थिती आहे की स्प्लिट पर्स्नलिटि डीसऑर्डर किंवा स्किझोफ्रेनियाची सुरुवात ? ह्या दोन्ही प्रकारात नक्की काय होतं ? हा आजार आहे की मनाची अवस्था ? असा मनुष्य रोजच्या जगण्यातली सगळी कामे साधारण पद्धतीने करू शकतो का? विज्ञान ह्यावर काय म्हणतंय ?
जाता जाता… मिपाच्या डू आयडींना ह्याचा धोका कितपत आहे ????
प्रतिक्रिया
3 Sep 2015 - 12:57 pm | होबासराव
:))
3 Sep 2015 - 1:18 pm | उगा काहितरीच
अख्ख्या लेखाचे सार शेवटच्या ओळीत दडलेले आहे. किंबहुना मला तर अशी शंका येत आहे की शेवटच्या ओळीसाठी पूर्ण लेख लिहायचा खटाटोप . ;-)
हघ्या हेवेसांनलगे .
3 Sep 2015 - 1:28 pm | माम्लेदारचा पन्खा
पण मन आद्यप्रवर्तक आहे....मिपा आणि त्यावरचे डुआयडी नंतरचे !!
3 Sep 2015 - 4:01 pm | कंजूस
व्यवहारात ( नेहमीच यशस्वी होणारे ) अयशस्वी झाल्यास,अनपेक्षित पराभव झाल्यास ,स्वत: ज्ञानी आहे अशी सर्वांनी समजूत करून दिलेली असताना कधीतरी फारच अज्ञानी आहे असा शिक्का बसल्यास अशा व्यक्तिंचे मन बंड करते आणि विविध मार्गाने आपले स्थान मिळवू पाहाते त्यापैकी एक आपण दिलेला आहे.
वयानुसार टिआरपी कमी झाल्यास तो वाढवण्यासाठीचे केलेले उपाय म्हणजे ट्रोलिंग.यावरचे उपाय---------
पुढील भागात------
3 Sep 2015 - 4:27 pm | माहितगार
द्विधा मनस्थिती → स्प्लिट पर्स्नलिटी → मिपाचे डू आयडीं =)) कार्यकारण संबंध समजला नाही !! &/ ?? कार्यकारण संबंध समजला नाही या वाक्यानंतर समजा मला प्रश्न पडला की आता उद्गारवाचक चिन्ह देऊ की प्रश्नचिन्ह मग दोन्ही दिले तर काय दोन्ही दिलेतर मध्ये & देऊ की / हि झाली द्विधा मनस्थिती या द्विधा मनस्थिती धागा लेखक स्प्लिट पर्स्नलिटीच उदाहरण की कार्य कारण समजू इच्छितात ? इतपतही ठिक तिथून सरळ मिपाचे डू आयडींवर घसरतात. धागा लेखकाचे कौतुक आहे ! :)
3 Sep 2015 - 4:44 pm | गवि
-तणावाखाली असलेल्या व्यक्तीची लांबी /उंची वाढते का?
-बुचकळ्यात पडलेल्या व्यक्तीचे कपडे ओले होतात का?
-भीतीने गर्भगळित झालेल्या व्यक्तीचा गर्भपातच होतो का?
-आतडे पिळवटून बोलणार्या व्यक्तीला मलनि:स्सारणविषयक समस्या येतात का?
शिरेसली स्पीकिंग, दोन्ही बाजूंनी बोलणं किंवा डबल ढोलकी वगैरे हा "बायपोलर" पर्सनॅलिटीचा अर्थ किंवा लक्षणं नसून एका क्षणी टोकाचा निगेटिव्ह, डाऊन, ब्लँक मूड आणि थोड्याच वेळात दुसर्या टोकाचा अतिउत्तेजित, युफोरियाटाईप, पॉझिटिव्ह मूड अशा दोन टोकांत मानसिक झोके घेत राहण्याशी हे संबंधित असावं. मानसोपचार तज्ञ नेमकं काय ते सांगू शकतील.
बाकी मिपा किंवा अन्यत्र असलेले छुपे आयडी (डू आयडी असा शब्द चुकीचा आहे).. यांविषयी..यात कोणतीही पर्सनॅलिटी डिसऑर्डर नसते.. उलट कितीही लिहिले तरी आपला "छाप" कोणीही कधीही ओळखणार नाही असा उच्च कोटीचा आत्मविश्वास हा मानसिक शक्तीचा नमुना नव्हे काय?
3 Sep 2015 - 4:59 pm | द-बाहुबली
कोणतीही व्यक्ती ही मुळात नॅचरली स्प्लिट पर्सनॅलिटीच आहे असे मी ग्रुहीत धरतो. ऐकायला विचीत्र वाटेल पण निट लक्ष दिले तर बाह्य व अंतर्मन या दोन प्रक्रिया आपल्याला एकाच देहात दोन मने आहेत याचीच पुन्हा पुन्हा जाणीव करुन देतात असे वाटते.
जसे बाह्य मन व्यवस्थीत शिस्तबध्द बरेच नियंत्रीत, तर्कशुध्द तर अंतर्मन बरेच बेशिस्त, अनियंत्रीत आणी संपुर्ण तर्करहीत आहे असे भासते. बाह्यमनाप्रमाणे हे नक्किच कोणते नियम पाळत नाही जसे चंद्रावर जायचे आहे हाप्रश्न समोर आला तर बाह्य मन वैज्ञानीक पध्दत व शक्याशक्यता हुडकेल तर अंतर्मन चटकन त्यात काय एव्हडे मोठी शिडी बांधुया अथवा उंच उडी मारुन चंद्रावर जाउया असा उपाय सुचवु शकते इट्स क्रेजी अँड मोस्ट इंपॉर्टंटली उन्कंटृओल्ड.
आता आपल्याला या दोघाची स्वयच इतकी झाली आहे बलपणापासुन यातिल विरोधाभास अथवा स्प्लिटनेस आपणास उमजुन येत नाही व अंतर्मनाचा आचरटपणा/अगम्/अगम्यपणा/शक्तीसहज पचवु शकतो इतकेच म्हणता येइल.
पण जेंव्हा बह्यमनही विर्धाभासि विचारांना मल्टीटास्क करते तेंव्हा नक्किच जाहिर स्प्लिट पर्सनॅलिटी निर्माण होत असावी... मिपावरिल डुआयडींना ह्याचा धोका नक्किच आहे न्हवे ज्यांचा आयडी आहे त्यांनाही हा धोका संभवतो.. परंतु सदस्य हा धोका पत्करतात म्हणजेच तो तरुन जायची क्षमता ते राखतात असे म्हणावेसे वाटते.
4 Sep 2015 - 11:41 am | आनन्दा
संपूर्ण असहमत.
3 Sep 2015 - 7:54 pm | मितान
इंटरेस्टिंग चर्चा ;)
3 Sep 2015 - 8:15 pm | पैसा
मी एक डुप्लिकेट आयडी काढून बघते. मग सांगते! ;)
हे दोन्ही वेगळे असावेत. डॉक्टर लोक सांगू शकतीलच. पण मध्यंतरी शुचीने एक धागा काढला होता. त्यात यावर बर्यापैकी चर्चा झाली होती.
डु आयडी काढणारे दुभंग व्यक्तिमत्त्वाचे नक्कीच नसतात. पण प्रत्यक्षात भेटल्यावर अगदी मऊ स्वभावाचे वाटणारे लोक आंतरजालावर भयानक आक्रमक वागताना दिसतात, त्याना दुभंग व्यक्तिमत्त्वाचा आजार आहे का अशी शंका येते.
3 Sep 2015 - 10:39 pm | माम्लेदारचा पन्खा
हेच होतं..... प्रत्यक्ष माणूस आणि त्याचे आंतरजालीय व्यक्तिमत्व यात जमीनअस्मानाचा फरक असतो....
4 Sep 2015 - 12:09 pm | सुबोध खरे
जिज्ञासू व्यक्तींसाठी एक सोपे स्पष्टीकरण.
पहा
http://psychcentral.com/lib/the-differences-between-bipolar-disorder-sch...
4 Sep 2015 - 12:28 pm | अजया
सहमत!
4 Sep 2015 - 12:38 pm | कपिलमुनी
4 Sep 2015 - 1:24 pm | कंजूस
लहानपणी ज्यांचे फाजिल लाड झाले आहेत त्यांना असले डिसॅार्डर असण्याचे परवडू शकते.
4 Sep 2015 - 2:18 pm | कैलासवासी सोन्याबापु
स्प्लिट पर्सनालिटी होते का नाही हे माहिती नाही पण द्विधा मनस्थितिमुळे डिसिशन मेकिंग एबिलिटी भयानक डैमेज होते असे वाटते, अशी उदाहरणे पाहिली आहेत मी, आता मानसशास्त्रीयदृष्ट्या (psychiatry and psychology both aspects) हे कितपत खरे आहे हे डॉक्टर साहब , बहुगुणी वगैरे तज्ञ लोक सांगू दे.
स्प्लिट पर्सनालिटी संबंधी अन द्विधा मनस्थितीविषयी माझे एकंदरित मत :-
मला वाटते ह्याचे मुळ आपल्याला त्या त्या व्यक्तीच्या बालपणात सहज सापडेल, पियर प्रेशर म्हणुन आयुष्याला अमुक एक वळण (संस्कार, धर्म, तार्किक कुवत जर बालपणी दाबली गेली असेल तर ती) लावले जाणे ह्याचा सुद्धा ह्या स्प्लिट पर्सनालिटी मधे खारीचा का असना वाटा असावा. उदहारण म्हणुन मी वैयक्तिक आमच्याच घरातले देतो, मी अन माझ्या एका नातलगांचा मुलगा समवयस्क मुले, १०वी पर्यंत त्याला त्याच्या वडिलांनी स्कूटर वर क्लासेज ना नेणे वगैरे सगळे केले, त्याच्या करियर संबंधी काही मत किंवा कल त्याने मुद्दाम किंवा ओघात व्यक्त केल्यास कधी त्याला समजावत (तू म्हणतो ते बरोबर आहे पण मला काय म्हणायचे आहे) तर कधी रागवत (गप्प बैस तुला काय अक्कल आहे सांगतो तसे कर) दाबले गेले, तेच आमच्याघरी इयत्ता पहिली मधे सायकल हाती आली अन त्याच्यासोबत "नीट सांभाळून चालवायची अन शाळेत जायचे" हा काळजीयुक्त सल्ला वजा सूचना ही आली, दहावी पास झाल्यावर वडिलांनी समोर बसवत शांतपणे "तुला आता स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आले पाहिजे, तस्मात आता तू तुझी लाइन ठरव तुला काय करायचे आहे ते पण एक लक्षात ठेव तुझ्या यशात आमचे योगदान फ़क्त कवडी चे असेल अन पराभवात सुद्धा, संसाधने काय हवी ते सांगत जा बाप म्हणून तुला मागशील ते पुरवणे माझे काम आहे व् तू त्याचा गैरवापर करणार नाही ह्याची खात्री आहे" असे जीवन जगायचे सूत्र दिले. त्यानंतर तो मुलगा, अभियंता झाला व मी माझी बौद्धिक कुवत पाहून बीएससी करायचे नक्की केले, आज तो त्याच्या संसारात आहे अन मी माझ्या, पण त्याची पर्सनालिटी स्प्लिट झाली आहे, तो घरी कोकरु बाहेर शेर झालाय, बायकोला इंटिमिडेट करणे अकांडतांडव करणे वगैरे प्रकार करतो, सतत नेगेटिविटी मधे लिप्त असतो, वडिलांना तोंडावर मान देत त्रयस्थ लोकांसमोर मात्र , "आमचा बाप ठरवेल तसे आमचे वाटोळे आमचे घर करत गेले असे म्हणतो" मला तरी ते प्रचंड चुकीचे अन मानसिकएंगल ने विचित्र वाटते.
8 Sep 2015 - 4:42 pm | माम्लेदारचा पन्खा
काथ्या कुटून कुटून मिपाकरांनी हार मानलेली दिसते....
हात आणि मेंदू भरून आला वाटतं...बिनडोक धाग्यांनी शाळा झालीये.......
असो !
8 Sep 2015 - 6:27 pm | सिरुसेरि
चंद्रमुखी , भुलभुलैया , अपरिचिताडु /अन्नियान यामधुन अधिक माहिती मिळते .