महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक काय असू शकेल ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
25 Aug 2015 - 3:46 pm
गाभा: 

महाभारत हा ग्रंथ लिहितानाच ग्रंथ लेखकाने तो ९००० श्लोकांचा आहे हे ग्रंथातच नमुद करून ठेवले. काळाच्या ओघात त्यातील विवीध कथासूत्रांचा विस्तार होत गेला आणि श्लोक संख्या लाखाच्या घरात गेली. म्हणजे प्रचंड मोठा भाग हा वस्तुतः प्रक्षीप्त असला पाहीजे.

मला एक नेहमी पडणारा प्रश्न आहे की

१) महाभारताच्या प्रथम कर्त्याने ९००० श्लोकात समजा एक कथा त्याच्या स्वतःच्या दृष्टीने पुर्ण केली आहे, समजा अधिकतम शक्य असलेला प्रक्षिप्त भाग गृहीत धरावयाचा नाही असे ठरवले तर महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक काय असू शकेल कि ज्या शिवाय महाभारताची कथा आजीबात आकार घेणार नाही ?

किंवा असंही म्हणता येईल की तुम्हाला केवळ ९००० श्लोकांमध्ये महाभारताची मुख्य पटकथा सांगावयाची आहे तर तुमच्या पटकथेचे स्वरूप कसे असेल ?

२) महाभारतातील किमान पात्रे कोणती की ज्यांच्या शिवाय महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक आकारास येऊ शकत नाही ?

३) महाभारतातील किमान भागास आवश्यक नसणारी पण लाखभर श्लोकी महाभारतातील कोणती कथासूत्रे सहजपणे बाजूला ठेवता येतील अथवा टाळता येतील ?

(अशीच चर्चा रामायणा बाबतही करावयाची आहे पण नंतर कधीतरी वेगळ्या धाग्यातून)

* प्रक्षिप्त = एखाद्या ग्रंथात ग्रंथकाराव्यतिरिक्त दुसर्‍या कुणीतरी मागाहून घातलेला भाग/लेखन (संदर्भ)

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

25 Aug 2015 - 3:56 pm | पगला गजोधर

विनंती: कृपया प्रतीसादाकांनी रेफ़रन्स, दुवे जरूर जोडावे आणि मुद्देसूदपणे पॉइंट्स मांडावे (पुरावे मदतीला घेऊन)

पुण्याचे वटवाघूळ's picture

25 Aug 2015 - 4:01 pm | पुण्याचे वटवाघूळ

चर्चाविषय छान आहे. पण बर्‍याचदा माहितगारराव काहीसे बोजड शब्द वापरतात आणि शिर्षके खूप लांबलचक असतात त्यामुळे धागे समजायला थोडे कठिणच जाते.हा धागा त्यामानाने पुष्कळच युजर फ्रेंडली आहे. तरी प्रक्षिप्त म्हणजे काय? संदर्भातून अर्थ समजला पण प्रक्षिप्त हा शब्द बाय इटसेल्फ बघायला मिळाला असता तर अर्थ कळणे कठिण झाले असते. माहितगाररावांना विनंती की चर्चाविषय थोडे अधिक युजर फ्रेंडली केले तर बरे होईल.

"राजसिंहासन प्राप्त्यर्थम्, प्राप्तसिंहासन चीरकाल संरक्षणार्थम्, अंतर्बाह्यरिपू नाशार्थम् पातकक्रिडा"

पामर's picture

31 Aug 2015 - 5:44 pm | पामर

१.व्यासांनी लिहिलेली मुळ कथा 'जय' म्ह्णुन प्रसिद्ध आहे, ह्यामधे ८८०० श्लोक आहेत
२.व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी ही कथा २४००० श्लोकांनी वाढवली आणि तिला 'भारत' नाव दिलं.वैशंपायनांनी हीच कथा सर्पसत्राच्या वेळी जनमजेयाला सांगितली.अश्वालयन गृह्यसुत्रा मधे वैशंपायनांचा उल्लेख भारताचार्य असा आहे.
३.वैशंपायनांकडुन सर्पसत्राच्या वेळी ऐकलेली गोष्ट पुढे व्यासांचे अजुन एक शिष्य उग्रश्रवस सौति ह्यांनी नैमिषारण्यात अनेक ऋषीमुनींसमोर सांगितली.त्यांनी ही कथा १,००,००० श्लोकांवर वाढवली. त्यावेळी पासुन ती 'महाभारत' म्हणुन प्रसिद्ध झाली.सौती हे भागवत पुराण,हरिवंश पुराण,पद्म पुराण व महाभारताचे व्याख्याते म्हणुन त्याकाळी खुप प्रसिद्ध होते.महाभारतातील अनेक आख्यानं-उपकथा ह्यांनीच कथेत मागाहुन घुसडली असण्याची शक्यता आहे.

महाभारतातील सर्वच व्यक्तीरेखा महत्वाच्या आहेत तरी- श्रीकृष्ण, पांडव, द्रौपदी, भिष्म, विदुर्, द्रोण, धृतराष्ट्र, गांधारी, कुन्ती, शकुनी, दुर्योधन्, दुशा:सन्, कर्ण्, अश्वथामा, धृष्टद्युम्न्, अभिमन्यु, विराट, जरासंध, घटोत्कच, गंगा, शांतनु, अंबा-शिखंडी, जयद्रथ ही पात्र मला फार महत्वाची वाटतात.

स्वामी संकेतानंद's picture

25 Aug 2015 - 4:01 pm | स्वामी संकेतानंद

१) दोन चुलतभावांच्या गटातले भांडण आणि शेवटी एकाचा विजय. त्यांच्या भांडणात इतरही काही राज्यांचा सहभाग.आणि एक शहाणा राजनितीवाला.
२) पाच पांडव, दुर्योधन, दु:शासन, द्रौपदी, धृतराष्ट्र, गांधारी, पंडू, कुन्ती, माद्री, भीष्म, वेदव्यास, कृष्ण, शकुनि.

स्वामी संकेतानंद's picture

25 Aug 2015 - 4:06 pm | स्वामी संकेतानंद

३) बरीच आहेत. नलदमयंती आख्यान, विदुरनीति, भगव्द्गीता( "उठ आणि लढ भाड्या" आणि यासाठी चार मोटिवेशनल वाक्ये एवढे पुरेसे राहील)भीष्माचे शरशय्येवरचे लेक्चर, काही जातकथा टाइप गोष्टी( उदाहरणार्थ तीन मासोळ्यांची कथा), द्रौपदीची थाळी .............

सातारकर's picture

2 Sep 2015 - 11:21 pm | सातारकर

"उठ आणि लढ भाड्या" ही काय भाषा आहे भगवद्गितेविषयि लिहिण्याची?

बाकी गितेचा दुसरा काही उपयोग नाही?

ते एकश्लोकी रामायण आहे तसे एकश्लोकी महाभारत आहे का?

एकश्लोकी रामायण खालीलप्रमाणे: (हे प्रथम मिरजेतील एका राम मंदिरात लिहिलेले पाहिले नंतर कळाले की फेमस आहे.)

आदौ रामतपोवनादिगमनं, हत्वा मृगं कांचनम्
वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसंभाषणम्
वालीनिर्दलनं समुद्रतरणं लंकापुरीदाहनम्
पश्चात् रावणकुम्भकर्णहननं एतद्धि रामायण म् ||

स्वामी संकेतानंद's picture

25 Aug 2015 - 4:19 pm | स्वामी संकेतानंद

एकश्लोकी महाभारतसुद्धा आहे. सध्या माझ्यापाशी नाही, जालावर पहावे लागेल. पण घरी एका पुस्तकात आहे.

बॅटमॅन's picture

25 Aug 2015 - 4:23 pm | बॅटमॅन

धन्यवाद, सर्च घेता सापडलेसुद्धा!!!!! जय हो इंटरनेटकी, जय हो गूगल बाबा की.

एकश्लोकी महाभारत

आदौ पाण्डवधार्तराष्ट्रजननं लाक्षागृहे दाहनम्
द्यूते श्रीहरणं वने विचरणं मत्स्यालये वर्तनम् ।
लीलागोहरणं रणे विहरण सन्धिक्रियाजृम्भणं
पश्चात् भीष्मसुयोधनादिहननं चैतन्महाभारतम् ॥

कृष्ण अर्जुन द्रौपदी यांचे उल्लेख नाहीत. पण भीष्म दुर्योधन आहेत!!

स्वामी संकेतानंद's picture

25 Aug 2015 - 4:42 pm | स्वामी संकेतानंद

पाण्डवमध्ये अर्जुन आणि त्याची बायको दोन्ही आले. कृष्ण आलेला नाही.

होय..मग धार्तराष्ट्रामध्ये दुर्योधन आलाच की.. ;-)

स्वामी संकेतानंद's picture

25 Aug 2015 - 8:28 pm | स्वामी संकेतानंद

धार्तराष्ट्र मध्ये सगळेच धृतराष्ट्रपुत्र आलेत, इन्क्लूडिंग दुर्योधन.
हे एकश्लोकी महाभारत आहे. त्यामुळे समझा करो

माहितगार's picture

25 Aug 2015 - 4:34 pm | माहितगार

लाक्षागृहे दाहनम् ज्या प्रकारे वेगळ्या प्रकारचे कारस्थान म्हणून महाभारतात येते ते ओरीजनल कथानकाचा भाग असू सुद्धा शकेल. लाक्षागृहे दाहनम् महाभारत पटकथेसाठी अत्यावश्यक ठरू शकेल असे वाटते का ?

प्रचेतस's picture

25 Aug 2015 - 5:35 pm | प्रचेतस

लाक्षागृह प्रकरण १००% मूळ कथानकाचा भाग आहे यात काहीच शंका नाही.
पटकथेसाठी आवश्यक आहेच कारण लाक्षागृह जळितकाण्डातून सुटल्यावर पाण्डव कौरवांच्या भयाने लपतछपत आधी एकचक्रा नगरीत व त्यानंतर पांचालनगरीत पोहोचले तेथे द्रौपदीशी विवाह होऊन पांचालांचा पाठिंबा व कृष्णाची (पहिल्यांदाच) भेट होऊन त्याचेही समर्थन मिळून पाण्डव ब्रह्मवेष त्यागून आपल्या मूळ रूपात प्रकट झाले.

माहितगार's picture

25 Aug 2015 - 4:30 pm | माहितगार

सीतेला नेमके कोणी नेले अथवा सीता कोठे गेली हे समजण्यासाठी जटायु भेट हा आवश्यक प्रसंग वाटतो पण जटायू ची झटापट मागाहून वाढवले गेले असू शकते का ? किंवा जटायू भेटी शिवायही रामायणाची कथा होऊ शकते ? एनी वे रामायण विषयक चर्चेसाठी वेगळा धागा नंतर काढूयात.

प्रचेतस's picture

25 Aug 2015 - 5:37 pm | प्रचेतस

जटायु रावण झटापट वाढवलेले शक्यच नाही कारण त्यात जटायुचा मृत्यूच होतो. सीतेच्या अपहरणाची दिशा रामस सांगणे इतकाच त्याचा उद्देश.

प्रिशू's picture

25 Aug 2015 - 4:16 pm | प्रिशू

आम्हांला कथानक वाढवायची सवय आहे कमी करायची किंवा थोडक्यात आटपायची नाही.

माहितगार's picture

25 Aug 2015 - 4:23 pm | माहितगार

=)) या वेळि वेगळा प्रयत्न करून पहा !

पगला गजोधर's picture

25 Aug 2015 - 4:27 pm | पगला गजोधर

तुमच्या या अश्या सुचनेमुळे उभा महाराष्ट्र एका केकता-कपूरला मुकला.

द-बाहुबली's picture

25 Aug 2015 - 4:49 pm | द-बाहुबली

अवघड प्रकरण आहे. काहीच डोके चालत नाही.

पिशी अबोली's picture

25 Aug 2015 - 4:56 pm | पिशी अबोली

१. द्यूत ते युद्ध
२. पांडव, द्रौपदी, दुर्योधन, दु:शासन, विकर्ण का कुणीतरी आणि ९३ एक्स्ट्रास्, धृतराष्ट्र, भीष्म-द्रोण, कृष्ण. बस झाले एवढेच. ;)

प्यारे१'s picture

25 Aug 2015 - 5:22 pm | प्यारे१

किस्सा कुर्सी का!

म्हणजे महाभारत हे कपोलकल्पित आहे असे गृहीत धरून पुढे जायचे का? महाभारताचे सगळे धागे सगळ्या व्यक्तिरेखा या एकमेकाच्या अनुषंगाने येतात आणि एक मेकांना पूरक आहेत. घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे एक पूर्वकर्म / भूतकाळ असतो हे प्रत्येक पत्र आणि घटना अधोरेखित करते.
महाभारत म्हणजे फक्त कुरुक्षेत्र नाही. कुरुखेत्र हा त्याचा एक महत्वाचा भाग आहे. कुरुक्षेत्र म्हजे फक्त भौबंदाकीची लढाई असे चित्र काही लोकांकडून पसरविले जाते आणि अनेक जण आंधळेपणाने ते पुढे रेटून नेत असतात. त्यांनी महाभारत संपूर्ण वाचावे हि विनंती. या उपर ज्याची त्याची इच्छा आणि मते.
गीता फक्त युद्ध कर इतकेच सांगत नाही. गीता हे संपूर्ण जीवन सर आहे. भगवद्प्राप्ती/ मोक्ष या गोष्टींचा उहापोह अगदी छोट्या छोट्या बर्काव्यान्साहित गीतेत सांगितला गेला आहे. गीता सांगण्यासाठी भगवंताने ती विशिस्त वेळच का निवडली या मागेही काही कर्णे आहेत. अर्थात ती माहिती करून घेणार्यांसाठी आहेत. ज्या गीताच्या वाच्गानाने कोट्यावधी मुमुखू तरले, लाखो पाशिमात्या वेडे झाले आणि होताहेत त्या गीतेकडे उगीचच पूर्वग्रह आणि प्रदूषित दृष्टी ठेवून पोहिले तर काहीच साध्य होणार नाही. नुकसान कोणाचे आहे हे ज्याच्रे त्याने ठरवावे.
महाभारतातील काही वर्णने काही पाश्चिमात्य पुरातत्व शास्त्रज्ञांना इतकी पटली आहेत कि तत्कालीन शस्त्रे/ अस्त्रे आणि विमाने हि खरी होतीच आणि हे तंत्रज्ञान मनुष्याला परग्रहावरील जीवांनी दिले होते आणि कालोघात ते नष्ट झाले आणि आज जगभर याचे फक्त अवशेष राहिले आहेत ( जगभरातील अद्भुत पिरामिड्स, नाझ्काची रेखा चित्रे,, मेसोपोटमिअन, ग्रीक, इजिप्शिअन, इंक, पेरूग्वियन इ. विविध प्राचीन शिल्पे त्यांच्या पारंपारिक कथा , पुस्तके इ.) अधिक रोचक माहिती हवी असल्यास हिस्ट्री वाहिनीवरील "anciant अस्त्रोनौत्स' कार्क्रामाचे भाग यु ट्यूब वर आहेत. यात त्यांनी महाभारतातील अस्त्रे त्यांचे विघातक वर्णन कि जे आजच्या अनेक अस्त्रांशी मिळते जुळते आहेत. मध्यंतरी डिस्कवरी वाहिनीवर एक कार्यक्रम पाहिला ज्यात अमेरिकेत सुरु असलेल्या संशोधानान्विषयी मीहिती होती. हे संशोधन पंच्म्हाभूतांवर नियंत्रण मिळवून कधी हि कोठेही निसर्गावर नियंत्रण मिळवणे ( भूकंप, पाऊस इत्यादी) आणि त्यांचा शस्त्रे म्हणून वापर करणे यावर सुरु आहे. अशी वर्णने आपल्याकडे कोठे सापडतात याचा विचार केलाय का?

कपिलमुनी's picture

25 Aug 2015 - 6:33 pm | कपिलमुनी

आपण या विषयावर अधिक खोलात व स्वतंत्र धाग्यावर लिहावे ही विनंती.

पहिल्या घटक चाचणीला हां धडा होता रे कपिल.
आता सत्र परिक्षेसाठी पुन्हा घेऊ. आत्ता नको.

स्वामी संकेतानंद's picture

25 Aug 2015 - 7:12 pm | स्वामी संकेतानंद

हरी ॐ !

नाखु's picture

26 Aug 2015 - 3:25 pm | नाखु

पुनश्च हरी ॐ !

गीता ही संपूर्णपणे प्रक्षिप्त होती असे कुरुंदकरांचे (आणि आहे असे माझेही) मत होते. कारण भगवदगीता उपपर्वाच्या आधीच्या १/२ अध्यायांत युधिष्ठिराला झालेला विषाद आणि अर्जुनाने केलेले त्याचे खंडन. शिवाय गीतेमधे 'कृष्ण उवाच' असे उद्गार नसून 'श्री भगवान उवाच' असे उद्गार आहेत. साहजिकच हे भागवद धर्मप्रचारानंतर कृष्णाला देवत्व (विष्णू अवतार) मिळाल्यानंतरचे आहेत. तर इरावती कर्वे ह्या गीतेतले पहिले ३ अध्याय हे मूळ मानत असून बाकीचे १५ अध्याय प्रक्षिप्त मानतात.

dadadarekar's picture

25 Aug 2015 - 9:18 pm | dadadarekar

पहिले तीन चार अध्यायच ओरिगिनल वाटतात.

विषाद - कर्मयोग - कर्मसन्य्यास .

इतक्या तयारीवर मनुष्य उभा राहू शकतो.

पुढचे अध्याय निवाण्त घरी बसून चrcaNyaayogy वाटतात. युद्धभूमी ही त्या अध्यायांची जागा नव्हती.

dadadarekar's picture

25 Aug 2015 - 9:19 pm | dadadarekar

हे संजयाच्या भूमिकेतून आलेले आहे.

कपिलमुनी's picture

27 Aug 2015 - 6:24 pm | कपिलमुनी

कुरुंदकरांचे (आणि आहे असे माझेही)

आम्हाला तुम्ही आणि कुरुंदकर सारखेच पूज्य आहात :)

सतिश गावडे's picture

29 Aug 2015 - 11:47 pm | सतिश गावडे

पाऊस कसा पडतो हे शाळेत गेलेल्या प्रत्येकाला माहिती आहे.

मात्र भगवद्गीतेत यज्ञ केल्याने पाऊस पडतो असे म्हटले आहे.

अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यत अन्न संभवः .
यज्ञात भवति पर्जन्यः यज्ञः कर्म समुद्भवः

अध्याय ३, श्लोक १४

याबद्दल आपलं काय म्हणणं आहे?

प्रचेतस's picture

30 Aug 2015 - 12:08 am | प्रचेतस

सिल्वर आयोडाइडचे स्फटिक पूर्वीपासूनच अस्तित्वात होते. यज्ञात त्यांचे ज्वलन केल्याने ते वाफ होऊन वर ढगात मिसळायचे. त्यांचा आणि पर्जन्यबिंदूंचा संयोग होऊन ते ते थेंब अधिकच मोठे व्हायचे व् सांद्रीभवन होऊन कृत्रिम पाऊस कोसळायचा.

बाकी ऋग्वेदात पर्जन्याचीही सुक्ते आहेत.

वि वृक्षान् हंति उत हंति रक्षसः विश्वं बिभाय भुवनं महाऽवधात् ।
उत अनागाः ईषते वृष्ण्यावतः यत् पर्जन्यः स्तनयन् हंति दुःऽकृतः

सारथी चाबकाचे तडाखे उडवून घोड्यांना दौडत पुढे करतो, तसा प्रजन्यही वृष्टिकरणार्‍या आपल्या मेघरूप नोकरांना गोळा करून लोकांच्या ते दृष्टिस पडतील असे करतो. आणि पर्जन्याने ह्याप्रमाणे गगनमंडल ढगांनी गडद भरून टाकले कीं त्या सिंहाच्या गर्जनेचा गडगडाट तितक्या दूर अंतरवरूनहि सुरू होतो.

रथीऽइव कशया अश्वान् अभिऽक्षिपन् आविः दूतान् कृणुते वर्ष्यां अह ।
दूरात् सिंहस्य स्तनथाः उत् ईरते यत् पर्जन्यः कृणुते वर्ष्यं नभः
वादळी वारे जोराने वाहू लागतात, विजांचे उत्पात चालू होतात, औषधींना अंकुर फुटूं लागतात, नभोमंडल मेघांनी गर्द भरून जाते, आणि सर्व जगाचे पोषण होण्याकरिता पृथ्वीवर धान्यसमृद्धि होते; परंतु हा सर्व चमत्कार पर्जन्य चरणीवर आपल्या वृष्टिरूप वीर्य वर्षावाचा प्रसाद करतो, तेव्हा घडून येतो.

प्र वाताः वान्ति पतयंति विऽद्युतः उत् ओषधीः जिहते पिन्वते स्वरितिस्वः ।
इरा विश्वस्मै भुवनाय जायते यत् पर्जन्यः पृथिवीं रेतसा अवति ॥
ज्याची आज्ञा झाल्याबरोबर पृथ्वी शिरसा नम्र होते, ज्याच्या इच्छामात्रेंकरून खूर असणारे पशु फुरफुरून बागडूं लागतात, ज्याच्या आज्ञेने औषधी सर्व प्रकारची रूपे धारण करतात, अशा तू हे पर्जन्या आम्हाला तुझे श्रेष्ठप्रतीच्या सुखाचे स्थान दे.

दि॒वो नो॑ वृ॒ष्टिं म॑रुतो ररीध्वं॒ प्र पि॑न्वत॒ वृष्णो॒ अश्व॑स्य॒ धाराः॑ ।
अ॒र्वाङ्ए॒शतेन॑ स्तनयि॒त्नुनेह्य॒पो नि॑षि॒ञ्चन्नसु॑रः पि॒ता नः॑ ॥ ६ ॥

मरुतांनो, द्युलोकापासून आम्हांवर कृपा वृष्टि करा. तुमच्या वीर्यवान् मेघरूप अश्वांच्या जलधारा उदकाचे पूर वाहवितील असे करा. पर्जन्या, ह्या समोरच्या गर्जना करणार्‍या मेघासह उदकवृष्टि करीत ये. तूच परमेश्वर व आमचा पिता आहेस. ॥

अ॒भि क्र॑न्द स्त॒नय॒ गर्भ॒मा धा॑ उद॒न्वता॒ परि॑ दीया॒ रथे॑न ।
दृतिं॒ सुक॑र्ष॒ विषि॑तं॒ न्यञ्चं स॒मा भ॑वन्तू॒द्वतो॑ निपा॒दाः

मोठ्याने गर्जना कर, गडगडाट कर, जमीनीमध्ये आपला उदकरूप गर्भ ठेऊन दे, आपल्या जलमय रथात बसून सर्वत्र संचार कर, आणि आपल्या मेघरूप पखालीचे तोंड खुले करून ती खाली उलटी ओढून घे म्हणजे पृथ्वीवरील सर्व उंचवटे खांचखळगे पाण्याने तुडुंब भरून जाऊन सारखे होतील ॥

म॒हान्तं॒ कोश॒मुद॑चा॒ नि षि॑ञ्च॒ स्यन्द॑न्तां कु॒ल्या विषि॑ताः पु॒रस्ता॑त् ।
घृ॒तेन॒ द्यावा॑पृथि॒वी व्युन्धि सुप्रपा॒णं भ॑वत्व॒घ्न्याभ्यः॑ ||

आपला मोठा जलाशय वर उचलून त्यांतील उदकाने खाली भूमिवर सिंचन कर. मोकळे केलेले कालवे दुथडी भरून पुढे वहात जावोत. अकाश आणि पृथिवी ह्यांना दिव्य घृताने आर्द्र कर आणि अवध्य ज्या धेनू त्यांना पिण्याला भरपूर पाणी होऊ दे. ॥

महांतं कोशं उत् अच नि सिञ्च स्यंदंतां कुल्याः विऽसिताः पुरस्तात् ।
घृतेन द्यावापृथिवीइति वि उंधि सुऽप्रपानं भवत्व् अघ्न्याभ्यः ॥
पर्जन्या, तू मोठा निनाद करून मोठी गर्जना करून जेव्हा दुष्ट अवर्षणाचा नाश करतोस, तेव्हा ह्या पृथ्वीवर जे जे काही आहे ते ते सर्व आनंदाने डुलूं लागते. ॥

पैसा's picture

30 Aug 2015 - 12:16 am | पैसा

अतिशय सुंदर वर्णने आहेत ही. हे सगळे ऐकून वरुणाची कृपा झालीच पाहिजे! =))

सतिश गावडे's picture

30 Aug 2015 - 12:21 am | सतिश गावडे

सिल्वर आयोडाइडचे स्फटिक पूर्वीपासूनच अस्तित्वात होते. यज्ञात त्यांचे ज्वलन केल्याने ते वाफ होऊन वर ढगात मिसळायचे. त्यांचा आणि पर्जन्यबिंदूंचा संयोग होऊन ते ते थेंब अधिकच मोठे व्हायचे व् सांद्रीभवन होऊन कृत्रिम पाऊस कोसळायचा.

याचा अर्थ यज्ञ केल्याने पाऊस पडतो असा नक्कीच नाही.

नाही तर "ज्या गीताच्या वाच्गानाने कोट्यावधी मुमुखू तरले, लाखो पाशिमात्या वेडे झाले आणि होताहेत" त्याच गीतेतील या श्लोकात म्हटल्याप्रमाणे यज्ञ करून दुष्काळी भागात यज्ञ करून पाऊस पाडता येईल आणि तेथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळून तेथील जीवन सुजलाम सुफलाम करण्याचा अतिशय सोपा मार्ग उपलब्ध होईल.

कुठलेही साहित्य ज्या काळात लिहिले गेले त्या काळातील समाजमनाचा, ज्ञात गोष्टींचा आणि समजुती-गैरसमजुतींचा आरसा असते. याला भगवद्गीताही अपवाद नाही.

प्रचेतस's picture

30 Aug 2015 - 12:25 am | प्रचेतस

असं कै नै.
तुम्ही साक्षात भगवंताच्या वाणीवर अविश्वास दाखवायलात.

प्यारे१'s picture

30 Aug 2015 - 12:42 am | प्यारे१

छान आहेत पर्जन्यसूक्तं.

माहितगार's picture

30 Aug 2015 - 12:18 pm | माहितगार

पर्जन्यसुक्ताम्चे अनुवाद आवडले. बाकी वरुणराजाची असो अथवा इश्वराची भूक यज्ञातील आहुतींवर कितीशीक अवलंबून असेल ते माहित नै देव भावाचा भुकेला अन दयाळू असेल तर त्याने भाव न खाता सुयोग्य प्रमाणात पर्जन्य समस्त प्राणीमात्रांना द्यावयास हवे असे आम्हाला वाटते.

द-बाहुबली's picture

31 Aug 2015 - 1:13 pm | द-बाहुबली

पाऊस कसा पडतो हे शाळेत गेलेल्या प्रत्येकाला माहिती आहे.

विवेचन पाउस कसा पाडायचा याचे चालु असल्याने... या शाळेत गेलेल्या प्रत्येक पोरानी पुढे कुठे कसा पाउस पाडला याचा विदा मिळाल्यास पुढील अभ्यास(दुष्काळात पाउस कसा पाडायचा ते) पुर्णतेकडे जाइल. मदत करा.

अवांतरः- शाळेतील मुले खिक्क...

शरद's picture

26 Aug 2015 - 3:17 pm | शरद

मी व श्री. माहीतगार बहुदा कोकणातील एका गावातील शेजारी शेजारी असल्याची शक्यता दिसते. बांधावरील आंब्यावरून वाद काढणे हा आवडता उद्योग. नाही तर निदान अहमदाबादमधील पतंग उडविणारे शेजारी. बघा नां, सांख्य तत्वज्ञानानंतर आता महाभारत मिळाले. भगवान व्यासांनी "आपला जय हा ग्रंथ ८८०० श्लोकांचा आहे " असे निदान माझ्याकडील महाभारतांत लिहलेले मला आढळले नाही. आदिपर्वांत व्यास- गणपति संवादानंतर कूट श्लोक भागात काय वाचावयास मिळते
"पुढे व्यासांनी भारत ग्रंथ सांगितला व गणेशांनी तो लिहिला. ह्यांत व्यासमुनींनी कित्येक स्थळी मुद्दाम कौतुकाने असा काही गूढ अर्थ ठेविला आहे कीं तो उकलणे फारच कठीण आहे." या ग्रंथातील अठ्ठाऐशींशे श्लोक एक मला अथवा शुकाला मात्र बरोबर रीतीने कळले आहेत. संजय हा महाज्ञानी खरा, परंतु त्याला हे श्लोक कळले आहेत कीं नाहीत याची वानवाच आहे" असे खुद्द व्यासांनीच प्रतिज्ञेवर सांगितले आहे.
म्हणजे जय ह्या ग्रंथाचा कूट श्लोकांचा भाग हा ८८०० श्लोकांचा. जय हा ग्रंथ त्याहून मोठा. किती मोठा ? सांगणे अशक्य आहे. पाश्चिमात्य पंडितांचा तर्क केवळ तर्क म्हणूनच स्विकार्य.
जास्त संयुक्तिक दिसते की व्यास, वैशंपायन आणि सौती हे तीन लेखक मान्य करून व्यास-वैशंपायन याचा जय-भारत हा एक भाग व सौतीचा महाभारत हा दुसरा भाग मानावा व चर्चा भारत-महाभारत यांपुरती मर्यादित ठेवावी.. तसे सौतीचा विस्तार शोधणे तुलनात्मक दृष्ट्या सोपे जावे.
आता श्री. पगला गजोधर यांच्यासाठी रेफरंस: भारताचार्य चिं. वि .वैद्य यांचा श्रीमन्महाभारत-उपसंहार
शरद

कृष्णा बोल कारे कृष्णा डोल कारे
घडिये घडिये घडिये गुज बोल कारे

माहितगार's picture

26 Aug 2015 - 5:30 pm | माहितगार

१) (केवळ) व्यासांनी लिहिलेल्या महाभारताची मूळ पटकथा हा धाग्याचा उद्देश आहे. असे धरून चालू कि मूळ व्यासांनी लिहिलेले श्लोक ८८००+क्ष होते तर या व्यासलिखीत ८८००+क्ष पर्यंत मर्यादेतील आणि व्यासेतर पटकथेतील फरक समजून घेणे हा धागालेखाचा उद्देश आहे.

: हा उद्देश का आहे ? आज पुर्वीपेक्षा भाषा तंत्रज्ञान आणि भाषा विज्ञान दोन्ही बरेच विकसीत झाले आहे. संगणक वगैरे हाताशी सहज आहेत पण कोणत्याही विश्लेषणाच्या सुरवातीसाठी मूळातला एक प्रश्न शिल्लक राहतो मूळपटकथा काय असू शकेल म्हणजे बाकी नंतर वाढवलेले पदर शोधणे अधिक विश्वासार्हपणे होऊ शकेल.

२) वैशंपायनांचा विस्तार कोणता ?

३) सौतीचा विस्तार कोणता ?

४) या तिघांच्या नंतर झालेला पण या तिघांच्या नावावर झालेला विस्तार कोणता ?

२) ८८०० श्लोक संख्या असलेला मूळ संस्कृत श्लोक आणि त्याचा शब्दवार अनुवाद जाणत्यांकडून करून मिळावा अशी विनंती आहे. (मला मराठी विकिस्रोत प्रकल्पात अख्ख संस्कृत साहित्य शब्दवार अनुवादीत स्वरूपात उपलब्ध असाव अस वाटते हा भाग वेगळा)

३) ज्यांच्या मते ८८०० श्लोक कूट आहेत ते कुट श्लोक कोणकोणते असू शकतील ?

४) भांडारकर प्रमाणप्रतीचा काही जण उल्लेख करत आहेत ती उपलब्ध प्रतीपैकी सर्वाधिक प्रमाणप्रत आहे पण त्याचा अर्थ त्यातून सर्व प्रक्षिप्त भाग काढून केवळ व्यासांचेच श्लोक ठेवले असा नसावा

-आम्ही संवाद साधतो त्याचा उद्देश सत्य जाणून घेणे हा असतो. :)

महाभारतासारख्या जगङ्व्याळ ग्रंथामधून मूळ व्यासप्रणित श्लोक शोधणे हे जवळपास अशक्य आहे.

मूळ व्यासांच्या कथेवर २ संस्करणे झाली हे तर अगदी उघडच महाभारतात लिहिलेले आहे. वैशंपायनाचे भारत आणि तदनंतर सौतीने केलेले महाभारत. ह्याच वैशपायनांचा शिष्य (का मुलगा?) जेमिनी. ह्याने महाभारताची कथा बहुधा दुर्योधनाच्या बाजूने सजवली (याबद्दल मला नेमकी खात्री नाही). हेच ते जैमिनिय महाभारत.

महाभारतावर काही मोठे प्रक्षेप झाले. कौटिल्यकाळात (इसपू ३००), भार्गवीय संस्करण (इसपू २०० ते इस २०० - परशुरामाचे बहुतेक उल्लेख याच काळातले आहेत) व शेवटचा मोठा प्रक्षेप गुप्तकाळात (इस ४०० ते ५००). ह्यानंतरही लहानमोठे असे प्रक्षेप अगदी इस. १७ व्या शतकापर्यंत होतच राहिले. नीलकंठाने भारतातील विविध प्रतींचा अभ्यास करुन नीलकंठी प्रत तयार केली जी आपल्याला १६ व्या शतकापर्यंतचे संस्करण सांगते.

सुखटणकरांनी (व त्यांच्यानंतर इतरांनी) जी भांडारकर प्रत अखंड संशोधन करुन पूर्णत्वास नेली ती आपल्याला इसवी सनाच्या १० व्या शतकापर्यंत मागे नेते. ह्याचा आर्थ जे भांडारकर प्रतीत आहे ते इस १० च्या आतलेच. द्रौपदीवस्त्रहरणप्रसंगीचा द्रौअपदीने केलेला कृष्णाचा धावा व त्याने साड्या पुरवून केलेले तीचे लज्जारक्षण भांडारकरप्रतीत गाळून टाकलेले आहे. ह्याचा अर्थ हा प्रसंग १० व्या शतकानंतर कधीतरी घुसडण्यात आलेला आहे.

एकंदरीत अभ्यास करता कृष्णाला जिथे विष्णूरूप दिलेले आहे ते उल्लेख साधारण इ.सपू १०० पासून सुरु होतात (भागवद धर्माच्या उत्थानानंतर) असे मानण्यात यावे.

बुद्धपूर्व कआळात मात्र व्यासांची मूळ कथा (कौरव -पांडव यांच्यातले सत्तेवरुन झालेले भांडण) प्रचलित होती असे मानण्यास काहीच हरकत नाही.

द-बाहुबली's picture

29 Aug 2015 - 6:34 pm | द-बाहुबली

द्रौपदीवस्त्रहरणप्रसंगीचा द्रौअपदीने केलेला कृष्णाचा धावा व त्याने साड्या पुरवून केलेले तीचे लज्जारक्षण भांडारकरप्रतीत गाळून टाकलेले आहे. ह्याचा अर्थ हा प्रसंग १० व्या शतकानंतर कधीतरी घुसडण्यात आलेला आहे.

हे बरेच ठीकाणी ऐकलेय खरे. मग एक मुलभुत प्रश्न मनात येतो तो म्हणजे द्रौपदीचे वस्त्रहरण प्रकरण शेवटी प्रत्यक्षात घडले की घडलेच नाही ? झाले नसेल तर ओह माय गॉड. पांडवानी कौरव वधाच्या प्रतिज्ञा केवळ सत्तेसाठी केल्या ?

प्रचेतस's picture

29 Aug 2015 - 7:59 pm | प्रचेतस

वस्त्रहरण झाले की दादूस. प्रतिज्ञा पण केल्या गेल्या.
भांडारकर प्रतीत मात्र तदनंतरचा कृष्णाचा धावा गाळून टाकला. प्रतिज्ञांमुळे घाबरून जाउन धृतराष्ट्राने हस्तक्षेप केला व वस्त्रहरण थांबवून द्रौपदीला ३ वर प्रदान केले.

द-बाहुबली's picture

29 Aug 2015 - 8:32 pm | द-बाहुबली

भांडारकर प्रतीत मात्र तदनंतरचा कृष्णाचा धावा गाळून टाकला.

म्हणजे "दैवी हस्तक्षेप" प्रकरण नाहीसे केले. मग हे बहुदा सगळ्या महाभारताबाबतच केले असेल. देव कथेतुन बाहेर. सबकुछ्च ह्युमन ओन्ली.

थोडक्यात ना पांड्व दैवी ठरतात ना कौरव ना क्रूष्ण ना आणखी कोणी मग... ५ पांडावांच्या प्रतिज्ञा एव्हड्या भितीदायक का ठरल्या तसही जुगारात हारणारा व भांडणामधे तुला नंतर बघुन घेइन, खपवुन टाकेन भेटच तु.. वगैरे वगैरे बरळले जातच असते मग पांडवांच्या पराक्रमाला इतके घाबरले की आत्ताच ज्या स्त्रिला *वले तिला लगेच्च घाबरुन वरदानही दिले ? मग **वले कशाला

सगळ्या महाभारतात असे नै केलं रे. भांडारकर प्रतीतही कृष्णाचे विष्णूस्वरूप, त्याचे चमत्कार असे बरेच काही आहे.
वगळलेल्या प्रकरणाचा अर्थ इतकाच की ते प्रकरण महाभारताच्या जगभर पसरलेल्या एकूणएक प्रतीपैंकी सर्वात जुन्या प्रतीत शिवाय इतरही काही प्रतीत नाही.
सर्वात जुनी प्रत १० व्या शतकाच्या आसपासची मानली जाते. ह्याचाच अर्थ असा की कृष्णाचा धावा व् त्याने वस्त्रे पुरवून केलेली सुटका हा भाग नंतर केव्हातरी घुसडला गेलाय.

भांडारकर प्रत संशोधीत प्रत आहे ह्याचा अर्थ ती निर्दोष प्रत आहे असा अर्थ होत नाही.

माहितगार's picture

29 Aug 2015 - 11:12 pm | माहितगार

भांडारकर प्रत संशोधीत प्रत आहे ह्याचा अर्थ ती निर्दोष प्रत आहे असा अर्थ होत नाही.

हे अत्यंत मोलाच सांगीतलत.

आपली खपुष्प शोधण्याची इच्छा स्तुत्य आहे. पण व्यास-वैशंपायन या गुरू-शिष्यांतील लेखनातील फरक शोधून त्यांचे लिखाण निराळे करणे आजच्या भाषातंत्रालाही अवघड जावे. मात्र भारत व महाभारत यांतील लिखाण निराळे करणे तसे सोपे असावे. भारताचार्य वैद्यांच्या उपसंहारात आपणास बरीच माहिती मिळते.(पृष्ट ५-३८).
शरद

माहितगार's picture

27 Aug 2015 - 9:43 am | माहितगार

भारत व महाभारत यांतील लिखाण निराळे करणे तसे सोपे असावे. भारताचार्य वैद्यांच्या उपसंहारात आपणास बरीच माहिती मिळते.(पृष्ट ५-३८).

या माहितीसाठी धन्यवाद.

बाकी पूर्ण खपुष्प शोधण्याचा या धाग्यातून होणार नाही आणि तशी अपेक्षाही या धागा लेखाची नाही.

कोणत्याही कथानकाचे संक्षीप्तीकरण अवघड नसावे, अन आता पावेतो ते अनेक वेळा झालेही असेल, पुढेही होत राहतील . फक्त मी संक्षीप्तीकरण हा शब्द टाळतो आहे, कारण संक्षीप्तीकरणात महत्वाचा असण्याची शक्यता असलेला कथानकाचा टप्पा सुटू नये आणि टाळण्याजोगा असलेला भाग संक्षिप्तीकरणात येऊ नये. असे किमान स्वरूपाचे कथानक रेखाटणे अवघड असले तरी खूपही कठीण असेल का ?

बाकी प्रश्न राहीला तंत्रज्ञानाचा मी तंत्रज्ञानाला ओव्हरएस्टीमेट करत नाही तसे तंत्रज्ञानाची क्षमता अंडरएस्टीमेट सुद्धा करू इच्छित नाही. असो.

प्रसाद प्रसाद's picture

26 Aug 2015 - 4:56 pm | प्रसाद प्रसाद

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने महाभारतातील प्रक्षिप्त भाग कोणता आहे हे शोधून काढून महाभारताची शुद्ध (दुसरा कोणता शब्द वापरावा हे कळत नाही) प्रत तयार केली आहे. प्रचेतस याविषयीचे जाणकार आहेत. त्यांनी ह्या प्रतीचा संदर्भ दिलेला वाचल्याचे आठवते.

मूळ व्यासप्रणीत ग्रंथातील भाग कुठला हे शोधण्याचा प्रयत्न एम आर यार्दी यांनी केलेला आहे, तेव्हा हे अगदीच खपुष्प वगैरे आजिबात नाही. १९८६ च्या आसपास भांडारकर संस्थेनेच त्यांचा यासंबंधीचा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे.

माहितगार's picture

27 Aug 2015 - 8:05 pm | माहितगार

ब्याटमनराव लै गूगलल्या नंतर मधुकर रामराव यार्दी यांची जराशी माहिती मिळाली ती मराठी विकिपीडियावर जोडली आहे. एक तर त्या माहिती दुजोर्‍याची गरज वाटते. दुसरे अजून बरीच माहिती खास करुन जन्म मृत्यू व्य्कतीगत जीवन इत्यादी माहिती हवी आहे. मिळाल्यास जरूर कळवावे.

माझ्याकडे त्यांचे पुस्तक आहे, त्याच्या प्रस्तावनेत काही माहिती मिळाल्यास पाहतो.

तुडतुडी's picture

27 Aug 2015 - 3:51 pm | तुडतुडी

दत्ता जोशी>>+११११११११११
इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे कि नाही हे शोधण्यासाठी सध्या केवढा आटापिटा केला जातो आणि पैसे खर्च होतात . हे सगळं करण्यापेक्षा योगानुभावातून का शोधत नाहीत ? सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील . आपल्या अध्यात्मात आणि धार्मिक ग्रंथात उल्लेख केलेले वेगवेगळे लोक हि केवळ कल्पना नसून खरोखर अस्तित्वात आहेत .
संदर्भ : चित्शक्ती विलास by स्वामी मुक्तानंद . (तो साउथ इंडिया मधला भोंदू बाबा मुक्तानंद नव्हे . गणेशपुरीचे मुक्तानंद . गेल्या शतकातले योगसामर्थ्य संपन्न . )

माणसांना ईश्वरा पर्यंत पोचण्याचा रस्ता दाखवण्यात नाग्लोकातून आलेल्या नागांचा फार मोठा वाटा आहे , योगशास्त्राची देणगी नागांनीच जगाला दिली आहे . (महर्षी पतंजलींची मूर्ती अर्धा नाग अर्धा मानव अश्या स्वरुपात आहे ) . साईबाबा ३ दिवस भौतिक शरीर सोडून गेले होते तेव्हा ते नाग्लोकातील १ समस्या सोडवण्यासाठी गेले होते . काळाप्रमाणे माणसांचा जसा अध्यात्मिक ऱ्हास झाला तसाच नागांचाही झाला . माणसांकडून नागांची मोठ्या प्रमाणात हत्या सुरु झाली (सर्पसत्र यज्ञ). तेव्हा नागराज अनंताने सर्व नागांना माघारी नागलोकात बोलावले . पण काहींना हे थांबेल अशी अशा होती तर काहींनी बंडाळी करून इथेच राहणं पसंत केलं . आज मनुष्याच्या दैवी शक्तीचा लोप होवून तो जसा 'मनुष्यप्राणी' बनून राहिलंय तशीच अवस्था नागांची सुधा झालीये .
संदर्भ : Apprenticed to Himalayan Master By Shri M .

बॅटमॅन's picture

27 Aug 2015 - 4:01 pm | बॅटमॅन

हे सगळं करण्यापेक्षा योगानुभावातून का शोधत नाहीत ? सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील .

म्हण्जे आमी येडे.

- नासा, इस्रो आणि त्यांचे अन्यदेशीय समस्त जातबंधूभगिनी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2015 - 2:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्लँचेट वापरून व्यास, वैशंपायन, सौती इ इ सर्व या सर्व प्राचीन लेखकांच्या आत्म्यांनाच प्रश्न विचारले तर खुद्द "घोड्यांच्या तोंडून" खरी माहिती मिळू शकेल !

(नेटीव उपाय लय झाले आता इन्नोवेटीव उपायांची बारी हाय ;) )

बॅटमॅन's picture

28 Aug 2015 - 4:13 pm | बॅटमॅन

हा हा हा ;)

प्यारे१'s picture

27 Aug 2015 - 4:32 pm | प्यारे१

पण मी काय म्हणतो? हा टॉपिक नंतर घ्या ना अभ्यासाला. आत्ता बरेच मनोरंजनात्मक कार्यक्रम सुरु आहेत मिपावर. थोडा slack आला की घ्या की हा बोर्डावर!

माहितगार's picture

27 Aug 2015 - 5:14 pm | माहितगार

=))

असले प्रतिसाद वाचले की नाडीमार्तंड बोलल्यासारखं वाटतं !! =))

द-बाहुबली's picture

29 Aug 2015 - 6:48 pm | द-बाहुबली

तुमचे विवेचन रोचक आहे. आपण अतिशय गुढ बोलत आहात. इतके की हास्यास्पद वाटावे. पण सध्या नासा व तत्सम भौतिक ज्ञानाच्या प्रणेत्या देशांचे प्रचंड लष्करी सामर्थ्य व मुक्तर्थव्यवस्थेच्या लोभस फळांची चलती असल्याने सामान्यांना रुचेल झेपेल असे ज्ञान व आयुष्य तुमचे दावे देणार नसतील तर ते मसणात जावे असेच म्हणावे लागेल.

सध्यस्थितीमधे आपण अपेक्षा करता/मानता ते प्रकार जिव, रसायन वा भौतीक शास्त्राच्या पातळीवर यावेत अशी अनेकांची इछ्चा असली तरी ते काही शतके निव्व्वळ क्ल्पना रंजनच असेल.. अनलेस सम मिरॅकल हॅपन्स.

कपिलमुनी's picture

2 Sep 2015 - 1:43 pm | कपिलमुनी

इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे कि नाही हे शोधण्यासाठी सध्या केवढा आटापिटा केला जातो आणि पैसे खर्च होतात . हे सगळं करण्यापेक्षा योगानुभावातून का शोधत नाहीत ?

म्हणजे ?
तुम्हाला वर्तकांचे मंगळभ्रमण माहित नाही ?

चित्रगुप्त's picture

3 Sep 2015 - 7:27 am | चित्रगुप्त

आता एवीतेवी " वर्तकांचे मंगळभ्रमण" हा विषय निघालाच आहे, तर हेही वाचून घ्या एकदा:

http://www.misalpav.com/node/23698

कपिलमुनी's picture

3 Sep 2015 - 4:02 pm | कपिलमुनी

झैरात !! झैरात !! झैरात !!

महभारताच्या आधारावर दोन गोष्टी आवर्जून सांगितल्या जातात-
१)सर्व लेण्या पांडवांनी एका रात्रीत बांधल्या.( हे सांगणाय्रा गाववाल्यास शंका विचारायची नाही.कानफटात बसू शकते.)
२)सर्व तृतीयपंथीयांना मूळपुरूष मिळाला( अर्जुन)

म्हण्जे आमी येडे.म्हण्जे आमी येडे.
- नासा, इस्रो आणि त्यांचे अन्यदेशीय समस्त जातबंधूभगिनी.

हो का . बर . अरबस्तान , पाकिस्तान , तुर्कस्तान आणि कसल्या कसल्या स्तानातल्या एखाद्या संस्थेचा उल्लेख नै केला तो

पगला गजोधर's picture

28 Aug 2015 - 12:29 pm | पगला गजोधर

अरबस्तान , पाकिस्तान , तुर्कस्तान आणि कसल्या कसल्या स्तानातल्या एखाद्या संस्थेचा उल्लेख नै केला तो

तुम्ही सांगितलेल्या देशात अवकाश-संशोधन संस्था असू शकेल काय या बाबत मी जरा साशंक आहे.
अश्या संस्था विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन बाळगणाऱ्या देशात (जसं की भारतासारख्या) त्यांच्या विज्ञाननिष्ठ नेतृत्वाने (जसं की पंडित नेहरू सारखे)
उभारलेल्या दिसतील. ते तुम्ही म्हणताय ते देश धर्मांधतेच्या विळख्यात सापडलेले आढळतील कदाचित…. त्यांना शिया किन्वा सुन्नी किन्वा ज्यू ह्यांच्या कत्तलीतून फुरसत मिळाली तर नं …

जो उल्लेख केलाय त्याबद्दल बोल की तुडतुडे, जो उल्लेख नाही त्याबद्दलच फापटपसारा वाढवून काय होणारे? हे लोक मूर्ख आहेत किंवा कसे इतके सांग. मग त्यांना सांगू आपण.

विज्ञानाच्या पल्याडच्या योगादी सामर्थ्याच्या तथाकथीत कल्पनांमबद्दल वि.का. राजवाड्यांचा एक मस्त लेख बर्‍याच वर्षांपुर्वी वाचला होता असे आठवते. कुणाकडे वि.का. राजवाड्यांचे साहित्य उपलब्ध असल्यास तो लेख शोधून वेगळ्या धाग्याच्या रुपाने मिपा आणि इतरही मराठी संस्थळावर आवर्जून टाकला जावयास हवा असे वाटते.

अजया's picture

4 Sep 2015 - 10:22 pm | अजया

=))

त्या 'स्ताना'तील लोक धर्मांध असल्याने त्यांची तशी गत झाली आहे. मला माफ करा पण मला वाटते आपले विचार त्या लोकांशी मिळते आहेत. सुदैवाने हिंदुस्थानात बुद्धिवादी लोक आहेत.

मंडळी चर्चा पुन्हा एकदा मूळ धागा लेखाकडे यावी म्हणून काही प्रश्न

१) व्यास लिखीत महाभारत भागाची सुरवात काय असावी ?
२) व्यास आणि भीष्म समावयीन असावेत का ?
३) महाभारताचे कुरुक्षेत्र युद्ध संपून व्यासांनी महाभारत (जय) लिहिण्यास घेतले तेव्हा व्यासांचे वय काय असावे ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Aug 2015 - 12:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

धृतराष्ट्र आणि पंडू ही खरे तर व्यासाची संतती. म्हणजे व्यासाने आपल्या वंशाचा इतिहास जिवंत रहावा म्हणून जय हा ग्रंथ लिहिला असे म्हटले तर काय चुकले ?

धृतराष्ट्र आणि पंडू ही खरे तर व्यासाची संतती. म्हणजे व्यासाने आपल्या वंशाचा इतिहास जिवंत रहावा म्हणून जय हा ग्रंथ लिहिला असे म्हटले तर काय चुकले ?

मी इथे गृहीतके सरसकट नाकारत नाहीए पण उपरोक्त विधानाच्या अनुषंगाने आधार गृहीतकांकडे निर्देश करतो आहे.

कारण इतिहास जिवंत ठेवण्याची संवेदना आहे अशी व्यक्तीस वंशविच्छेद करणारे संघर्ष थांबवण्याचाही प्रयत्न करेल तटस्थ राहणार नाही.

१) यातील पहिल गृहीतक हे कि

अ) जय या कथेत अंशतःतरी इतिहास असला पाहिजे. (असूही शकतो, नसूही शकतो यावर या धाग्यासाठी भाष्याची विशेष जरूरी तुर्तास तरी नाही)

आ) व्यासांचा नियोग प्रसंग चित्रण हा भाग प्रक्षिप्त असावयास नको. कारण महाभारतात नियोग प्रसंग चित्रीत केलेला नसता तरीही धृतराष्ट्र आणि पंडू यांच्या पुत्रांमध्ये जो सत्ता संघर्ष व्हावयाचा तो झालाच असता. (याचा अर्थ असा नव्हे की आपण ते प्रसंगचित्रण प्रक्षिप्त आहे हे आत्ताच गृहीत धरून चालू शकतो.) इथे एक उल्लेखनीय भाग म्हणजे व्यासांच भाषेवरच प्रभूत्व एवढ विशीष्ट आहेतर महाभारतातील विवीध संघर्ष प्रसंग हाता बाहेर जाण्या पुर्वीच व्यासांनी इफेक्टीव्ह हस्तक्षेप करून स्वतःच भाषा प्रभूत्व सिद्ध का केले नाहीत. त्यांनी इफेक्टीव्ह हस्तक्षेपाचा प्रयत्न केला असता तर त्यांनी कृष्णाने युद्ध कर म्हणून गीता लिहिली त्याच्या तोडीस तोड युद्ध करू नका अशी गीता अथवा स्वतःचे इतर इफ्फेक्टीव्ह संवाद आंतर्भूत केले असते. (महाभारतात असे संवाद असतील तर त्या बद्दल मला कल्पना नाही असे असू शकते आणि महाभारत जाणकारांनी व्यासांच्या अशा संवाद श्लोकांवर प्रकाश टाकावा)

इ) जर नियोग प्रसंग चित्रण वस्तुनिष्ठ आहे आणि त्यांचा तदनंतरच्या प्रसंगात इफेक्टीव्ह प्रेझेन्स दिसत नाही तर एक शक्यता अशीही असू शकते की व्यासांचा मूळ जय ग्रंथ हा केवळ त्यांच्या पिढी पर्यंतचे आणि फारतर धृतराष्ट्र आणि पांडू या दोन पूत्रांच्या उदया पर्यंतचा असेल आणि नंतरचे सर्व चित्रण इतरांनी केले असेल.

पैसा's picture

31 Aug 2015 - 11:29 pm | पैसा

नियोगाच्या अटी नुसार नियोगकर्त्याने त्या स्त्रीशी बोलूही नये असा संकेत होता. त्याने अर्थातच अशा संततीबद्दल ममत्व बाळगणे किंवा त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करणे हे ही संमत नव्हते.

माहितगार's picture

31 Aug 2015 - 11:53 pm | माहितगार

काही जण नियोगकर्ते चेहराही पहात नाहीत शरीराच्या इतर भागास स्पर्शही करत नाहीत स्वरुपाचे दावेही करत असावेत. इतर वस्तुस्थिती माहित नाही. जिथपर्यंत महाभारत कथेचा संबंध आहे अंबिका आणि अंबालिका (नावे बरोबर आहेत ना? चुकभूल देघे) यांना चेहरा पाहून भिती वाटली आणि विदुराच्या मातेस भिती वाटली नाही असा किमान उल्लेख आहे म्हणजे चेहर्‍याचे दर्शन प्रत्ययही होत नसावे असे किमान महाभारतात नसावे. दुसरे पांचालनगरीस पोहोचण्यापुर्वी वनात अज्ञातवासातील पांडवांना व्यास भेटघेऊन मार्गदर्शन करून जातात असा किस्सा शरद रावांनी सुचवलेल्या महाभारतात वाचला प्रक्षिप्त आहे अथवा नाही हा भाग वेगळा पण व्यासांचा बाजू घेणारा एक उल्लेख आढळला.

कुंतीचे देवतांना आवाहन हा प्रकार नियोगात मोडणारा नसावा पण महाभारतात कुंतीचे संबंधीत देवतांशी संवाद झाले असावेत आणि पाच पांडवात वयाचे अंतर असावे असे काहीसे वाचल्याचे स्मरते पुन्हा एकदा हे स्मरणावर आधारीत आहे इतर अभ्यासकांनी दुजोरा द्यावा अथवा माझी धारणा चुकीची असल्यास तसे नजरेस आणावे. मी माझी धारणा बदलण्यात तत्पर असेन. आणि प्रक्षिप्ततेचा मुद्दा आहेच.

प्यारे१'s picture

1 Sep 2015 - 12:06 am | प्यारे१

अंबा नाही. अंबा ने भीष्माचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करून प्राणत्याग केला नि पुढील जन्म शिखंडीचा मिळाला असं आहे बहुतेक.
अंबिका आणि अम्बालिका या दोघीन्ची लग्न हस्तिनापुर च्या युवराजांबरोबर लावून दिली गेली.

तुडतुडी's picture

31 Aug 2015 - 3:24 pm | तुडतुडी

बॅट्या . बोलायचं म्हणलं तर खूSSSSSSS प बोलता येईल . तो विषयच असा आहे . पण 'आम्ही येडे' असं भांडणाच्या सुरत बोलल्यावर नै बोलता येणार .
चर्चा करायची असेल तर बोलण्यात अर्थ

विज्ञानाच्या पल्याडच्या योगादी सामर्थ्याच्या तथाकथीत कल्पनांमबद्दल वि.का. राजवाड्यांचा एक मस्त लेख बर्‍याच वर्षांपुर्वी वाचला होता असे आठवते.

वि.का. राजवाड्यांचा 'योग' ह्या विषयावर काही अभ्यास आहे का हे आधी महत्वाचं .त्यांचं लिखाण हि सुधा तथाकथीत कल्पनाच म्हणता येईल .अर्जुना , तू योगी हो म्हणून सांगणारे श्रीकृष्ण येडे , ज्ञानेश्वर महाराज येडे , रामकृष्ण परमहंस , स्वामी विवेकानंद , वासुदेवानंद सरस्वती , स्वामी राम , परमहंस योगानंद आणि असे पुष्कळ योगी सगळे येडे . राजवाडे तेवढे शहाणे

द-बाहुबली's picture

31 Aug 2015 - 3:27 pm | द-बाहुबली

कशाला एवडा प्रतिसाद प्रपंच ? अशावेळी फक्त होय शक्तीमान, स्वारी शक्टीमॅन, ओके शक्तीमान म्हणून विषय मोकळा करायचा.

माहितगार's picture

31 Aug 2015 - 3:35 pm | माहितगार

वि.का. राजवाड्यांचा 'योग' ह्या विषयावर काही अभ्यास आहे का हे आधी महत्वाचं. ...... राजवाडे तेवढे शहाणे.

हे राजवाड्यांनी त्या लेखात काय लिहिलय हे पाहून मगचं ठरवता येईल ना, तुर्तास त्यांचा लेख आंजावर तरी उपलब्ध दिसत नाही. त्यामूळे तोपर्यंत तरी राजवाड्यांची योग परीक्षा होऊ शकणार नाही.

योग आणि योगी शब्दाच्या एकापेक्षा अधिक व्याख्या आहेत. बाकी तुम्ही ज्यांच्या बद्दल उपरोधानी लिहिले आहे त्यांच्या योगा बद्दल आम्ही उपरोधानेही लिहित नाही, त्यांच्या पैकी प्रत्येकाच्या योगा बद्दल वस्तुनिष्ठ कल्पना बाळगतो आणि त्यांच्या योगसामर्थ्या बद्दल अवास्तव कल्पनाही बाळगत नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2015 - 1:57 pm | कैलासवासी सोन्याबापु

महाभारत कथा ज्याच्याशिवाय होऊ शकली नसती असे दोनच शब्द सुचतात

"भावकीची भांडणे"

(कृ ह घ्या)

कपिलमुनी's picture

2 Sep 2015 - 3:25 pm | कपिलमुनी

आमच्या सांगलीकडे भांडणाची ३ कारणे सांगतात
भावकी, गावकी आणि न्हावकी

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2015 - 3:43 pm | कैलासवासी सोन्याबापु

आवो मुनिवर आमचे आजोळ हाय सांगली जिल्ह्यात!!!

बॅटमॅन's picture

2 Sep 2015 - 3:52 pm | बॅटमॅन

अतिनेमके!!!!!

कृष्णासारखे देव आणि भीमार्जुनासारखे योद्धे असले तरी बेशिक गोष्ट म्हंजे भावकीची भांडणे असल्यामुळेच ही कथा इंड्यन जन्तेला जास्त आपल्यातली वाटली असावी असे वाटते. राम वगैरे ठीके, पण तो तर बोलूनचालून आदर्श, त्यामुळे जरा आवाक्याबाहेरचाच. महाभारत मात्र एकदम "आपल्यातले" वाटते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2015 - 4:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

आमची आय कीर्तनकार तिच्या शब्दांत बोलायचे झाल्यास

रामायण :- मानवी स्वभावातल्या चांगल्या गुणांचा चांगुलपणाचा अतिरेक झाल्यावर जे होते त्याची कथा

महाभारत :- मानवी स्वभावातल्या नीच गुणांचा अतिरेक झाल्यावर जे होते त्याची कथा

क्या बात है, परफेक्ट वर्णन एकदम! सहीच.

आता काही सेकुलर आणि लिबरल लोक्स या वर्णनावरून दोन्ही ग्रंथ 'अतिरेक्यां'ना पोषक आहेत असा जावईशोध लावायलाही कमी करणार नाहीत. ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2015 - 4:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

मुद्दा हा गोथम नरेश का अतिरेक टाळा! अतिरेक टाळणे ह्या सदरा खाली सेक्युलर अन लिबरल सदरे काढून डोसक्याला गुंडाळतात हेच खरे साले :(

त्याला काही इलाज नाय सरजी, एकवेळ कुत्रा म्यांवम्यांव आणि मांजर भू भू करेल पण यांच्यात बदल काही व्हायचे नाहीत.

तरी अलीकडे जागृती होतेय हे चांगलेच आहे.

नाखु's picture

2 Sep 2015 - 5:05 pm | नाखु

शिवचरीत्र माहीतीची लेखमाला चालू कर!!!(हे धागे सध्या साईडलाईन ला टाक)

अन्यथा रोज दहा खरडींचा मारा करीन.

नाखुस सुपारीवाला

चिमण हटेला गँग.

माहितगार's picture

3 Sep 2015 - 9:33 am | माहितगार

:) नाखु रोज दहा खरडींचा माराची सुपारी घेण्या आधी बहुसंख्य मिपा धागे गुणीले प्रतिसाद लिहिणारे गुणीले दहा-दहा खरडी = ? खरडी हा गुणाक्रार केलाय ना. काल रात्री मिपावरील सर्व धागे आमच्या स्वप्नात येऊन विचारत होते कि बहुतेक धागालेखाच्या मुख्य मुद्द्यापासून भरकटत राहणे यात आम्हा धाग्यांचा काय दोष. आमचा हा धागा तर या चिंतेत पडला होता शिवचरीत्र माहीतीची लेखमालेतही लोक केवळ भावकीपाहू लागले बाकी काही दिसलच नाही तर आपल्या नाखुस सुपारीवालांना किती खरडींचा मारा करावा लागेल ? :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Sep 2015 - 10:19 am | कैलासवासी सोन्याबापु

अहो भावकी चा प्रतिसाद विषय सोडुन वाटल्यास मी माफ़ी मागतो तुमची, पण थेट बोला की राव हे काय उगा आडून आडून,

उरता उरला नंतर च्या प्रतिसादांचा प्रश्न तर ते एकातुन एक येत गेले _/\_

माहितगार's picture

3 Sep 2015 - 4:09 pm | माहितगार

अहो तसं कै नै, नाखुंच्या खरड्यांना धास्तावून आमच्या धाग्यावर खरेच बहिष्कार झाला तर काय म्हणून धास्तावलो आणि बाकी आम्ही पण :) स्मायली टाकूनच विनोदानी लिहिलकी त्यामुळे ह. घ्या. बाकी चालू द्या.

नाखु's picture

3 Sep 2015 - 4:54 pm | नाखु

धागा लवकरच शंभरी गाठो आणि द्विशतकही करो ही शुभेच्छा !!!!