बाबासाहेब पुरंदरेंच्या निमित्ताने जो काही वाद उकरून काढला आहे. आणि त्याला ज्याप्रकारे हे असलं दुर्दैवी रूप दिलं जातंय… त्यावरून विशेषकरून इतिहाससंशोधनाबद्दल काही नियम करावेत कि काय असा विचार मनात आला…
१. कोणीही इतिहास संशोधन करूच नये.
२. करायचे असल्यास फक्त त्यांच्याच जातीच्या संदर्भात करावे.
३. ते करण्याआधी त्या त्या जातीच्या महासंघाची परवानगी घेणे बंधनकारक करावे.
४. प्रत्येक शब्द अन शब्द काडीचीही अक्कल नसलेल्या, "पॉवर"फुल दळभद्रीच लोकांकडून तपासून घ्यावा.
५. संपूर्ण आयुष्य ध्यॆयाने झपाटून तर अजिब्बात संशोधन करू नये… कारण आज काल कुत्र्याच्या छत्र्याच वडाच्या झाडाचं मोठेपण मानत नाहीयेत.
६. आणि चुकूनसुद्धा, कधीही दुसर्याच्या जातीच्या महापुरुषांबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करू नये.
७. ह्या महाराष्ट्रात "ब्राह्मणांनी" #कधीही इतिहास संशोधन करू नये.
.
.
सरळ एक रिझोल्युशनंच पास करा म्हणावं… आणि द्या हाकलून एकजात ब्राह्मणांना महाराष्ट्राबाहेर…
.
.
तेंव्हा तरी ह्यांना शांती मिळेल कि नाही देव जाणे…
म्हणे हा पुरोगामी महाराष्ट्र
गाभा:
प्रतिक्रिया
19 Aug 2015 - 3:23 pm | प्रदीप साळुंखे
ह्या कुत्र्याच्या छत्र्या कोण?
आणि हे वडाचे झाड कोण?
काय ही 'वटवट' करताय ?
19 Aug 2015 - 3:28 pm | जेपी
शशक स्पर्धा संपली आहे.आता क्रुपया पुढच्या वेळेस प्रयत्न करा.
धन्यवाद.
19 Aug 2015 - 3:32 pm | वेल्लाभट
हाहाहाहा ! :)
20 Aug 2015 - 2:08 pm | पैसा
जौ द्या हो! कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही कधी.
20 Aug 2015 - 2:45 pm | तिमा
वरातीमागून घोडं !
20 Aug 2015 - 3:01 pm | प्रसाद गोडबोले
हे सातार्यात ( की कोल्हापुरात) झालेल्या एका विद्रोही साहित्य संमेलनात जाहीरेपणे स्टेज वरुन घोषित केले गेले होते म्हणे !!
ह्यावरुन हिटलर चे फायनल सोलुशन टु ज्युईश क्वेश्चन आठवले , असेही होवु शकते लवकरच !
20 Aug 2015 - 9:30 pm | प्यारे१
>>> एका विद्रोही साहित्य संमेलनात
यावरुन आठवलं.
अशाच एका विद्रोही साहित्य संमेलनात शंबूकाचा (रामायणवाले) पुतळा केला होता. त्याचं डोकं आणि धड वेगळं अशा अवस्थेत.
संमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलन वगैरे प्रस्थापित गोष्टींनी न करता डोकं धडावर ठेवून झाली. असते एकेकाची आवड!
21 Aug 2015 - 12:21 am | अर्धवटराव
डोके धडावर प्रस्थापीत करुन संमेलनाची सुरुवात करायची कल्पना जाम आवडली आपल्याला.
20 Aug 2015 - 7:39 pm | विवेकपटाईत
हत्ती आपल्या चालीने चालतो, कुत्रे कितीही भुंकले तरी काही फरक पडत नाही. भुंकणे कुत्र्यांचा स्वभाव असतो. कधी कधी मालकांच्या आदेशानुसार हि भुंकतात. हे चालणारच. यालाच राजनीती म्हणतात.