प्रदिप दळवीच्या लेखनाविषयी आपले मत

सुलक्षणा's picture
सुलक्षणा in काथ्याकूट
27 Aug 2008 - 3:18 pm
गाभा: 

आपण प्रदिप दळवीचे लेखन वाचता का? आपले त्याविषयी काय मत आहे?

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2008 - 3:34 pm | प्रभाकर पेठकर

जरा विस्ताराने लिहीलेत तर बरे पडेल. दुसर्‍यांची मते विचारण्या आधी आपले प्रामाणिक मत द्यावे. लेखकाचा पूर्ण परिचय द्यावा. त्याच्या पुस्तकांची नांवे द्यावीत, लेखनशैलीवर स्वतःचे निरिक्षण, मत नोंदवावे आणि मग सहसदस्यांना मते मांडण्यासाठी आवाहन करावे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Aug 2008 - 3:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

किंवा "कौल" या सदरामधे टाकावे? :?

टग्या's picture

27 Aug 2008 - 4:34 pm | टग्या (not verified)

मुळात प्रदीप दळवी कोण, काय वगैरे काहीच कल्पना नसेल तर कौल तरी काय देणार कपाळ!

(पण इन दॅट केस, 'प्रदीप दळवींच्या लेखनाबद्दल तुम्हाला काय वाटते' हा प्रश्नही निरर्थक ठरतो. इन एनी केस, असल्या चर्चांचे / कौलांचे / एकंदरीतच कौल या प्रकाराचे [इन्क्लूडिंग 'महत्त्वाचे पाच'] प्रयोजन कळत नाही. असो.)

त्यामुळे पेठकरकाकांशी सहमत.

भडकमकर मास्तर's picture

27 Aug 2008 - 5:09 pm | भडकमकर मास्तर

मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक लिहिणारे प्रदीप दळवीच काय? की दुसरे कोणी? :?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

टारझन's picture

27 Aug 2008 - 5:20 pm | टारझन

नाटक लिहीले असले तरी ते ...माननिय आदरनिय पुज्य नथूराम गोडसेंच्याच पुस्तकावरून लिहीले आहे ते .. तो परप्रकाशित पणा मी पण करू शकतो ..

पिक्चर ढापू महेश भट आणि म्युझिक ढापू अन्नू मलिकचा शत्रू
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

टारझन's picture

27 Aug 2008 - 5:17 pm | टारझन

आयला कोण हा प्रदिप दळव्या ? शेक्स्पियर की पु.लं ? की अत्रे ?
आमचे मत कळलेच असेल

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

सुनील's picture

27 Aug 2008 - 5:57 pm | सुनील

आयला कोण हा प्रदिप दळव्या ? शेक्स्पियर की पु.लं ? की अत्रे ?
मी काही प्रदीप दळवींचा चाहता असे नाही. आणि तसे ते शेक्स्पियर, पुल किंवा अत्र्यांइतके सुपरिचित नाहीतही.

तरिही, स्वत:ला अनोळखी असलेल्या व्यक्तीबद्दल थेट एकेरी, हेटाळणीपूर्वक भाषा काही पटली नाही बौ. हां आता याला तुम्ही "पुणेरी" सडेतोडपणा म्हणणार असाल तर गोष्ट वेगळी!!

(सडेतोड ) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Aug 2008 - 7:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

+१

टारझन's picture

27 Aug 2008 - 7:35 pm | टारझन

मी ऍरोगंट वाटलो ... किंवा काय मला फरक पडत नाही .. मला धागा उचकुन आत यायचे कष्ट पडले तर आतमधे काहीच नाही ..
यामुळे धागा काढणाराने मिपावरचे बाइट्स आणि लोकांचा अमुल्य वेळ घालवलात . हे पटले नाही.
भाषेबद्दल माफी मागण्यासा प्रश्न येत नाही. आम्हाला वाटेल/पटेल त्याला आम्ही मान देऊ नाही देऊ .. कुणाला त्याचे काय ?
प्रदिप दळवी/व्या आमच्या साठी शुन्य आहे. शुन्याला मान देण्याची प्रथा आमच्यात नाही . उत्तर देऊ इच्छीत नव्हतो .. पण द्यावं लागलं..
असो .. ज्यांविषयी मला आदर वाटावा त्यांच्या बद्दल आदर आहे. तुम्ही काळजी करू नये.

अवांतर : आज काल कुठेही लोक +१ लिहून सहमतीचं शेपूट चिकटवतात.
फुकटचा सल्ला : फालतू धागे सूरू करू नयेत. आपल्या मिपाची जागा (किलो बाईट्स) आणि मिपाकरांचा वेळ जाणार नाही याची दक्षता घ्या. आम्हाला याचा फरक पडतो .

तात्या .. नम्र विनंती :
उद्या जर मी "हैबतराव वासमारे यांच्या दात घासण्याच्या आणि टमरेल धरण्याच्या कौशल्याबद्दल आपले मत काय?" हा धागा काढला तर शिव्या खायचा हक्कदार कोण असेल ? धागा सूरू करणारी "मी" का "हैबतराव वासमारे" ?

सडेतोडांना बिनतोड
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

कोलबेर's picture

27 Aug 2008 - 7:46 pm | कोलबेर

'मान न देणे' ह्याचा अर्थ 'हेटाळणी करणे' असा होत नाही. मान द्यायचा का नाही ते सदर व्यक्तिविषयी माहिती झाल्यावरच ठरवा.. पण निव्वळ सदर व्यक्ती कोण हे कधीच न ऐकल्याने, 'कोण हा दळव्या?' असा उल्लेख करायची मुभा मिळते का?

मी ऍरोगंट वाटलो ... किंवा काय मला फरक पडत नाही

असेच असेल तर सगळ्याच प्रतिक्रियांकडे कृपया दुर्लक्ष करावे!

टारझन's picture

27 Aug 2008 - 8:07 pm | टारझन

.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Aug 2008 - 7:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतर : आज काल कुठेही लोक +१ लिहून सहमतीचं शेपूट चिकटवतात.
फुकटचा सल्ला : फालतू धागे सूरू करू नयेत. आपल्या मिपाची जागा (किलो बाईट्स) आणि मिपाकरांचा वेळ जाणार नाही याची दक्षता घ्या. आम्हाला याचा फरक पडतो .

टारू बाळ, आता ही दोन्ही वाक्य एकमेकांशी संबंधित आहेत असा विचार कर. आपलं मत दुसय्रानी आधीच मांडलं असेल तर त्याला सहमती दाखवून मिपावरचे बाईट्स आणि लोकांचा वेळ वाचतो. आणि ज्याला सहमती दर्शवली आहे त्याला आपला समविचारी कोण तेपण कळतं!

तुझी
विक्षिप्त आज्जी!

लंबूटांग's picture

27 Aug 2008 - 9:08 pm | लंबूटांग

मिपाची जागा (किलो बाईट्स) ची चिंता तात्या करेल. तुला कष्ट पडले ह्याचा अर्थ असा नाही की कोणालाही थेट एकेरी, हेटाळणीपूर्वक भाषा वापरून बोलावे. हे मलाही नाही पटले.

'हैबतराव वासमारे यांच्या दात घासण्याच्या आणि टमरेल धरण्याच्या कौशल्याबद्दल आपले मत काय?' हा धागा कोणाच्या लेखन कौशल्याशी तुलना करणारा होऊच शकत नाही.

अवांतर: धागा सूरू करणारी "मी" !!!! आफ्रिकेत जाऊन काय काय बदलते लोकांचे :P (ह. घ्या.)
--(छप्परतोड) लंबूटांग

टारझन's picture

27 Aug 2008 - 9:59 pm | टारझन

जागेचं जाउन देत ... पण माझा वेळ गेला त्याचं काय ? का त्याच पण कोणीतरी बघेल ?
असो सोडून दे.. ही गोष्ट मनाला लाउन घेऊ नये... उगाचच वाद घालता .. क्षमस्व ..
पण हा फालतू धागा आहे हे तरी मान्य कर की .... तुलनेचं सोड .. पण यातुन काय निष्पन्न...?
असो माझा शेवटचा रिप्लाय ... इथून पुढे हा धागा मी उधडणार नाहिये...
एकेरी उल्लेखाबद्दल भावना दुखलेल्या सर्वांची माफी !!

रा का री ... ते आपण ग-बोल वर बोलू .. इथे बाइट्स नको वाया जायला :)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मी''प्रदीप दळवीं'ची संभवामि युगे युगे ही कादंबरी वाचली होती.
त्यानंतर त्यांच्या ४-५ कादंबर्‍या वाचल्या. कालांकित पण एक चांगले पुस्तक वाटले.

विज्ञानाच्या दृष्टीकोनातून धार्मिक वचनांचा आधार घेऊन लिहिणारे लेखक म्हणजे प्रदीप दळवी आहेत.
त्यातले खरे किती आणि खोटे किती हे ज्याचे त्याने ठरवावे असे मला वाटते. खरे तर प्रदीप दळवीच जास्त चांगले सांगू शकतील.

पण माझे मत, असे आहे की त्यांची कथानके केवळ तर्कावर आधारीत असावीत.
या चर्चेचा हेतू काय आहे हे माहीत नाही. पण चांगली - वाईट अशी विभागणी करायची असेल तर ही २ पुस्तकेच मला जास्त भावली.
बाकीची कथानके मला तरी नाही आवडली.
अशा कादंबर्‍या केवळ मनोरंजनाकरीता वाचाव्यात असे मला वाटते....

बाकी येथे बरीच विद्वान मंडळी आहेत ती योग्य तो उहापोह करतीलच
(कादंबरीप्रेमी) सागर

विसोबा खेचर's picture

27 Aug 2008 - 5:44 pm | विसोबा खेचर

प्रदिप दळवी हे नाटककार आहेत असे ऐकून आहे. याउपर त्यांच्याबद्दल मला अधिक काही माहिती नाही....

तात्या.

कोलबेर's picture

27 Aug 2008 - 7:47 pm | कोलबेर

त्यांच्या नाटकांपैकी वासूच सासू भन्नाट होते 'मी नथुराम बोलतोय' मात्र आवडले नाही.

१.५ शहाणा's picture

27 Aug 2008 - 10:11 pm | १.५ शहाणा

त्यांच्या नाटकांपैकी 'मी नथुराम बोलतोय' हे खुपच आवड्ले मस्त आहे.

भाग्यश्री's picture

27 Aug 2008 - 10:20 pm | भाग्यश्री

मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक त्यांचे असेल तर खूप आवडले होते.. पण त्यात त्यांच्या लेखनाचा/डिरेक्षनचा ई.चा हातभार किती ते माहीत नाही.. कारण शरद पोंक्षेचा अभिनय पहील्या रांगेत बसून पाहील्यामुळेच आवडलं होतं नाटक.. श्रेय शरद पोंक्षेला..
बाकी त्यांची अजुन काही पुस्तकं/नाटकं असतील तर इथे यादी दिली तर बरे पडेल..