( मुंबईत जुहूबिचवर छटमोहोत्सावाला ५००००० जणांची उपस्थिती ! )

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
17 Aug 2015 - 10:46 am
गाभा: 

* सर्वप्रथम डॉ. इ. ए. साहेबांची माफी मागतो
** आमची प्रेर्ना

नुकत्याच(काही महिन्यांच्यापूर्वी) झालेल्या, उत्तर-भारतीयांचा महत्त्वाचा सण असलेल्या छट पूजेसाठी मुंबईतील समुद्र किनारे गर्दीने फुलले होते. कार्तिक शुक्लषष्ठीच्या मावळत्या सूर्याला अर्ध्य देण्यासाठी लाखो भक्तांनी मुंबईच्या किनाऱ्यावर गर्दी केली होती. सर्व प्राणीमात्रांचे कल्याण व उन्नती व्हावी आणि नैसर्गिक संकटापासून मुक्ती मिळावी या उद्देशाने उत्तर भारतीय समाजाच्या वतीने छटपुजा करण्याची प्रथा आहे. एकट्या जुहू बिचवर पाच लाखांवर भाविक जमले होते. अक्सा, पवई, गिरगाव, आणि वांद्रयातही भाविकांनी पुजा केली होती. **** निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ***ने पुन्हा उत्तर भारतीयांना आकर्षित करण्याची कवायत सुरू केली आहे. त्यासाठी मुंबई भा**चे अध्यक्ष व रा*- **रे यांचे 'मित्र' अशी ओळख असलेले आमदार *** *** यांनी मुंबईभर छटपूजेचे बॅनर झळकवले होते. या कार्यक्रमाला अनेक नामांकीत व्यक्तींची उपस्थिती होती. समारंभाची काही क्षणचित्रे...

Celebrities

puja

crowd

sunset

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Aug 2015 - 11:10 am | कैलासवासी सोन्याबापु

छठ दिवाळी नंतर आठवडा भरात असते , काही महीने आधी म्हणजे तुमचा रेफेरेंस मागच्या दिवाळी चा आहे काय?

पगला गजोधर's picture

17 Aug 2015 - 11:41 am | पगला गजोधर

रेफेरेंस मागील ऐक दोन मोहोत्सवांचा आहे….

तुडतुडी's picture

17 Aug 2015 - 12:05 pm | तुडतुडी

५००००० म्हणजे किती रे भाऊ ?

पगला गजोधर's picture

17 Aug 2015 - 12:07 pm | पगला गजोधर

पाच लाख ग़ तै !

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Aug 2015 - 12:16 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अन्य राज्यांमध्ये मराठी रहिवाशांनी त्यांच्या सणाला अशी मोठी गर्दी करुन भक्ती (अन्य राज्याप्रती) दाखवत सोहळा केला तर कितपत स्वीकारला जाईल?
..उपस्थितांपैकी कितींजण थालिपीठ्,मिसळपाव खात असावेत?
कवि.

पगला गजोधर's picture

17 Aug 2015 - 12:25 pm | पगला गजोधर

माइ, या गोष्टी मुम्बैतिल नागरिकांमुळे शक्य होतात. या मोहोत्सवामध्ये सुरुवातीला स्थानिक
राजकीय मेम्बर/मेम्ब्रान्ची भाषणे होतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Aug 2015 - 12:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

पग, डरनेका कायको ? वाचकांना आवडतील अश्या रोचक बातम्या आंदते रहो । नो प्रोब्लेमो. :)

पगला गजोधर's picture

17 Aug 2015 - 1:10 pm | पगला गजोधर

या धाग्याच्या निमित्ताने, आपल्या लेखावर (अमेरिकेत स्वातंत्र्यदिनाच्या संचलनाला ३८,००० जणांची उपस्थिती !) जिथे हर्ष व्यक्त केला, त्यांची प्रतिक्रिया इथे (या धाग्यावर) कशी असेल हे जाणून घ्यायची मला उत्सुकता, म्हणून हा प्रपंच…….

चलत मुसाफिर's picture

17 Aug 2015 - 1:14 pm | चलत मुसाफिर

छट पूजा हा एक हिंदू सण असून हिंदू समाजाने तो एकत्रितपणे साजरा करणे अपेक्षित आहे. बिहारी हिंदू बांधवांची या प्रसंगी मोठी उपस्थिती असणे ही अभिमानाची गोष्ट आहे. किंबहुना मुंबईत या सोहळ्याला एक दिमाखदार व शालीन असा मराठी रंग का चढू नये, हा एकच प्रश्न मला पडतो. मराठी हिंदूंनी हा सण आपलासा करून सामूहिकरीत्या साजरा करावा.

जडभरत's picture

17 Aug 2015 - 2:05 pm | जडभरत

हं जर आपण रोजच सूर्याला अर्घ्य देतो तर हा सण आपलासा करणेस काय हरकत आहे. त्या निमित्ताने होणारी राजकीय साठमारी तरी थांबेल.आपले आर्य पूर्वज त्या मानाने खरेच ग्रेट. अनेक परकीय देवता व सण त्यांनी खुल्या दिलाने स्वीकारले.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Aug 2015 - 1:21 pm | कैलासवासी सोन्याबापु

मुसाफिर,

तसे केल्यास राजकीय पोळ्या कश्या भाजल्या जातील?

पगला गजोधर's picture

17 Aug 2015 - 1:58 pm | पगला गजोधर

बाकी प्रतिक्रिया एकदम मनसे दिली

मास्टरमाईन्ड's picture

18 Aug 2015 - 8:38 pm | मास्टरमाईन्ड

खरोखरच मार्मिक आणि बव्हंशी खरी प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Aug 2015 - 2:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

आज गिरगाव चौपाटी येथील पूजा पाहिली. फार मजा आली. सगळ्यात सुरवातीला जी पूजा पाहिली
ती पाहुन मन प्रफुल्लित झाले माझे तरी. ज्यांचे आधार कार्ड्स बॅकलॉगमधे अडकले आहेत असे लोक ह्या रॅलीमध्ये होते. आणि 'हमे क्या चाहिये? आधार कार्ड!!! अशा आरोळ्या देत चालले होते!!!
बाकी फोटो टाकते नंतर.
बिलियन स्पायडर

नाव आडनाव's picture

17 Aug 2015 - 3:09 pm | नाव आडनाव

:) माईसाहेब, आज ईनोदी परतिसाद?

(आता म्हणू नका तो प्रतिसाद माझा नाही. माझा आयडी हॅक झाला होता :) )

सिद्धार्थ ४'s picture

18 Aug 2015 - 1:42 am | सिद्धार्थ ४

ह्या आमच्या माई नाहीत.

हं नक्कीच आयडी हॅक झालाय!!!

श्रीगुरुजी's picture

18 Aug 2015 - 8:46 pm | श्रीगुरुजी

माईसाहेब,

नानासाहेबांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व समृद्धी लाभो यासाठी तुम्ही वटपौर्णिमा, हरतालिका, छठ पूजा, कडवा चौथ इ. व्रतवैकल्ये, उपासतापास करता का नाही? कडवा चौथच्या रात्री चाळणीतून चंद्र बघून मग त्याच चाळणीतून नानासाहेबांना बघता ना?

हल्ली माईच बोलतात."ह्यांचं" काय स्टेटस आहे माई?

बोका-ए-आझम's picture

18 Aug 2015 - 1:10 am | बोका-ए-आझम

असं गाणं गात ते (तुमचे हे) गिरगाव चौपाटीजवळच्या रस्त्यावरून फिरताना दिसले मला. परवाचीच गोष्ट!