रानभाज्या महोत्सव.

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
13 Aug 2015 - 11:21 am
गाभा: 

भीमाशंकरजवळील आहुपे या निसर्गरम्य गावामध्ये रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.

शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आलेल्या देवराया, नैसर्गिक धबधबे, उंच कडे आणि खोल खोल अशा दर्‍या, भोळे आणि शहरीकरणापासून दूर असलेले वनवासी / आदिवासी, अशा या ठिकाणी २१ आणि २२ ऑगस्टला आपणास येता येईल. निगडी अथवा पुण्याहून जाता येईल.

जंगलामध्ये होणार्‍या अनेक भाज्या आणि त्यांच्या नैसर्गिक चवींचा आस्वादही घेता येईल.

वनवासी कल्याण आश्रम यांनी याचे आयोजन केले आहे.

संपर्क : ९१६८८०७७३३ आणि ९६०४६२२६२८.

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

13 Aug 2015 - 3:27 pm | वेल्लाभट

फोन करून बघतो.
खवय्यांची धाव नक्की जाणार इथे ! बघूया जमतंय का

प्रसाद गोडबोले's picture

13 Aug 2015 - 3:40 pm | प्रसाद गोडबोले

हायला !

हे भारी आहे :)

gogglya's picture

13 Aug 2015 - 4:17 pm | gogglya

मिळाल्यास कृपया येथे प्रकाशीत कराल का ?

खेडूत's picture

13 Aug 2015 - 5:22 pm | खेडूत

चांगली माहिती!

भीमाशंकरजवळील आहुपे

गुगलवर पाहिले तर भीमाशंकरच्या आधीच १४ कि मी वर उजवीकडे फाटा फुटतोय.