गणित विषयक शिलालेख-मथळ्याच्या दोन ओळींचे लेखन माहित करून हवे आहे

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
9 Aug 2015 - 10:52 am
गाभा: 

एका (बहुधा अभारतीय आंतरजालीय) अभ्यासकाने खजुराहोच्या पार्श्वनाथ जैन मंदिरातील आदर्श जादुई वर्ग (Most-perfect_magic_square) चा उल्लेख असलेल्या शिलालेखाचे खालील छायाचित्र दिले आहे आणि मथळ्यातील वरच्या दोन ओळीतील अक्षरे (लेखन) माहित करून देण्याची विनंती मराठी विकिपीडियावर केली आहे.

खालील शिलालेख चित्रातील आकड्यांचा टेबल त्याला वाचता आलेला आहे तो बहुधा
७ १२ १ १४
२ १३ ८ ११
१६ ३ १० ५
९ ६ १५ ४
असा आहे.

त्यास खालील गणित विषयक शिलालेख-मथळ्याच्या दोन ओळींचे लेखन माहित करून हवे आहे.
.
.
.

shilalekh
.
.
(छायाचित्र मोठे करुन पाहण्यासाठी विकिमिडीया कॉमन्सवरील या दुव्यावर उपलब्ध आहे.)
.
.
.

* विकिप्रकल्पातून उपयोग होत असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त समजले जातील.
* अनुषंगिका व्यतरीक्त इतर आवांतर टाळण्यासाठी आणि प्रतिसादांसाठी आभार

प्रतिक्रिया

माहितगार's picture

9 Aug 2015 - 11:00 am | माहितगार

मला पहिली ओळ ' राजपुत्र श्री देवसर्म्म' अशी वाटते आहे. माझे हे वाचन बरोबर असेल का ?

राजपुत्र श्री देवशर्म चे प्राकृत रूप असेल.

जडभरत's picture

9 Aug 2015 - 11:09 am | जडभरत

खाली विजयतु असेल का?

माहितगार's picture

9 Aug 2015 - 11:27 am | माहितगार

दुसर्‍या ओळीतील पहिले अक्षर दगडाचा आकार लक्षात घेतलातर कदाचित आपण म्हणता तसे दीर्घ वी असू शकेल पण मग त्या नंतरचे जयतुच्या आधीचे अक्षर कोणते हा प्रश्न शिल्लक राहील असे वाटते आहे

माहितगार's picture

9 Aug 2015 - 11:09 am | माहितगार

दुसरी ओळ पहिली दोन अक्षरे आणि शेवटचे अक्षर नीट वाचता येत नाहीएत. जयतु आणि
॥ हे दंड चिन्ह स्पष्ट दिसते आहे.

१) दुसर्‍या ओळीतील पहिली दोन अक्षरे 'रिप' अशी आहेत का ?
१.१) पहिली दोन अक्षरे 'रिप' असतील तर त्यांचा अर्थ लागत नाही का काही जैनधर्मीय अर्थ असू शकेल ?
२) शेवटचे अक्षर बहुधा ॰ हे असावे असे वाटते

कन्नड मध्ये ० हे अनुस्वार किंवा म् यासाठी केला जातो. इथेही तसेच असेल का?

जडभरत's picture

9 Aug 2015 - 11:11 am | जडभरत

जैन धर्मात रिपुंजय आणि शत्रुंजय अशी नावे वाचलीयत मी.

माहितगार's picture

9 Aug 2015 - 12:04 pm | माहितगार

या निमीत्ताने शोध घेताना रिपुंजय नावाच्या राजाविषयी एक रोचक पौराणिक कथा वाचण्यात आली.

अर्थात जैनसंदर्भ शोधल्यास कदाचीत अधिक माहिती मिळू शकेल. पण जैन संदर्भ सहज उपलब्ध होत नसावेत.

माहितगार's picture

9 Aug 2015 - 12:29 pm | माहितगार

या पौराणिक ब्लॉगवर रिपुंजय आणि शत्रुंजय यो दोघांचा एकत्र उल्लेख येतो आहे.

जडभरत's picture

9 Aug 2015 - 11:32 am | जडभरत

पण पहिल्या ओळीत जसाठी वापरलेलं चिह्न आणि दुसर्या ओळीत वापरलेलं चिह्न यात फरक आहे असं मला वाटतं.

तुमचा मुद्दा अगदी बरोबर वाटतो आहे. खालच्या ओळीतील जयतुचा ज स्पष्ट आहे, मग पहिल्या ओळीतील पहिल्या दोनक्षरांचे वाचन अगदी वेगळे काही तरी असावे, काय असू शकतील पहिली दोन अक्षरे ?

जडभरत's picture

9 Aug 2015 - 1:32 pm | जडभरत

साढ किंवा साट असेल का? साढपुत्र म्हणून एक इंडोनेशियन नाव दिसते आहे गुगलवर. बरं मी तुम्हाला व्यनि केलेली वेबसाईट कृपया चेक करा. तिथे मदत मिळण्याची शक्यता आहे.

मुक्त विहारि's picture

9 Aug 2015 - 11:55 am | मुक्त विहारि

(अज्ञानी) मुवि

माहितगार's picture

9 Aug 2015 - 12:00 pm | माहितगार

होय या निमीत्ताने गणित प्रेमींनी हे जरा समजावून सांगावे.

(माहिती नसलेला) मागा

उभी आडवी त्रिकोणी कशीही बेरीज करा. उत्तर ३४ येते.पूर्वी अशी यंत्र तंत्रसाधनेत वापरत असत.

मुक्त विहारि's picture

9 Aug 2015 - 12:09 pm | मुक्त विहारि

अज्ञान दूर केल्याबद्दल धन्यवाद....

आता बिर्याणी कट्याचा खर्च निम्मा-निम्मा.

जडभरत's picture

9 Aug 2015 - 12:12 pm | जडभरत

;)

अत्रन्गि पाउस's picture

9 Aug 2015 - 12:46 pm | अत्रन्गि पाउस

ओळीतले किंवा बाजूचे +समोरचे ; रांगेतले कोणतेही ४ सलग चौरस घेतले तरी बेरीज तीच ...

पैसा's picture

9 Aug 2015 - 12:15 pm | पैसा

वीश्वजयतु आहे का ते?

माहितगार's picture

10 Aug 2015 - 9:32 am | माहितगार

जैन लोकांचे बरेचसे प्राचीन लेखन मागधी प्राकृतात आहे असा उल्लेख मिळतो. अद्याप ओळख न पटलेली चारही अक्षरे गूगल इमेजेस मध्ये शोधण्याचा एक प्रयत्न करून पाहिला साधर्म्य असणारी अक्षरे अद्याप तरी दिसली नाहीत.

जोडाक्षरांच क्लस्टर बनवणे ब्राह्मीपासून चालत आले असावे 'वी' असू शकेल असे समजले तरी 'श्व' साठी सहसा दोन अक्षरे कोरलेली असावयास हवीत असे वाटते.

माहितगार's picture

10 Aug 2015 - 9:19 am | माहितगार

इंग्रजी विकिपीडियावर Jain temples of Khajuraho आणि खजूराहोतील मंदीरे बनवून घेणारे Chandela राजघराणे विषयक लेख आहेत.

राजघराण्यातील काही नावात देव शब्द आहे पण नंतर सहसा वर्मा शब्द येतो आहे. वर्मा आनि सर्मा सेम असू शकतात का वेगळेच असावेत ?

शर्मा ब्राह्मण आणि वर्मा क्षत्रिय.

माहितगार's picture

10 Aug 2015 - 10:57 am | माहितगार

ओ ओक्के हे माहित नव्हते

हे यन्त्र प्रसिद्ध चंडेल राजा विजयधरचा नातु व राजा विजयपालाचा पुत्र देववर्मा/देववर्मननी(राज्यकाल १०५०-बहुदा १०६०) इसवि सनाच्या १० व्या शतकात इथे कोरुन घेतले.राजा विजयधर(राज्यकाल १०१७-१०२९) हा परक्रमी व कलासक्त होता, मुहम्मद घुरीचा पराभव तसेच खजुरहो च्या अनेक शिल्पांचे,मंदिर बांधकामाचे श्रेय त्यालाच दिले जाते. ह्या यन्त्रा वरील ओळी ह्या पाली/प्राकॄतात असुन- 'राजपुत्र श्री देववर्म/देवसर्म विजयतु:|' असे आहे.
राजा देववर्माला सतत शेजारच्या कालचुरी/कालछुरी साम्रज्यापासुन धोका होता.सम्राट त्रिलिंगाधिपति गांगेयदेव कलचुरी आणि त्याचा पुत्र लक्ष्मीकर्ण कलचुरी ह्यांनी चंडेल राज्यांच्या नाकी आणले होते,आणि शेवटी राजा देववर्माला पराभुतही केले. त्या शत्रुपिडेला उपाय म्हणुन देववर्मानी हे यन्त्र मंदिरामधे खोदले असावे.हे काली-चंडीचे यन्त्र आहे जे शत्रुविनाश,प्रापंचिक सुख्,धनप्राप्ती,ग्रहदोष निवारण वगैरे साठी काळीजादु-गुढपंथी-ज्योतिष-तांत्रिक लोकांत 'सिद्ध चौतिस यन्त्र' म्हणुन प्रसिद्ध आहे.चंडी ही चंडेल राजपुत वंशाची कुलदेवी असल्यानी कोणी हा तांत्रिक उपाय राजाला सुचवला असण्याची शक्यता आहे.
हा झाला इतिहास, आता मजा गणिताची,युलर च्या कल्पनेनुसार आपण ज्यावेळी दोन 4 × 4 चे mutually orthogonal diagonalize Latin squares घेतो-> A{[२ ३ १ ४],[१ ४ २ ४],[४ १ ३ २],[३ २ ४ १]} व B {[३ ४ १ २],[२ १ ४ ३],[४ ३ २ १],[१ २ ३ ४]}आणि ज्या वेळी आपण त्यांच्यावर 4 × (A − 1) + B हे operation करतो त्यावेळी चौतिस यन्त्रा चा magic matrix सापड्तो. ह्या magic matrix मधे-
१.मुख्य Diagonal ची बेरिज ३४ येते.
२.प्रत्येक 2x2 ची बेरिज ३४ येते.
३.८ समद्वीभुज(trapezium)असे येतात त्यांची बेरिज ३४ येते.
४.४ त्रिकोण ज्यामधे ३ चौकोन येतात आहेत ज्यंची बेरिज ३४ येते.
५.चारही कोप-यांची मिळुन बेरिज ३४ येते.
६.मुख्य Diagonal सोडुन बाकी सर्व Diagonal ची बेरिज १७ येते.

आहे की नाही मज्जा

धन्यवाद. आपल्या ज्ञानाला मनापासून नमस्कार!!!
कृपया आपले लेखन ब्लाॅगवर उपलब्ध आहे का. वाचायला आवडेल.

राही's picture

10 Aug 2015 - 3:50 pm | राही

फारच छान माहिती.

gogglya's picture

10 Aug 2015 - 5:05 pm | gogglya

शतशः धन्यवाद. युलर च्या कल्पनेसाठी __/\__

अत्रुप्त आत्मा's picture

10 Aug 2015 - 5:20 pm | अत्रुप्त आत्मा

वाचनीय

तुडतुडी's picture

10 Aug 2015 - 1:18 pm | तुडतुडी

@पामर. अनमोल माहितीबद्दल धन्यवाद . पूर्वीच्या काळच्या ज्ञानाची तर उडवनारयांचा निषेध .

पामर's picture

10 Aug 2015 - 3:52 pm | पामर

राजा विजयधरला 'महाराजा राव विद्याधर' म्हणुन ओळखले जाते किंबहुना तो ह्याच बिरुदानी जास्त प्रसिद्ध आहे. देववर्मन हा फार कमनशीबी राजा ठरला; महाराजा धंगदेव,महाराजा गंडदेव,महाराजा राव विद्याधर,व कलिंजराधिपती महाराजा विजयपालाच्या पराक्रमी वंशात जन्माला येऊनही बिचारा कालचुरी लक्ष्मी-कर्णाकडुन पराभुत झालेला राजा म्हणुनच लक्षात ठेवला गेला.देववर्मनचा पुत्र किर्तिवर्मनने मात्र ह्या घेऊन कालचुरींचा मोठा पराभव केला.

जडभरत's picture

10 Aug 2015 - 4:23 pm | जडभरत

अहो भौ मग लेखच येऊ द्यात! इतकी सखोल माहिती लेखस्वरूपात मांडली तर फार चांगले.

माहितगार's picture

10 Aug 2015 - 6:58 pm | माहितगार

पामर खूपच छान माहिती. आंधळ्याने एक डोळा मागावा आणि त्याला दोन डोळे मिळावेत तसा आनंद झाला माहिती वाचून.

या निमीत्ताने अनुषंगिक अवांतर पृथ्वीराज चौहानांनी चंडेलांशी केलेल्या युद्धांची वर्णने आहेत असे दिसते त्या एवजी पृथ्वीराज चौहानांनी अफगाण सीमे कडे अधीक लक्ष दिले असते तर परिस्थिती वेगळी राहिली असती का ?

पामर's picture

11 Aug 2015 - 11:45 am | पामर

भारताच्या इतिहासाचे हेच वैशिष्ट्य आहे.दरवेळी परकिय आक्रमक येत गेले आणि स्वकिय आपापसात लढ्ण्याच्या नादात लुटत गेले,मरत गेले,उद्ध्वस्त होत गेले,गुलाम होत गेले.

अदि's picture

11 Aug 2015 - 5:22 pm | अदि

अहो पामर, असे अजून काही माहितीपूर्ण लेख येउद्या की..

छान माहिती मिळाली. धन्यवाद.

चंबा मुतनाळ's picture

10 Aug 2015 - 4:33 pm | चंबा मुतनाळ

बर्‍याच दिबसांनी सांख्यिक कोटी बघायला मिळाले, मजा आली