तिने हळूच बाहेर पाहिलं. टॅक्सी सिग्नलवर थांबली होती. बाबा टॅक्सीवाल्याच्या शेजारी बसला होता. तिने एक सुस्कारा सोडला. त्यांच्या कारच्या सीटस् किती छान होत्या. मऊमऊ. पण बाबाला गेले वर्षभर एकपण पिक्चर किंवा सीरियल मिळाली नव्हती. म्हणून मग गेल्या आठवड्यात बँकवाले येऊन कार घेऊन गेले होते. तिला काहीच कळलं नव्हतं. तसंपण मम्मा दोन वर्षांपूर्वी बाबाला सोडून निघून गेल्यापासून बाबा कसंतरीच करायचा. रडायचा काय, ओरडायचा काय. फोनवरून कुणाला तरी घाणघाण बोलायचा. आणि कसलंतरी ब्राऊन कलरचं ज्यूस प्यायचा. एकदा तर बाटलीच तोंडाला लावून पीत होता.
ती खडबडून जागी झाली. बाबा कुठे आहे? आणि हा टॅक्सीवाला पण तो नाहीये. त्याचा ड्रेस पांढरा होता. काय चाललंय काय?
प्रतिक्रिया
6 Aug 2015 - 10:58 am | जडभरत
+१
बोकोपंत पण नक्की काय झालं तिच्या बाबतीत हे स्पष्ट होत नाहीये. म्हणजे कदाचित मला तरी समजलं नाही. पण काहीतरी वाईट घडलं हे निश्चित!
7 Aug 2015 - 10:47 am | जडभरत
वाईट काही घडू देऊ नका हो त्या पिल्लूसोबत. अगोदरच अनेक शोकांत शशकचं पीक आलंय.
7 Aug 2015 - 8:09 pm | बहिरुपी
+११
6 Aug 2015 - 11:01 am | जेपी
ती खडबडून जागी झाली. बाबा कुठे आहे? आणि हा टॅक्सीवाला पण तो नाहीये. त्याचा ड्रेस पांढरा होता. काय चाललंय काय?
कथा संपली अस वाटल नाही.
नियमाप्रमाणे कथेचा शेवट व्हायला हवा होता.
6 Aug 2015 - 11:28 am | कहर
सिक्वेल लिहायचा असा नियम घातल्याने बऱ्याच कथा लेखकांनी अर्धवट सोडल्यासारखे वाटतय.
6 Aug 2015 - 11:52 am | टवाळ कार्टा
अग्दी अग्दी
6 Aug 2015 - 12:06 pm | मी-सौरभ
:)
6 Aug 2015 - 1:15 pm | तुमचा अभिषेक
सह्मत
सिक्वेल हवा हे आयोजकांनी नंतरच डिक्लेअर केले असते अचानक मध्ये तर बरे झाले असते.
१०० शब्दांमध्ये जर शेवट नाही झाला तर कथा वाचल्याचा फीलच येत नाही.
आणि जर पहिल्या भागात ईम्पॅक्टच नसेल तर सिक्वेल काय याची उत्सुकता वाचकांना लागणार तरी कशी.
हे याच कथेबद्दल नाही तर ईतरही कथा वाचतोय त्यात जाणवतेय.
6 Aug 2015 - 11:10 am | पगला गजोधर
रहस्य्मय
6 Aug 2015 - 11:15 am | अजया
+१
सिक्वलची वाट पहायला लावणारी कथा.
6 Aug 2015 - 12:04 pm | मुक्त विहारि
+१
6 Aug 2015 - 12:33 pm | प्रीत-मोहर
+१
6 Aug 2015 - 1:15 pm | प्यारे१
-१
7 Aug 2015 - 8:12 pm | प्यारे१
कथा समजल्यानं आधीच्या -१ नंतर +२.
गणित नियमानुसार -१+२= +१
6 Aug 2015 - 1:21 pm | द-बाहुबली
बाबा टॅक्सीवाल्याच्या शेजारी बसला होता...
आणि हा टॅक्सीवाला पण तो नाहीये. त्याचा ड्रेस पांढरा होता. आँ .. ? काय चाललंय काय?
6 Aug 2015 - 1:47 pm | तुषार काळभोर
छान कथा!
एकटी म्हणून पण चांगली आहे, सीक्वेल वाचायला अर्थातच आवडेल.
6 Aug 2015 - 1:48 pm | तुषार काळभोर
अर्धवट असल्याचे अजिबात वाटत नाही.
पुर्ण गोष्ट आहे ही.
6 Aug 2015 - 2:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
नियमाप्रमाणे कथेचा शेवट व्हायला हवा होता.
सहमत !
पहिली कथा स्वतःच्या बळावर स्वतंत्रपणे उभी पाहिजे... दोन भागांच्या लेखमालेचा उत्सुकता चाळवणारा पहिला भाग आहे असे वाटू नये. शेवटी धक्कादायक वळण देणारा अपेक्षित आहे, पण त्याने कथा संपली पाहिजे, पुढे काय असे वाटत राहू नये.
दुसरी कथा (सिक्वेल) पहिल्या कथेचा धागा पकडून पुढे जाणारी पण स्वतःच्या बळावरही शशक असावी.
किंबहुना, पहिल्या कथेत दुसर्या कथेचा संदर्भ न लागता, दुसर्या कथेत पहिलीचा संदर्भ अचानकपणे समोर येऊन वाचकाला धक्का बसला तर ते तिचे बलस्थान होईल.
7 Aug 2015 - 10:50 am | पैसा
सहमत आहे.
6 Aug 2015 - 7:59 pm | विवेकपटाईत
पहिली कथा ही पूर्णच असायला पाहिजे. कथेच्या नियमात हि पहिली कथा अर्धवट नसावी हेच आहे.
7 Aug 2015 - 11:02 am | थॉर माणूस
लोकांना शेवट झेपला नाहीये का पटला नाहीये?
रुढार्थाने आपण जशा कथेची अपेक्षा ठेवतो तशी ती शशक प्रकारात लिहिणे अवघड असते. त्यामुळे शशक बर्याचदा प्रसंगाप्रमाणे समोर येतात. आता पुर्ण शशक म्हणजे काय तर त्याला एक डेफिनिट सुरूवात, पार्श्वभूमी आणि शेवट (ओपन एन्डेड असला तरी) असायला हवा, बरोबर? सगळं तर आहे की या शशक मधे, मग अर्धवट का वाटतेय? का माझ्या समजण्यात काही चूक होतेय?
माझ्याकडून तरी +१
7 Aug 2015 - 11:32 am | तुडतुडी
ह्या कथेचा शेवट झालाच नाहीये . त्यामुळे तो पटण्याचा किवा झेप्न्याचा प्रश्नच नाही
7 Aug 2015 - 12:11 pm | थॉर माणूस
खरं तर मला कथेची अशी चिरफाड करायला आवडत नाही पण कदाचित मलाच हे शशक प्रकरण समजायला मदत होईल म्हणून...
>>>बाबा कुठे आहे? आणि हा टॅक्सीवाला पण तो नाहीये.
कथेत तयार केलेली पार्श्वभूमी आणि हे वाक्य कथानायिकेचा एक शेवट अगदी स्पष्टपणे देते. ही कथा क्लोज एंडेड नाही हे मान्य (कित्येक कथा, कथाच काय कादंबर्या पण नसतात की क्लोज एंडेड), पण कथेला शेवटच नाहीये असं मला नाही वाटत. नक्की काय चुकतंय?
7 Aug 2015 - 12:24 pm | अजया
वरच्या प्रतिसादाला +१
9 Aug 2015 - 1:12 am | सुहास झेले
सिक्वल वाचायला आवडेल :)