भडकलाच तो, एव्हढी वर्षे इंतजार केल्यावरही म्यनेजमेंट ने त्याला फक्त "Satisfactory" ग्रेड दिला होता, आणि तो जवान पोट्टा, "Extraordinary" घेऊन त्याचा बॉस बनला होता.
त्याने केलेली कामे मोठी होती, आजकालच्या या जवान पोरांसारखा भड़क डोक्याचा नव्हता तो, प्रत्येक कामात प्लानिंग असायचे त्याच्या, त्याला आठवला प्रोजेक्ट पूर्ण केल्यावर भेटलेला शाही Send-off .
HRला गाठला त्याने, तोही साला जवानच, तसेही हमउम्र साथीदार फारच कमी होते, अनुभवाची कदरच नव्हती जणू, विशी-तिशीतील पोरांचा भरणा होता फक्त. म्हणाला, Policy बदललीये चचा, आता कमी वेळेत मोठे "टार्गेट" नम्बर गाठावे लागतात, हाथ चालायला पाहिजे तेज फ़क्त, न थिजता..
..
..
..
..
ऐकून सुन्नपणे याकूब निघाला, जन्नतमध्ये कसाबला रिपोर्टिँग होते त्याचे.
प्रतिक्रिया
10 Aug 2015 - 7:54 pm | विवेकपटाईत
अश्या कथेची कल्पना कल्पना करणार्या डोक्स्याला सलाम. +१ १ १ ....
11 Aug 2015 - 9:23 am | विशाल कुलकर्णी
+१
13 Aug 2015 - 12:10 pm | डायवर
लाहौल बिलाकुवत.
13 Aug 2015 - 6:28 pm | पद्मावति
+१
13 Aug 2015 - 6:43 pm | नावातकायआहे
+१
13 Aug 2015 - 7:13 pm | कोमल
+१ मस्तच..