"झालं सगळं! आपल्या हक्काच्या घरात रहायला येणार आता आपण." संकेत आनंदी होता.
"हो ना, पण कर्ज खूप मोठं आहे रे. आपल्याला झेपेल ना हे?" सानिकाच्या स्वरात काळजी डोकावत होती.
"काळजी नको करूस. सॉरी, तुझ्या आवडत्या बांगड्या मात्र विकाव्या लागल्या..."
"नो प्रॉब्लेम! बांगड्या पुन्हा करता येतील.”
"हम्म…कर्जाचा ईएमआय थोडा कठीण जाईल. बघू, महिन्याभरात माझं प्रमोशनही होईल बहुतेक..."
दुसऱ्या दिवशी सकाळी संकेतच्या मोबाईलवर कंपनीच्या एमडीचा फोन आला. संकेतला ताबडतोब भेटायला बोलावलं होतं.
"संकेत, टेक अ सीट…कंपनीचा निर्णय झालेला आहे…तुला जावं लागेल…"
संकेतला दरदरून घाम फुटला...
“आपले चेअरमन आपल्या नवीन रिजनल हेडची वाट बघतायेत. त्यामुळे लवकर हेड ऑफिसला जायची तयारी करा. अभिनंदन!!!"
प्रतिक्रिया
4 Aug 2015 - 10:26 pm | पुणेकर भामटा
छान !!!
4 Aug 2015 - 10:32 pm | टुंड्रा
+१
4 Aug 2015 - 10:32 pm | पगला गजोधर
Nanded City ?
7 Aug 2015 - 9:57 am | समीरसूर
पण मी रिजनल हेड नाही. ;-) त्या उंचीपर्यंत जाण्यासाठी जे 'हेड' लागतं सालं नेमकं तेच नाही ना आमच्याकडे! :-)
4 Aug 2015 - 10:33 pm | प्यारे१
मस्त आहे
+1
4 Aug 2015 - 10:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान !
4 Aug 2015 - 10:38 pm | अजया
+१
4 Aug 2015 - 10:40 pm | जडभरत
मस्त रे
+१
पैल्यांदा उगाच घाब्रवलंस! असो तुझा कथानायक राहू दे नवीन घरात सुखाने.
4 Aug 2015 - 10:41 pm | इशा१२३
+१
4 Aug 2015 - 11:32 pm | रेवती
कथा आवडली पण तुमच्या आधीच्या धाग्याचा सिक्वल वाटला. ;) +१.
4 Aug 2015 - 11:59 pm | राघवेंद्र
+१
5 Aug 2015 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा
+१ & +१
मला तर ईक्वलंहि वाटला! ;-)
5 Aug 2015 - 12:13 am | प्यारे१
शब्दांचे खेळ नका करु बुवा
जाऊ दे जोरात पुढे एक्टिवा
सोडा जिल्बी येऊ दे आयटम नवा
नका सरू मागे भाजा पेढयासाठी खवा
5 Aug 2015 - 12:44 am | अनन्त अवधुत
+1
5 Aug 2015 - 6:46 am | मुक्त विहारि
+१
5 Aug 2015 - 7:31 am | प्रीत-मोहर
+१
5 Aug 2015 - 8:34 am | योगी९००
+१ आवडली...!!
5 Aug 2015 - 9:34 am | नाखु
सुखद धक्याबद्दल +११११
पिळवटणार्या कथाबाजारात "सुखद सकारात्मक झुळुक" शोधणारा शशक वाचक
7 Aug 2015 - 9:55 am | समीरसूर
म्हटलं थोडा सकारात्मक धक्का देऊन बघू या... :-)
5 Aug 2015 - 9:38 am | नाव आडनाव
+१
5 Aug 2015 - 9:42 am | पाटील हो
+1
5 Aug 2015 - 10:01 am | ज्ञानोबाचे पैजार
गोष्ट वाचताना.......
नुसत्या कल्पनेनेच घाम फुटला.....
पैजारबुवा,
5 Aug 2015 - 10:03 am | सनईचौघडा
+१
5 Aug 2015 - 10:18 am | देशपांडे विनायक
+१
5 Aug 2015 - 10:55 am | असा मी असामी
+१
5 Aug 2015 - 11:04 am | मी-सौरभ
मस्त
5 Aug 2015 - 11:07 am | चिगो
+१.. ठोका चुकवलात..
5 Aug 2015 - 11:52 am | सौंदाळा
+१
5 Aug 2015 - 12:10 pm | अविनाश पांढरकर
+१
5 Aug 2015 - 1:10 pm | gogglya
नाखु म्हणाले तसे दुख्खी शेवट असणार्या अनेक कथांमधील अपवाद! वाचून आनंद झाला.
5 Aug 2015 - 1:40 pm | ब़जरबट्टू
+१
6 Aug 2015 - 2:11 am | अंतु बर्वा
+१
6 Aug 2015 - 6:03 am | आगाऊ म्हादया......
अगदी खरं...सुखद धक्क्याबद्दल +१
6 Aug 2015 - 9:25 am | बोका-ए-आझम
+१
6 Aug 2015 - 12:19 pm | अनिरुद्ध.वैद्य
खरच … धक्का बसला असता
6 Aug 2015 - 12:22 pm | नागेश कुलकर्णी
सुखद धक्का +1
6 Aug 2015 - 12:23 pm | प्रसाद गोडबोले
+१
हायला ! खरंच काळजाचा ठोका चुकला राव :)
6 Aug 2015 - 2:06 pm | सावि
+1
6 Aug 2015 - 2:16 pm | यमन
+१
6 Aug 2015 - 3:05 pm | निमिष सोनार
शीर्षकाला १००% जागणारी कथा!!
आणि कथेचा मनावर झालेला आघात जबरदस्त!
सुखद धक्का!! आवडला!!
7 Aug 2015 - 9:10 pm | बहिरुपी
+१
7 Aug 2015 - 9:13 pm | पैसा
+१
मस्त धक्का!
7 Aug 2015 - 10:08 pm | उगा काहितरीच
+१ सकारात्मक शेवटासाठी !
8 Aug 2015 - 10:03 am | नूतन सावंत
+१
आनन्द देण्यासाठी.
9 Aug 2015 - 2:57 pm | तीरूपुत्र
+१
10 Aug 2015 - 10:01 am | समीरसूर
अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाचा पहिल्या सत्राचा 'नेटवर्क एनेलिसिस' नावाचा खतरनाक विषय! पहिल्यांदा दांडी उडाली. विशेष वाटलं नाही. ८०% विद्यार्थ्यांची उडाली होती त्यामुळे फारसं दु:ख झालं नाही. दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या सत्रात पुन्हा पेपर दिला. पुस्तकं वाचली होती. थिअरी थोडी फार येत होती पण कधी नव्हे ती ९० गुणांची गणितं यायला सुरुवात झाली होती. गणितं जाम कळेनात. जी थोडी-फार बुद्धी होती ती सगळी ओतली पण तरी ती गणितं अगम्यच राहिली. थोडीफार प्राथमिक दर्जाची गणितं ठीक-ठाक जमू लागली. ती गणितांचा साचा थोडाफार कळल्यामुळे जमत होती; गणितांमागची लपलेली शुद्ध संकल्पना समजली नव्हतीच.
थिअरीच्या जोरावर मी बरे गुण पदरात पाडून घेत असे पण तांत्रिक विषयाची गणितं म्हटली की मला कापरं भरत असे. आणि या विषयात पूर्वी ६० गुणांची थिअरी यायची; आता ९० गुणांची गणितं! गर्भगळीत होणे म्हणजे काय हे त्यावेळी आम्ही अनुभवलं. दुसऱ्या वर्षीच्या दुसऱ्या सत्रात दुसऱ्यांदा 'नेटवर्क एनेलिसिस' धडधडत्या अंत:करणाने दिला. पुन्हा नापास! आता एटीकेटी नामे वरदानाचा लाभ घेऊन तिसऱ्या वर्षात गेलो खरे पण नेटवर्कचे भूत मानगुटीवर होतेच. तिसऱ्या वर्षीच्या पहिल्या सत्रात परत झटापट करून नेटवर्क दिला. हाय रे कर्मा, पुन्हा अनुत्तीर्ण! प्राण कंठाशी आले. आता एकच चान्स. नाहीतर तिसऱ्या वर्षी डिस्टिंक्शन मिळवूनदेखील एक वर्ष आराम करावा लागला असता. तिसऱ्या वर्षीच्या दुसऱ्या सत्रात पुन्हा नेटवर्कसोबत कुस्ती खेळलो. तिसऱ्या वर्षीच्या बहुतेक सगळ्या विषयांमध्ये फर्स्ट क्लास मिळाला आणि नेटवर्कने पुढील एक वर्ष गिळण्यासाठी आ वासला होता. मी मटकन खाली बसलो.
सगळं जग डोक्याभोवती गरगर फिरायला लागलं. पर बचेंगे तो और भी लडेंगे या न्यायाने मी पेपर पुनर्तपासणीसाठी टाकला. तोपर्यंत चौथ्या वर्षात तात्पुरता प्रवेश घेऊन वर्गांना हजेरी लावू लागलो. अशा वेळेस परिस्थिती कशी असते हे ज्यांना असे अनुभव आहेत त्यांनाच कळू शकते. वर्गात सगळे 'ये तो चंद दिनों का महमान हैं' अशा नजरेने बघत. हृदय विदीर्ण होत असे. पण या बोटीत बरेच सहाध्यायी असल्याने थोडा दिलासा होता. आणि एक दिवस मी वसतिगृहातील माझ्या खोलीत पसरलेलो असतांना एक मुलगा पळत पळत आला.
"अबे सम्या, तेरा एनए निकल गया बे. साले ३७ पे निकला. और दो जनों का निकला. जा बे जल्दी xxडे देख के आ...रिजल्ट लगा है बोर्ड पे..."
मला सुचेचना. क्षणभर आई-बाबा डोळ्यांसमोर तरळले. काय घडलं असतं ते डोळ्यांसमोरून तरळून गेलं.
मी सुसाट पळत निघालो.
सुखद धक्के आवश्यक असतात आयुष्यात.....जगण्याची ओढ अधिक घट्ट करण्यासाठी...
10 Aug 2015 - 12:16 pm | बबन ताम्बे
हा हा हा ! काही क्षण कपाळातच गेल्या असतील :-)
11 Aug 2015 - 12:03 pm | समीरसूर
मग काय! पायाखालची जमीन सरकणे म्हणजे काय हे मला या अनुभवातून कळले. :-)
10 Aug 2015 - 5:20 pm | घरकोंबडी
+१
11 Aug 2015 - 9:33 pm | किसन शिंदे
ठोका चूकवलान.
+१