आजच एक वाचनात बातमी आली... शिर्षक होते: Hari Puttar and the half-baked lawsuit?
हरी पुत्तर हे नाव वाचल्यावर रमेश मंत्र्यांच्या "राजू मोरेचे जनू बांडे" आठवले. तर चित्रपटाचे नाव काय? - "Hari Puttar: A Comedy of Terrors" ह्या चित्रपटात हरी पुत्तर लंडनला जातो आणि त्याच्या वडीलांची काँप्यूटर चीप वाचवायचा प्रयत्न करतो वगैरे काहीतरी. (थोडेफार होम अलोन) हा सिनेमा १२ सप्टेंबरला प्रदर्शीत होणार आहे.
वार्नर ब्रदर्सनी मिर्च सिनेमाच्या विरुद्ध ह्या संदर्भात मुंबईत खटला भरला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी नावाचा अपभ्रंश केला आहे पण चोरले आहे, कॉपिराईट हक्कानुसार ते चुकले आहेत इत्यादी!
पण मिर्च सिनेमाचे म्हणणे आहे की त्यांनी हे नाव २००५ सालापासून ठरवले आहे आणि ते जाहीर होते. तर मग खटला असा ऐनवेळेस का?
तर तुम्हाला काय वाटते? असे नाव देणे योग्य का की जे काही कायदेशीर पणे म्हणा चोरले आहे हे नक्की. तसेच असा ऐनवेळेस खटला भरणे योग्य आहे का?
प्रतिक्रिया
26 Aug 2008 - 1:40 am | लिखाळ
हॅरी पॉटर वाल्यांचा दावा बरोबर वाटतो.
अवांतर : कल हो न हो या चित्रपटातील आजी आपल्या नातवाला लाडाने 'हरी पुत्तर' म्हणताना दाखवली आहे. तो मुलगा हॅरी पॉटर सारखाच चष्मा वगैरे लावुन आहे.
--लिखाळ.
मी सुद्धा काळ्या काड्यांचा चष्मा करायला टाकतो आहे ;)