अनमोल...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
25 Aug 2008 - 11:27 pm
गाभा: 

राम राम मंडळी,

प्रत्येक गोष्टीला काही किंमत असते, काही एक मोल असतं हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु मंडळी, या जगात अश्या अनेक गोष्टी आहेत की ज्या केवळ अनमोल आहेत. कितीही पैसे खर्च केले किंवा अन्य कोणताही खटाटोप केला तरी त्या गोष्टींचं मोल ठरवता येत नाही/येणार नाही, त्या केवळ अनमोल असतात.

परंतु असंही होऊ शकेल की माझ्याकरता जी गोष्ट अनमोल आहे ती कदाचित इतरांकरता नसेलही! म्हणजेच कुठली गोष्ट मोल करता येण्याजोगी, आणि कुठली अनमोल, हे व्यक्तिसापेक्ष आहे.

तर मंडळी, आपल्यापैकी प्रत्येकाच्या दृष्टीने अशी कोणती गोष्ट आहे की जी वैयक्तिकरित्या आपल्याला अनमोल वाटते? आपल्याला अनमोल वाटणार्‍या गोष्टी कदाचित अनेक असतील परंतु त्यातल्या पहिल्या किमान पाच गोष्टी आपण सांगू शकाल का?

त्याकरताच हा काथ्याकूट!

माझ्यापासून सुरवात करतो...

१) आईने प्रेमाने जवळ घेऊन डोक्यावर तेल थापणे.
२) जीव ओतून म्हटलेलं कुठलंही गाणं किंवा वाजवलेलं कुठलंही वाद्य जे हृदयाला भिडतं!
३) मिसळपाव आणि हापूसचा आंबा.
४) एखाद्या लहानग्याचं निरागस हास्य.
५) तिरंगा.

कृपया येऊ द्यात आपलेही पाच अनमोल पर्याय! वाट पाहतो...! :)

आपल्या सर्वांचाच,
(अनमोल!) तात्या.

प्रतिक्रिया

१) सह्याद्री वर चांदण्यातली रात्र (कुठेही)
२) एखाद्या लहानग्याचे गळ्यात असलेले हात, निरागस हास्य आणि बोबडे बोल...
३) पिठ्ल्-भाकरी.
४) शाळेतल्या आठवणी.
५) दुपारचे सहकुटंब तुडंब जेवण आणि बाहेर झाडाखाली झोप..
+१) पोट सुटले आहे तरी आई/आजी चे "किती रे वाळलास" हे डोक्यावरून (पोटावरून नाही) हात फिरवून म्हणणे...

विसोबा खेचर's picture

26 Aug 2008 - 12:01 am | विसोबा खेचर

+१) पोट सुटले आहे तरी आई/आजी चे "किती रे वाळलास" हे डोक्यावरून (पोटावरून नाही) हात फिरवून म्हणणे...

हे केवळ क्लास! :)

आपला,
(हळवा) तात्या.

प्राजु's picture

26 Aug 2008 - 12:04 am | प्राजु

१ ला नंबर मिळावा अशा गोष्टीही खूप आहेत. तरीही
१. लेकराचं निरागस हास्य..
२. आईने मायेने केलेली पुरणपोळी आणि दिलेली तिची एखादी साडी
३. नवर्‍याने मी केलेल्या एखाद्या पदार्थाचं केलेलं कौतुक
४. कोकणातलं अस्सल कोकणी जेवण.. एखाद्या आत्यानं किंवा काकूनं केलेलं
५. केवळ मायेपोटी एखाद्या सुरेखानं किंवा पांडेकर आजीने केलेलं चिकन , तां-पां रस्सा किंवा शेवग्याच्या शेंगाचि भाजी
६. हृदयापासून गायलेली गाणं...
.
.
.
.
.
.
तात्या, यादि खूप मोठी आहे हो...

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

26 Aug 2008 - 4:04 am | टारझन

३. नवर्‍याने मी केलेल्या एखाद्या पदार्थाचं केलेलं कौतुक
काय गं प्राजु तै ? असं म्हणतात जी गोष्ट दुर्मिळ तेवढी ती अनमोल्/महत्वाची. किंवा एखादी गोष्ट काही केल्या परत येणार नसेल तर , उदा. बालपण ....खाऊचं कौतुक अंमळ दुर्मिळ आहे का ग ?
(ह.घे.)
-कंन्यारास
(टार्‍या खातोय मार आता .. युएस वरून व्हाया युरोप येतंय बघ लाटणं आता अफ्रिकेत )

भास्कर केन्डे's picture

27 Aug 2008 - 9:50 pm | भास्कर केन्डे

नवर्‍याने मी केलेल्या एखाद्या पदार्थाचं केलेलं कौतुक
- - कौतूक झालेल्या पदार्थांचे १३१२३ मध्ये स्वागत आहे. फक्त फोन करा आणि पहा... मी २ मिनिटात येतो का नाही ते... आणि तेही मोठ्या डब्ब्यासहित!

आपला,
(खादाड) भास्कर
आम्ही येथे वसतो.

विसोबा खेचर's picture

26 Aug 2008 - 12:07 am | विसोबा खेचर

कृपया.... कृपया.... कृपया....!

आपले पर्याय कितीही असू शकतात हे मान्य. परंतु इथे केवळ पहिले पाचच लिवा. त्यातच या काथ्याकुटाची गंमत आहे! :)

फार फार तर ६ चालतील, परंतु शक्यतो पाचच लिवा अशी पुन्हा एकवार विनंती...

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Aug 2008 - 12:57 am | बिपिन कार्यकर्ते

माझ्या साठी...

१) माझ्या पहिल्या मुलीला पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा आलेलं फीलींग अनमोल आहे. (अजून तो क्षण फोटोग्राफिक मेमरी सारखा स्वच्छ आठवतोय).
२) रात्री झोपताना माझ्या मुली लाडात येऊन मस्ती करतात ते अनमोल आहे.
३) कधी तरी गाणं / एखादं वाद्य ऐकताना एखाद्या क्षणी ते आत जाऊन भिडतं ते अनमोल आहे.
४) सुट्टीवर घरी जातो आणि शेवटच्या दिवशी निघताना नमस्काराला वाकल्यावर आई-वडिलांच्या डोळ्यात जे भाव येतात ते अनमोल आहेत.
५) एखाद्या शांत न गजबजलेल्या देवळात, नुसतं डोळे बंद करून बसल्यावर एकप्रकारची शांतता अनुभवाला येते ती अनमोल आहे.

या ५ मधे वर-खाली (रँकिंग) नाही. ज्या गोष्टी खरोखर अनमोल वाटतात त्या सगळ्या सारख्याच महत्वाच्या असतात. इथे फक्त ५चे बंधन आहे म्हणून ५ देत आहे.

बिपिन.

विसोबा खेचर's picture

26 Aug 2008 - 6:26 am | विसोबा खेचर

आणि शेवटच्या दिवशी निघताना नमस्काराला वाकल्यावर आई-वडिलांच्या डोळ्यात जे भाव येतात ते अनमोल आहेत.

सुंदर...!

तात्या.

भाग्यश्री's picture

26 Aug 2008 - 3:04 am | भाग्यश्री

माझ्यासाठीच्या ५ अनमोल गोष्टी..

१) माझे आई, बाबा,सासू सासरे
२) माझा नवरा
३) माझ्या मित्र-मैत्रिणींचा + वरील सर्वांचा माझ्यावरचा विश्वास..
४) आत्मविश्वास
५) सेल्फ एस्टीम ( अवास्तव नसलेला आत्मसन्मान )

बाकीच्या गोष्टी खूप आहेत, संगीत्,खाद्यपदार्थ,चांगली पुस्तके, किंवा अजुन मी न अनुभवलेल्या गोष्टी.. पण हे वरचे पाहीजेच, आणि ते माझ्यासाठी अनमोल आहेत.. !

विसोबा खेचर's picture

26 Aug 2008 - 6:33 am | विसोबा खेचर

४) आत्मविश्वास

खरं आहे. एकदा हा गमावला की माणूस काहीच करू शकत नाही!

टारझन's picture

26 Aug 2008 - 3:43 am | टारझन

१. मला जॉब लागल्यावर पहिल्या पगार आणि चितळे भाउंचे पेढे देताना आई-बाबांना झालेला आनंद
२. नरेंद्र-देवेंद्र-प्रशांत(टारझन) यांनी कॉलेज काळात देवेंद्रच्या रूम वर कंप्युटर्स लॅन वर लाउन बोटं+डोळे+पाठ त्रास देइ पर्यंत २०-२० तास खेळलेल्या गेम्स ; भेळ, समोसे,गुलाबजाम,ढोकळा, आइसक्रिम च्या पार्ट्या (खाउ खाऊन झाला की पॅकिंगचे बोळे आम्ही गुपचुप दुसर्‍यांच्या घरावर फेकत असू, त्यामुळे याला "बोळे पार्टी" असं नाव पडलं आहे (ह्यावर खरं तर लेखंच होउ शकेल ;) ) थ्री चियर्स माय फ्रेंड्स ,
३. १००१ वेळा प्रपोज केल्यावर 'तिने' अति अति हळू आवाजात दिलेला 'होकार' (अंगावर शहारे आलेले आहेत)
४. आमच्या टोळभैरवांबरोबर पाठ दुखेस्तोवर केलेल्या बाईक्सच्या सहली ...
५. गणिताच्या मास्तरचं ८वीत असताना कार्टून काढल्यावर संपुर्ण वर्गात एक आठवडा हशा पिकवला होता. त्यानंतर मास्तर मला या न त्या कारणाने रोज मारत असे आणि मी निर्लज्जा सारखं हसत असे. मारचं लागत नसे हो, आणि हसणं कंट्रोल होतच नसे. आणि मी हसताना पाहून वर्ग हसत असे...म्हणून मी परत हसत असे... लै छड्या तुटल्यात पाठीवर खॅखॅखॅ ..

(आर्ररर मापटी,नकला करणे, एखाद्याला रडेपर्यंत चिडवणे आणि मारामार्‍या राहिल्याच की .. तात्यांनी मर्यादा घालून गोची केली राव)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

शितल's picture

26 Aug 2008 - 5:06 am | शितल

१. मा़झ्या मुलाला जन्म दिल्यावर त्याला पहिल्यांदा पाहिले तो क्षण
२. मुलगा जेव्हा "आई" अशी हाक म्हणुन गळ्यात पडतो तो क्षण
३. लग्नात अग्नी भोवती घेतलेल्या ७ फेर्‍या.
४. आई -वडिल, भाऊ- बहिण ह्यांचे प्रेम व त्यांच्या कडुन लाड करून घेणारा प्रत्येक क्षण.
५. मा़झ्या जवळच्या मित्र्-मैत्रीणींनी बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण.

वर्षा's picture

26 Aug 2008 - 6:02 am | वर्षा

१) माझ्या मुलाचा जन्म
२) आम्हा बहिणींची लग्न होण्याअगोदरचा, आम्ही सर्व एकत्र असलेला तो काळ
३) ऑनसाईट (जपानमध्ये) एकटं राहण्याचा अनुभव आणि त्याकाळात शिकायला/पहायला मिळालेल्या सर्व चांगल्या गोष्टी
४) माझ्या (कै.) आजोबांच्या सहवासातले क्षण
५) हापूस आमरस विथ साजूक तूप

-वर्षा

या माझ्यासाठी अनमोल आहेत.
आणि....
१) माझा मुलगा
२) घर (म्हणजेच घरातील सर्वजण )
३) एखाद्या निराशेच्या क्षणी कोणी कळत्-नकळत दिलेला आधार
४) पु. ल. ची पुस्तके / लता,आशा, रफी ची असंख्य गाणी
५) मित्र / मैत्रीणी

गणा मास्तर's picture

26 Aug 2008 - 6:52 am | गणा मास्तर

१. तिचे डोळे, तिचे स्मित आणि हनुवटीवरचा तीळ
२. जिथे शिकलो त्याच कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणुन काम केले ते दिवस
३. नागावला समुद्रकिनारी घालवलेली होळीची रात्र
४. कट्ट्यावर बसुन मित्रांसोबत तासनतास हाणलेल्या गप्पा
५. दमुन भागुन घरी आलो की दारातुनच येणारा आईने केलेल्या मसाले भाताचा वास.....

गणा मास्तर's picture

26 Aug 2008 - 8:16 am | गणा मास्तर

पुरंदरला केदारेश्वराच्या मंदीरात अनुभवाला येणारी शांतता

सुचेल तसं's picture

26 Aug 2008 - 9:33 am | सुचेल तसं

१) प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आई-वडिलांनी दिलेले पैसे/ केलेले लाड.
२) बहिण रक्षाबंधनाला बांधते ती राखी तसेच भाऊबीजेला ओवाळते तो क्षण
३) परिक्षेला/मुलाखतीला जाताना आजी हातावर देते ते दही.
४) पहिली नोकरी लागते तसेच पहिला पगार हातात येतो तो क्षण.
५) एखादं सुंदर पुस्तक वाचताना किंवा चित्रपट पाहताना भारावुन टाकणारे ते क्षण.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

१) आईला आवडलेले माझे मिसळपाव वरील लेखन
( माझी आई सौ. उज्वला केळकर ही लेखिका आहे. आत्तापर्यंत साधारण ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक जण तिला विचारत असत की काय हो तुमचा मुलगा काही लिहितो की नाही? त्यावेळी मला फार वाईट वाटायचे. आईला जेंव्हा मी केलेली विडंबने दाखवली तेंव्हा तिला आश्चर्याचा सुखद धक्क बसला. त्या विडंबनाचा दर्जा , मात्रा , वृत्त यमक न पाळता केलेली विडंबने फारशी चांगली नव्हती तरी तिच्या चेहर्‍यावरचा आनंद पहाण्यासारखा होता.
याबद्दल मी मिसळपाव/ तात्या अभ्यंकरांचा आभारी आहे

मला अनमोल वाटणार्‍या इतर गोष्टी
२) सांगलीची भेळ
३) मुंबई-काठमांडु पहिला विमान प्रवास
४) रविवारच्या सकाळी रंगोली पहात, पेपर वाचत निवांतपणे घेतलेला चहाचा आस्वाद.
५) कोजागिरीची रात्र / गाण्याची मैफल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

ऋषिकेश's picture

26 Aug 2008 - 12:02 pm | ऋषिकेश

१. राष्ट्रगीत
१. रात्रभर मित्रांबरोबर/नातेवाईकांत रंगलेल्या गप्पा
१. घर व घरातले सगळे
१. आईच्या मांडीवर डोके ठेऊन विसावणे.. व तीचा डोक्यातून फिरणारा हात
१. दहावी झाल्यावर आजीने हातावर ठेवलेला सव्वा रुपया
-(पाचामुखी) ऋषिकेश

प्रभाकर पेठकर's picture

26 Aug 2008 - 6:11 pm | प्रभाकर पेठकर

१) गच्च भिजलेल्या अवस्थेत लोकलने प्रवास करताना नजिकच्या स्थानकावर उतरायला मिळणे, आणि समोरच सार्वजनिक संडास, मुतारी मोकळी मिळणे........... अहाहाहाहाहाहाहाहाहाहा....!

२) पँटच्या चेनने दगा दिला असता खोचलेला शर्ट बाहेर काढल्यावर तो 'सफिशियंट' लांब असणे आणि कोणाच्या लक्षात यायच्या आत घरी पोहोचणे.

३)मैत्रीणी बरोबर हॉटेलात जाऊन, महागडे पदार्थ ऑर्डर केल्यावर चु़कून पैसे/पाकिट घरी राहिल्याची आठवण होणे आणि तेंव्हाच मैत्रीणीने ' ए! आज बील मी भरणार हं, तू पाकिटाला अज्जीबात हात लावायचा नाही' असा लाडीक दम भरणे. (बऽऽऽऽऽर, बाबा)

४)'थोडे दिवस माहेरी जाईन म्हणते' असा प्रस्ताव पत्नी मांडते तो क्षण.

५) चार वर्षांनी परदेशातून परतताना मुलाला फोनवर विचारले, 'तुझ्यासाठी काय आणू?' तेंव्हा त्याने दिलेले 'दाढीचे सामान' हे उत्तर. तो क्षण.

असे खूप खूप आहेत पण तात्यांनी पाचाची पाचर मारून ठेवलीए नं!

वैद्य's picture

26 Aug 2008 - 10:17 pm | वैद्य (not verified)

ऍज युज्वल, पेठकर काकांचा बेश्ट प्रतिसाद आहे !

-- वैद्य

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Aug 2008 - 10:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक, दोन, तीन, चार मस्त !!!

चतुरंग

नंदन's picture

27 Aug 2008 - 1:16 am | नंदन
धनंजय's picture

27 Aug 2008 - 12:11 am | धनंजय

:-)

कोलबेर's picture

27 Aug 2008 - 1:42 am | कोलबेर

आई -वडील, मायेचा हात, डोळ्यातले अश्रू, खाण्याच्या गोष्टी ह्याशिवाय वेगळे काहीतरी वाचून मजा आली :)

II राजे II's picture

27 Aug 2008 - 9:36 am | II राजे II (not verified)

४)'थोडे दिवस माहेरी जाईन म्हणते' असा प्रस्ताव पत्नी मांडते तो क्षण.

काकु मिपा वाचते का हो काका ?

:D

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

राम भाऊ's picture

27 Aug 2008 - 10:28 am | राम भाऊ

सहि आहे !!!!!

भास्कर केन्डे's picture

27 Aug 2008 - 9:52 pm | भास्कर केन्डे

पंत,

आपला प्रतिसाद वाचून आज मिसळपाववर आल्याचे सार्थक झाले!

आपला,
(प्रभावित) भास्कर
आम्ही येथे वसतो.

झकासराव's picture

5 Sep 2008 - 12:00 pm | झकासराव

=)) =)) =)) =)) ................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

रामदास's picture

26 Aug 2008 - 7:35 pm | रामदास

एक साधा प्रश्न माझा
लाख त्याची उत्तरे
हे खरे की ते खरे
ते खरे की हे खरे.
बहुतेक भटांची कविता आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Aug 2008 - 8:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

१. आई गेल्यावर बाबांना मिठी मारून रडले होते तेव्हाचा त्यांचा स्पर्श
२. पीएच. डी. करायला इंग्लंडला जायला निघाले तेव्हाचा सुलीकाकूचा आणि अशोक काकांचा एकाच वेळी झालेला रडवा आणि हसरा चेहेरा
३. पीएच.डी. संपवून इंग्लंडला भेवटचा बायबाय केला तेव्हा माझ्या मास्तरचं वाक्य, "आता भारतात येण्यासाठी एक कारण आहे." आणि तेव्हाच्या हाऊसमेट्सचं विमानतळावर येणं आणि हळूच माझे आणि स्वतःचे डोळे पुसणं
४. पीएच.डी. संपवून परत भारतात आले तेव्हा अभिरचा (तेव्हाचा माझा बॉयफ्रेंड, आताचा नवरा) चेहेरा
५. हल्ली ऊठसूठ भाऊ फोन करून " ... झालं, आता काय करू" विचारतो ... त्याचं प्रेम!

१.५ शहाणा's picture

26 Aug 2008 - 8:27 pm | १.५ शहाणा

३. नवर्‍याने मी केलेल्या एखाद्या पदार्थाचं केलेलं कौतुक

प्राजु नवर्‍यावर पदार्थाचं प्रयोग करतेस का?

वैशाली हसमनीस's picture

27 Aug 2008 - 7:21 am | वैशाली हसमनीस

१)जीवन सन्मानाने व स्वाभिमानाने कसे जगावे हे स्वानुभवाने शिकविण्यार्‍या वडिलांच्या आठवणी
२)माझे बंधू मा.मनोहर जोशी हे युती सरकारचे पहिले मुख्यमंत्री झाले तो दिवस.
३)कै.सौ.सरोजिनीबाई वैद्य यांची 'रणांगण' कादंबरीवरील व्याख्याने.
४)श्रीमद् भगवद्गीता
५)पंडित भीमसेन जोशी यांचा सकाळी सकाळी कानावर पडलेला अभंग

वैद्य's picture

27 Aug 2008 - 9:42 am | वैद्य (not verified)

२)माझे बंधू मा.मनोहर जोशी हे युती सरकारचे पहिले मुख्यमंत्री झाले तो दिवस.

आई शप्पत !

एवढे उच्च कनेक्षन आहे हे आम्हाला माहितीच नव्हते !

प्राचार्यांना आमचा नमस्कार सांगा.

म्हणावं, त्याच्या जावयाशी आमची जी "मिलीभगत" आहे, ती मोडू नका, अशा क्षुल्लक प्रतिसादांमुळे.

जावयाने लाटलेले भूखंड आम्हालाही ३०-३५ टक्के देताहेत, त्यात अशी बाधा नको. काय ?

-- वैद्य

वैशाली हसमनीस's picture

27 Aug 2008 - 11:38 am | वैशाली हसमनीस

आपण म्हणता तसे माझे उच्च कनेक्शन (शब्द नीट लिहीला आहे) वगैरे काही नाही. मी शिवसेनेचे काम करीत होते त्यामुळे ते मला बंधूसमानच आहेत.पण आपल्यासारख्या अमेरिकास्थित उच्चविद्याविभूषित माणसाला मुंबईतील क्षुल्लक भूखंडाचे प्रेम कशाला? असो,शाब्दिक मारामारीचा कंटाळा आल्यामुळे येथेच थांबणे बरे.अच्छा.

सर्किट's picture

27 Aug 2008 - 12:20 pm | सर्किट (not verified)

मी शिवसेनेचे काम करीत होते त्यामुळे ते मला बंधूसमानच आहेत

हुश्श ! आता बरे वाटले. धन्यवाद.

तसेच असेल, तर आम्हालाही ते काकांसमान आहेत. आणि त्यांचे जावई बंधूसमान.

(ता. क. भूखंड मुंबईतील नाहीत, पुण्यातले.)

-- वैद्य

टग्या's picture

27 Aug 2008 - 12:19 pm | टग्या (not verified)

मी शिवसेनेचे काम ... शाब्दिक मारामारीचा कंटाळा...

बापरे! म्हणजे डायरेक्ट रस्त्यात गाठून हाणामारीची धमकी की काय?

भास्कर केन्डे's picture

27 Aug 2008 - 9:46 pm | भास्कर केन्डे

१. आई-वडिल, आजी व भावंडाच्या डोळ्यातले वात्सल्य/प्रेम.
२. कॉलेजातले मंतरलेले दिवस.
३. अर्ध्या रात्री झोपीतून उठून मला शोधत येऊन "माझा बाबा" म्हणून मिठी मारून पुन्हा बिनधास्त ताणून देणारी माझी चिमुरडी अरुषी.
४. सकळी उठल्या बरोब्बर इवल्याश्या अर्णीचे (कन्या) डोळे उघडून पहिल्या नजरेत मिळणारे निरागस स्मितहास्य.
५. कोकण रेल्वेने श्रावणात (दिवसा) पनवेल-सावंतवाडी केलेला प्रवास व पहिले कोकण दर्शन - एका गडावर अजूबाजूला कोणी नाही हे पाहून खूप मोठ्याने केलेले "गोब्राम्हण ... छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!"

आपला,
(रोमांचित) भास्कर
आम्ही येथे वसतो.

ऋचा's picture

5 Sep 2008 - 12:31 pm | ऋचा

१. माझ्या लग्नात मी-आई-बाबा-ताई ५-१० मिनिट एकमेकांचे हात हातात घेऊन बसलो तो क्षण.
२. माझ्या भाच्याचा जन्म झाला तेव्हा.
३. मी B.sc ची परीक्षा First Class मिळवून पास झाले तेव्हा कारण मी खुप आजारी होते पास व्हायचीच खात्री नव्हती.
४. माझ्या मांजरीला पहीलं पिल्लु झालं तो क्षण.
५. लहान असताना रात्री लाईट गेल्यावर आई-बाबांच्या मधे झोपायचा केलेला हट्ट पुर्ण व्हायचा तेव्हा..

तात्या खुप आहेत हो .......

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"