गाभा:
मुम्बई परिसरात चाळीतील घरांच्या अनेक जाहिराती येतात. ही घरे लीगल आहेत व लोनही मिळते असा त्यात उल्लेख असतो.
चाळीतील घरे लीगल असतात का ?
माझ्या एका डॉक्टर मित्राने खूप वर्षांपूर्वी चाळीत दोन घरे घेतली होती. नंतर त्याने त्यावर दोन मजले चढवुन दवाखाना व घर केले.. अर्थात हे बांधकाम लोड बेअरिंगचे म्हणजे मेटलचे खांब व बीम्स या पद्धतीचे असते.
दोन नाही निदान एक तरी मजला नक्की चढवता येतो.
वीस पंचवीस वर्षानी जागेलाही भाव येऊ शकतो.
याबाबतचे अनुभव व माहिती कृपया इथे लिहा.
प्रतिक्रिया
24 Jul 2015 - 9:42 am | खटपट्या
१. महापालीकेची रीतसर परवानगी घेउन (सीसी - सर्टीफीकेट ओफ कमेन्समेंट) मिळवून जर बांधकाम चालू केले असेल
२. अधिक्रुत ईमारतीला ज्या परवानग्या आवश्यक असतात त्या सर्व मिळवल्या असतील तर.
३. अधिक्रुत सदनिकेचे जसे स्टॅप्ड्यूटी रजीस्ट्रेशन होते तसे केले असेल तर. (यात सात बारा उतार्यापासुन सर्व नोंदी असतात)
सोपा उपाय म्हणजे एचडीएफसी बँकेकडून कर्ज मिळतेय का याची चाचपणी करावी. माझा अनुभव असा आहे की एचडीएफसी बँक सर्व कागदपत्रांची कसुन चौकशी करते.
९०% बैठ्या चाळी या अनधिक्रुत असतात.
24 Jul 2015 - 9:50 am | सुबोध खरे
हितेस राव
बिनधास्त घर घ्या लीगल का इल्लिगल शी काय घेणे देणे आहे. कॅम्पा बिल्डींग अजूनही तोडलेली नाही. मग चाळ तोडायला कोण जातंय? अगदी झोपडी घेतलीत तरी चिंता नाही. कोणीतरी येईलच नगरसेवक गरीबांचा कैवार घेण्यासाठी.
नाहीतरी गेल्या ६८ वर्षात किती बेकाय्देशीर बांधकामे बांधली गेली आणि त्यातील किती प्रत्यक्ष पडली गेली याचे प्रमाण पी पी एम( पार्टस पार मिलियन) म्हणजे दशलक्षात काही असेच आहे.कशाला चिंता करता?आणि त्यातून कर्ज कोणी देत असेल तर अजूनच उत्तम. घर पडले तर तुमची जबाबदारी शून्य. काखा वर करून मोकळे व्हा.
हा का ना का
25 Jul 2015 - 11:47 am | वाचन प्रेमी
चाळीतील घर उत्तमच !
उंच बांधकामाचा दर्जा न राखलेल्या ईमारती पेक्षा चाळीतील घर हे उत्तमच !
आजकाल बिल्डर्स पण फक्त सुविधांवरच भर देतात आणि घेणारे पण,आपली ईमारतीच बांधकाम व्यवस्थित आहे कि नाही हे कुणीच पाहत नाही !
25 Jul 2015 - 12:17 pm | सुबोध खरे
आजकालच्या चाळीसुद्धा आजकालच्या बिल्डींग इतक्याच टिनपाट असतात. त्या ब्रिटीश काळातील चाळी गेल्या आता.
25 Jul 2015 - 10:12 am | प्रकाश घाटपांडे
मला वाटल चाळीशीतील घर लिगल असते का? :)
25 Jul 2015 - 11:08 am | दमामि
खिक्क! घर की घरोबा?
25 Jul 2015 - 11:51 am | dadadarekar
:)
25 Jul 2015 - 1:21 pm | दमामि
नंबर बदलला की साइझ बदलेल:)
25 Jul 2015 - 5:16 pm | पैसा
नव्या मुंबईत घर घेतलं होतंत ना? त्याचं काय झालं?
25 Jul 2015 - 6:12 pm | dadadarekar
२०१८ नंतर पजेशन आहे. एअरपॉर्त , शीवाडॅ सी लिंक , उरण सी वुड रेल्वॅ हे थोडे झाले की मग बांधकाम सुरु होणार आहे. तोवर रेट्कमी आहेत.
लँडस्केप बिल्डरच्या डायरेक्टर बॉडीत ऑनररी मेंबर म्हणुन परवापासुन रीमा लागू आल्या आहेत.
....
चाळीतील घरेही भविष्यात चांगले अॅप्रिसिएशन देतात. मानखुर्दात पाच वर्षापुर्वी तीन लाखात घेतलेली बैठी घरे आता लोकानी दहा लाखाला विकली आहेत.
वशी पनवेल प्रांतात चाळी फारश्या नाहीत का ? हार्बरलाच चाळीत घर मिळाल्यास बरे होइल.
25 Jul 2015 - 6:17 pm | dadadarekar
http://www.mumbaisealink.com/index.html