गेल्या मे महिन्यात प्रचंड बहुमताने निवडून आलेले मोदी सरकार आता एका वर्षापेक्षा जास्त मोठे झाले आहे. खूप अपेक्षा ठेवुन अनेक भारतीयांनी ह्या सरकार ला बहुमताने निवडून आणले. सरकार सुरु झाल्यापासुनच स्म्रुती इराणी वगैरे टीवी सिरियलवाल्या लोकाना मोठे मंत्रीपद दिल्याने बर्याच लोकानी नाराजी दर्शवीली होती. पण इतक्या लवकर त्यावरुन सरकार च्या परफोर्मन्स बद्दल बोलणे अयोग्य होते. आत एक वर्षाच्या वर कालावधी उलटला आहे. माझ्या मते खालील गोष्टींमुळे सरकार विषयी सामान्य जनांना निराशा अनुभवास आली आहे. मिपाकरांना काय वाटते?
१. शंभर दिवसात काळा पैसा परत आणण्याचे वचन भंगले (१५ लाख वगैरे जुमले सोडून देऊ)
२. रोबर्ट वाड्रा, इतर काँग्रेस राज्यातील भ्रष्टाचारी ह्यापैकी कुणीही तुरुंगात गेले नाही.
३. व्यापम, आसाराम बापू वगैरे प्रकरणातुन घोटाळ्यांनी एक नवे न्युनतम टोक गाठले. (साक्षीदारच मारुन टाकणे, मुडद्यांची रास लावणे असले प्रकार युपीए घोटाळ्यांमधेही होत नव्हते) ह्या सगळ्यावर मोदीजींचे असह्य मौन
४. गुड गवर्नन्सची सामन्य माणसाला काहीही चिन्हे दिसत नसताना काय खावे, काय प्यावे, असल्या गोष्टींमधे सरकारी दखलअंदाजी मात्र चालू झाली.
५. विकासाच्या मुद्द्यावरही काही फारसे घडले नाही - कुठलेही मेजर बील पास करता आले नाही
६. ललित मोदी सारख्या घोटाळेबाज माणसाला पाठीशी घालणार्या वसुंधरा राजे सारख्या बाईवर मोदींचा कसलाही कंट्रोल नाही.
७. अमित शहा आणि मोदी ह्या केवळ दोन व्यक्तिंच्यामधे सामावलेले देशाचे महत्वाचे निर्णय
८. उद्योग धंद्याना पोषक वातावरण निर्माण होईल असाही बर्याच लोकांची अपेक्षा होती, तिथेही काहीही झाले नाही, प्रत्येक परदेश वारीत गौतम अदानी आणि त्याने मिळवलेले नविन कंत्राट हे मात्र क्रोनी कॅपीटिलजम
ह्या सगळ्यावर जे भाजपाचे निस्सीम चाहते आहेत ते पान पान भर लंगडे युक्तिवाद देत राहतात. पण ज्यांना कसलाही राजकीय कल नव्हता, अशा मतदारांना आता पश्चाताप होतो आहे का?
प्रतिक्रिया
21 Jul 2015 - 11:23 pm | अर्धवटराव
मला वाटलं मोदी साहेबांना सत्ता स्थापन केल्याचा पश्चात्ताप होतोय अशी बातमी फुटली कि काय...
आप्ल्याला नाय बा पश्चात्ताप झाला. आमचं मत नेहमीच थोरल्या बारामतीकरांच्या बाजुने असतं... ते तर (ऑफिशीयली) सत्तेतच नाय यंदा. प्रधानमंत्री पदाच्य लायकीचा एकमेव मराठी माणुस महाराष्ट्राच्या दुर्दैवाने अणि काँग्रेसच्या कर्तुत्वाने अक्षरशः वाया गेला. असो.
22 Jul 2015 - 6:22 pm | पाटीलअमित
मला वाटलं मोदी साहेबांना सत्ता स्थापन केल्याचा पश्चात्ताप होतोय अशी बातमी फुटली कि काय...
केजरीवाल ला झाला होता भो ,
21 Jul 2015 - 11:46 pm | dadadarekar
याविषवार एक धागा आधीच काढला होता... पण अजुन एक वर्षही झाले नाही ही सबब सांगुन मोदीभक्तानी तेंव्हा धाग्याकडे पाठ फिरवली.
21 Jul 2015 - 11:50 pm | dadadarekar
http://www.misalpav.com/node/29374
22 Jul 2015 - 2:40 pm | कलंत्री
५ वर्ष पूर्ण होऊ द्या. त्यामध्ये बरीच स्थिंत्यतरे होतील. लोकांना प्रयोगाचे फलित लक्षात येईल, तुर्त त्यांना त्यांचे काम करु द्या आणि अर्थातच आपण आपले काम करु या.
22 Jul 2015 - 4:42 pm | विकास
आपण आपले काम करु या.
पिंका टाकणे हे देखील काम असू शकते ना? ;)
22 Jul 2015 - 6:23 pm | पाटीलअमित
त्या पेक्षा दरवर्षी एक धागा टाकू या ( आमच्या कडे aanual appriasal cycle असते )
22 Jul 2015 - 5:01 pm | नाखु
जय मिपाराष्ट्र्,जय महाराष्ट्र्,
मोदीभक्त्जयमोदीविरोधकजय्धागाअस्वादक्जय्धागादुर्लक्षकस्म्वर्धउत्खनक्स्म्गोपकप्रतीपालकऊच्छादक संघ
22 Jul 2015 - 5:03 pm | चिरोटा
सरकारच्या काही योजना नक्कीच स्तुत्य आहेत. उदा. जन सुरक्षा योजना,सुकन्या समृद्धि योजना..
पाच वर्ष पूर्ण होतील तेव्हाच ह्यावर बोलता येईल.कंपनीत कामाला लागलात तरी तुम्हाला साधारण ६ महिन्यांचा कालावधी शिकण्यासाठी, चुकांतून शिकण्यासाठी देण्यात येतो.दर पंधरा दिवसांनी कंपनी पर्फॉमन्स विचारत नाही.
४ वर्षे पूर्ण झाल्यावर-म्हणजे २०१८ साली आढावा घेणे सोपे होईल.
22 Jul 2015 - 5:06 pm | विकास
हो, पण आसारामबापूं प्रकरणाबद्दल काय मत आहे आपले? ;)
22 Jul 2015 - 5:14 pm | dadadarekar
फोटोला हार घालून त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा 'प्रताप' झारखंडच्या शिक्षणमंत्री नीरा यादव यांनी केला आहे. कोडर्मा इथल्या एका शाळेत आमदार, मुख्याध्यापक, शिक्षकांच्या उपस्थितीत हा क्लेशदायक प्रकार घडला. त्यामुळे शिक्षण मंत्री आणि शाळेच्या अकलेचे धिंडवडे काढले जात आहेत.
http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=48173719§ion=tajya-b...
22 Jul 2015 - 7:32 pm | विकास
आता मात्र मोदींनी राजीनामाच द्यायला हवा.
22 Jul 2015 - 7:44 pm | विवेकपटाईत
माझा पंतप्रधान कार्यालयातला १९९७ ते मे २०१५ चा अनुभव, गेल्या वर्षात जेवढे कार्य झाले तेवढे कार्य या पूर्वी कधीच झाले न्हवते. फक्त डोळे उघडून पहायची गरज आहे...
22 Jul 2015 - 8:10 pm | dadadarekar
हे लिहायलाच हा धागा aàe
22 Jul 2015 - 9:30 pm | आनन्दा
पटाईतसाहेब खरेच लिहा हो काहीतरी. किमान लोकांना कळेल तरी.
23 Jul 2015 - 10:57 am | पुण्याचे वटवाघूळ
पटाईतरावांनी नक्कीच लिहावे ही आग्रही मागणी. पण ते या धाग्यावर नको. त्यासाठी स्वतंत्र धागा काढावा.
मिपावर असे काही लेखक आहेत की त्यांचे नाव वाचून आपल्याला आवड नसलेल्या विषयावरचा धागाही वाचावासा वाटतो. त्यात गविंसारख्याचा समावेश होतो. आणि असे काही लेखक आहेत की त्यांचे नाव वाचूनच तो लेखक काय दिवे लावणार आहे हे डोळ्यासमोर येतेच आणि तो लेख उघडूनही बघावासा वाटत नाही.अशा दुसर्या कॅटेगिरीच्या लेखकांमध्ये बंडामामाचा नंबर खूपच वरचा आहे. कधीही कुठच्याही कन्स्ट्रक्टिव्ह चर्चेत या गृहस्थाचा कधी भाग राहिलेला नाही.सतत इतरांना नावे ठेवायची, काही विचारायला गेले तर स्पेशल आम आदमी पक्ष स्टाईलने हिट अॅन्द रन करून पळून जायचे, त्या चर्चेत परत फिरकायचेही नाही हे असले या गृहस्थाचे प्रताप. या गृहस्थाची मिपावरील वाटचाल वाचा.त्यावरून मला काय म्हणायचे आहे हे समजून येईल.
या चर्चेत अर्धवटराव, विकास, आनन्दा, पटाईतराव (आणि कुणाचे नाव लिहायला विसरलो असल्यास क्षमस्व) तुम्ही का लिहित आहात? लेखकाचे (डिस)रेप्युटेशन आणि मुख्य म्हणजे लेखकाचे नाव यावरून तो लेख नक्की कसा असणार याची अजिबात आयडिया आली नाही का तुम्हाला? उगीच अशा लोकांना का मोठे करायचे?
हा माझा या धाग्यावरील पहिला आणि शेवटचा प्रतिसाद.
(मिपावरील प्रत्येक लेख आणि प्रतिसाद वाचलेला आणि त्यामुळे कोण चांगले लिहितो आणि कोण काड्या घालतो याची पूर्ण आयडिया असलेला) पुव
22 Jul 2015 - 9:25 pm | रमेश आठवले
सौ सुनारकी एक लुहारकी.
पंतप्रधानाच्या कार्यालयात १८ वर्षे कार्यरत असणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहिती नंतर मोदी सरकार वर टीका करणारे लोक थांबतील असे वाटते .
22 Jul 2015 - 9:51 pm | सामान्यनागरिक
सध्या मागील सरकारांनी केलेल्या चूका दुरूस्त करण चालु असावे. अनेक आघाडयांवर दुर्लक्ष झालेले होते.
पण एकुण बरीच वाट बघीतल्या नंतर मिळणारी फळे निच्चीतच रोड असतील . देशाचं भलं करण्याची कळकळ असणारा पंतप्रधान खुप वर्षानंतर आपल्याला मिळाला आहे।
22 Jul 2015 - 8:16 pm | अर्धवटराव
ज्यांचा काहिच राजकीय कल नव्हता त्यांना पश्चात्ताप होणं शक्य आहे काय ??
22 Jul 2015 - 8:19 pm | पाटीलअमित
पण हे सगळे वायदे पूर्ण होतील असे खरच लोकांना वाटले होते ?
22 Jul 2015 - 11:03 pm | विनोद१८
५ वर्षे पूर्ण झाल्यावरच याचे खरेखुरे उत्तर मिळेल, जरा धीर धरा.
23 Jul 2015 - 11:50 am | dadadarekar
अच्छे दिन २५ वर्ष्सनी येणार असे शहा बोल्ले होते गेल्या आठवड्यात.
23 Jul 2015 - 1:46 pm | विनोद१८
तो व्हिडीओ नीट पाहिल्यावर साधारण बुद्धीच्या माणसाच्या लक्षात येइल अमित शहा काय म्हणाले ते. तो नीट पहावा मग प्रतिक्रीया लिहा. या देशाला जर 'विश्वगुरू' करायचे असेल तर २५ वर्षे लागतील, देशांतर्गत 'अच्छे दिन' येण्यासाठी निदान ५ वर्षे तरी वाट पहावीच लागेल.
23 Jul 2015 - 2:18 pm | dadadarekar
..
23 Jul 2015 - 5:10 pm | आदिजोशी
बंडा मामा हा डुआयडी असल्याबद्दल मेंब्रांचे काय मत आहे?
23 Jul 2015 - 6:46 pm | dadadarekar
http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=48183199§ion=top-sto...
उद्धव ठाकरेही विचारताहेत ... अच्चे दिन कधी येणार ?
24 Jul 2015 - 10:56 pm | रमेश आठवले
उद्धव ठाकरे यांच्या मते जोपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेचे एकछत्री सरकार येत नाही तो पर्यंत अच्छे दिन येणार नाहीत. म्हणजे अच्छे दिन आता कधीच येणार नाहीत.
24 Jul 2015 - 10:57 pm | अर्धवटराव
नकोच 'तसले' अच्छे दिन
24 Jul 2015 - 5:37 am | के के वाघ
राव गेले नि पंत आले.
25 Jul 2015 - 1:28 am | रमेश आठवले
http://www.huffingtonpost.in/2015/07/24/pew-research-india-econom_n_7865...
25 Jul 2015 - 4:24 am | विकास
ते प्यू रीसर्च सेंटर वाले मोदीभक्त आहेत झालं! ;)
25 Jul 2015 - 5:05 am | रमेश आठवले
http://www.pewresearch.org/
https://en.wikipedia.org/wiki/The_Pew_Charitable_Trusts
28 Jul 2015 - 8:56 am | विकास
;) चा डोळे मिचकावणे असा आहे... अर्थात प्यू काय आहे ते मला चांगले माहीत आहे...
28 Jul 2015 - 9:49 am | रमेश आठवले
या खुलाशा बद्दल आणि नंतरच्या प्रतिसादात प्यू सम्बन्धी दिलेल्या अधिक माहिती बद्दल.
27 Jul 2015 - 9:46 pm | dadadarekar
डॉ. अब्दुल कलाम गेले.
चारच दिवसापुर्वी भाजपाच्या कुणीतरी अतीउत्साही नेत्याने त्यांच्या फोटोला ते जिवंत असतानाच हार घातला होता !
http://abpmajha.abplive.in/india/2015/07/22/article658935.ece/Jharkhand-...
27 Jul 2015 - 10:30 pm | अर्धवटराव
३६५ डेज गटारीनिमीत्त हार्दीक शुभेच्छा.
28 Jul 2015 - 8:04 am | dadadarekar
त्या कंदिलाच्या गोष्टीसारख झालं .
28 Jul 2015 - 9:37 pm | अर्धवटराव
कधि पेटवताय??
27 Jul 2015 - 10:38 pm | lakhu risbud
हे डुप्लिकेट आयडी ब्लॉक का केले जात नाहीत ? जिकडे तिकडे घाण करत असतात.
28 Jul 2015 - 7:30 am | होकाका
१. प्यू फक्त इंटरनेटद्वारे आणि फक्त इंग्रजीमधून सर्वेक्षण करते. आता ही प्यूची गफलत आहे की लेखकाची ते माहीत नाही, परंतु संपूर्ण बातमीमध्ये या सर्वेक्षणामध्ये किती लोकांचं मत अजमावलं गेलं हे दिलेलं नाही. त्यामुळे या निष्कर्षांच्या वैधतेबाबत शंका उपस्थित होतात. केवळ टक्के देणं ही वाचकाची फसवणूक आहे.
२. @ पुण्याचे वटवाघूळ, आनन्दा, dadadarekar: +१..... पटाईतसाहेब, तुंम्ही खूप सुंदर लिहिता. कृपया या विषयावर जरूर लिहा. लवकर लिहा.
३. @ dadadarekar: 'ते' मूळ भाषण
हे सुद्धा पहा:
http://www.niticentral.com/2015/07/14/media-distorts-amit-shahs-statemen...
28 Jul 2015 - 9:03 am | विकास
प्यू फक्त इंटरनेटद्वारे आणि फक्त इंग्रजीमधून सर्वेक्षण करते. आता ही प्यूची गफलत आहे की लेखकाची ते माहीत नाही, परंतु संपूर्ण बातमीमध्ये या सर्वेक्षणामध्ये किती लोकांचं मत अजमावलं गेलं हे दिलेलं नाही. त्यामुळे या निष्कर्षांच्या वैधतेबाबत शंका उपस्थित होतात. केवळ टक्के देणं ही वाचकाची फसवणूक आहे.
नक्की हे कशाच्या संदर्भामुळे आपल्याला वाटले ते समजले नाही... प्यू ने २०१५ सालात भारतात सर्वेक्षण कसे केले याची पुर्ण पद्धत (methodology) खाली चिकटवत आहे.
Survey Methods for India in 2015
Country: India
Year: 2015
Sample Design:
Multi-stage, area probability design. Primary sampling units (PSUs) are urban settlements and rural districts stratified by region and urbanity. Nine large cities are selected with certainty. Within these cities, PSUs are sub-grids. The number of effective PSUs is 167. Individuals within households are selected using a Kish grid and gender quotas based on national figures. At least three attempts are made to complete the interview with the selected respondent. The sample is disproportionately urban, but the data are weighted to reflect the actual urban/rural distribution in India.
Mode: Face-to-face
Languages: Hindi, Bengali, Tamil, Telugu, Kannada, Gujarati, Marathi, Odia
Fieldwork Dates: April 6 - May 19, 2015
Sample Size: 2,452
Margin of Error: 3.2 percentage points
Representative: Adult population 18 plus (conducted in 15 of the 17 most populous states and the Union Territory of Delhi, excluding Kerala, Assam, and a district in Chhattisgarh state due to insecurity)
Primary Vendor: Princeton Survey Research Associates International
Weighting Variables: Gender, age, education, region, urbanity and probability of selection of respondent
Design Effects: 2.69