या मीडिया चं नक्की करावं तरी काय ?

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
21 Jul 2015 - 6:47 am
गाभा: 

काही दिवसापूर्वी सागरिका घोष नामक पत्रकार महिलेने असे ट्वीट केले होते की, “पत्रकारांनी देशभक्त असावेच, असा काही नियम नाही “. या बाई व अन्य अनेक तथाकथित “ धर्मनिरपेक्ष सेक्युलर इत्यादि इत्यादि “ पत्रकार व मीडिया मुघल्स यांचीदेखील विचारसरणी व वर्तन पाहता ह्या मंडळींना भारतीय म्हणावे का? व ही मंडळी नक्की भारताच्या भल्यासाठी काम करत असावेत की परकीय अथवा देशविघातक शक्तींच्या अजेंड्याचे समर्थन करण्यासाठी? असा प्रश्न पडतो!

भाजपाप्रणीत केंद्र सरकार अन विविध राज्यातील भाजप सरकारे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पराकोटीचा द्वेष करत सतत कुठलीतरी खुसपटे काढून त्रास देण्याचा प्रयत्न करणे , संघपरिवार आणि अन्य उजव्या विचारांच्या संस्थांना बदनाम करण्याची कारस्थाने करणे , मीडियातून सरकार भ्रष्ट आणि निष्क्रिय असल्याचे खोटे चित्र सतत उभे करणे असे अनेक उद्योग ही मंडळी करत असतातच ,पण भारतीय सैन्यदल आणि प्रशासनातील प्रामाणिक अधिकारी यांच्यावरही यां मंडळींचा डोळा असतो . यांना पैशाचा पुरवठा नक्की कुठून होतो? देशविघातक शक्ती तर अशा मीडिया हाऊसेस ना अप्रत्यक्ष रीत्या कंट्रोल करत नाहीत ना? असा दाट संशय येतो.

असा प्रकार यापूर्वी कथित “पर्यावरणारक्षक” एनजीओज बद्दल झालेला आहे . जगातील भारतद्वेष्ट्या संस्था आणि भारताच्या औद्योगिक प्रगतीस खीळ घालू पाहणार्यान मंडळींनी अशा “पर्यावरणारक्षक” एनजीओज ना छुपे फंडिंग करत पर्यावरणाचे बाहुले उभे करून उद्योगधंद्याना व विशेषत: पॉवर प्रोजेक्टस ना अडचणी आणल्या होत्या . तसाच प्रकार मीडिया च्या बाबतीत होत आहे का ? दुसर्या एका धाग्यात उल्लेख केल्यानुसार आज किंवा उद्या प्रत्यक्ष युद्ध झाले ,तर मीडिया ची भूमिका नक्की काय असेल ? व त्याचे काय भीषण परिणाम होऊ शकतात ? अशा अनेक शन्का मनात दाटून आल्या .कारण आजकाल “मीडिया म्हणजे उपाय कमी अन अपाय जास्त” अशी स्थिती सध्या दिसत आहे . म्हणून हा लेखनप्रपंच!

जाणकारांनी आपली मते अवश्य मांडावीत !

प्रतिक्रिया

चलत मुसाफिर's picture

21 Jul 2015 - 7:30 am | चलत मुसाफिर

खरा मुद्दा हा दुटप्पीपणाचा आहे. उद्या एखाद्याने जर "पत्रकाराने धर्मनिरपेक्ष असायलाच हवे असे नाही. तो हिंदुत्ववादी असू शकतो" असे विधान केले तर हेच स्वातंत्र्यवीर त्याला बहिष्कृत करतील.

सागरिकाबाई अशा पत्रकाराला आपल्या वाहिनीत नोकरी देतील का?

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jul 2015 - 7:41 am | कैलासवासी सोन्याबापु

धाग्याबद्दल बोलायचे झाल्यास, धागाकर्त्याने काही गोष्टी स्पष्ट कराव्यात
१ धागा मीडिया काय बोलतोय ह्याच्यावर आहे का?
२ धागा बीजेपी व संघाला विक्टिमहूड क्लेम करायला काढलाय काय?
३ धागा मीडिया च्या देशभक्तिवर असल्यास देशभक्ति ची समग्र परिभाषा धागाकर्त्याच्या विचारांती काय ठरते आहे?

सहसा मला राजकीय फ्रंट वर बोलायला आवडत नाही कारण कायदेशीर सज्ञान प्रत्येक माणसाने प्रत्येक एक एक पक्ष पकडून आपापला एक यूटोपिया बांधलेला असतो अन सहजी आपले विचार मॉडिफाई करायला तो तयार नसतो मग वांझ चर्चा करून उपयोग काय? शिवाय

ह्या प्रश्नावर किंवा धाग्यावर मी काहीही बोललो तरी ही मते बापुसाहेब नामे व्यक्तिची असतील, अधिकारी म्हणुन नव्हे, म्हणुन बोलु का नको ती आगाऊ परवानगी मागतोय

पैसा's picture

22 Jul 2015 - 12:27 pm | पैसा

या पत्रकार आहेत का? मला वाटले त्या न्यूज रीडर आहेत. म्हणजे सलीम-जावेदच्या कथेवर अमिताभची दीवार उभी रहावी तसे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन जिवंत लोकांच्या जिवंत बातम्या कधी आणल्या होत्या त्यांनी?

पुण्याचे वटवाघूळ's picture

22 Jul 2015 - 3:19 pm | पुण्याचे वटवाघूळ

या मीडिया चं नक्की करावं तरी काय ?

शिंपल. फाट्यावर मारायचं.

उगा काहितरीच's picture

22 Jul 2015 - 6:34 pm | उगा काहितरीच

पटलं ! गुगल न्युज वाचत जायचं .

नितिन थत्ते's picture

22 Jul 2015 - 6:24 pm | नितिन थत्ते

>>मीडियातून सरकार भ्रष्ट आणि निष्क्रिय असल्याचे खोटे चित्र सतत उभे करणे

मे २०१४ पूर्वी जे सरकार होते ते सरकार भ्रष्ट आहे आणि निष्क्रीय आहे असा लोकांचा ग्रह झाला आणि त्यामुळे ते सरकार सत्ता गमावून बसले. ते सरकार भ्रष्ट असल्याची माहिती (उदा. राष्ट्रकुल खेळांच्या आयोजनावेळी २० रुपयाचे टॉयलेट पेपर काहीशे रुपयांना विकत घेतले गेले, २जीच्या वाटपात १.७६ लाख कोटी रुपयांचा रेव्हेन्यू लॉस झाला असे कॅगने अहवालात म्हटले इत्यादि गोष्टी) किंवा सरकार निष्क्रीय असल्याची माहिती (उदा. अर्थव्यवस्थेचा विकासदर कमी होत आहे, अनेक प्रकल्प मंजूरीविना अडकून पडले आहेत इत्यादि गोष्टी) लोकांना अंतर्ज्ञानाने समजल्या की मीडियाने प्रसिद्ध केल्यामुळे माहिती झाल्या?

मीडिया त्याहीवेळी सरकारविरोधातील बातम्या देत होती आताही देत आहे. तेव्हाच्या बातम्या ही "मीडियाची जागरूकता" आणि आताच्या बातम्या ही "मीडियाची खुसपटे" अशी व्याख्या असली तर क्लिअर करून टाका.

पाटीलअमित's picture

22 Jul 2015 - 6:37 pm | पाटीलअमित

मीडियाची जागरूकता" आणि \ "मीडियाची खुसपटे

हे तुम्ही कोणत्या पक्षाचे त्यावरून ठरणार

मी-सौरभ's picture

22 Jul 2015 - 6:40 pm | मी-सौरभ

आजकाल मिडीया फक्त पेड बातम्या देतो असे वाटण्यास भरपूर वाव आहे.
फाट्यावर मारणे हा एक्मेव उपाय आहे.

सत्याचे प्रयोग's picture

22 Jul 2015 - 7:20 pm | सत्याचे प्रयोग

मिडिया चे कामच असं आहे काय तरी खुसपट काढायचं मग बसायचे चघळत

बोका-ए-आझम's picture

22 Jul 2015 - 7:44 pm | बोका-ए-आझम

जगातल्या कुठल्याही लोकशाही असलेल्या देशात मीडियाला ३ वास्तव तत्वे (realities ) लागू पडतात -
१. मीडियासाठी वाईट बातमी ही नेहमीच चांगली बातमी असते. Bad News is always Good News.
२. मीडियाची बांधिलकी ही शेवटी बातमी आणि ती प्रसिद्ध करण्यासाठी असलेली स्पर्धा आणि त्यातून येणारे टीआरपी किंवा वाचकांची संख्या यांच्याशी असते. शेवटी तोही एक व्यवसाय आहे आणि नफा कमावणे हा त्यांचाही उद्देश आहे.
Commitment of media is always to news and profit generation from the dissemination of such news.
३. माहिती हा मीडियाचा प्राणवायू आहे पण त्याचा अतिरेक त्यांना आवडत नाही. जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण, मुद्देसूद माहिती दिलीत, तर त्यात मीडियाला अजिबात रस नसतो. जेव्हा ही माहिती लपवली जाते, तेव्हा मीडियाचा त्यातला इंटरेस्ट जागृत होतो.

भारतातील प्रसारमाध्यमं भाजपविरोधी आहेत असं म्हणायला जागा आहे, पण उजव्या विचारसरणीचे पक्ष हे जगभरात मीडियाच्या टीकेचे धनी ठरलेले आहेत. भाजप एकटाच नव्हे.
अमेरिकन प्रसारमाध्यमं डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने जास्त लिहितात. जाॅर्ज बुश, निक्सन, रेगन - यांच्यावर टीका होण्याचं एक कारण ते रिपब्लिकन पक्षाचे होते हेही आहे. ब्रिटनमध्ये लेबर पार्टी किंवा लिबरल पार्टीपेक्षा काँझर्व्हेटिव्ह पक्षावर टीका नेहमीच जास्त होते. भाजप याच पठडीतला, उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे. आणि बिगर-काँग्रेसी सरकार यायची ही आपल्या देशातली फक्त सहावी वेळ आहे - १९७७, १९८९, १९९६, १९९८, १९९९ आणि आता २०१४. त्यामुळे भाजपच्या पाठीराख्यांना ही टीका बोचरी वाटणं साहजिकच आहे कारण इतकी वर्षे अशीच टीका काँग्रेसवर होत होती. आता सुपातले जात्यात आले आहेत, एवढाच काय तो फरक आहे. यावरून एक मस्त किस्सा आहे - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जाॅन्सन म्हणाले होते की मी व्हाईट हाऊसजवळून वाहणा-या पोटोमॅक नदीच्या किना-यावर फेरफटका न मारण्याचं कारण मीडिया लगेच छापेल - राष्ट्राध्यक्षांना पोहता येत नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Jul 2015 - 10:58 pm | कैलासवासी सोन्याबापु

बोका-ए-आझम,

निव्वळ अप्रतिम प्रतिसाद! मी विनंती करेन की ह्या विषयावर अजुन एक स्वतंत्र असा लेखच येऊ देत कसा!

बोका-ए-आझम's picture

22 Jul 2015 - 7:50 pm | बोका-ए-आझम

बायस - हे बर्नार्ड गोल्डबर्ग यांचं पुस्तक याच संदर्भात आहे. त्यात त्यांनी अमेरिकन प्रसारमाध्यमं कशा प्रकारे माहितीचं विपरितीकरण (distortion) करतात हे फार सुंदर पद्धतीने सांगितलं आहे. भारतातही ते लागू पडतंच.

https://googleweblight.com/?lite_url=https://en.m.wikipedia.org/wiki/Bia...

रमेश आठवले's picture

22 Jul 2015 - 9:37 pm | रमेश आठवले

राजदीप सरदेसाई आणि सागरिका घोष हे पतिपत्नी आहेत.

चैतन्य ईन्या's picture

22 Jul 2015 - 9:47 pm | चैतन्य ईन्या

आता २ ठिकाणी तर इचारून झालाय तुमचे. पुन्हा इथे इचारताना काय नवी भर घालायची कि राव. तुमचा काय ठरला ते सांगा जरा बघू.