इन्फोसिस व विप्रो (नारायण मूर्ती आणि अझीम प्रेमजी ) यांनी अभियंत्यांचे नुकसान केले कि फायदा ?
मी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. गेली अकरा वर्षे या व्यवसायात आहे व त्या आधी १० वर्षे उद्योग क्षेत्रात होतो. माझ्या व त्या आधीच्या काळी अभियंते कोअर ( ज्या क्षेत्रातली पदवी, त्याच क्षेत्रातली) कंपनी मिळवण्यासाठी अतिशय उत्सुक असत.
सध्या मात्र जवळपास सर्व अभियंते थोडा जास्त पैसा, मोठ्या शहरातील राहणीमान, परदेश गमनाची संधी या व अश्या अनेक कारणासाठी माहिती व तंत्रज्ञानं क्षेत्रातील नोकरीला सुवर्णसंधी समजून त्या क्षेत्रात नोकरी करत आहेत . बऱ्याच जणांनी घेतलेल्या शिक्षणाचा योग्य असा वापर या ठिकाणी होत नाही .
बऱ्याच अनुभवी लोकांचे असे मत आहे कि भारतीय अभियंते हे सुशिक्षित हमालाचे / क्लार्कचे (पण चकचकित, वातानुकुलीत कार्यालयात ) काम करत आहेत . या सगळ्याचा परिपाक म्हणून भारतातील अभियंत्यांकडून एक सुद्धा नेत्रदीपक, जग बदलून टाकणारे संशोधन झालेले नाही .
हे मत साक्षात नारायण मूर्तीनी काल परवाच भारतीय शास्त्र संस्थान (IISC ) बंगळूरू येथे व्यक्त केले आहे .
म्हणजे तुम्हीच IIT , NIIT व मोजक्याच प्रसिध्द महाविद्यालातून होतकरू, हुशार तरुण निवडून त्यांना लायकीपेक्षा कमी दर्जाचे काम, कदाचित अभियांत्रिकी / उत्पादन क्षेत्रातील कंपनी पेक्षा जास्त वेतन देवून देणार. आणि वरती भारतातील अभियंत्यांकडून एक सुद्धा नेत्रदीपक, जग बदलून टाकणारे संशोधन झालेले नाही असे जगाला ओरडून सांगणार .
मग शेवटी इन्फोसिस व विप्रो (नारायण मूर्ती आणि अझीम प्रेमजी ) यांनी अभियंत्यांचे नुकसान केले कि फायदा ? तुमचे मत काय ?
प्रतिक्रिया
20 Jul 2015 - 11:56 pm | आरोह
नुकसान!!
"kind of work in services companies is crap. filling excel sheets, staring at the screen to see if some service is running or not, attend calls and solve minor bugs. forget about iit, any cs grad wont want to do this. very few people get into actual development work and in there also its mostly copy and paste. iitians are used to develop softwares participate in hackathons, code for fun. they will die out of frustration in an it services firm"
20 Jul 2015 - 11:59 pm | पुणेकर भामटा
हेच म्हणतो.
21 Jul 2015 - 12:13 am | सटक
अभियंता हा Applicational Resource आहे. संशोधनासाठी (नविन) ज्याला Pure Science म्हणतात त्याची जास्ती गरज असते. आपल्यकडे ते शिकण्यासाठीचे पोषक वातावरण नाही.
आपल्याकडच्या "वाकबगार" अभियंत्यांना घेउन त्यांचे "वाक बिगार" अभियंते करण्यात आले हे सत्य आहे. पण अभियंता हा शिक्षणाने असा बनविण्यात आला आहे जो बर्याच ठिकाणच्या गाळलेल्या जागा भरु शकतो. त्यामुळे त्याने सर्वात कीमती जागा भरली तर त्यात नवल ते काय?
बाकी त्यांच्या भाषणातल्या बहुतेक गोष्टी ह्या स्वतःचा उदो उदो करण्यासाठी होत्या. त्यांनी कामही तसे जबरदस्त केले आहे म्हणा !
21 Jul 2015 - 12:46 am | मंदारपुरोहित
IT यायच्या आधी अभियंते असे कुठे रोज शोध लावत होते जे आता थांबले. IT मध्ये excelsheets भरतात आणि आधि logsheets भरत होते. माझ्या मते अभियंत्याचे मूळ काम आहे गोष्टी चालू ठेवणे. Production चालु ठेवणे. आणि ते काम सगळे अभियंते अजून हि चांगले करत आहेत. IT मध्ये किंवा Non -IT मध्ये.
जे काही थोडे संशोधक प्रवृत्तिचे जन्म घेतात, ते त्यांना आवडेल असे काम करतातच. IT मध्ये अगणित शोध Non -IT वाल्यानी लावले आहेत. आणि असेही IITआणि IIM करून थिल्लर कादंबऱ्या लिहिणारे आहेतच कि.
आज काल कुठल्याहि विषयावरून IT ला नावे ठेवायचे फॅड आहे. पुण्यात COEP पण होती आणि Bajaj पण होती, तरी पण स्कूटर २०-३० वर्षे तिरकी करूनच चालू करायला लागत होती
21 Jul 2015 - 1:02 am | सटक
१ नंबर!!
21 Jul 2015 - 1:22 am | चिरोटा
पुण्यात COEP होती,टेल्कोपण होती तरीपण बोरघाटात टाटाचे ट्रक अनेक वर्षे मंदगतीनेच चढायचे.
21 Jul 2015 - 2:23 pm | बबन ताम्बे
अहो पण COEP चे इंजिनीअर हवेत ना टेल्कोतील आर अॅन्ड डी त ! तिथे जास्त बाहेरचीच भरती होती.
26 Jul 2015 - 5:56 am | नगरीनिरंजन
बर्याच सीओईपी वाल्यांना तिसर्या वर्षीच जीआरई करुन "बाहेर" जायचे वेध लागतात. म्हणजे पूर्वीतरी लागायचे; आताचं माहित नाही. बाहेर जाऊनही फार काही शोध-बिध लावत नाहीत ही गोष्ट वेगळी.
राहता राहिला इन्फोसिस आणि विप्रोचा मुद्दा; त्यांनी पैसे कमवण्यासाठी कंपन्या काढल्यात. इंजिनिअर लोकांचा किंवा देशाचा फायदा करुन देण्यासाठी नाही. देशाच्या फायद्याच्या गोष्टी कॉर्पोरेट गुडविल-बिल्डिंग पुरत्याच असतात. प्रत्यक्षात शेअरहोल्डर्स हेच मायबाप.
21 Jul 2015 - 1:41 pm | बॅटमॅन
हा हा हा, एकच नंबर.
(पूर्वाश्रमीचा मेक्यानिकल विंजिनेर) बॅटमॅन.
21 Jul 2015 - 2:39 pm | टवाळ कार्टा
तु संस्कृतातून केलेस कै रे मेक्यॅनिकल
22 Jul 2015 - 9:23 pm | होबासराव
=))
23 Sep 2015 - 10:00 am | शित्रेउमेश
खिक्क..... संस्कृतातून मेक्यॅनिकल... भन्नाट कल्पना....
21 Jul 2015 - 12:50 am | चिरोटा
फायदा(पण आर्थिक!)
मूर्ती व त्यांच्या सहकार्यांनी 'पटनी कंपनी' सोडून इन्फोसिस स्थापन केली त्याचे एक कारण होते- भारतात खाजगी
कर्मचार्यांना मिळणारी वागणूक.१९८१साली कंपनी स्थापन झाल्यापासून ते १९९९ पर्यंत इन्फी,विप्रो ह्यां कंपन्यांत रुजू झालेल्या अनेकांचा आर्थिक फायदा झाला.एका काळात(९६-९९) अनेक अभियंत्यांकडे २०-२५ लाख रुपयांचे शेयर्स असायचे.तेव्हा ह्या दोन्ही कंपन्यांनी ईतर क्षेत्रांत काम करणार्या भारतीय कंपन्यांपेक्षा निश्चितच वेगळे धोरण राबवले
होते व त्यात ह्या कंपन्या यशस्वी झाल्या.
.
शक्यता आहे. पण ही 'हमाली' करण्यासाठी कोणीतरी ताशी २० ते ४० डॉलर्स द्यायला तयार आहे.! आय.टी.(सॉफ्टवेयर) नोकर्या ह्या बाहेरून एकसारख्या दिसत असल्या तरी त्यात बरीच विविधता आहे.इन्फोसिस वा विप्रो ह्या प्रामुख्याने सॉफ्ट्वेयर आउटसोर्सिंग कंपन्या म्हणून ओळखल्या जातात.कस्टमरची 'बिझिनेस प्रोसेस' समजून घे
णे,त्यासाठी लागणारे सॉफ्ट्वेयर बनवणे वा पॅकेज सॉफ्ट्वेयर कस्टमाईझ करणे ही कामे ह्या कंपन्या वा थोड्या फार फरकाने अनेक भारतीय सॉफ्ट्वेयर कंपन्या करीत आल्या व आहेत. ह्यात नेत्रदीपक वा भरीव असे करण्याला खूपच कमी वाव आहे. यशस्वीरित्या गॅरेज चालवणार्याने गाडीचे इंजिन बनवावे वा त्यात काहीतरी मोठी सुधारणा करावी अशी अपेक्षा केल्यासारखे. वरील मॉडेल अनेक वर्षे यशस्वी होत असल्याने ह्या कंपन्यानी संशोधनावर जेवढा
खर्च करायला ह्वा होता,विद्यापीठांशी संपर्क साधून अधिकाधिक संशोधन कसे होईल ते पहायला हवे होते.ईतर भारतीय कंपन्या संशोधनात हाथ आखडता घेतात तसा ह्या कंपन्यांनीही घेतला.
फक्त पैसा हेच धोरण असले तर सॉफ्ट्वेयरच काय कुठ्ल्याही क्षेत्रात नेत्रदीपक्/भरीव काम करण्याची शक्यता कमी असते.
या सगळ्याचा परिपाक म्हणून भारतातील अभियंत्यांकडून एक सुद्धा नेत्रदीपक, जग बदलून टाकणारे संशोधन झालेले नाही
ह्या दोन्ही कंपन्या व्यवसाय करण्याकरीता स्थापन झाल्या होत्या
21 Jul 2015 - 12:54 am | चिरोटा
या सगळ्याचा परिपाक म्हणून भारतातील अभियंत्यांकडून एक सुद्धा नेत्रदीपक, जग बदलून टाकणारे संशोधन झालेले नाही. ह्या दोन्ही कंपन्या व्यवसाय करण्याकरीता स्थापन झाल्या होत्या
21 Jul 2015 - 12:51 am | डॉ सुहास म्हात्रे
प्रत्येक व्यावसायीक... मग तो ईंजिनियर असो की डॉक्टर किंवा अन्य कोणी... नोबेल पारितोषिक मिळविण्यासाठी लागणारी पात्रता असलेला नसतो. काही सन्मानिय अपवाद वगळता इतर सर्व निम्न ते उच्च (पण नोबेल पारितोषिकाइतकी उच्च नसलेल्या) विविध स्तरांचे काम करण्यास लायक असतात. त्यांनी त्या त्या स्तरांचे काम करणे हे सुद्धा देश व एकंदरीत सर्व मानव समाजाला हवे असलेल्या अनेक प्रकारची कामे करण्यास आवश्यक असते. किंबहुना असे करण्यानेच या जगातील बहुसंख्य कुंटुंबाना अंगभर कपडे, डोक्यावरचे छप्पर, रोज दोनवेळचे जेवण आणि कधीमधी मजा करण्याइतके धन मिळते.
या जगात सर्वांनीच आईनस्टाईन किंवा गेला बाजार बिल गेट्स तरी असावे असे म्हणण्यात एक गमतीदार वैचारीक गडबड आहे !
बाकी, शतकी धागा काढण्याच्या प्रयत्न असेल तर पोपकोर्ण आणि पेय घेऊन मोक्याची खूर्ची पकडत आहे... रणधुमाळी पाहण्यात लै मज्जा अस्ते ;)
24 Jul 2015 - 11:31 pm | माहितगार
होय बरोबर पण दुसरी बाजू : सर्वांनी नसले तरी इतर देशात ज्या टक्केवारीने आईनस्टाईन किंवा गेला बाजार बिल गेट्स निपजतात त्या टक्केवारीने नसले तरी टक्केवारी आसपासही नाही अशी स्थिती असेल तर गडबड वैचारीक की शिष्टीमीक ?
होय बरोबर पण दुसरी बाजू : ज्या गोष्टीचे शिक्षण घेतले त्या पेक्षा वेगळे काम करणे आणि पोटेंशीयल पेक्षा कमी उत्पादकतेचे काम करणे इरिस्पेक्टीव्ह ऑफ मनी अर्न्ड, असमतोलाचे लक्षण नाही का ?
25 Jul 2015 - 3:53 am | डॉ सुहास म्हात्रे
या लेखात वैचारीक गडबड आहे हे मी का म्हणालो हे खालील वस्तूस्थिती समजाऊन घेतल्यास समजू शकेल...
१. कोणत्याही देशात नागरिकांना "संधी" आणि त्यातही "समान संधी" निर्माण करणे हे देशातील सरकारचे मूलभूत कर्तव्य असते... भारतिय सरकारचा गेल्या ६५ वर्षांचा इतिहास या बाबतीत अगदी उलटा आहे. समान संधी देण्या ऐवजी गटबाजी करून एखाद्या गटाला जास्त फायद्याचे अमिष दाखवून मते मिळवणे हे आपल्या लोकशाहीचे लक्षण बनले आहे.
२. याबाबतीत कोणत्याही खाजगी उद्योगाला / उद्योजकाला... विषेशतः ज्याने
(अ) अनेक सरकारी अडथळे पार करून देशाच्या तरुणांना आपले कमीत कमी आर्थिक स्थिती (जे बहुसंख्यांचे ध्येय असते) उत्तम करण्यास मदत केली आहे
(आ) त्याच्या क्षेत्रात देशाचे नाव जागतीक स्तरावर उल्लेखले जाईल इतपत मोठे केले आहे
(इ) स्वतःच्या आयुर्मर्यादेत भारतातील मोठा आणि जागतीक स्तरावर नोंद घेण्याजोगा उद्योग उभारला आहे
... दोष देणे कितपत योग्य आहे.
३. उद्योजकाचे काम आहे त्याच्या पसंतीचा उद्योग निर्माण करून गुंतवणूकदारांच्या साधनसंपत्तीची वाढ करणे. हे ध्येय साध्य करताना नोकर्या निर्माण होतात. संशोधनही केले जाते... पण त्याचा रोख हातातला उद्योगात (कोअर बिझनेसमध्ये) अधिकाधिक क्षमता (व्हॉल्युम) आणि कार्यक्षमता (इफिश्यन्सी) निर्माण करणे हाच असू शकतो
४. अश्या उद्योजकाला, सरकारच्या चुकांबद्दल जाब विचारण्याचा अथवा टीका करण्याचा, एक सामान्य नागरिक म्हणून हक्क आहेच; पण त्याच्या वर उल्लेखलेल्या कर्तृत्वामुळे त्याला हा हक्क सामान्य नागरिकापेक्षा अनेक पट्टींनी जास्त आहे.
अश्या उद्योजकांना तुम्ही का नाही सरकारचे कर्तव्य केलेत असे विचारणे फारसे हुशारीचे लक्षण नाही... ज्याला त्याला आपापल्या कर्तव्यासंबंधीच जाब विचारणे जास्त संयुक्तीक होईल, नाही का ? तरीसुद्धा, बर्याचदा माणसे असे न करता (अ) अंदाजपंचे कोणालाही, विषेशतः जो प्रतिकार करणार / करू शकणार नाही त्याला अथवा (आ) आपल्या वैचारीक विरोधकाला अथवा (इ) ज्याच्याबद्दल आपल्या मनात काही कारणाने आकस आहे त्याला झोडपताना दिसतात... हा स्वार्थी मानवी स्वभाव आहे... सारासार विवेक नाही :)
===============================
गोष्टीचे शिक्षण घेतले त्या पेक्षा वेगळे काम करणे आणि पोटेंशीयल पेक्षा कमी उत्पादकतेचे काम करणे इरिस्पेक्टीव्ह ऑफ मनी अर्न्ड, असमतोलाचे लक्षण नाही का ?
१. गोष्टीचे शिक्षण घेतले आहे किंवा दिले आहे तेच काम करण्याची सक्ती कम्युनिझम किंवा हुकुमशाहीत होते. इतर कोणत्याही व्यवस्थेत तसे करणे मानवी अधिकारांची पायमल्ली केल्यासारखे समजले जाते.
आपण स्विकारलेला एखादा पर्याय आपल्याला अपेक्षित यश अथवा मानसिक समाधान देत नाही असे ध्यानात आल्यावरही इतर योग्य पर्यायांचा अवलंब न करणे हे फारसे बुद्धीमत्तेचे लक्षण नाही. उलट आपली चूक घ्यानात आल्यावर योग्य ते बदल करणे हेच मानवी प्रगतीचे आद्य लक्षण आहे.
कोणीतरी म्हटले आहेच की हुशार माणसे त्यांच्या आयुष्यात तीनदा आयुष्यक्रम (करिअर) बदलतात. या संबंधात हा (50 Famous People Who Failed at Their First Attempt at Career Success) लेख बरेच काही सांगून जातो.
किंबहुना चुकीची दिशा बदलून आपल्या आवडीचा विषय निवडला तरच माणसातले पोटेंशियल उत्तम रितीने वस्तुस्थितीत येइल, नाही का?
२. पोटेंशीयल पेक्षा कमी उत्पादकतेचे काम करणे म्हणजे काय याची व्याख्या करणे कठीण आहे. कोणतीही पदवी माणसाचे पोटेंशीयल ठरविण्याचा मानदंड होऊ शकत नाही... अन्यथा केवळ पदवी अथवा पदवीचे गुण (मार्क्स) पाहूनच काम दिले गेले असते आणि एच आर नावाच्या खात्याची गरजच पडली नसती... अर्थात बरेच एच आर खूप दिवे लावतात असा दावा अजिबात नाही (बर्याचदा ते नेसेसरी इव्हीलचे काम करते :) ). मुद्दा एवढाच की पदवीच्या पलिकडे अनेक गोष्टी संभाव्य कर्मचार्यामध्ये बघावे याची कंपन्यांना गरज पडते, यामुळेच एच आर खात्याची गरज भासते.
सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की...
Potential of Productivity in real life = (knowledge*) X (Ability to put knowledge to use in order to produce "required" results) X (Aptitude) X (Attitude) X (Integrity)
(* : Which is not necessarily directly proportional to a degree, or marks/grades obtained while acquiring the degree.)
वरच्या समीकरणाच्या उजव्या बाजूची गृहीतके एकमेकाचा गुणाकार करतात, हा मुद्दा सर्वात कळीचा आहे !
===============================
असो. खर्या जीवनात माणसे...
१. एकतर त्यांना आवडणारे काम करण्यासाठी दुसर्यांची पर्वा न करता शिक्षण/कामाची दिशा बदलून, झगडून आपले सुख शोधतात... त्यात काही जण यशस्वी होतात काहीजण होत नाहीत.
२. इतर माणसे आपला निर्णय चुकला हे ध्यानात आले तरी शिक्षण/कामाची दिशा बदलण्याची धडाडी दाखवू शकत नाहीत आणि एकदा निवडलेल्या दिशेनच चालत राहतात... त्यात काहींना पुरेसे आर्थिक यश मिळते काहींना मिळतही नाही... पण दोघांनाही आपल्या आवडीची निवड चुकली ही रुखरुख लागते.
===============================
आणि विषेश म्हणजे...
ज्यांनी दुसर्यासाठी एकही कामाची संधी (जॉब) निर्माण केली नाही त्यांनी लाखो जॉब निर्माण करणार्यांना "तुम्ही काय केले ?" असे विचारणे हास्यास्पद असण्यापलिकडचे आहे !
25 Jul 2015 - 2:20 pm | दा विन्ची
प्रतिसाद आवडला .
21 Jul 2015 - 1:12 am | आयुर्हित
मूर्तिंच्या भाषणातिल "गेल्या ६० वर्षात" हा मूळ मुद्दाच् आपण ऐकलेला दिसत नाही.
21 Jul 2015 - 12:12 pm | बाळ सप्रे
खरच की??
कारण त्या पूर्वीच्या काळात अगदी पुराणकाळापासून सगळे काही शोध इथेच लागलेत हे लक्षातच नाही आलं !!
असचं म्हणायचं होतं ना? :-)
21 Jul 2015 - 1:17 am | वीणा३
माझ्या मते दीर्घकालीन फायदा. आत्ताच्या पिढीत कितीतरी लोक असे असतील कि ज्यांना काहीतरी वेगळा करायच असेल पण परिस्थितीमुळे जमलं नसेल.
कदाचित उद्या माझ्या मुलाने काहीतरी वेगळं करायचं म्हटलं तर त्याला किमान "आई बाबांना सांभाळायचा आहे, लहान भावंडांची काळजी घ्यायची आहे, त्याच्या शिक्षणाचा खर्च करायचा आहे" या काळज्या तरी नसतील.
आणि कदाचित आम्ही त्याचं ध्येय मिळवण्यात त्याची मदतही करू शकू. आत्ता ज्या लोकांची काहीतरी वेगळं करायची इच्छा होती त्यांचही फार वाईट झालं असं नाही म्हणता येणार. कारण आर्थिक स्वातंत्र्य सुबत्ता आली.
21 Jul 2015 - 1:40 am | दा विन्ची
गेल्या साठ वर्षात हे लिहायला विसरलो. एक डाव माफी करा .
शतकी धागा वगेरे काय डोस्क्यात नव्हत . काय तर मिपा वर लिवायचा फकस्त चौथा प्रयत्न आहे .
नया है यह
22 Jul 2015 - 6:16 pm | नितिन थत्ते
नै नै....
"६७ वर्षात" (की ६१?) असं लिहायला हवं होतं.
21 Jul 2015 - 2:17 am | अर्जुन
इन्फोसिस व विप्रो किंवा इतर भारतीय कंपन्या आपल्या नफ्याचा किती भाग संशोधनासाठी वापरतात?
मुलभुत संशोधनासाठी पाच ते दहा वर्ष लागु शकतात, तितके थांबण्याची किती कंपन्यांची तयारी आहे.
इन्फोसिस व विप्रो यांनी भारतीय संशोधकांवर विश्वास ठेऊन कीती संशोधन प्रकल्प चालू केलेत ?
मूर्ती यांनी भारताची अवकाश संशोधनातील प्रगती पाहीली नाही का? अलका झाडगावकरांसारखे अनेक संशोधक तूटपुंजा
साधनांचा मदतीने काम करत आहे. फक्त बघण्याची ईच्छा पाहिजे..........
21 Jul 2015 - 5:38 am | अर्धवटराव
पुष्कळ लोकांनी कुठल्याही क्षेत्रातली अभियांत्रीकी पदवी घेऊन त्यात विशेष काहि करण्यासारखं भारतात औद्योगीक + सरकारी वातावरण नव्हतं. अशा परिस्थितीत रात्रंदीवस प्रेशरमधे राहुन काम करायचं आणि त्याचा भरपूर मोबदला मिळवायचा अस स्पष्ट व्यवहारी जग इन्फी,विप्रो ने भारतीय अभियंत्यांना दाखवलं तर बिघडलं काय? हाती पैसा आल्यावरच कुठल्याही क्षेत्रात झोकुन देऊन काम करायची मानसीक गरज भारतीयांना जाणवली व आता लोक मनासारखं काम वगैरे शोधायला बघताहेत. हे मुर्ती, अझीम आणि तत्सम मंडळींकडुनच नकळत झालं आहे.
22 Sep 2015 - 1:55 pm | राजाभाउ
हे एकदम पटलं. आज ज्या आई बापांकडे पैसा आहे त्यांची मुले कदाचीत आपल्याला पाहीजे त्या क्षेत्रात काम करतील, स्वता:ला आजमाउन पाहतील त्यातुन काही भरीव संशोधन होइल, म्हणजे तशी शक्यता तरी तुलनेने जास्त आहे कारण त्याना लगेच पोटा पाण्याला लागयचा दट्ट्या नाही.
21 Jul 2015 - 9:02 am | जयंत कुलकर्णी
एक गोष्ट नारायनमुर्तिंना नाकारणे शक्य होणार नाही....कधीच... आय टी मुळे भारताचा एक प्रकारचा दबदबा जगात तयार ज़ाला...ज्याप्रमाणे इस्रोमुळे झाला...
21 Jul 2015 - 12:59 pm | तुडतुडी
मंदारपुरोहित >>>+111111111111
इन्फोसिस ने आर्थिक फायदा खूप करून दिला आहे . अर्थात गेल्या ६० वर्षांपासून ची भारताची आर्थिक परिस्थिती लक्षात घेतली तर संशोधना पेक्षा कुटुंबाची आर्थिक स्थिती उंचावण हा सगळ्याच भारतीय लोकांपुढचा मोठा प्रश्न होता . आणि नारायण मूर्तींनी फक्त IT त संशोधन झालं नाही असं कुठं म्हणलंय ? इन जनरल सगळ्यात क्षेत्रात झालं नाही .
आता परिस्थिती बदलली असली तरीही भारतात संशोधन नगण्यच आहे . त्याची मुख्य कारण म्हणजे शिक्षण मातृभाषेत नसल्यामुळे मुलांचे concept क्लिअर होत नाही .मूळ गाभा समजत नाही . त्यामुळे त्यांना एखाद्या विषयाची गोडी लागण्या ऐवजी फक्त रट्टे मारून परीक्षा पास होण्याकडे भर असतो .
चांगले मार्क मिळवून पुढे चांगले पैसे कमावण्यासाठी शिक्षण घ्यायचं असतं हेच त्यांच्या मनावर बिंबवलेलं असतं . त्यात मुळातच आळशीपणा . मग संशोधनाकडे अर्थातच दुर्लक्ष होतं
21 Jul 2015 - 2:36 pm | श्रीगुरुजी
लेख वाचून हसायला आहे.
काही प्रश्नान्ची उत्तरे देतो.
>>> मी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. गेली अकरा वर्षे या व्यवसायात आहे व त्या आधी १० वर्षे उद्योग क्षेत्रात होतो. माझ्या व त्या आधीच्या काळी अभियंते कोअर ( ज्या क्षेत्रातली पदवी, त्याच क्षेत्रातली) कंपनी मिळवण्यासाठी अतिशय उत्सुक असत.
त्याचे कारण असे की ज्या क्षेत्रात पदवी आहे त्याच क्षेत्रात जॉब मिळायचा. त्याच क्षेत्रातील कम्पनी मिळवायला अभियन्ते उत्सुक असत हे वाक्य चुकीचे वाटते. आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात जाण्याचा पर्यायच उद्योगक्षेत्रात नव्हता. त्यामुळे, ते उत्सुक होते म्हणून नव्हे तर इतर क्षेत्रान्चा पर्यायच उपलब्ध नव्हता म्हणूनच अभियन्ते आपल्याच क्षेत्रातील कम्पनीत जायचे.
>>> सध्या मात्र जवळपास सर्व अभियंते थोडा जास्त पैसा, मोठ्या शहरातील राहणीमान, परदेश गमनाची संधी या व अश्या अनेक कारणासाठी माहिती व तंत्रज्ञानं क्षेत्रातील नोकरीला सुवर्णसंधी समजून त्या क्षेत्रात नोकरी करत आहेत . बऱ्याच जणांनी घेतलेल्या शिक्षणाचा योग्य असा वापर या ठिकाणी होत नाही .
थोडा नव्हे तर अनेक पटीने जास्त पैसा आणि परदेश गमनाची सन्धी मिळत असताना माहिती/तन्त्रज्ञान क्षेत्रात मिळू शकणारी नोकरी ही सुवर्णसन्धीच आहे. घेतलेल्या शिक्षणाचा योग्य वापर झाला किन्वा नाही झाला, यापेक्षा नवीन क्षेत्रात नवीन ज्ञान मिळवून त्याचा योग्य वापर करता येतो व त्याच बरोबरीने पैसा, परदेश गमन इ. आर्थिक फायदेही मिळतात.
>>> बऱ्याच अनुभवी लोकांचे असे मत आहे कि भारतीय अभियंते हे सुशिक्षित हमालाचे / क्लार्कचे (पण चकचकित, वातानुकुलीत कार्यालयात ) काम करत आहेत . या सगळ्याचा परिपाक म्हणून भारतातील अभियंत्यांकडून एक सुद्धा नेत्रदीपक, जग बदलून टाकणारे संशोधन झालेले नाही .
जग बदलून टाकणारे सन्शोधन हे कोणत्याच क्षेत्रातील अभियन्त्याने केलेले नाही (काही अपवाद नक्कीच असतील). तुम्ही त्यान्ना सुशिक्षित हमाल/क्लार्क इ. काहीही म्हणा. चकचकीत आणि वातानुकुलीत कार्यालय मिळत असेल तर ते कोणाला नको आहे? सध्या शहरातील अनेक बॅन्कान्च्या शाखा चकचकीत आणि वातानुकुलीत आहेत. बॅन्कान्मध्ये अभियन्ते नसून सुद्धा त्यान्ना अशी कार्यालये मिळतात हे जीवनमान उन्चावत जात आहे याचे लक्षण आहे.
जर अभियन्त्यान्ना चकचकीत व वातानुकुलीत कार्यालय न देता अस्वच्छ, अरून्द, साधे पन्खे लावलेले कार्यालय दिले तर त्यान्च्याकडून नेत्रदीपक, जग बदलून टाकणारे सन्शोधन होणार आहे का?
>>> म्हणजे तुम्हीच IIT , NIIT व मोजक्याच प्रसिध्द महाविद्यालातून होतकरू, हुशार तरुण निवडून त्यांना लायकीपेक्षा कमी दर्जाचे काम, कदाचित अभियांत्रिकी / उत्पादन क्षेत्रातील कंपनी पेक्षा जास्त वेतन देवून देणार. आणि वरती भारतातील अभियंत्यांकडून एक सुद्धा नेत्रदीपक, जग बदलून टाकणारे संशोधन झालेले नाही असे जगाला ओरडून सांगणार .
माहिती तन्त्रज्ञान क्षेत्रातील काम हे अभियन्त्यान्च्या लायकीपेक्षा कमी दर्जाचे काम आहे हे कोणी ठरविले?
>>> इन्फोसिस व विप्रो (नारायण मूर्ती आणि अझीम प्रेमजी ) यांनी अभियंत्यांचे नुकसान केले कि फायदा ?
अर्थातच फायदा. इन्फोसिस, विप्रो आणि त्यान्च्यासारख्या पर्सिस्टन्ट, केपीआयटी इ. कम्पन्या निघाल्या नसत्या तर आज लाखो अभियन्ते कामाशिवाय राहिले असते. माहिती तन्त्रज्ञान क्षेत्रातील कम्पन्यान्नी किमान १० लाख नागरिकान्ना जॉब्ज दिलेले आहेत. याशिवाय किमान १५-२० लाख अप्रत्यक्ष जॉब्ज उपलब्ध झालेले आहेत. या कम्पन्या नसत्या तर या अभियन्त्यान्ना इतर क्षेत्रातील कम्पन्यान्नी सामावून घेतले असते का? आज आयटी कम्पन्या असूनसुद्धा अनेक अभियन्ते बेकार आहेत. मूर्ती, प्रेमजी इ. नी या कम्पन्या सुरू केल्या नसत्या तर कदाचित मूर्ती पटणीतच राहिले असते, कदाचित प्रेमजी फक्त तेल आणि साबणाचे उत्पादन करीत राहिले असते आणि असन्ख्य अभियन्ते बेकार राहिले असते. या कम्पन्या निघाल्या असत्या तरीसुद्धा भारतीयान्नी काहीतरी नेत्रदीपक, जगप्रसिद्ध असे शोध लावले असते असे म्हणणे धाडसाचे होईल.
आयटी कम्पन्यान्मुळे किमान १ टक्का भारतीयान्कडे आर्थिक सुबत्ता आली आहे. हा प्रचन्ड फायदा आहे आणि नुकसान शून्य आहे.
21 Jul 2015 - 2:52 pm | बबन ताम्बे
यात बिल्डरांची टक्केवारी कीती?
:-)
21 Jul 2015 - 3:04 pm | चिरोटा
आता धागा बहुतेक मूर्ती,आय.टी. अभियंते,बिल्डर्,महाग झालेले फ्लॅट्स्,भाजीपाला..ह्या दिशेने जाणार.
राजकारणी+बिल्डर्+आय.टी. कंपन्या अशी युती आहे असे एकदा ऐकले होते.
22 Jul 2015 - 6:20 pm | पाटीलअमित
पुण्यात रिक्षा ची पण भाडे वाढ झालीये :(
24 Jul 2015 - 10:33 pm | निनाद मुक्काम प...
ह्यात गुंता काय झाला बुआ
मूर्ती ह्यांनी जे प्रश्न विचारले ते ह्या विषयाला धरून होते म्हणून
तो प्रतिसाद मी येथे दिला
काही विद्वान मंडळीनी त्यावर तार्किक चर्चा करण्यापेक्षा
मूर्ती ह्यांना असे म्हणण्याचा काय अधिकार किंवा त्यांच्या कंपनीने काय केले असा राजकारणी पवित्रा घेतला
हे म्हणजे एक वर्षात काय केले काय विचारतात तुम्ही आधी ६० वर्षात काय केले ते सांगा असे म्हणणे झाले
काय केले व का नाहि केले हे राहिले बाजूला
आय आय टी उभारणी मागील इतिहास पहा रशिया अमेरिका जर्मनी आदि देशांनी ती उभारण्यास हातभार लावला , पण ह्या देशांच्या तोडीस तोड संशोधन आय आय टी करू शकली का
किती नोबेल पारितोषिक विजेते आय आय टी मध्ये घडले
स्वातंत्र्या नंतर विज्ञानात किती नोबेल आपण मिळवले
किती नोबेल पारितोषिक प्राध्यापक आय आय टी मध्ये शिकवतात
अनेक आय आय टी विद्यार्थी परदेशात जातात किंवा
अहमदाबाद मधील त त्या दर्जाच्या इतर संस्थाना मध्ये एम बी ए ला प्रवेश घेतात
आता हाच प्रवेश वाणिज्य शाखेत पदवी असली तरी घेता येतो मग आय आय टी मधील एक जागा कशाला वाया घालवली
त्यापेक्षा ज्याचा संशोधनाचा पिंड आहे अश्या लायक उमेदवाराला का बरे आय आय टी मध्ये संधी मिळू नये
लाखो मधून काही हजार निवडले जातात थोडक्यात प्रवेश हुकलेल्या किती तरी विद्यार्थ्यांना संशोधनात रस असेल तर अश्या लोकांनी काय करावे
इस्त्रो आय आय टी यान वर अवलंबून आहे का
नासा पेक्ष्या जास्त संशोधन त्यांनी नसेल केले व हाही मुद्दा ग्राह्य धरू कि कमी पैशात मंगळ मोहीम करण्यात अनेक इतर मुद्दे असू शकतील पण जगात पहिल्या प्रयत्नात मंगळ मोहीम फत्ते करणारी असा बिरुद फक्त तेच मिळवू शकले
इस्रो मधील वैज्ञानिक लोकांना आय आय टी यान पेक्ष्या जास्त पैसे मिळतात का
सध्या शशी थरूर ह्यांचे ब्रिटीश वसाहत वादांविषयी भाषण गाजत आहे त्यांचे असेच एक मुंबई मधील भारतीय शिक्षण व्यवस्थेवर सुंदर भाषण आहे
हे पहा
पूर्वी नोकर्या व संधी नाहि म्हणून परदेशात अनेक आय आय टी यन गेले आता भारतात भरपूर संधी आहेत
मात्र भरपूर पैश्यासाठी मार्केटिंग मध्ये शिरणारे आय आय टी यन पहिले की नेहरूंच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेल्याचे दिसून येते
25 Jul 2015 - 12:33 am | निनाद मुक्काम प...
तुम्ही त्यान्ना सुशिक्षित हमाल/क्लार्क इ. काहीही म्हणा. चकचकीत आणि वातानुकुलीत कार्यालय मिळत असेल तर ते कोणाला नको आहे? सध्या शहरातील अनेक बॅन्कान्च्या शाखा चकचकीत आणि वातानुकुलीत आहेत. बॅन्कान्मध्ये अभियन्ते नसून सुद्धा त्यान्ना अशी कार्यालये मिळतात हे जीवनमान उन्चावत जात आहे याचे लक्षण आहे.
हाच तर प्रमुख मुद्दा आहे
आय आय टी चे अभियंते व तर महाविद्यालयातील अभियंते ह्यांचे अंतिम ध्येय जर हेच असेल तर मग सरकार ने करदात्यांच्या पैशातून आय आय टी चा पांढरा हत्ती का पोसावा.
सी वि रामन ह्यांनी आय आय टी मध्ये शिक्षण न घेत नोबेल मिळवले. त्यांच्या नंतर देशातील विद्वत्तेला वाळवी लागली का
दरवेळी सरकारी अकार्यक्षमतेवर बोट दाखवून कसे चालेल.
युरोपात पूर्वी न्यूटन ते आर्किमिडीज ते एडिसन ह्यांना तत्कालीन सरकारने आर्थिक पाठिंबा दिला होता का
शोध लावण्यासाठी
25 Jul 2015 - 12:22 pm | अभिजित - १
फक्त IIT चा का ? VJTI , COEP , सरदार पटेल आणि इतर gov engg college . झाडून सगळे बंद करून टाकायाला पाहिजे ..
कारण सरकारला भारतीय जनतेच खरेच कल्याण करायचेय . पण वरील कोलेज वर पैसा फालतू खर्च होत आहे त्या मुळे सगळे घोडे अडलेय .
25 Jul 2015 - 3:23 pm | तिमा
चर्चा फक्त अभियंत्यांभोवतीच फिरत आहे. मूलभूत संशोधन करायला आधी मूलभूत सायन्सच्या शाखांकडे शिक्षण
घ्यायला पाहिजे. आज किती विद्यार्थी, पदार्थविज्ञान्,रसायनशास्त्र, जीवशास्त्र याच्या शाखांमधे जाण्याची उत्सुकता दाखवतात? ते जात नाहीत करण त्यांच्या मते त्याला 'स्कोप' नसतो. भारतात तरी, 'स्कोप' या शब्दाचा अर्थ, जास्त पैसा मिळवणे, हाच झाला आहे.
असे जर लाखोंच्या संख्येने, मूलभूत शिक्षण घेतले गेले तर त्यातील संशोधक (जरी अगदी मूठभर असले तरी) उजेडात येतील. सगळाच दोष सरकारला देता येणार नाही. ही 'कमीतकमी श्रमांत जास्तीतजास्त पैसा' ची भारतीयांची मनोवृत्ती बदलणार नाही, तोपर्यंत मोठे शोध या देशांत लागणे शक्यच नाही.
25 Jul 2015 - 5:12 pm | पैसा
तिमा म्हणतात तसे मूलभूत संशोधनाबाबत कमी बोलले गेले आहे. एका काळी ज्ञानकोषकार केतकर आणि इतिहासाचार्य राजवाडे यांसारखे लोक काही ध्येयाने पछाडून गरिबीसुद्धा स्वीकारून आयुष्य खर्च करत. आता ते करणे शक्य आहे का? तेव्हा पैसे सगळ्यांकडेच कमी असायचे. त्यामुळे अजून थोडी गरिबी म्हणजे या मंडळींना विशेष वाटत नव्हते. पण आता तशी बुद्धिमत्ता असताना गरीब रहाणे कोणालाही शक्य आहे का? आणि पुरेसे पैसे नसतील तर संशोधन तरी कोण आणि कसे करणार आहे? उमेदीचा काळ पैशांची तरतूद करण्यात निघून जातो. सरकारी मालकीच्या संस्थात संशोधन क्षेत्रात नोकर्या मिळवणे आणि तथाकथित संशोधन करणे याबद्दल काही न बोललेले बरे. अशा परिस्थितीत संशोधन कोणी आणि कसे करायचे?
25 Jul 2015 - 11:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
मूलभूत संशोधन आणि व्यापारी संशोधन या गोष्टी एकमेकापासून अतिभिन्न किंवा एकमेकाविरुद्ध आहेत असे समजले जाणार्या देशांत/समाजात मूलभूतच काय कसलेही संशोधन रुजायला नेहमीच कठीण जाते. याचे भारत उत्तम उदाहरण आहे.
काही काळापूर्वी एका गैरसरकारी संस्थेच्या (एन जी ओ) माध्यमातून १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम केला होता. त्यानिमित्ताने उद्योग क्षेत्रातल्या ५-६ मान्यवरांना आणि एका नामांकीत (खाजगी नसलेल्या) विद्यापिठातील १०-१२ विषयप्रमूखांना (एच ओ डी) एकत्र आणले होते. त्या प्रकल्पाची व्याप्ती केवळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे यापलिकडे नेऊन "उद्योग-विद्यापिठ संवाद साधून एकमेकाला पूरक संशोधन आणि प्रकल्प कसे करता येतील" याची चाचपणी करणे असा वाढवला होता. त्यावेळेस स्पष्ट झलेल्या काही गोष्टी थोडक्यात खालीलप्रमाणे होत्या:
१. उद्योगांचा दृष्टीकोन : आम्ही खर्च केलेल्या दर रुपयाचे मुल्यमापन केले जाते. त्यामुळे, आम्ही दिलेल्या देणग्यांचे १०% तरी पैसे उद्योगांच्या फायद्याचे संशोधन करून त्यामुळे उद्योगावर, दीर्घकालात का होईना, काही सकारात्मक परिणाम होईल, असे एक उद्दिष्ट्य उद्योग-विद्यापिठ करारांत असले पाहिजे. केवळ व्यावसायीक नियतकालिकांत (प्रोफेशनल जर्नल) निबंध प्रकाशित करणे हेच अंतिम उद्दिष्ट्य नसावे.
२. विद्यापिठाचा दृष्टीकोन : आम्ही केवळ मूलभूत संशोधन करतो. ते व्यावसायीक नियतकालिकांत (प्रोफेशनल जर्नल) प्रसिद्ध होऊ शकणे हाच त्याच्या प्रतिचा आणि यशाचा पुरेसा पुरावा आहे. यापलिकडे काही करणे आमच्या तत्वांत बसत नाही. आम्ही संशोधक आहोत, उद्योगांना पैसे कमावण्यापलिकडे काही कळत नाही. जिवनोपयोगी आणि व्यापारी संशोधन हे कमी प्रतिचे संशोधन असते !
३.भारतातल्या शिक्षणक्षेत्रात वरिष्ठ स्तरावर जाण्यासाठी केवळ प्रकाशित निबंधांची संख्या महत्वाची समजली जाते; ते कोणत्या नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले असावे याचे मानदंड कडक/स्पष्ट नसतात; आणि त्यातल्या संशोधनाचे पुढे काय झाले हे तर कधीच तपासले जात नाही !
काही महिने निष्फळ प्रयत्न करून आम्ही उद्योग-विद्यापिठ संवाद साधण्याचा प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवला !
--------
याउलट मूलभूत संशोधन, व्यापारी संशोधन आणि संशोधनाचे व्यापारीकरण (मॉनेटायझेशन) ही सगळी संशोधन या मूलतत्वाची भिन्न दिसणारी पण एकमेकोपयोगी रुपे आहेत हे ज्या देशांना समजले-उमजले आहे त्या देशांत सर्व प्रकारचे संशोधन बहरते. याचे अमेरिका उत्तम उदाहरण आहे.
अमेरिकेत...
१. उद्योगांच्या अनुदानाने व नावाने चाललेली विद्यापिठ अनुष्ठाने (चेअर्स) ही सामान्य गोष्ट आहे. अश्या आणि इतर प्रकल्पांतून जेवढे मूलभूत संशोधन केले जाते तेवढेच उद्योगांना उपयोगी ज्ञानवर्धन आणि संशोधन केले जाते.
२. उद्योगातल्या धुरीणाने सब्बॅटिकल घेऊन काही काळ विद्यापिठात शिकवणे किंवा उद्योगात कार्यरत असताना विद्यापिठांत शिकवणे जगावेगळी गोष्ट समजली जात नाही. त्याचप्रमाणे विद्यापिठातून बाहेर पडून उद्योग स्थापन करणे / उद्योगात काम करणे जगावेगळी गोष्ट समजली जात नाही.
३. मुख्य म्हणजे संशोधनाचे व्यापारीकरण आणि सर्वसामान्य जिवनात उपयोगी असणे ही आवश्यक आणि अभिमानाची गोष्ट समजली जाते. या एकाच महत्वाच्या मानसिकतेमुळे अमेरिका संशोधनांच्या बाबतीत सतत पुढे राहीली आहे. ही मानसिकता अधोरेखीत करणारी एक (दंत ?)कथा टॉमस अल्वा एडिसनच्या नावाने सांगितली जाते. असे म्हणतात की आयुष्याच्या सुरुवातीस त्याच्या आवडीची अनेक संशोधने लोकांना न आवडल्याने त्याने अशी शपथ घेतली की "यापुढे मी व्यापारीकरण न होऊ शकणारे संशोधन करणार नाही". या माणसाच्या नावावर एकट्या अमेरिकेत १,०९३ लोकोपयोगी (युटिलिटी) पेटंट्स होती. याशिवाय युके, फ्रान्स आणि जर्मनीत त्याची अनेक पेटंट्स होती.
--------
अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये होणार्या संशोधनामध्ये प्रचंड फरक असण्याची कारणे वरच्या वस्तुस्थितीच्या फरकामुळे आहेत.
26 Jul 2015 - 1:16 am | राघवेंद्र
खुपच सुंदर प्रतिसाद. फरक खुपच चांगल्या पद्धतीने मांडला आहे.
21 Sep 2015 - 10:53 pm | शेखरमोघे
आणखीही एक फरक
अमेरिकेत..., जिथे एडिसन म्हणू शकला की "यापुढे मी व्यापारीकरण न होऊ शकणारे संशोधन करणार नाही". आणि अमेरिकेत १,०९३ लोकोपयोगी (युटिलिटी) पेटंट्स तसेच युके, फ्रान्स आणि जर्मनीत अनेक पेटंट्स मिळऊ शकला तिथेच त्याच्यापेक्षाही वरचढ लोक अमेरिकेबाहेरून येऊन योग्य तो पाठिम्बा मिळवू शकले. एडिसन हा DC currents चा इतका जाज्वल्य पुरस्कर्ता होता की त्याला काही केल्या AC currents काही परिस्थितीत चान्गले असतील ही कल्पनाच सहन होत नव्हती. पूर्व युरोपातून अमेरिकेत आलेल्या निकोला टेस्लाने मान्डलेल्या AC currents बद्दलच्या कल्पनाना वेस्टिन्गहाउस इत्यादी जम बसलेल्या लोकानी साथ दिल्याने AC currents चा वापर नुसता सुरूच न होता कल्पनातीत वाढल्याने सगळ्या जगातच यन्त्रयुगातले एक नवे पर्व सुरू झाले. या सन्दर्भात मुद्दाम वाचावे असे दुवे
https://en.wikipedia.org/wiki/War_of_Currents
http://www.livescience.com/46739-tesla-vs-edison-comparison.html
भारतात... प्रस्थापित एडिसन सगळ्या नवोदित आशाळभूत टेस्लाना नेस्तनाबूत करू इच्छितात आणि शकतात.
नारायण मूर्ती आणि कम्पूने जेव्हा त्यान्चा उद्योग सुरू केला तेव्हा त्यात प्रस्थापित लोक फारसे कुणीच नसल्याने त्याना "प्रस्थापितान्चा विरोध कसा बोथट करावा" अशा non-productive गोष्टीत अडकून पडावे लागले नाही.
21 Sep 2015 - 11:15 pm | शेखरमोघे
क्षमस्व - DC currents च्या जागी Direct currents (DC) आणि AC currents च्या जागी Alternating currents (AC) वाचावे.