सेबीच्या एका आदेशाप्रमाणे, नोव्हेंबर २०१५ पासून इक्विटी फ्युचर काँट्रॅक्ट किमान ५ लाख रुपयांचे होणार आहेत. ह्या निर्देशाचा थेट परिणाम म्हणजे फ्युचरमध्ये ट्रेड करण्यासाठी किमान ७५००० रुपयांचे "मार्जिन" लागेल. ह्याचाच दुसरा अर्थ असाही आहे की "लॉट साइझ" वाढणार, पर्यायाने जर का तुम्ही फ्युचर घेतले असेल तर तुमचे "रिस्क एक्स्पोजर" वाढून "उभे" रहाण्याची कपॅसिटी कमी होइल.
सेबीच्या म्हणण्याप्रमाणे, ह्यामुळे लहान म्हणजे रिटेल गुंतवणूकदार "स्पेक्युलेश्न" पासून लांब राहील आणि त्याचे संरक्षण होईल. मला ह्या समजुतीत काही मूलभूत चुका दिसतात. माझ्या ह्या शंकांचे निरसन व्हावे म्हणून हा प्रपंच.
१. रिटेल इनव्हेस्टर पार्टिसिपेशन वाढले तर शेअर मार्केट जास्ती सक्षम होइल असे मला आणि सेबीलाही वाटत आलेले आहे! ;)
ह्या विचाराला अनुसरुन काही काळापूर्वी फ्युचरची लॉट साइझ कमी करण्यात आली. असे करूनही गेली काही वर्षे स्पेक्युलेटिव्ह मार्केट मधून रिटेल ट्रेडरची गच्छंती चालूच आहे, ह्याचे एक प्रमुख कारण म्हणजे "रिस्क अॅपेटाइट" जे व्यक्तीनुरुप आणि बर्याच वेळा संस्क्रुतीनुरुप बदलते असते. आपण मुळातच "सेफ गेम" प्रधान आहोत. रिटेल इन्व्हेस्टरचा विशेष पुळका आत्ताच येणे संशयास्पद वाटते, तेही आधीची दुरुस्ती त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी केली गेली असताना. इन्व्हेस्टर पार्टिसिपेशन हा वैयक्तिक प्रश्न असायला हवा, तुम्ही बाहेरच रहा असे ह्यांनी का सांगायचे?
२. इक्विटीला हा सापत्नभाव का? तुम्ही १ किलो चांदी ५००० रु मार्जिनवर ट्रेड करू शकता, क्रूडही १० बॅरल साधारण २००० रु मधे ट्रेडिंगला उपलब्ध आहे, करन्सीही साधारण त्याच रेंजमध्ये!
३. फिनान्शिअल अॅसेट्स चे महत्व आत्ता आत्ता लोकांच्या लक्षात येउन लोक त्याकडे वळू लागली आहेत. ह्याचा रिपल इफेक्ट म्हणूनही असेल कदाचित, पण इतर मार्केट्स जरा "अण्डरव्हॅल्यूड" झाली आहेत, सालाबादप्रमाणे, "जर, जमीन, जेवर" (जर =प्रत्यक्ष पैसा. हा बँकातून, FD's वगैरे माध्यामातून सुटा असतो) ह्या त्रयीपेक्षा वेगळे काही पर्याय लोक निवडू लागले आहेत, भाड्यानेच राहू आयुष्यभर असे म्हणणार्यांची संख्या वाढती आहे. सोने कालपेक्षा आज कमी किमतीचे असू शकते हेही नवे राहिलेले नाही. असे असताना रिटेल इन्व्हेस्टरला दूर ठेवण्याचे प्रयोजन उमगत नाही.
४. आताची शंका अतिशयोक्त असेल कदाचित, पण रिटेल इन्व्हेस्टर जर का मार्केट्मधून बाहेर राहिला तर मार्केटचा कंट्रोल आपसुकच FII's कडे जाईल अशी भिती वाटते HNI's म्हणजे एकगठ्ठा मोठी गुंतवणूक करणारा वर्गही फार काही करू शकणार नाही. आपण फक्त बघे म्हणून उभे राहू आणि FII's हवे तेव्हा मार्केट धुवून नेतील. फक्त म्युच्युअल फंडातच गुंतवणूक करु शकणाराही ह्यात सुरक्षित रहाणार नाही. जर का फ्युचर काँट्रॅक्ट्स आणखिन स्वस्त केली आणि १०% जनता जरी फ्युचर मार्केट्मध्ये आली तर FII's निष्प्रभ होतील.
५. सध्याचा अजून एक मुद्दा म्हणजे आपण एका मोठ्या real estate rate revision च्या बेतात आहोत. म्हणजे आज जरी जमीन, सदनिका, शेतजमीन इत्यादींचे भाव त्या मानाने स्थिर असले तरी त्यात प्रचंड उलथापालथ चालू आहे. त्या व्यवसायिकांच्या समोर असलेली रात्र उजाडताना सध्या तरी दिसत नाही, सगळाच डोलारा पडायच्या बेतात आहे. रिटेल इन्व्हेस्टरला शेअर मार्केट्मधून बेदखल केले की आपोआप रिअल इस्टेट मार्केट सुधारेल असा काहीसा डाव दिसतो.
६. अजून एक मुद्दा हा आहे की सध्या जो शेअर सब-ब्रोकर आहे (Bolt owner) त्याला डायरेक्ट ट्रेडिंगवर त्याचा डोलारा सांभाळता येइल असे वाटत नाही. त्यामुळे फ्युचर ट्रेडिंग बंद झाले तर गाशा गुंडाळणार असे सांगणारे काही माझे मित्रही आहेत. शेअर ट्रेडिंगला एका शेअर ला ३०/४० पैसे (both sides) असे ट्रेड पुरेसे होत नसल्यामुळे दुकान बंद करून घरी बसावे लागणार असे त्यांचे म्हणणे आहे. allied products म्हणजे म्युच्युअल फंड विकायचे तर, म्युच्युअल फंडवाले अत्यंत चिल्लर कमिशन देतात अशी त्यांची रड आहे.
काय होते हे एक छोटा हिशोब सांगितल्याने थोडे अधिक स्पष्ट होइल. जर का एका म्युच्युअल फंड विकणार्या माणसाला एक १००० प्रतीमाहची मासिक इन्व्हेस्ट्मेंट प्लॅन मधील (SIP) गुंतवणूक मिळाली तर त्याला साधारणपणे ४८ रु वर्षाचे मिळतात!!!
थोडक्यात काय तर ते पोटभरीचे खाणे नाही. म्हणजे म्युच्युअल फंड विकताना अक्टिव्ह मार्केटिंग फक्त फोनवरून फार तर फार होते. अन्यथा walk-in गिर्हाईकीच फक्त.
त्यात बँका व म्युच्युअल फंडातल्या वित्तसंस्था ह्या त्याच्या सरळ समोर जास्ती ताकदीनी आणि जास्त जाळे, गुडविल घेऊन धंदा करायला उभ्या आहेत. त्यामुळेच जर रिटेल फ्युचर ट्रेडिंग बंद झाले तर छोट्या सब-ब्रोकर कडे दुकान बंद व्यतिरिक्त पर्याय उरणार नाही
७. "डब्बा" पद्धत, जी अवैध आहे आणि बहुतांशी माफियाच्या साथीशिवाय चालू शकत नाही, तिचे फार हिरिरीने पुनरुज्जीवन होईल अशी सार्थ भिती माझ्या ट्रेडर मित्रांना आहे. सध्याही ती चालू आहेच पण काळा पैसा असलेल्यांच्यासाठीच, मुख्यत्वेकरून.
मला असे वाटते आहे की आपण म्हणजे Retail Investor ने SEBI ला हे सांगायला पाहिजे की काँट्रॅक्ट् साईझ वाढवणे साधक नसून बाधक आहे.
प्रतिक्रिया
20 Jul 2015 - 3:11 am | एस
माहितीपूर्ण लेख.
20 Jul 2015 - 5:31 am | श्रीरंग_जोशी
यावर इतर जाणकार मिपाकरांचे प्रतिसाद काय येतात याचे औत्सुक्य आहे.
20 Jul 2015 - 5:47 am | नगरीनिरंजन
माहितीपूर्ण लेख; पण माझा बेसिक प्रश्न.
फ्युचर्स वापरुन हायली लिव्हरेज्ड ट्रेडिंग करणार्या व्यक्तीला गुंतवणुकदार का म्हणायचं?
20 Jul 2015 - 11:52 am | सटक
गुंतवणूकदार ही व्याख्या सध्या अत्यंत गुंतागुंतीची आहे. financial world खरचचं जवळ आले आहे त्यामुळे ह्या व्याख्येची कक्षा रुंदावत जाणार हे सहाजिकच आहे. leveraged trading करणे ही एक सोय म्हणून उपलब्ध केली गेली आणि ती तशीच वपरली जाणे अभिप्रेत आहे. पण तसे कुठेही होताना दिसत नाही. त्यामुळे फक्त रिटेल इन्व्हेस्टरकडून तशी अपेक्षा करणे चूक आहे.
दुसरे असे की जेव्हा leveraged trading होते तेव्हाही उद्देश सारखाच असतो, एका कंपनीच्या सक्षमतेचा किंवा earning potential चा फायदा घेण्याचा प्रयत्न करणे. कमी सुरुवातीची गुंतवणूक करून.
माझे बरेच मित्र L&T, Asian Paints ह्या कंपन्यांची फ्युचर घेउन मिळालेल्या फायद्यातून त्याच कंपन्यांचे शेअर्स घेतात. कारण त्यांची Entry Barrier मोठी आहे. ( L&T, CMP 1862.9 and Asian Paints CMP 829) ही फक्त वानगीदाखल आहेत.
रिटेल इन्व्हेस्टर जेव्हा फ्युचर ट्रेडिंग करतो तेव्हा तो इन्व्हेस्टरच असतो, ट्रेड्रर नाही, असे मला वाटते.
20 Jul 2015 - 12:35 pm | पगला गजोधर
नै माझी काय शंका आहे सर, की जो माणूस, मार्जिन साइज वाढला म्हणून गुंतवणुकीस का-कुं ? करत असेल, तर तो खरंच रिअल इस्टेट मार्केटकडे वळेल ?
20 Jul 2015 - 12:59 pm | सटक
ते थोडे अतिशयोक्त असू शकेल असे मीही म्हटलेच आहे. पण, ७५००० एकदम शेअर्समध्ये टाकण्याऐवजी, २५००० चा हफ्ता परवडेल असा विचार करणारे माझ्या महितीत आहेत.
हे ७५००० ही एकदा टाकून झाले असे नाही. जसे तुमचे फ्युचर (म्हणजे तुम्ही विकत घेतलेल्या शेअरचे फ्युचर कॉण्ट्रॅक्ट) "हलेल" तसे मार्जिनही हलणार आहे. ह्या अर्थानी ती महिना काहितरी (७५००० नव्हे) इन्व्हेस्ट्मेंट आहेच.
ह्या अर्थानी म्हणत होतो! पुन्हा असे आहे की जर का मार्जिन कमी असेल तर हेजिंग करता येईल. :)
20 Jul 2015 - 1:25 pm | प्रसाद१९७१
२५००० चा हप्ता दर महीन्याला भरायचा असतो.
७५००० चे मार्जीन स्टॉक च्या किमती नुसार कमी जास्त होइल पण जो पर्यंत एकच लॉट आहे तो पर्यंत अवाक्यातच राहील.
ब्रोकर कायमच रडत असतात. पूर्वी २ टक्के मारायचे तेंव्हा पण परवडत नाही म्हणुन रडायचे, त्यांचे काही ऐकू नका.
तसे ही छोटा गुंतवणुक्दार ऑनलाइन ब्रोकर कडुनच टेर्डींग करतो.
21 Jul 2015 - 12:16 am | सटक
हे मत इंट्रेस्टींग आहे!! ब्रोकर कायमच रडत असतात हे सत्यच आहे! :-)
20 Jul 2015 - 6:32 am | dadadarekar
गुंतवणुकदार नसतात. ते ट्रेडर असतात.
एखाद्या शेअरची किंमत वाढत जाऊन दुप्पट झाली . तरीही मार्जिन वाधतेच की. ( अर्थात काही वर्षानी लॉट अॅडजस्ट करतात व मार्जिन पुन्हा कमी होते. )
ज्या त्या व्यवसायातेल रिस्क ज्याने त्यानेच घ्यायची असते. मार्जिन वाढू शकते हे कन्सीडर करुन आधीच काही रक्कम बाजुला ठेवली पाहिजे
20 Jul 2015 - 10:05 am | प्रसाद१९७१
ऑप्शन चे ब्रोकरेज एका लॉट ला क्ष रुपये असे थेट अवलंबुन असल्यामुळे लॉट साईझ वाढला तर लॉट चा नंबर कमी होऊन ब्रोकरेज वाचेलच. गुंतवणुकदारांचा फायदाच आहे कारण फक्त एक लॉट घेणारे ट्रेडर फारच कमी असतात.
20 Jul 2015 - 12:18 pm | सटक
धन्यवाद प्रसाद! पण लॉट साइझ रिवाइझ झाला तर ब्रोकरेजही रिवाइझ होइलच. लॉट्च्या संख्येवर ब्रोकरेज तसे अवलंबून नाही.
20 Jul 2015 - 1:21 pm | प्रसाद१९७१
माझ्या ICICIDIRECT ला प्रत्येक लॉट वर ऑप्शन साठी ठरावीक बोकरेज असते. लॉट साईझ बदलला म्हणुन ते ब्रोकरेज कमी किंवा जास्त करत नाहीत. आता निफ्टीचा लॉट साइझ जर २५ वरुन ५० होणार असेल तर माझे निम्मे ब्रोकरेज वाचेल.
20 Jul 2015 - 1:40 pm | प्रसाद भागवत
सहमत प्रसाद राव, पण थांबा, यावेळी ते हीच पॉलिसी ठेवतीलच असे नाही.
20 Jul 2015 - 10:45 am | प्रसाद भागवत
Retail Investor म्हणजे ७५००० रु.ची मार्जिन गुंतवणुक न परवडणारा असेच काही नाही. किंबहुना IPO सारख्या अन्य ठिकाणीही त्यासाथी १,००,००० वा अधिक रक्कमेचीच गुंतवणुक गृहित असते. जर पुर्ण अभ्यासाअंती एखादा व्यवहार करणे व्यवहार्य आहे असे वाटत असेल तर मग त्यापोटी ५० ऐवही ७५ हजार गुंतवायला 'परवडत नाही' असे गुंतवणुक्दार फार असतील असे वाटत नाही. पेट्रोल वा अशाच (जीवनावश्यक नसलेल्या) सिगारेटस, गॅजेटस, नेट पॅक्स अशा अन्य गोष्टींचे भाव वाढले म्हणुन त्यांचा खप कमी झाला असे मला तरी आढळ्लेले नाही. येथे तर फक्त मारजिन वाढवले आहे.
कसलीही माहिती न घेता केवळ ५/२५००० अहेत म्हणुन उठसुठ ट्रेडिंग करणार्यांना पायबंद ही बसायलाच हवा होता.
तरीही आपण म्हणता त्याप्रमाणे काही लोकांना अडचणीचे होईलही, मात्र 'रिटेल फ्युचर ट्रेडिंग बंद झाले तर छोट्या सब-ब्रोकर कडे दुकान बंद व्यतिरिक्त पर्याय उरणार नाही.. वा 'रिटेल इन्व्हेस्टरला शेअर मार्केट्मधून बेदखल केले की आपोआप रिअल इस्टेट मार्केट सुधारेल असा काहीसा डाव दिसतो.' वगैरे भीती अवाजवी आहे.
मी अशा इक्विटी फ्युचर काँट्रॅक्टची किमान रक्कम वाढविल्याने बाजाराचे वा सर्वसामान्यांचे भलेच होईल या मताचा आहे.
20 Jul 2015 - 11:59 am | dadadarekar
.
20 Jul 2015 - 12:29 pm | सटक
येव्हढ्या detailed प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
१००% सहमत, पण असे असल्यामुळे entry barrier वाढवण्याचे समर्थन होत नाही.
हे थोडेसे खटकले. फ्युचर ट्रेडिंग हा 0 sum game आहे. कुणीतरी हरेल आणि कुणीतरी जिंकेल, It's only rotation of wealth! उठसुठ ट्रेडिंग करणारेच पुढे serious traders बनतात असे माझे निरिक्षण आहे. पूर्ण अभ्यासानिशी १००% ट्रेडिंगमधे उतरलेले कमीच असतात. माझ्यामते ट्रेडर्सचे प्रमुख प्रकार आहेत, हौशी, अतिरिक्त पैसा असलेले, म्युच्युअल फंडातून प्रॉफिट झाल्यामुळे ह्यात खरेच पैसा कमावण्याची संधी आहे बर का, असे जाणवलेले आणि अभ्यासू.
बाकी अभ्यास चालू आहेच!
21 Jul 2015 - 4:00 pm | ऋतुराज चित्रे
सब ब्रोकर्सची काळजी नसावी. कमी पैशात जास्त नफा कमावण्याचे साधन म्हणुन फ्युजर ट्रेडींगकडे बघितले जाते.फ्युजर ट्रेडींगमध्ये आतापर्यंत बर्याच रिटेल इनव्हेस्टरनी हात पोळुन घेतले आहेत. जुने जातात नवीन येतात, सब ब्रोकर्सची दुकाने चालूच राहतात. वारन बफेने ह्यास “financial weapons of mass destruction” असे म्हटले आहे.
22 Jul 2015 - 4:48 pm | सुधीर
सेबीच्या निर्णयापाठी कसला तरी डाव आहे अशी शक्यता मला पण वाटत नाही. उलट फ्युचर्स मधल्या स्पेक्युलेटीव्ह ट्रेडींगवर पैसे गमावलेले बरेच जण पाहिले आहेत. "फक्त दिवसातून १० मिनिटे देऊन. शेअर बाजारातून हमखास नफा कमवण्याचे तंत्र शिका" छापाच्या जाहिरातींचा मागे पूर असायचा. ते जाहिरातदार सब-ब्रोकर असावेत अशीच शंका वाटत राहते. ट्रेडींग मधून चर्निंग करून ब्रोकरेज उत्पनातून स्वत:चा फायदा झाल्याशी मतलब.
मला स्वत:ला फ्युचर्स पेक्षा ऑपशन्स हा प्रकार बरा वाटतो (हेजिंगसाठी पण आणि स्पेक्युलेटीव्ह बेट साठी पण). काही महिन्यांपूर्वी इंडेक्स ऑप्शन्सची लॉट साईज ५० वरून २५ केली तेव्हा १-२ लाखाच्या आसपास असलेल्या पोर्टफोलिओची रिस्क हेज करणं अफोर्डेबल होऊ लागलं. कारण इन द मनी इंडेक्स ऑप्शन्स पण (एक्सपायरीच्या १५-२० दिवस आधी) साधारण ३-५ हजारापर्यंत उपलब्ध व्हायला लागला. १-२ लाखाच्या पोर्टफोलिओसाठी (अगदीच "स्पेकुलेटीव्ह बेट" असली तरी) ती मॅक्स २-३% डाउनवर्ड रिस्क. ऑप्शनची लॉट साईज पुन्हा वाढवली (५० केली) तर मात्र १-२ लाखा खालच्या पोर्टफोलीओची रिस्क हेज करताना ऑप्शनचं एकंदर प्रमाण (%) पूर्ण पोर्टफोलिओच्या मानाने वाढेल. ५ लाखाच्या वरच्या पोर्टफोलिओंना फारसा फरक पडणार नाही.