१९४७ मध्ये फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन देश अस्तित्वात आले. पाकिस्तान हा भौगोलिक दृष्ट्या चमत्कारिक देश होता. पश्चिम व पूर्व पाकिस्तान एकमेकांपासून फारच दूर होते. पश्चिम पाकिस्तानचा भौगोलिक आकार मोठा होता तर पूर्व पाकिस्तानची लोकसंख्या पश्चिम पाकिस्तानपेक्षा जास्त होती. एवढेच नव्हे तर पाकिस्तानचा ह्या दोन्ही भागांमध्ये फार मोठी सांस्कृतिक भिन्नता होती. जरी पश्चिम पाकिस्तानात ४ वेगवेगळ्या भाषा बोलणारे प्रांत होते तरी त्यांनी त्या सर्व भाषा सोडून उर्दू ही उत्तर भारतीय भाषा राष्ट्रभाषा म्हणून निवडली.
पाकिस्तान च्या तत्कालीन राजकीय नेत्यांनी संपूर्ण देशात उर्दू भाषेची सक्ती केली. माझ्या मते बांगलादेश निर्मितीची चळवळ सुरु होण्याची ही नांदी होती. पश्चिम पाकिस्तानातील श्रीमंत पंजाबी राजकारण्यांना पूर्व पाकिस्तानीतील रंगाने काळे आणि बंगाली बोलणारे लोक आवडत नसत. बंगाली बोलणारी लोकसंख्या जास्त असूनही त्यांना देशाच्या राजकारणात आणि निर्णय प्रक्रियेत अजिबात किंमत नव्हती.
याच सगळ्याची निष्पत्ती म्हणून बांगलादेश मुक्तीची चळवळ सुरु झाली. पाकिस्तानी सैन्याने केलेले पूर्व पाकिस्तानातील हत्याकांड आणि भारतात निर्माण झालेला बंगाली निर्वासितांचा प्रश्न यामुळे भारताने सैनिकी कारवाई करून डिसेंबर १९७१ मध्ये बांगलादेश स्वतंत्र केला.
पण आज २०१५ मध्ये १९७१ ची पुनरावृत्ती होण्यासारखी परिस्तिथी निर्माण झाली आहे.
१९४७ मध्ये बलुचिस्तान ने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा बलुचिस्तान पाकिस्तानने १९४८ मध्ये जबरदस्तीने विलीन करून घेतला. तत्कालीन पाकिस्तानी सरकारने बलुचिस्तानला स्वायत्तता देण्याचे खोटे आश्वासन दिले आणि ते कधीच पाळले नाही.
बलुचिस्तानमधील नैसर्गिक साधन संपत्ती वापरून पाकिस्तानातील पंजाब प्रांत श्रीमंत झाला आणि बिचाऱ्या बलुच लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. बलुचिस्तानातील लोकांच्या जेव्हा पाकिस्तानचा हा अन्याय लक्षात आला तसे त्यांनी याबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. या अन्यायाविरुद्ध आंदोलने करण्यास सुरुवात केली.
पाकिस्तानी पंजाबी राजकारणी आणि पंजाब्यांनी भरलेल्या पाकिस्तानी सैन्याला हे अजिबात आवडले नाही. त्यांनी बलुचिस्तानातील ही चळवळ मोडून काढण्यास सुरुवात केली. बलुचिस्तानातील अतिशय वयस्कर आणि मोठे नेते असलेल्या नवाब अकबर शाहबाझ खान बुग्ती यांची त्यांच्या ८० व्या वर्षी निर्घृण हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षात पाकिस्तान आणि पाकिस्तानी सैन्याविरुद्ध बोलणाऱ्या अनेक बलुच लोकांना असेच पद्धतशीरपणे मारण्यात येत आहे.
पाकिस्तानी सैन्य बलुचिस्तानातील कित्येक तरुण मुलांना पकडून घेऊन जातात आणि काही दिवसांनी त्याची प्रेते गावाबाहेर सापडतात. त्या प्रेतांवर शारीरिक छळाच्या खुणा असतात.
एकीकडे बलुच लोक गरिबीत राहत आहेत. पाकिस्तानी सरकार आणि सैन्य त्यांच्यावर अत्याचार करत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या नैसर्गिक साधन संपत्तीची लूट चालू आहे.
चीनची बलुचिस्तानातील नैसर्गिक साधन संपत्तीवर नजर पडली आहे आणि त्यांनी ते मिळवण्याकरता पाकिस्तानशी अब्जावधी डॉलरचे करार केले आहेत. थोडक्यात पाकिस्ताने बलुचिस्तान चीनला विकायला काढला आहे.
आज बलुचिस्तानातील लोकांना मदत करणारे कोणीच नाही. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल कोणीच बोलत नाही. अमेरिका आणि युरोपमधील देशांना बलुचिस्तानमध्ये काहीही रस नाही. मानवाधीकारांबद्दल बोलणाऱ्या आणि काम करणाऱ्या कोणालाच बलुचिस्तानमध्ये जे चाललाय ते दिसत नाहीये.
प्रश्न हा आहे की हे सर्व चालू असताना भारताने काय करावे?
बलुच लोकांची लूट आणि हत्याकांडे याकडे दुर्लक्ष करावे, त्यांच्या मानवाधीकारांचे होणारे उल्लंघन पाहत राहावे की त्यांना त्यांच्या संघर्षामध्ये मदत करावी? आजपर्यंत भारताने सरकारी पातळीवर उघडपणे बलुचिस्तान बद्दल बोलणे टाळले आहे. पण जेव्हा पाकिस्तान उघडपणे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना मदत करतो आणि त्यांचे सरकार आणि सैन्य हे जाहीरपणे मान्य करतात, भारताने बलुचिस्तानला उघडपणे मदत का करू नये?
प्रतिक्रिया
19 Jul 2015 - 10:51 pm | मंदार कात्रे
हा strategic policy शी संबंधित विषय आहे . वर्तमान भारतीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे अतिशय मुत्सद्दी नेते असल्याने या विषयावर योग्य ती भूमिका घेतली जाईल ही अपेक्षा !
19 Jul 2015 - 10:55 pm | विद्यार्थी
https://www.youtube.com/watch?v=R4aTxF3xjWA
19 Jul 2015 - 11:18 pm | विनोद१८
आपल्याला पडलेला प्रश्न योग्य आहे, त्याबद्दलची भारताची भुमिका ही तर सर्वश्रुत आहे. त्याबद्दल इथे अगदी तपशीलवार व उघडउघड होउ नये असेच मी म्हणेन, असले काही संवेदनशील विषय इथे खोलात जाऊन न हाताळलेलेच बरे.
आपला देश ह्या प्रश्नाबाबत सजग व जागरुक असुन हा प्रश्न योग्य रितीने हाताळत आहे व जे करायला पाहिजे तेच करत आहे असे आजवरच्या या विषयावरील देशी व विदेशी दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवरील चर्चा व वर्तमानपत्रातील लेख याजवरुन समजून येते. एव्हढेच आजवर समजुन येते.
19 Jul 2015 - 11:36 pm | काळा पहाड
अ) पाकिस्तानच्या राहिलेल्या भागाचं ३ वेगवेगळ्या देशात विभाजन करण्यासाठी भारतानं प्रयत्न केले पाहिजेत
.
१. वर सांगितल्याप्रमाणं बलुचिस्तान
२. सिंध (ज्यांच्या सर्व संसाधनांवर पंजाब्यांनी कब्जा केला आहे)
३. पंजाब
ब) वजिरिस्तान (हा एन डब्ल्यू एफ पी च्या डावीकडचा विभाग)+ एन डब्ल्यू एफ पी हे विभाग औष्णिक परमाणु विलय उपकरणे वापरून निर्मनुष्य करावे लागतील. कारण इथे रहाणारी मनुष्यजात मानवी विकासाच्या दृष्टीनं फारशी उपयोगी नाही.
क) पख्तुन्ख्वा विभाग अफगाणिस्तानला ऑफिशियली देवून टाकावा.
ड) गिल्गिट, बाल्टीस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर वर पुन्हा भारतीय नियंत्रण प्रस्थापित करावं.
इ) स्वतंत्र सिंध आणि बलुचिस्तान बरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करावेत तर पंजाब च्या आर्थिक नाड्या आवळून त्यांना जखडून ठेवावं.
20 Jul 2015 - 12:36 pm | टवाळ कार्टा
असे करण्याची हिंमत कोणत्या राजकारण्याच्या पार्श्वभागात असेल असे वाटत नाही...असलीच तर ती आधी आप्ल्या देशातल्या गोष्टी साफ करायला वापरली तर जास्त चांगले...पाकडे स्वतःच आपापसात मारामारी करून कमी होतीलच...आपण का त्यासाठी आपली शक्ती घालवावी
20 Jul 2015 - 1:17 pm | काळा पहाड
एव्हरीथिंग इन गुड टाईम सर. इंदिरा गांधींनी असंच काहीसं करून दाखवलंच ना. बाकी ही विशलिस्ट आहे. "न्युक्लीयर" पाकिस्तान मुळे गोष्टी बदलू शकतात.
पण,
जर एखादं न्युक्लीयर वेपन अतिरेक्यांच्या हाती लागलं किंवा/आणि त्यांनी ते कुठेही फोडलं तर गोष्टी पुन्हा बदलतील. अमेरिका मग नाईलाजाने पाकिस्तान मध्ये घुसेल आणि सगळ्या अण्वस्त्रांवर एक तर कब्जा करेल किंवा ती नष्ट करेल. आणि मग भारताला फक्त पुढच्या अतिरेकी हल्ल्याची वाट पहावी लागेल.
20 Jul 2015 - 1:23 pm | टवाळ कार्टा
माझा मुद्दा इतकाच आहे की पाहुण्याच्या काठीने साप मारावा...आपण आपली शक्ती का खर्च करावी
20 Jul 2015 - 1:48 pm | खटपट्या
21 Aug 2016 - 2:29 am | आबा
=)) =))
एक एक तज्ञ आहेत राव !
19 Jul 2015 - 11:45 pm | राही
बलुचिस्तानकडे भारताचे फार पूर्वीपासून लक्ष्य आहे. अगदी खालिस्तानप्रश्नात पाकिस्तान आणि अमेरिकेने नाक खुपसण्याआधीपासून.
वेल, बांग्ला देश युद्धाचे अन् संग आणि अन् नोन हीरो बनण्याची संधी आर.एन. काव यांना मिळाली. (आणि त्यांनी तिचे सोने केले.) अजित डोवल यांना तशी संधी मिळण्याची वेळ अजून आली नाहीय असे वाटते.
20 Jul 2015 - 12:00 am | राही
मला म्हणायचे आहे की टाइम इज़ नॉट यट राइप.
20 Jul 2015 - 12:25 am | एस
लॅण्ड ऑक्युपेशन थिअरीवर भारतीय मुत्सद्द्यांनी अगदी १९७१ च्या आधीपासून काम केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानचे वर म्हटलंय तसे तुकडे करण्याचाही प्लॅन किंवा ब्लूप्रिंट केव्हापासूनच तयार आहे. ह्यात एक अडचण जशी पाकिस्तान अण्वस्त्रधारी असल्याची आहे त्याहीपेक्षा ह्या विभागात आणखी छोटी-छोटी राज्ये निर्माण होणे ही अंतिमतः भारतासाठी डोकेदुखीच ठरेल अशीही एक थिअरी आहे.
बलुचिस्तान आणि सिंधमधील अस्वस्थता भारताने केव्हाच हेरलेली आहे आणि त्यावर योग्य दिशेने सर्वच सरकारांनी पावले उचललेली आहेत. राही म्हणताहेत तसे इट्स नॉट द राइट टाइम येट.
20 Aug 2016 - 11:51 pm | वाल्मिक
अजून एक धोका म्हणजे अतिरेकी संस्था यांच्या हातात अण्वस्त्रे आली तर अक्खे जग धोक्यात