एअरटेल ४जी

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
14 Jul 2015 - 6:02 pm
गाभा: 

मुंबईत एअरटेल ४जी चे ट्रायल नेटवर्क चालू झाले आहे. सध्या मुंबईत राहणारे कोणी वापरताहेत काय ? इतर शहरात कोणी वापरत असाल तर तुमचे अनुभव कळवा. मी सध्या एअरटेलचे ३जी नेटवर्क वापरत आहे आणि ४जी अपग्रेड करायच्या विचारात आहे.

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

14 Jul 2015 - 7:01 pm | संदीप डांगे

थांबा थोडं. नाशिकमधे एअरटेल फोरजी आहे. माझ्याकडे डेमो दाखवायला आला होता. पार १०० एमबी पर्यंत स्पीड दाखवला त्याने. मग त्याला म्हटले किती सबस्क्रायबर झालेत मागच्या १ वर्षात तर म्हणे ४०-५०. मी म्हटलं तुमची सर्विस एवढी चांगली आहे तर एवढे कमी ग्राहक का? उत्तर नव्हते त्याच्याकडे. जालावर सर्च केल्यावर कळले की डेमो मधे ८०-१०० एमबी स्पीड असतो. विकत घेतल्यावर जास्तीत जास्त ५-१० एमबी मिळतो. तीन महिन्याचे ३ ते ५ हजार भरायला लागतात. लोक वैतागलेत. रीलायन्स जीओची वाट बघतोय.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! मी एअरटेलचे प्रीपेड डाँगल वापरतो. महिना जास्तीत जास्त २५० रु. खर्च.
मोबाईलवर वोडाफोन ३जी, ऑफीसमधे व घरी केबलनेट असल्यामुळे जास्त बिल येण्याची चिंता नाही. रिलायन्स जीयो ची वाट बघणे हा एक पर्याय आहेच पण रिलायन्स म्हटल्यावर अगोदरच उरात धडकी भरते. पण प्रिपेड सेवा वापरुन पाहण्यास हरकत नाही.

मला वाटतं GSM 4G इथे आणत आहेत ते कंपन्यांना परवडत नसावे. परदेशात CDMA वर 4G आहे का ?त्यामुळे फरक पडत असावा.(GSM band 2100 आणि 2900MHz तरCDMA 850MHz wide band ).

Dhananjay Borgaonkar's picture

14 Jul 2015 - 7:40 pm | Dhananjay Borgaonkar

साहेब तुम्ही जवळच्या एअरटेलच्या शोरुम मधे जा. तिथे त्यांना सांगा कि तुम्हाला ४जी घ्यायचे आहे पण आधी टेस्ट करायचं आहे. ते त्यांचा माणुस तुमच्याघरी पाठवतील. मग तुम्ही स्पीड्टेस्ट करुन घ्या. बरं वाटलं तर घ्या नाहीतर नको म्हणून सांगा.
मी मागच्याच आठवड्यात हे करुन बघितल आहे. प्लान्स तुम्हाला त्यांच्या साइट्वर मिळतील.
तुम्हाला डाँगल हव आहे कि वायर्लेस ब्रॉड्बँड हे फक्त त्यांना आधी सांगा त्याप्रमाणे ते घेउन येतील बरोबर टेस्ट करायला.

सुबोध खरे's picture

14 Jul 2015 - 7:45 pm | सुबोध खरे

मी मुंबईत AIRTEL ४ G गेले तीन महिने वापरत आहे. त्याचा वेग घरात साधारण ६-८ एम बी पी एस( मेगा बाईट पर सेकंद) इतका मिळतो. यात तु नळी न थांबता पाहता येते. काही वेळेस किंवा बाहेर २३ एम बी पी एस पर्यंत मिळाला आहे. ३ G च्याच पैशात ४ G मिळतो आहे पहिले दोन महिने त्यानी १ GB अतिरिक्त फुकट दिला होता माझ्या डेटा प्लान मध्ये १. ३ GB अंतर्भूत आहे आणी माझ्या भ्रमणध्वनीवर मी १ GB नंतर सूचना देण्याचे टाकून ठेवले आहे. शिवाय एअर तेल कडून आपला देता संपत आला याची सूचनाही येते. त्यामुळे मागच्या दोन महिन्यात माझे बिल ५०० च्या आसपासच (फोन आणी डेटा मिळून) आले.बाकी घरी एम टी एन एल चा ४ एम बी पी एस चा वायफाय आहे ११११ रुपयात ३२ GB. त्याच्या वर हवा तेवढा देता वापरतो. बाहेर गेल्यास AIRTEL ४ G वापरतो. आता या महिन्यात पाहूया.
एकंदर सेवा समाधानकारक आहे ३ G पेक्षा नक्कीच चांगली आहे. रोमिंग ई ला कुठेही अडथळा आला नाही. वाटेल तेवढे व्हिडीओ पहिले नाही तर बिलाचा प्रश्न येऊ नये. आपला HANDSET ४ G आहे का ते पाहून घ्या.

धर्मराजमुटके's picture

14 Jul 2015 - 8:13 pm | धर्मराजमुटके

६-८ एम बी पी एस म्हणजे ३जी च्या तुलनेत बरा (समाधानकारक नव्हे) आहे. शिवाय जर ३जी च्याच भावात ४जी मिळत आहे तर वापरुन बघण्यास हरकत नाही. युनिवर्सल ४जी डॉंगल विकत मिळते का ते शोधतो पहिले म्हणजे एअरटेल आणि रिलायन्स दोन्ही वापरुन पाहता येतील.

सुबोध खरे's picture

14 Jul 2015 - 8:14 pm | सुबोध खरे

एअरटेलचे ४जी डॉंगल उपलब्ध आहे

कपिलमुनी's picture

14 Jul 2015 - 8:34 pm | कपिलमुनी

मोबाईलवर ४जी वापरता येता का ?

मित्रहो's picture

14 Jul 2015 - 11:01 pm | मित्रहो

तुमचा मोबाइल ४ जीला सपोर्ट करनारा हवा तरच ४जी मोबाइलवर वापरता येते.

सुबोध खरे's picture

14 Jul 2015 - 8:39 pm | सुबोध खरे

मोबाईलवरच वापरतो आहे

पैसा's picture

14 Jul 2015 - 10:33 pm | पैसा

माझ्या नवर्‍याच्या गावात एअरटेलचं फोन कॉल करायचं नेटवर्क मिळू दे. बहुतेकदा फोन सर्चिंग मोडमधेच असतो. जीपीआरेस मिळालं तर एका पायावर उभी राहीन अन ३जी मिळालं तर हत्तीवरून साखर वाटीन.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jul 2015 - 11:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

४जी करुन दिलं तर काजु उसळ मिळेल कै? किंवा रसगुल्ले?

पैसा's picture

14 Jul 2015 - 11:09 pm | पैसा

काय म्हणशील ते! पुढच्या वेळी तिकडे गेले की तुला फोन लागतो का ते आधी बघेन. मग २ ३ ४ जी च्या गोष्टी! =))

टवाळ कार्टा's picture

15 Jul 2015 - 2:45 pm | टवाळ कार्टा

म्हणजे तुम्ही वेग्ळ्या गावात र्हाता?

धर्मराजमुटके's picture

7 Jul 2016 - 11:53 pm | धर्मराजमुटके

मुंबईत आता वोडाफोन ४जी सेवा सुरु होऊन ३-४ महिने झालेत. पण अजूनही ४जी साठी काही खास प्लॅन दिसत नाहित. मिपाकरांपैकी कोणी ही सेवा वापरली आहे काय ? कोणी एअरटेल वि. वोडाफोन तुलना करुन बघीतली असेल तर अनुभव वाचायला आवडतील.

मी गेल्या २-३ महिन्यांपासुन वापरतोय. वर कुणी तरी म्हणल्याप्रमाणे स्पीड ३जी पेक्षा बरा आहे. पण रेट ३जीचाच आहे.

सुबोध खरे's picture

8 Jul 2016 - 10:27 am | सुबोध खरे

सव्वा वर्ष एअरटेल ४ G वापरात आहे. बिल कधीच ६०० च्या वर गेलेले नाही. अर्थात ४G वर रोज रोज तू नळी पाहत नाही. परंतु बाहेर असताना गरज पडली तर पटकन गोष्टी पाहता येतात.

सुचिकांत's picture

8 Jul 2016 - 5:36 pm | सुचिकांत

इकडे हैदराबादमध्ये बऱ्याच अगोदर ४ जी आलं आहे. स्पीड भन्नाट! माझ्याकडे एयरटेल आहे. १० एमबीपीएसच्या Act (पूर्वीचे बीम) कनेक्शनपेक्षा चांगला स्पीड आहे. मोजला नाही किती. ४ जीचे वेगळे पैसे भरावे लागत नाहीत. ३ जीच्याच रकमेत ४ जी सध्या तरी इकडे उपलब्ध आहे.

सुचिकांत's picture

8 Jul 2016 - 5:46 pm | सुचिकांत

इकडे हैदराबादमध्ये बऱ्याच अगोदर ४ जी आलं आहे. स्पीड भन्नाट! माझ्याकडे एयरटेल आहे. १० एमबीपीएसच्या Act (पूर्वीचे बीम) कनेक्शनपेक्षा चांगला स्पीड आहे. मोजला नाही किती. ४ जीचे वेगळे पैसे भरावे लागत नाहीत. ३ जीच्याच रकमेत ४ जी सध्या तरी इकडे उपलब्ध आहे.

सॅगी's picture

10 Jul 2016 - 1:29 pm | सॅगी

मी मुंबईत व्होडाफोन ४जी वापरतोय. लोकल ट्रेन मध्ये सुद्धा १९-२० एमबीपीएस पर्यंत वेग मिळतो. व्हिडीओज न थांबता पाहता येतात.

व्होडाफोनची एकच अडचण आहे. सध्या तरी एअरटेल किंवा रिलायन्स जिओ प्रमाणे त्यांची ४जी सेवा भारतभर उपलब्ध नाहीये. त्यामुळे रोमिंगवर असताना ३जी वापरावे लागते.

नीलमोहर's picture

10 Jul 2016 - 1:47 pm | नीलमोहर

पुण्यात एअरटेल ३जी वापरत आहे, मात्र सध्या एअरटेल बहुधा ट्रायल/प्रमोशन म्हणून ३जी च्या रेट/प्लॅनमध्ये
४जी देत आहे, स्पीड चांगलाच आहे.

सॅगी's picture

10 Jul 2016 - 2:05 pm | सॅगी

पोस्टपेड कनेक्शन असल्यास ४जी सिम मोफत देतात मोबाईल कंपन्या. प्रीपेडचे माहित नाही.

नीलमोहर's picture

10 Jul 2016 - 2:09 pm | नीलमोहर

फक्त प्रमोशनसाठी असावे काही दिवस.

मला नाही वाटत प्रमोशनल ऑफर असेल म्ह्णून. कारण ४जी सेवा सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत.

तसेही आता रिलायन्स जीओ येणार असल्याने ४जीचे दर वाढ्विण्याचे उद्योग मोबाईल कंपन्या करतील असे वाटत नाही.

त्यामुळे ३जी चे ग्राहक ४जी ला कन्व्हर्ट करण्यासाठी असेल.
तसे दोन्हीचे रेट्स सेम आहेत.

अमित मुंबईचा's picture

10 Jul 2016 - 3:30 pm | अमित मुंबईचा

एक वर्ष झाल रिलायन्स जीओ वापरात आहे. हे आत्ताच फोन वरच स्पीड. साधा VoLTE फोन आहे कमी आहे. काहींना ८० mbps पर्यंत मिळत आहे,

JIo Speed

अभ्या..'s picture

10 Jul 2016 - 4:22 pm | अभ्या..

जिओ चे 4जी रेट्स कसे आहेत?
इथे लौंचिंग चाललंय त्यामुळे पहिले 3 महिने अनलिमिटेड नेट आणि कॉलिंग. नंतर रिलायन्स वाले काय रेट लावतील ग्यारंटी नाही सो....
95 रुपयात 10 जीबी अशा ऑफर आहेत म्हणे, तुमचा काय आणभव?

अमित मुंबईचा's picture

10 Jul 2016 - 4:57 pm | अमित मुंबईचा

३० - ५० पर जीबी असेल लॉन्च झाल्यावर असा वाटत. टेलिकॉम मार्केट तोडणार. एम्प्लॉयी असल्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही पण या वर्षी डिसेंबर मध्ये लौंच होईल.

तसे नाही म्हणत अमित, सध्या इथे एलवायएफ चा फोन घ्यायला मिनिमिम 4800 आणि रिलायन्स कार्ड फ्री सोबत 3 महिने अनलिमिटेड अशी ऑफर आहे. ते घेणारच आहे पण मुंबईत सध्या काय रेट आहेत 4 जी प्लान्चे?

अमित मुंबईचा's picture

10 Jul 2016 - 5:22 pm | अमित मुंबईचा

अजून कुठेही ऑफिशियली लौंच झ्हाला नाही आहे. आणि LYF चे फोन २९९९ पासून चालू आहेत. फायर ६ चेक करा. ३ महिने इंटरनेट आणि कॉलिंग सुद्धा. चांगली डील आहे. लौंच झाल्यावर वापरायचं आहे तर वापर नाहीतर हॅन्डसेट तर आहेच. आणि डिसेंबर अहंडी लौंच होणार नाही हे नक्की. म्हणजे अनलिमिटेड नेट ६ महिने

अभ्या..'s picture

10 Jul 2016 - 5:29 pm | अभ्या..

थॅन्क्स बॉस.
घेतो आहे.

रुस्तम's picture

12 Jul 2016 - 9:49 pm | रुस्तम

आते भावाने घेतलाय 4800 वाला एलवायएफ चा फोन. 4 जी चा स्पीड खूप चांगला आहे. + 3 महिने ऑल ओव्हर इंडिया इनकमिंग आउटगोईंग सुद्धा फ्री.

अमित मुंबईचा's picture

10 Jul 2016 - 5:02 pm | अमित मुंबईचा

खर तर ते LYF ब्रॅण्ड च मार्केटिंग करत आहेत. मार्केट च्या आकड्यांनुसार ४ था ब्रॅण्ड बनला आहे भारतात

ए ए वाघमारे's picture

11 Jul 2016 - 2:58 pm | ए ए वाघमारे

मी वापरतो आहे जिओ गेले ०२ महिने, एम्प्लॉयी रेफरल ऑफरमधे (तेच ते ०३ महिने फुकट).
मी खेड्यात राहतो.त्यामुळे इथल्या तुलनेत एकदम कातिल स्पीड मिळते आहे.

साधारणत: १.२ जीबीचा युट्यूबचा ७२०पी विडीओ १०-१५मिनिटात डाऊनलोड होतो. टोरेंटस तर यापेक्षा जास्त फास्ट चालतात.

मी अनुभवलेली मॅक्स स्पीड ४ ते ५ मेगाबाईटसपरसेकंद.तीही ७०%-८०% सिग्नल स्ट्रेंथवर.

जुनं रिलायन्स (अनिलअंबानी) व नवीन जिओ(मुकेश) यांनी टायअप केल्यामुळे ९३रु.त १०जीबी ही ऑफर फक्त रिलायंसच्या आधीच असलेल्या ग्राहकांसाठी आहे. नव्या लोकांना नव्हे.

पण हॅण्ड्सेटस फारसे चांग़ले नाहीत.ओव्हरहीट होतात आणि बॅटरी रिचार्जला प्रचंड वेळ घेतात.(मी तेव्हा स्वस्तातला स्वस्त फ्लेम-०१ घेतला म्हणा)

हरामखोर लोक आहेत एअरटेल ४जी वाले. डेमोमध्ये एक स्पीड दाखवतात आणि प्रत्यक्षात कमी स्पीड मिळतो.

बिल्कूल घेवू नका. घरी डेमो दाखवायला आला तरी घराबाहेर हाकलून द्या.

%^#%#^

अभ्या..'s picture

10 Jul 2016 - 5:11 pm | अभ्या..

अरे अरे अरे, इतका राग?
त्या फोरजी च्या साशा छेत्रीला पाहायचे अन राग विसरायचा ;)

केस घातली आहे यांच्यावर. निकाल लागूदे, मग बघतो यांच्याकडे.

निकाल काय अजून तीन वर्षे लागत नाही माहिती आहे.

अभ्या..'s picture

10 Jul 2016 - 5:28 pm | अभ्या..

बाब्बौ,
मोदका तुला कळते रे ते ग्राहकहित, कोर्टकचेर्‍या.
आम्ही येडे कंपनीत ते हायफाय मॅनेजर दाखवतील ते रुल बघतो अन अनुभवासाठी पैसे गेले म्हणून गप्प बसतो.
असो..... शुभेच्छा.

पुतळाचैतन्याचा's picture

15 Jul 2016 - 4:18 pm | पुतळाचैतन्याचा

एयरटेल म्हणजे पैसे काढायचे उद्योग आहेत....एक वेळ नेत नसेल तरी चालेल पण एरटेल नको....तुमचा 10 जीबी चा प्याक असेल तर तो 14 व्या दिवशी संपला असे दाखवून थेट 2 जी सुरू होते...भीक नको आणि एरटेल आवर...मी सरळ रु.2500 च्या मोडेम वर पाणी सोडले पण एरटेल नको....तुम्हाला घ्यायचे असेल तर माझा मोडेम फुकट घेऊन जा.