खरं सांगायचं तर ही काही पाककृती नाही आणि मी काही पाक-कुशल नाही. पण २-४ कलाकारांना एकत्र आणून त्या मेहफिली चा आनंद लुटणारा रसिक नक्कीच आहे. श्रीयुत साल्मन (यातला "ल" हा सायलेंट आहे)हे यातले प्रमुख कलाकार आणि सोबत करायला भरपूर लसूण (हा मात्र सायलेंट असता कामा नये), लेट्युस, ब्रोकोली, लिंबू आणि उगाच थोडं ओलिव्ह ऑईल. मीठ आणि मिरी हे अर्थात निवेदक म्हणून हवेतच.
तर… लसूण आणि ब्रोकोली थेंबभर तेलावर थोडे टॉस करून ठेवावे. श्रीयुत साल्मन यांना मंद आचेवर १० मिनिटे गाऊ द्यावे आणि बस्स………
एखादी जिवाभावाची मैत्रीण असेल तर मेहफिलीची रंगत अजूनच वाढते……… तेव्हा!!!
प्रतिक्रिया
10 Jul 2015 - 10:44 am | सौंदाळा
सादरीकरण मस्त
पण खरं सांगु का, अशा मिळमिळीत डिशेस परदेशात चांगल्या लागतात. (मी पण उकडलेले मासे, पांढरा भात आणि सालाद मिटक्या मारत खाल्ले होते) पण ईकडे घशाखाली उतरत नाहीत.
10 Jul 2015 - 9:23 pm | प्रसाद गोडबोले
सत्यवचन !
१००% सहमत सऊन्दाळा !!
मीही फार कौतुकाने साल्मन खल्ला होता पण काय मजा आली नाय राव ... आपला पापलेट / सुरमई फ्राय च्या पुढे तर अगदीच फिक्का :(
असो . पाकृचे सादरीकरण अत्युत्तम आहे ह्यात शंकाच नाही !
:)
11 Jul 2015 - 8:40 pm | रेवती
शाकाहारी असले तरी तुमच्याशी भयंकर सहमत.
10 Jul 2015 - 9:14 pm | त्रिवेणी
शेवटचा फोटु मस्तच.
पण तिखट आणि मसालेदार जेवणाची सवय असल्याने हे खुपच सात्विक होईल.
12 Jul 2015 - 12:05 pm | सुहास झेले
सहमत :)
10 Jul 2015 - 9:28 pm | नूतन सावंत
त्रिवेणीशी सहमत.
10 Jul 2015 - 10:33 pm | सानिकास्वप्निल
छान आहे पाककृती. असे माश्यांचे प्रकार आवडतात खायला बदल म्हणून :)
सामनला आपला नेहमीच्गा मसाला लावून फ्राय केले की अजून छान लागतो.
फोटो मस्तं.
11 Jul 2015 - 2:04 pm | वेल्लाभट
मी प्रतिसाद देणारच होतो की साल्मन नाही सामन म्हणायचं. :) पण म्हटल माशाची चव का घालवा? तुमच्या प्रतिसादात योग्य उच्चार लिहिलेला पाहिला, म्हणून मग प्रतिसाद देऊ म्हटलं.
11 Jul 2015 - 1:49 pm | मनीषा
छान आहे पा. कृ.
नक्की करणार ! :)
11 Jul 2015 - 5:02 pm | राघव
तसं मी मासे खाणं बंद करून भरपूर दिवस झालेत... पण हे असलं काही बघीतलं की जीव कासाविस होतो..
जाऊं देत.. कधीतरी सामन खाईनच या विश्वासावर तग धरून राहतो सध्या!!
बादवे, फिश ची स्वतःची चव लागली पाहिजे इतपतच मसाला वापरला तर ठीक... नाही तर चिकन आणि फिश च्या डिश मधे फरक काय राहणार? काय रे किल्लेदारा.. काय मत?
11 Jul 2015 - 8:41 pm | रेवती
पाकृ सांगण्याची ष्टैल आवडली. फोटू चांगला आलाय.
11 Jul 2015 - 10:00 pm | किल्लेदार
मला काही ही डिश मिळमिळीत वाटत नाही. उलट दमदारच वाटते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत झाले.
मुळातच साल्मन हा अतिशय घट्ट बांधणीचा आणि स्वतःची एक खास चव असलेला मासा आहे. फक्त मीठ मिरी ची सोबत घेऊन हे गुणधर्म जोखता येतात. मसाले वापरून डिश चविष्ट होऊ शकेल हे नक्की पण फारसा वाद्यवृंद नसताना तबल्या-तंबोऱ्याच्या साथीने पण मेह्फीलीची मजा घेता येतेच की. अर्थात त्यासाठी कलाकार पण तेवढ्याच ताकदीचा असावा लागतो आणि तेच इथे सांगायचे होते.
साल्मन मसाला फ्राय पण करून पाहिला. एकीकडे साल्मन करी पण खाऊन बघितली पण शेवटी आवडली ती हीच डिश.
12 Jul 2015 - 2:52 pm | सुबक ठेंगणी
माझं पण असंच मत आहे. सामन माशाच्या चवीबरोबरच त्याचा लाल-गुलाबी रंगपण शाबूत ठेऊन शिजवला तर त्याची मजा येते असं मला वाटतं.
बाकी शेवटचा फोटो केवळ कातिल :)
12 Jul 2015 - 12:19 pm | जडभरत
शेवटचा फोटू तर कातिलच! तुम्ही अगोदर्च खाऊन संपवला वाट्टंत. त्यामुळं आता नजर नाय लावू शकत.
असो पण मी कल्पनेत खाऊन पाहिला. मस्तच लागणार हो. त्या ग्लासमधल्या सुंदरीसकट!!!
13 Jul 2015 - 11:29 am | वेल्लाभट
तोंडाला असं पाणी सुटलंय म्हणून सांगू !!!!
13 Jul 2015 - 11:43 am | पैसा
हा रावस काय? फोटो आणि सादरीकरण झकास! पण माझा नव्रा भरपूर तिखटाशिवाय मासा खाऊ शकेल असं वाटत नै.
14 Jul 2015 - 3:40 am | किल्लेदार
भरपूर तिखट घालून सुखट खा म्हणावं त्यांना :)…. हा रावस नाही, साल्मनच. पण रावस ला इंडिअन साल्मन असेच म्हणतात. त्याचा रंग हलका गुलाबी. अटलांटिक साल्मनचा रंग गर्द तांबडा आणि शिवाय पोत अतिशय घट्ट असतो. रावस हा करीसाठी अतिशय उत्तम पण साल्मन खावा तो असाच.… मी सांगितला तसा. :) :) :)
13 Jul 2015 - 8:27 pm | एस
झक्कास!
13 Jul 2015 - 8:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं पाकृ !
सामन प्रत्येकाने आपल्याला आवडेल तसा खावा... पसंद अपनी अपनी !
हा मुळातच चवदार असलेला मासा, शिजवलेला असो की नसो, मसालेदार असो की नसो, मस्तच लागतो. ही घ्या काही उदाहरणे...
14 Jul 2015 - 3:43 am | किल्लेदार
उदाहरणे दिलीत पण थोडा तपशील पण द्याल का त्यांचा ? म्हणजे करून बघता येईल. :)
13 Jul 2015 - 9:09 pm | मयुरा गुप्ते
किल्लेदार, छान दिसतोय मासा.
सामन माश्याची स्वतःची अंगभुत चव छान असते. सुरुवाती सुरुवातीला थोडी स्ट्राँग वाटण्याची शक्यता आहे पण सवयीने आवडतेच. सामन कसाही छान होउ शकतो. आपलं आलं-लसुण गोळी,तिखट मीठ मसाला लावुन असो किंवा नुसतं मिठ्,लिंबु व थोडी लसणाची पेस्ट असो, तेला मध्ये शॅलो फ्राय करुन, माश्याचं कोकमाचं आगळ, नारळाचं दुध घालुन केलेलं कालवणही कातिल होतं.
किंवा पाश्चिमात्य पध्दतीने लाकडाच्या छोट्या फळीवर नुसतं ग्रिल केलेलंही जबरी होतं.
पध्द्त कुठलीही असो, मासे बनवताना त्याच्या मुळ चवीला योग्य न्याय देण्यासाठी आपण वापरतो त्यापेक्षा थोडे कमी प्रमाणात मसाले वापरले की त्याची चवही छान कळते व त्याचा पोत ही बदलत नाही.
रावसा सारखीच खुट्खुटीत तुकडी पानात....
--मयुरा.
14 Jul 2015 - 3:49 am | किल्लेदार
मी आपल्याशी पूर्णपणे सहमत आहे. माशाची अंगभूत चव घेता येईल इतपतच मसाला वापरणे योग्य. बाकी लाकडी फळीवर ग्रिल करून खायचा योग काही आला नाही.
13 Jul 2015 - 9:24 pm | सविता००१
पण सादरीकरण आणि फोटो जबराट आहेत
14 Jul 2015 - 4:38 pm | दिपक.कुवेत
वारूणी वगळता माश्यासकट ईकडे सगळं साहित्य मिळण्यास हरकत नसावी. एकदा जरुर ट्राय करीन.
22 Jul 2015 - 4:33 pm | gogglya
सामन ? [ ह. घ्या. ]
29 Jul 2015 - 3:36 pm | झंप्या सावंत
माहोलच बनवला तुम्ही राव............
यो मासा आपल्या कड मिळतो का ओ राव आन काय म्हणत्यात त्यास
4 Aug 2015 - 8:17 am | किल्लेदार
आपल्याकडे इंडिअन साल्मन म्हणजेच "रावस" मिळतो….
14 Aug 2015 - 10:22 pm | झंप्या सावंत
व्हय आतीच्या ......