गाभा:
काही दिवसापासून प्रश्न पडला आहे, क्रियेटिव रायटिंग या क्षेत्रात इंटर्नशिप किंवा पार्ट टाइम जॉब मिळू शकतो का? या क्षेत्राबद्दल फारशी माहिती नाही. यशस्वी होईन की नाही हा निकष सध्या महत्वाचा नाहीये. फक्त प्रयत्नसुद्धा केला नाही ही रुखरुख मागे लागू नये म्हणून हा प्रपंच.
या जॉब साठी आवश्यक औपचारिक शिक्षण घेतले नाहीये. पण ऑनलाइन काही कोर्स / सर्टीफिकेट असल्यास करायची तयारी आहे.. सध्या काम करते तिथे सतत दुसर काहीतरी करायच आहे हा भुंगा डोक्यात असतो. कलाक्षेत्राची मुळात आवड आहे त्यामुळे पाट्या टाकण्यापेक्षा एकदा रिस्क घेऊन पहायची आहे.
मिपाकरांच्या मोलाच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत. : )
प्रतिक्रिया
9 Jul 2015 - 6:09 am | यशोधरा
शुभेच्छा!
9 Jul 2015 - 10:21 am | एस
मिपाकर माधुरी विनायक यांच्याशी संपर्क साधा. त्यांची 'जडणघडण' ही लेखमाला वाचनीय आहे. तसेच कमर्शिअल आर्टस् या क्षेत्रात बहुधा संदीप डांगे काम करतात. तेही सांगू शकतील.
9 Jul 2015 - 11:38 am | रातराणी
लेखमाला वाचली आहे. त्यांना संपर्क करून बघते.
9 Jul 2015 - 1:13 pm | माधुरी विनायक
रातराणी, तुम्हाला या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. तुम्ही मुंबईत राहता का? सध्या कंटेंट रायटिंग तसेच कॉपी रायटिंगचे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम मुंबईत सहज उपलब्ध आहेत. तुम्ही लेखन करत असलात तर स्वत:चा ब्लॉग तयार करा. यासाठी गुगल ब्लॉगर तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करेल.या लिखाणाचा संदर्भ तुम्ही इच्छित नोकरीच्या ठिकाणी देऊ शकता.त्याव्यतिरिक्त इतर काही लिखाण प्रकाशित झालं असेल तर त्याचाही संदर्भ देता येईल.
एस ई ओ अर्थात सर्च इंजिन ऑप्टीमायझींग क्षेत्रातही होतकरू आणि अनुभवी लेखकांना चांगल्या संधी उपलब्ध आहेत. स्कील पेजेस, लिंक्ड इन अशा ठिकाणीही तुम्ही नोंदणी केल्यास वेगवेगळ्या भाषांमधल्या लेखन संबंधित संधींची माहिती मिळेल. आवश्यकता वाटल्यास माझ्याशीही अवश्य संपर्क साधा.
पुन्हा शुभेच्छा.
10 Jul 2015 - 1:17 am | रातराणी
माधुरीताई खूप खूप धन्यवाद! मी अजूनही माहिती मिळवणे आणि ती समजून घेणे या फेजमधेच आहे. तुझ्याशी संपर्क करेनच माझ्या प्रश्नासाहीत
9 Jul 2015 - 10:23 am | टवाळ कार्टा
कॉपिराईट सुध्धा यातच येते का? तसे असेल तर कॉल्लिंग आदि जोशी :)
9 Jul 2015 - 10:23 am | टवाळ कार्टा
कॉपिराईटिंग लिहायचे होते
9 Jul 2015 - 10:35 am | बोका-ए-आझम
क्रिएटिव्ह रायटिंग किंवा सृजनात्मक लेखन हे खूप मोठं क्षेत्र आहे. कथा-नाट्य-पटकथा लेखनापासून ते काॅपीरायटिंग, वेब कंटेंट डेव्हलपमेंटपर्यंत अनेक पैलू त्यात समाविष्ट होतात. त्यातला नक्की कोणता भाग तुम्हाला करायचा आहे ते आधी ठरवा.
9 Jul 2015 - 11:46 am | रातराणी
काहीच माहिती नाहीये या क्षेत्राची. सध्या तरी अंधारात चाचपडत आहे. तुमच्या प्रतिसादाने अजून अभ्यास केला पाहिजे हे लक्षात आलं. धन्यवाद!
9 Jul 2015 - 10:39 am | बोका-ए-आझम
जेवढा माझा अनुभव आहे त्यावरुन हे सांगू शकतो की या क्षेत्रात कोर्स केलाय म्हणून संधी मिळेलच असं नाही पण तुमचा पोर्टफोलिअो म्हणजे आधी काही काम केलेलं असेल तर त्याची उदाहरणं - हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. भाषा हाही एक मुद्दा आहे. तुम्ही कुठल्या भाषेत हे काम करणार आहात त्या भाषेतल्या लिखाणाचा तुमचा पूर्वानुभव ही एक जमेची बाजू होऊ शकते.
9 Jul 2015 - 12:01 pm | रातराणी
हो. पण शुन्यातुन सुरुवात करत असल्यास पोर्टफोलिओ बनवण्यासाठी कुणाला विचारायचं? कोर्स करताना काही प्रॉजेक्ट, असाइनमेंट केल्या जातील ज्या as प्रूफ ऑफ वर्क वापरता येतील. मी त्यासाठी कोर्सचा विचार करत होते. पहिल्या औपचारिक प्रॉजेक्टनंतर तोच वापरता येईल पण तोपर्यंत काहीतरी दाखवायला करायला लागेल. हा म्हणजे आपला क्लासिक कोबडी आधी का अंड आधी प्रॉब्लेम झाला ना. : )
9 Jul 2015 - 5:48 pm | बोका-ए-आझम
कोर्स करताना ज्या असाईनमेंटस् कराल त्या तर पोर्टफोलिओमध्ये येतीलच आणि शिवाय तुमचं इतरत्र प्रकाशित होत असलेलं लेखनही त्यात समाविष्ट होईल. वरती माधुरी विनायक यांनी सांगितलेला ब्लाॅगचा पर्यायही चांगला आहे. गूगल ब्लाॅगरसारखाच वर्डप्रेसवरही फार सोप्या पद्धतीने स्वतःचा ब्लाॅग तयार करता येतो. अनेक जुने मिपाकर सदस्य - नंदन, प्रकाश घाटपांडे, भडकमकर मास्तर - यांचे ब्लाॅग वाचा. सुंदर आहेत.
9 Jul 2015 - 11:48 am | रातराणी
सर्वांचे आभार!
9 Jul 2015 - 6:30 pm | म्हया बिलंदर
तुम्ही ज्या शहरात राहत असाल त्या शहरातले असे स्टुडिओ शोधा जे छोटे मोठे कौर्पोरेट प्रोजेक्ट किंवा जाहीराती करतात्/बनवतात, (जस्ट डायल उपयोगी पडेल)त्यांना संपर्क करा. त्यांना देखील सतत राईटर्स लागत असतात. सरळ सांगायचं फ्रेशर आहे. दहातल्या एकाने ही काम दिलं की झालं. दरम्यान कोर्स ची शोधाशोध चालु ठेवा. मी माझ्या मित्राला सुरुवातीला एका स्टुडीओचे दोन प्रोजेक्ट्स दिलेले. नंतर त्याला त्याचा उचीत मोबद्ला देखील मिळु लागला व माझ्या ओळखीची ही गरज नाही पडली. सध्या तो त्याच्या याच (लाडक्या) फिल्ड्ला कंटाळलाय हा मुद्दा वेगळा पण एक काम भेटलं की तुमची गाडी पुढे जाईल असे मला वाटतं.
9 Jul 2015 - 8:01 pm | सदस्यनाम
हम्म. हे उपयोगी आहे.
अजून एक म्हणजे स्वतःच डमी प्रोजेक्टवर काम करायचे. एखादी अॅड किंवा प्रोजेक्ट पाहून तुम्ही कसा डेव्हलप केला असता ते लिहायचे. अॅड मधली कॉपी लिहिताना पंचेस, स्लोगन्स, कॅप्शन्स वर विशेष लक्ष ठेवायचे. शब्दांची फिरवाफिरव करुन काही चमत्कॄती शब्द तयार करणे अशा गोष्टींची प्र्याक्टीस अस्ल्यास जाहीरातक्षेत्रात प्रवेश मिळ्ण्यास काही हरकत नाही.
9 Jul 2015 - 8:37 pm | म्हया बिलंदर
माझा अनुभव तरी असा आहे की स्वत: डम्मी प्रोजेक्ट केले की त्यात आपल्याला हवं तसं करता येतं पण दुसर्या साठी काम केल्यावर क्लाईंट टेस्ट/प्रेफरन्स/ई. चा आभ्यास होतो, आणी तो क्रिएटीव क्षेत्रात खुप महत्वाचा आहे.
10 Jul 2015 - 1:19 am | रातराणी
खूपच उपयुक्त माहिती म्हया बिलंदर. अनेक आभार!