हिंजवडी -- परांजपे बिल्डर्सच्या "ब्लू रिज" बद्दल माहिती हवी आहे.

रिग पिग's picture
रिग पिग in काथ्याकूट
5 Jul 2015 - 11:05 am
गाभा: 

सध्या रहायला नवी मुंबईत आहे. ( कुटुंब - स्वतः बायको, 2 मुली, आई)
१ बीएचके चा फ्लॅट विकून तिकडे ३ बीएचके घेण्याचा विचार आहे. राहत्या ठिकाणी ३ बीएचके घेणे माझ्या बजेटच्या बाहेरची बाब आहे. (खूप जास्त गृहकर्ज करायचे नसल्याने)
नेटवर तरी प्रोजेक्ट चांगला दिसतोय. शाळा प्रोजेक्टला लागून आहे असे दिसते.

१ - २ मूली आहेत शाळेत जाणाऱ्या, शाळा जवळ असणे हि मुख्य अट आहे घरून." जवळ म्हणजे चालत जाण्यायोग्य"
२ - सर्व amenities असलेल्या ठिकाणी राहण्याची हौस.
३ - गर्दीपासून सुटका - नोकरी बोटीवर असल्याने रोज कामावर पळायचे नाही.

माहिती पाहिजे
१. मेंटेनन्स चार्जेस - दरमहा ??
२. छोटी मुले आणि वयस्कर व्यक्ती (आई)असलेल्या कुटुंबासाठी ??
भिती हि कि बहुतांश जनता IT वाले आणि DINK (डबल इन्कम नो किड्‌स)
३ शाळेव्यतिरिक्त इतर छंदवर्गाची उपलब्धता

-- भेट देणार आहे पुढील महिन्यात पण त्यात फ्लॅट बघणे होईल.
प्रत्यक्ष राहणाऱ्याकडुन / त्या भागातल्या जाणकारांकडुन कळावे हि अपेक्षा.

--- धन्यवाद
रिग पिग

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

5 Jul 2015 - 11:09 am | प्रसाद गोडबोले

गूगल बंद पडले आहे का हो आजकाल ?

हिंजवडी म्हणतात त्या भागाला, हिंजेवाडी नाही. हिंजेवाडी मुख्यतः बाहेरच्यांनी केलेला अपभ्रंश आहे.

श्रीरंग's picture

5 Jul 2015 - 7:08 pm | श्रीरंग

बरोब्बर

हिंजवडी - हिंजेवाडी
औंध - आँध
येरवडा - येरवाडा
चतु:शॄंगी - चतुरशिंगी

असले अपभ्रंश वाचून तिडिक जाते डोक्यात.

श्रीरंग_जोशी's picture

5 Jul 2015 - 7:18 pm | श्रीरंग_जोशी

बाकी उदाहरणांचे ठाऊक नाही पण हिंजवडीचा उच्चार हिंजेवाडी असा केला जाण्याचा दोष त्या गावाचे स्पेलिंग Hinjewadi असे असण्यालाही जातो.

काही ठिकाणी Hinjawadi असंही पाहिलं आहे. परंतु Hinjewadi अधिक पाहिलं आहे.

चालायचंच भाऊ अडाणी जनता भरपूर आहे भारतात! जिथं आपल्या देशाची ओळख अजून तथाकथित उच्चभ्रू राजकारणी धर्मनिरपेक्षतावाले इंडीया च करून देतात, तिथं या अडाणी जनतेचा तरी राग का धरता?

कपिलमुनी's picture

6 Jul 2015 - 4:51 pm | कपिलमुनी

खडकी चा स्पेलिंग kirkee असे ज्या महाभागाने केले तो एक मूर्ख !
आणि तेच स्पेलिंग पुढची कित्येक वर्षे संभाळणारी नोकरशाही शतमूर्ख

बॅटमॅन's picture

6 Jul 2015 - 4:58 pm | बॅटमॅन

ब्रिटिशांच्या उच्चारपद्धतीप्रमाणे ते स्पेलिंग फार चूक नाही. पण आपण इंग्लिश शिकू लागल्यावर आपल्या उच्चारपद्धतीप्रमाणे स्पेलिंग्ज नीट बदलली पाहिजेत, नायतर मथुरेचे muttra पाहून भारतीय डोळ्यांना कसंसंच होतं. छत्रपती या शब्दाचे ब्रिटिशांनी केलेले अनेक स्पेलिंगपैकी एक स्पेलिंग पाहिले, ते इथे लिहवत नाही. तो कै त्यांचा दोष नाही, ते उच्चार ठीकठाकच करत - पण आपली उच्चारपद्धती तशी नसल्याने आपल्याला ते बघवत नाही सबब तशी स्पेलिंग्स बदललीच पाहिजेत.

टवाळ कार्टा's picture

6 Jul 2015 - 7:27 pm | टवाळ कार्टा

ज्या लोकांनी स्वातंत्र्य मिळाल्यावरसुध्धा "भारत" आणि "India" अशी दोन्ही नावे २ वेगळ्या भाषांत ठेवली त्यांच्याकडून वरची अपेक्षा ठेवणे जरा जास्तच नै होत?

बॅटमॅन's picture

6 Jul 2015 - 7:43 pm | बॅटमॅन

अगदी अगदी...पण लै नाही तरी थोडं तरी...

श्रीरंग_जोशी's picture

6 Jul 2015 - 8:08 pm | श्रीरंग_जोशी

टक्याने मांडलेल्या मुद्द्याबरोबर सहमत.

तसेच भारतातल्या (महाराष्ट्रात नसलेल्या) कितीतरी ठिकाणांचे मराठीतले उच्चार तेथील स्थानिक भाषांपेक्ष खूप वेगळे आहे. हा मुद्दा सोयिस्करपणे विसरला जातो.

बरोबर आहे जोशीसाहेब. इतर भाषांतील नावे, शहरे यांचा आपण पण आपल्याला वाटेल तसा उच्चार करतोच की. उदा. बिसी बेळे हुळे अन्न या कानडी पदार्थाचा उच्चार मी ग्रामीण भागात "भिशी बिळी अण्णा" असा भयंकर ऐकलाय.अशी विविधता आहे म्हणून गंमत पण आहे.

सूड's picture

6 Jul 2015 - 8:54 pm | सूड

आणि वानवडीचं Wanowrie, घोरपडीचं Ghorapurie !! ;)

उत्तरेतल्या लोकांचं एक पाह्यलंय. नावांचे सत्यानाश शिकावे तर त्यांच्याकडून!!
आणि बोललं की आपल्याच लोकांना राग येतो. मध्यंतरी हिंजेवाडीवरनं चेपुवर कमेंट टाकली तर एक महाभाग म्हणून गेला शीव चं नाय का Sion झालं. अरे झालं ठीकाय, म्हणून हे पण होऊ द्यायचं का? मूर्ख लेकाचे!!

संदीप डांगे's picture

6 Jul 2015 - 9:10 pm | संदीप डांगे

विक्रोळी चं बिकरौली. एका उप्र ने असंच दादर स्टेशनवर विचारलं. ये बिकरौली कितना लंबा है? मला दोन मीणीट कळलेच नाय बाबा काय म्हंतोय...

तसंच. कोपरखैरना, तुर्बा, सन्पाडा, रबाला,

वशाडी येवो!! असं बोलणार्‍या कर्मचार्‍यांकडून मी तिथल्या तिथे बरोबर उच्चार करवून घेतो. वाईटपणा येतो, पण मुंबैकरांनी आपल्या भाषेची शरम वाटून घेऊन आधीच अवलक्षण ओढवून घेतलंय तेवढं पुरे!!

संदीप डांगे's picture

6 Jul 2015 - 9:32 pm | संदीप डांगे

मी पण तेच केलं.

मराठी डोकी प्रचंड तापलेली आहेत. अहो पण या उपसंग्रामात रिग पिग साहेबांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? एक अकेला इस शहर में
मला रिग पिग साहेब अमोल पालेकर सारखं उदाह बसलेले डोळ्यासमोर तरळून गेले.

संदीप डांगे's picture

6 Jul 2015 - 10:17 pm | संदीप डांगे

काय राव? आपल्या गावाच्या नावाची वाट लागली की सगळ्यांची डोकी अशीच तापलेली असतात. न्यु यॉर्क ला नेवार, लंडन ला लंटन, पॅरीसला फ्यारेस, सिडनेला शेदनी, कॅलिफोर्निया ला कलफुनिया, असं काय म्हटलं तर चालंल का तितल्या भूमिपुत्रांना?

श्रीरंग_जोशी's picture

6 Jul 2015 - 10:27 pm | श्रीरंग_जोशी

इंग्रजांनी पारि चे पॅरिस केले म्हणून फ्रेंचांनी लंडनचे लॉन्द्रे केले असे वाचले आहे.

मूळ फ्रेंच उच्चार देवनागरी लिपित लिहिण्याचा माझा प्रयत्न गोड मानून घ्यावा.

चिकागो राहिले या यादित.

नावं डांगेसाहेब फिक्स झालीच पाहिजेत. माझं त्या बाबतीत काही म्हणणे नाही. पण एखाद्या अडाणी मेंदूला त्याचा उच्चार जमतंच नसेल तर आपण हलके घ्या. एवढंच म्हणायचंय मला. बाकी कायदे करणारे मराठी पुढारी निवांत आहेत. आणि आम्ही थंड घ्या म्हटलं तर चक्क शिव्या! तुम्ही नाही! थोडंसं वर बघा. एवढ्या स्पष्ट भाषेत आपण राज्यकर्त्याना जाब विचारला असता तर मराठीची दैना झालीच नसती.

राज्यकर्त्याना जाब विचारला असता

जाब विचारायचा म्हणजे काय करायचं ते सांगा बरं!!

जडभरत's picture

6 Jul 2015 - 10:53 pm | जडभरत

सूड साहेब, हा प्रश्न अपेक्षितच होता. पण तुमची एकंदरीत भाषाशैली बघून तुमच्याशी वाद वाढवत नाही. कारण संगणकाची बटने दाबून ना तुम्ही बदल घडवू शकता ना मी. अनामिक आयडीच्या आवरणाखाली लपून केलेल्या या वादाला काय अर्थ आहे. गुडबाय.

आनंदी गोपाळ's picture

6 Jul 2015 - 11:16 pm | आनंदी गोपाळ

अनामिक आयडीच्या आवरणाखाली लपून केलेल्या या वादाला काय अर्थ आहे.

म्हणजे ओळखीच्या लोकांनी समोरासमोर एकमे़कांचे गळे पकडून केलेल्या भांडणांना काही अर्थ असतो वगैरे म्हणायचे आहे काय? "आयडीच्या" हा एकवचनी शब्दप्रयोग असल्याने नेमक्या कुणाच्या अनामिकतेकडे अङ्गुलीनिर्देश आहे? त्यांच्या, की स्वतःच्या? ;)

ताई अहो माझ्यासाठी हा विषय केव्हाच संपलाय. का तुम्ही त्रास करून घेताय स्वतःला. मी इथे फक्त कथा काव्य पाककृती यांचा आनंद घ्यायला येतो. शिवीगाळ वादविवाद यासाठी नाही. आपणांस अशा गोष्टींची फार आवड असल्यास आपण समविचारी मंडळी शोधावीत.

शिवीगाळ कोणी आणि कुठे केलीय ते दाखवून दिलीत तर बरं होईल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Jul 2015 - 6:41 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

समोरच्याने मुद्दा धरुन बोललं की काही लोकांना अपमान झाल्यासारखं वाटतं. त्यांना शिवीगाळ केल्यासारखं वाटतं असावं. रच्याकने तु आयडीमागे लपुन का बोलतोस रे आँ? पुढच्या वेळी स्वतःचं पुर्ण नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थान, शिक्षण, सद्ध्याची नोकरीची जागा (वाद टकाशी घालत असशील तर बाकी काही गोष्टीही हाताशी ठेव ;) ) वगैरे सगळ्या डीट्टेल दे बरं. अशी लपवाछपवी बरी नव्हे हो सूडपंत.

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2015 - 9:45 am | टवाळ कार्टा

(वाद टकाशी घालत असशील तर बाकी काही गोष्टीही हाताशी ठेव ;) )

संदर्भासहित स्पष्टीकरण dene

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Jul 2015 - 2:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

Entropomentry.

जडभरत's picture

6 Jul 2015 - 11:59 pm | जडभरत

आणि हो यावर सुद्धा काही प्रतिक्रिया टाकणार असाल तर माफ करा. मी काही परत वाचायला या धाग्यावर येणार नाही. तेव्हा वाटेल ते लिहा. आपणांस लखलाभ.

कपिलमुनी's picture

7 Jul 2015 - 12:36 am | कपिलमुनी

एवढ्यातच संपलात ? मग कसं ओ व्हायच

एशियन पेंट्स वापरायला अजिबातच वाव न मिळाल्याने हळवे झाले असतील बिचारे. आपण दोन मिनीट शांतता पाळूया त्यांच्यासाठी.

या ग्लोबलाईझ्ड जमान्यात एशियन पेण्टवर अडून कशाला बसायचं म्हणतो मी. आफ्रिकन नैतर युरोपियन नैतर अमेरिकन नैतर आष्ट्रेलियन पेण्टदेखील उपलब्ध असतीलच की (ते सगळे मेडिन्चाय्ना नसले म्हणजे मिळवली).

आफ्रिकेत (अल्जीरिया मध्ये तरी) बराचसा माल 'मेड इन चीन' आहे. चीनची मुसंडी जोरदार आहे. भारतानं निव्वळ वल्गना कराव्यात.

खरंच की !! पेंट कोणताही असो, रंग महत्त्वाचा!! ;)

प्रसाद गोडबोले's picture

8 Jul 2015 - 5:22 pm | प्रसाद गोडबोले

पेंट कोणताही असो, रंग महत्त्वाचा!!
>>>

सत्यवचन !

हे घ्या आमच्या तर्फे तुम्हाला भेट : 'मी'चित्र

red

बॅटमॅन's picture

8 Jul 2015 - 7:16 pm | बॅटमॅन

वा वा वा वा....
सर्व विभक्त्या आणि सर्व वचने दिसली. =))

ब़जरबट्टू's picture

9 Jul 2015 - 9:08 am | ब़जरबट्टू

धाग्याचा ग्रीस केला राव मंडळीने ... :)

मी काम करत असलेल्या कंपनीचे गेस्ट हाउस याच संकुलात आहे. आणि गेले दोन आठवडे याच गेस्ट हाउस मधे रहातोय. जबरद्स्त वेगाने वाहणारे वारे आहेत. एसीची गरज नाही. उन्हाळ्यात बघावे लागेल. संपूर्ण स़कूलाच्या मधोमध गोल्फ मैदान आहे. गोल्फ मैदानाच्या देखभालीचा खर्च अफाट असतो. पण संकूलातील रहीवासी कधी गोल्फ मैदानात दिसले नाहीत. शाळा जवळ आहे. चालत जाउ शकतो एवढ्या जवळ. लीफ्ट कोने कंपनीची आहे. सुरक्षा उच्च दर्जाची आहे. सुरक्षारक्षक बायोमेट्रीक प्रणालीने दरवाजा उघडून देतात. सदनीका प्रशस्त आहेत. मुंबईच्या विकासकांसारखी कंजूषी करुन खूराडी बांधलेली नाहीत. बाजूलाच बारमाही पाणी असलेली नदी आहे. त्या नदीवर अवलंबून असलेली बागायती शेती आहे. संकूलातील रस्ते आणि बाकीचे इन्फ्रस्ट्रक्चर उच्च दर्जाचे आहे.
बाकी तुम्ही प्रत्यक्ष पहालच...

राहता राहीला प्रश्न मेंटेनन्स चार्जेसचा, ते मी विचारुन सांगतो.

अधिक माहीतीसाठी आपला भ्रमणध्वनी मल व्यनी करा..

रिग पिग's picture

10 Jul 2015 - 10:11 am | रिग पिग

व्यनी केला आहे.
धन्यवाद

वेल्लाभट's picture

5 Jul 2015 - 4:24 pm | वेल्लाभट

खोल्या छोट्या आहेत. मी गेलो होतो बघायला. दोन वर्षापूर्वी. नाही आवडलं.

मलाही ब्लू रिजबद्दल वाचायला आवडेल. जालावरून घरांच्या किमतीची कल्पना आली आहे. खटपट्या यांचा प्रतिसाद वाचून काय ते समजले. खोल्यांचे आकार जरा लहान वाटले, तरी बाकी गोष्टी आवडल्यात पण किंमत बघून गप्प बसण्यात आले आहे. उगीच फ्ल्याट घ्यायचा नाही तरी कशाला चौकश्या करतेस असे नवरा म्हणेलच! ;) पण आता बाकी माहिती झालीये तर मेंटेनन्सचा आकडा समजला तर बरे होईल. आमच्या आत्ताच्या सोसायटीचा मेंटेनन्स एकदम दुप्पट केलाय, यावर्षीपासून.

श्रीरंग_जोशी's picture

5 Jul 2015 - 6:49 pm | श्रीरंग_जोशी

मी काही काळ राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज १ मध्ये काम केले आहे. माझ्या हापिसच्या बाल्कनीवजा ब्रेक घेण्याच्या जागेतून काढलेला हा ब्लू रिज प्रकल्पाचा फोटो (नोव्हे २००७). त्या काळात सरकारी प्रकल्पाला लाजवेल इतक्या कूर्मगतीने काम सुरू होते. तेव्हा ऐकलेली किमान किंमत ₹५५ लक्ष होती. म्हणजे आता कदाचित ₹१.२५ कोटी वगैरे असावी (अंदाज)

BR

माझे दोन प्रश्न

  1. ब्लू रिजमध्ये राहणार्‍या रहिवाशांना राजीव गांधी इन्फोटेक पार्कातून बाहेर पडण्यासाठी व परत येण्यासाठी वेगळा रस्ता आहे का? की जो रस्ता तिथे काम करणारे वापरतात तोच वापरावा लागतो?
  2. इथे शाळा असली तरी नव्याने सुरु झालेल्या शाळेत (प्राथमिक शिक्षण वगळता) शिक्षणाच्या दर्जाबाबत काय परिस्थिती आहे.

५० लाख कशाचे ? प्लॉट की फ्लॅट ?

श्रीरंग_जोशी's picture

5 Jul 2015 - 8:21 pm | श्रीरंग_जोशी

तेव्हाच्या ऐकीव माहितीनुसार ब्लू रिज प्रकल्पातील सर्वात स्वस्त फ्लॅटची किंमत ₹५५ लक्ष होती.

सध्या बांधकाम व्यावसायिकांची कोटीच्या कोटी उड्डाणे असल्यामुळे हे दर परवडणार नाहीत. लाखाच्या किमतीत घर उपल्ब्ध असलेले एवढ्यात पाहण्यात नाही. अर्थात मी पहात असलेली ठिकाणे त्याला कारणीभूत असतील. पुण्यापासून लांब म्हणजे किती लांब जायचे? उगीच कारण नसताना घरे का घेऊन ठेवायची? असे प्रश्न आहेत, जे बरोबरही आहेत पण मला ब्लू रिज फोटूमध्ये बघून तरी आवडले होते म्हणून नस्त्या चौकश्या करतीये. ;)

सतिश गावडे's picture

6 Jul 2015 - 10:16 am | सतिश गावडे

लाखाच्या किमतीत घर उपल्ब्ध असलेले एवढ्यात पाहण्यात नाही.

वडगांव धायरी परिसरार चाळीस लाखाच्या आसपास किंमतीत १ बीएचके फ्लॅट मिळतात की.

रेवती's picture

6 Jul 2015 - 3:39 pm | रेवती

ओक्के.

गणेश माळी's picture

5 Jul 2015 - 11:06 pm | गणेश माळी

ही टाउनशीप आहे पुर्ण.९५% आयटी जणता...हिंजवडी अजुणहि गावच आहे.अजूण ५ वर्ष लागतील पुर्ण विकसीत व्हायला
मी १ वर्षापासून जातो हपीसला....

dadadarekar's picture

5 Jul 2015 - 11:48 pm | dadadarekar

नवीन मुम्बै सोडुन पुण्यात कशाला जायचे ?

ब़जरबट्टू's picture

6 Jul 2015 - 10:08 am | ब़जरबट्टू

हिंजेवाडी (हिंजवडी त्याला कूणीसुद्धा म्हणत नाही) मध्ये येताय, तर काही गोष्टींचा विचार नक्की करा.
१) हे पुणे नाही, नदीपलीकडेच पि.चि. सुरू होते.. :)
२) या रस्त्याने घरी जाणे त्रासदायकच राहणार आहे. रोडवर नेहमीच कोंडी असते, शनीवार - रवीवार सोडून.
३) घरातच राहणार असाल तर ठिक, कारण आजूबाजुचा परीसर एकदम भकास आहे तसा, म्हणजे पाच दिवस लोक असतात आजुबाजुला, पण विकांतला फक्त आजुबाजुची गुण्ठामंत्रीच. काही खरेदी करायची असल्यास औंध, पिंपरी हेच पर्याय आहेत, अर्थात डी-मार्ट व तत्सम दुकाने आहे या भागात.
४) घरे बघितली होती सुरवातीला, नुसते रेल्वेचे डबे आहेत. छोट्या खोल्या आणि लम्बुळके डिझाईन.. विशेष आवडले नव्हते. फक्त उंच टावर आहेत, आणि दोन बिल्डींगनधली जागा कमी वाटली.
५) एकीव माहितीनुसार शाळा फक्त ब्लू रिजपुरती नाही, म्हणजे तुम्ही तिथे राहता, म्हणून मिळेलच याची शाश्वती नाही. रात्रभर लाईन लावून फार्म मिळतो, मग दाखला, एकदा तपासून बघा..
६) जायचा रस्ता छोटा आहे, जो मोठा रस्ता बनवलाय, तो थोडा वळुन जातो.
७) अजून एका मिळालेल्या माहीतीनुसार, हिंजेवाडी ते बालेवाडी हा एक प्रकल्प रखडला आहे. बालेवाडीला जाणारा रस्ता हा ब्लू रिज ने जो आपला म्हंटलाय तोच रस्ता आहे, असे असेल तर पुढे हा आम रस्ता होणार, मग तर मज्जाच बघा... :)
८) नदीच्या चित्रावर जाऊ नका.. एव्हढी निळी नाहीये ती... :)
९) बाकी बांधकाम उच्च दर्जाचे आहे...व सुरक्षा छान आहे. पण एव्हढा मोठा परीसर म्हणजे खर्च असनारच...

सतिश गावडे's picture

6 Jul 2015 - 10:19 am | सतिश गावडे

८) नदीच्या चित्रावर जाऊ नका.. एव्हढी निळी नाहीये ती... :)

आजच्या घडीला ही नदी पुर्णपणे पान-वनस्पतींनी आच्छादलेली आहे. हिरवे हिरवे गार गालिचे पाण-वनस्पतींच्या मखमालीचे. :)

जडभरत's picture

6 Jul 2015 - 10:15 pm | जडभरत

हीः हीः हीः

१) हे पुणे नाही, नदीपलीकडेच पि.चि. सुरू होते.. :)

माझ्या माहितीप्रमाणे हिंजवडीची वेगळी ग्रामपंचायत आहे. हिंजवडी पुण्यातही येत नाही आणि पिंपरी-चिंचवडमध्येही येत नाही..

क्रेझी's picture

6 Jul 2015 - 11:40 am | क्रेझी

+१

संग्राम's picture

8 Jul 2015 - 6:48 pm | संग्राम

शाळा फक्त ब्लू रिजपुरती नाही पण प्रथम प्राधान्य ब्लू रिज मधील लोकांना आहे,

>> रात्रभर लाईन लावून फार्म मिळतो
आजकाल सोडत (लॉटरी) पद्धतीने प्रवेश देतात

मग ज्या मुलांना तिथे प्रवेश मिळणार नाही त्यांच्यासाठी दुसरी चांगली शाळा जवळपास आहे का?

संग्राम's picture

9 Jul 2015 - 12:08 pm | संग्राम

"ब्लू रिज" हिंजवडी फेज १ मध्ये आहे ... जवळपास "ट्री हाऊस", "पवार पब्लिक स्कूल" आणि थोडे दूर "इंदिरा", "अक्षरा इंटरनॅशनल", "युरो स्कूल", "माऊंट लिट्रा", "विझ्डम वल्ड स्कूल" इत्यादी शाळा आहेत ...

नावावरून तरी या शाळा पावरबाज दिसतायत.
फ्ल्याटच्या किमतीपेक्षा जास्त पैशे मुलांच्या शिक्षणाला लागणार असं दिसतय. माहितीबद्दल धन्यवाद.

कपिलमुनी's picture

9 Jul 2015 - 6:12 pm | कपिलमुनी

नायतर आमच्या समर्थ विद्यालय , आदर्श विद्यालय नूतन मराठीला काय ग्लॅमर नाय बगा :(

रेवती's picture

9 Jul 2015 - 6:21 pm | रेवती

अगदी हेच मनात आलं. देणगीदरांमुळे दिलेली वत्सलाबाई विद्यालय, आण्णासाहेब महाविद्यालय अशी नावे साधी वाटतात पण आईवडिलांना फी भरण्याचे टेन्शन कितपत असेल त्यावेळी? माझी दहावीच्या परिक्षेची फी ७० रुपये होती तर आई म्हणत होती की महागाई झाली.

अस्वस्थामा's picture

9 Jul 2015 - 7:52 pm | अस्वस्थामा

त्यावेळेस, मेथीची जुडी आणि दूधाचा प्रति लिटर दर काय होता म्हणतो मी.. ;)

रेवती's picture

9 Jul 2015 - 11:28 pm | रेवती

ही ही ही. तेही आहेच की! पण आजकाल मेथी पेरून उगवेपर्यंत भाव वाढलेले असतात.......

प्रसाद१९७१'s picture

6 Jul 2015 - 10:40 am | प्रसाद१९७१

तुम्ही जर बोटीवर असणार असाल आणि बायको/आई वडिल घरातच असणार असतील तर कोथरुड/बाणेर परीसरात जागा चांगल्या मिळतील. आणि माणसात रहातो आहोत असे वाटेल.

ब्ल्यु रीज ला घरातुन सोसायटीच्या गेट पर्यंत चालत पोचायलाच १० मिनीटे लागतात. तुमच्या घरच्यांना आठवड्याची भाजी ( महीन्याचा किराणा ) एका दिवशी आणुन ठेवण्याची सवय आहे का?

मी नक्की सांगतो, तुमचे आईवडीलांना नैराश्य येइल अश्या सोसायटीत रहायला जावुन.

जुल्या बिल्डींग मधल्या खोल्या मोठ्या आहेत. नविन बिल्डींग मधे खुराडी आहेत.

मित्रहो's picture

6 Jul 2015 - 11:05 am | मित्रहो

भाडे किती असेल?
इंटरनेटवर २० हजारापासून ते ३६ हजारापर्यंत भाडे दाखवित आहे.

चिनार's picture

6 Jul 2015 - 11:23 am | चिनार

पुण्यात घर घेण्याआधी अस्मादिकांचा खालील लेख जरूर वाचवा
http://www.misalpav.com/node/29925
प्रस्तुत लेख लोकप्रभा मध्ये प्रकाशित झाला आहे.
http://epaper.lokprabha.com/528943/Lokprabha/03-07-2015#dual/46/1

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Jul 2015 - 11:41 am | माईसाहेब कुरसूंदीकर

परांजपे पूर्वी मध्यमवर्गाला परवडतील अशी घरे बांधण्याबद्दल प्रसिद्ध होते.पण सध्याची परिस्थिती खूपच बदललेली दिसतेय. आसपसच कुमार बिल्डर्सचे बांधकाम चालु आहे असेही वाचले होते.

टवाळ कार्टा's picture

6 Jul 2015 - 1:12 pm | टवाळ कार्टा

मै आल्या :)

माई आहेत, मी एव्हाना वड्यांचं पीठ गिरणीत द्यायचा विचार करत होतो. ऐन श्राद्धाच्या दिवशी गडबड नको म्हणून!!

नाखु's picture

6 Jul 2015 - 11:55 am | नाखु

मामो ऑन "अरे चिनार्‍या बराच लब्बाड आहेस की मासीकात लेख बि़ख छापून आले, तसे घर घ्यायचे म्हणजे खायची गोष्ट नाही असं आमचे हे श्री गुरुजी भावजींना म्हणताना ग्रेट्थिंकर्नी ऐकले असे हितेसभाई दादरकरला सांगत होता अशी कुजबुज कुमठेकर आणि सचिन मध्ये चालली होती असा आप्ला दमामीला वाटते खरे खोटे टक्याला माहीती असेल"

मामो ऑफ

चिनार's picture

6 Jul 2015 - 12:13 pm | चिनार

हा हा हा ..
स्वत:चे लेख कुठल्यातरी हिंदुत्ववादी मासिकात छापून आणायचे आणि स्वत:चा व हिंदुत्वाचा उदो उदो करायचा. हिंदूंची ही जुनी खोड आहे ...!
-- कुठला मोड ते सांगायची गरज नसेलच..

.

उगा काहितरीच's picture

8 Jul 2015 - 9:14 pm | उगा काहितरीच

कुमठेकर आणि सचिन मध्ये चालली होती

सचीन होते ते !

होबासराव's picture

6 Jul 2015 - 3:34 pm | होबासराव

ते हितेस 'द'रेकर हायेत

नाखु's picture

6 Jul 2015 - 4:01 pm | नाखु

रेकून र फार उडाला याची नोंद घ्यावी.

पुढच्या वेळी प्रूफे तपासाओनच छापली जातील.

डोंबिवलीत पलावा सिटीचा विचार करु शकता. २ बी. एच. के. ६० ते ७० लाखांपर्यन्त जातो. मेंटेनन्स साधारणतः ३००० आहे. गोल्फ क्लब मेंबरशिप ऑप्शनल आहे. महत्वाचे फ्लॅट घेणार असाल तर रिसेल घ्या. लोढा वेळेवर पझेशन देत नाही.

(मी ब्रोकर नाही.)

अजुन माहिती हवी असल्यास व्य. नि. करा