जाती आधारीत जनगणना २०११ च्या निष्कर्षांचा पहिला टप्पा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
4 Jul 2015 - 12:21 pm
गाभा: 

मी जातींचा जातीवादाचा आणि जात आधारीत जनगणनेचा समर्थक नव्हतो नाही आणि नसेन. कारण कोणत्याही मनुष्याच्या व्यवसाय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येणारे जन्माधारीत जात विषयक निकष व्यक्ती आणि समाज या दोन्हींच्या आरोग्यास आणि प्रगतीस हितावह नाहीत आणि कोणतीही जातीय गणना धार्मीक, सामाजीक, राजकीय आणि आर्थीक नेतृत्वाचे जाती निर्मुलनातील अपयश भरून काढण्यास कितपत उपयूक्त ठरेल या बाबत मी प्रामाणिकपणे साशंकीत राहीलो आहे. जात या घटकाची बिनचूक माहिती मिळवणे नेहमीच कठीण होते २०व्या शतकाच्या उत्तरार्धापासून जातीच्या हितसंबंधांची गणिते बदलल्याने अशा कोणत्याही माहीतीच्या अचुकतेची साशंकता शिल्लक राहीलच.

तरीही आपल्या बाजूचा समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण आपल्या व्यक्तीगत मतांसाठी थांबत नाही ते त्याची दिशा निवडत जाते. असो. तर माझी तुमची इच्छा असो नसो भारत सरकारने २०११ मध्ये जात निहाय सामाजीक आर्थीक जनगणना घेण्याचे ठरवले जनगणना झाली आणि सावकाशीने आणि हातचे राखून का होईना आकडेवारीचा पहीला टप्पा जाहीर होऊन चर्चेसाठी तुमच्या आमच्या पुढ्यात आहेच. सरकारने तुर्तास हातची राखलेली आकडेवारी पुढे मागे एनकेनप्रकारे बाहेर येण्याची शक्यता असेलच, तेव्हा चर्चा न होण्यापेक्षा मनमोकळेपणाने नव्याने उपलब्ध आकडेवारीची चर्चा झालेली बरी.

गाव, तालुका राज्यवार कुटूंब निहाय माहिती आंतरजालावर http://secc.gov.in/state या आणि http://secc.gov.in/stateFinalList या दुव्यांवर आधीपासूनच उपलब्ध केली गेली आहे. (प्रत्येक कुटूंबाची एवढी डिटेल माहिती आंतरजालावर उपलब्ध असणे यात प्रायव्हसीचे अंशतः तरी खोबरे होतेच पण आलीया भोगासी असावे सादर म्हणून स्विकारण्याशिवाय कुणासही पर्याय नाही असो) पण हि आकडेवारी एकत्रीत स्वरूपात उपलब्ध नव्हती ती http://secc.gov.in/staticReport या दुव्यावर उपलब्ध आहे.

शिवाय विवीध वृत्तपत्रांनी या विषयी बातम्या दिल्या आहेत त्या पैकी आपणास सुयोग्य वाटणार्‍या बातम्यांचे संदर्भ घेऊन चर्चेची सुरवात करावी.

प्रतिक्रिया

dadadarekar's picture

4 Jul 2015 - 12:30 pm | dadadarekar

जातीविषयक आकडेवारी असणं / ठेवणं यात गैर काहीच नाही.

माहितगार's picture

4 Jul 2015 - 12:51 pm | माहितगार

ठिकेना, आता आकडेवारी तुमच्या पुढ्यात आहे त्याच्या आधारे काय आणि कसे साध्य करणार हा मुख्य प्रश्न आहे !

संदीप डांगे's picture

4 Jul 2015 - 3:29 pm | संदीप डांगे

लिंका चालत नै ओ..

माहितगार's picture

4 Jul 2015 - 3:42 pm | माहितगार

मला तीनही लिंका उघडतात. (मी फायरफॉक्स ब्राऊजर वापरतो आहे)

संदीप डांगे's picture

4 Jul 2015 - 3:49 pm | संदीप डांगे

मी पण फाफॉच वापरतो.. अजून कोणाला येतोय हा प्रॉब्लेम?

संदीप डांगे's picture

4 Jul 2015 - 3:50 pm | संदीप डांगे

आत्ता उघडल्या. आधी काय माहित काय झालं होतं..?

फुले, शाहू, आंबेडकरांच्या (इतर कुणी नव्हतेच) महाराष्ट्राचा डेटा उपलब्ध का केला नाही त्यात????

प्रकाश घाटपांडे's picture

4 Jul 2015 - 4:33 pm | प्रकाश घाटपांडे

स्वल्पविराम नाही डॅश द्यायचा असतो.

माहितगार's picture

4 Jul 2015 - 4:54 pm | माहितगार

वरच्या एका लिंकेत महाराष्ट्राचा ड्राफ्ट (कच्चा) डाटा उपलब्ध आहे. तोही इतर राज्यांच्या मानाने फारच उशीरा अपलोड केला गेला असावा. त्याचे फायनल कन्फर्मेशन अजून कदाचित दिले गेले नसावे म्हणून प्रकाशित आकडेवारीत महाराष्ट्राच्या आकडेवारीचा समावेश आहे की नाही माहीत नाही. काही राज्यांची आकडेवारी उपलब्ध नसतानाच सरकारने आकडेवारी प्रकाशीत केली असल्यास बिहारच्या निवडणूकांचे प्रसिद्धी आराखड्यासाठी वेळ पाहून अहवाल प्रकाशित केला नसेलच असे सांगता येत नाही. कारण काही आकडेवारी स्वांतंत्र्यकाळापासून स्थितीत अपेक्षीत फरक पडला नसल्याचे दर्शवते. आणि याचा फायदा प्रतीपक्षावर टिकेसाठी होऊ शकत असल्यास कल्पना नाही.

dadadarekar's picture

4 Jul 2015 - 6:28 pm | dadadarekar

मागासवर्गीयांच्या विकासनिधीतून सुमारे १० लाख रुपये खर्चून वारकऱ्यांना पखवाज व वीणा ही वाद्ये देण्याचा सामाजिक न्याय विभागाने निर्णय घेतला आहे. या खात्याचे मंत्री राजकुमार बडोले यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.

http://m.loksatta.com/mumbai-news/backward-development-fund-sue-to-buy-v...

येडाफुफाटा's picture

4 Jul 2015 - 6:50 pm | येडाफुफाटा

महाराष्ट्राचा डाटा नाहीये की हो.