याला जबाबदार कोण?

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in काथ्याकूट
24 Jun 2015 - 10:26 am
गाभा: 

एक अपघात....न केलेला मधील उल्लेखिलेल्या अपघातग्रस्त गृहस्थांचे बेशुद्धावस्थेतच निधन झाल्याचे कळले.या गृहस्थाना तिथेच रक्तस्राव होत असलेल्या स्थितीत ठेऊन जमाव मारामारी करत होता, त्यात मोलाचा वेळ वाया गेला. साधारण पाऊण तासाने पाली आरोग्य केंद्रात पोचल्यावर जखमीवर उपचार करण्याआधी तिथेही रुग्णवाहिका का आली नाही यावरून आधी डॉक्टरला मारहाण करण्यात आली. त्यातही वेळ वाया गेला.तिथे पाणी नसल्याने आणि इतर सोयीसुविधा नसल्याने जुजबी उपचार करून जखमीला अलिबाग सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.अलिबागहूनही थोडे उपचार करून जखमीला वाशी येथे एम.जी. एम.ला पाठवण्यात आले.पाचव्या दिवशी शुद्धीवर न येताच त्यांचे निधन झाले.इतक्या जणांचे जीव धोक्यात घालून काय उपयोग झाला?
याला जबाबदार कोण आहेत?
१.प्राथमिकता कशाला द्यायची हे न समजणारा जमाव.

२.जमावाला घाबरणारे डॉक्टरर्स,

३.डॉक्टर्सना संरक्षण देऊ न शकणारे शासन.

५.आपल्या गावातली आरोग्यसेवा नीट आहे की नाही हे न पाहणारे; “मी पण लावू शकतो सी.एम.ला फोन, म्हणणारे आणि “लावा,मी बोलते त्यांच्याशी “ असे सांगितल्यवर शेपूट घालणारे ; आणि अनुयायांना आवरू न शकणारे नेतागण.

६.स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी मूलभूत सोयी न सेऊ शकणारे शासन.

५.एकांगी बातम्या देणारे बातमीदार.या बातमीदाराचा फक्त दृष्टीकोन दिसला.(पेपरात काय होते ते वाचले नाही.)

हे शिक्षण शाळेपासून दिले पाहिजे असे वटते.त्याचा उपयोग होईल का?

प्रतिक्रिया

शालेय अभ्यासक्रमात नैतिकतेचे आणि जबाबदार नागरिकत्वाचे धडे असतातच. पण अशा गोष्टी माणूस शाळेबाहेर शिकतो. त्यातही आपले लहानपणीचे रोल मॉडेल म्हणजेच आई-बाबा आणि पौगंडावस्थेत आजूबाजूचे असे कोणी 'आदर्श' हे जास्त जबाबदार असतात.

मुक्त विहारि's picture

24 Jun 2015 - 11:10 am | मुक्त विहारि

भारत हा एक विचित्र देश आहे.....

NiluMP's picture

24 Jun 2015 - 10:48 pm | NiluMP

सहमत

नाखु's picture

24 Jun 2015 - 11:36 am | नाखु

या जमातीबाबत फार अपेक्षा ठेवणे चूक आहे. अगदी काल परवा फक्त नगरसेवकाच्या सांगण्यावरून मुंबई अग्निशमन दलातील कर्म्चार्याबद्दल २-३ दिवस उलट सुलट राळ ऊडवून बातमी बंद केली एकतर्फी!

१.प्राथमिकता कशाला द्यायची हे न समजणारा जमाव.

अडकाठी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची सोय हवी पाहिजेतर जागेचा पंच्नामा+चित्रिकरण केले जावे तातडीने आणि जबाबदारी घटणा स्थळाच्या जवळ असलेल्या पोलिस स्टेशनची असावी (हद्दीची हद्द न करता)

२.जमावाला घाबरणारे डॉक्टरर्स,

अडकाठी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची सोय हवी. कारण सगळेच डॉक्टर चोर नसतात तेव्हा दाखल करतानाचे अवथेचे चित्रिकरण करावे ( स्व्यंभू नेते आणि पुंडाचे वर्तन जरा नातेवाईकांना पाहू दे स्वतःच्या डोळ्याने)

३.डॉक्टर्सना संरक्षण देऊ न शकणारे शासन

प्राथमिक+किमान पारदर्शकता, सचोटी आणि जनतेचा विश्वास मिळवला तर नक्कीच बहुसंख्य लोकांना वाटेल की यात डॉक्टर्सना जबाबदार धरू नये. सुरूवात डॉक्टर्सना करावी लागेल.

कपिलमुनी's picture

24 Jun 2015 - 12:55 pm | कपिलमुनी

झाले ते दुर्दैवी आहे.

तुमच्या कुणावर त्याच्या अपघाती मृत्यूचा ठपका (पोलिस केस ) ठेवला आहे का ?

नूतन सावंत's picture

24 Jun 2015 - 6:12 pm | नूतन सावंत

कदाचित चालकाला त्रास होईल कारण एफ. आय. आर.मध्ये आमच्या गाडीने उडवले अशी तक्रार आहे,ती देणारा माणूस अपघाताच्या ठिकाणी हजरही नव्हता.गाडी भाड्याची होती पण आम्ही जबाब दिले आहेत.त्या जखमी झालेल्या गृहस्थांचा जबाब न झाल्यामुळे परिस्थितीजन्य पुराव्यावर ठरेल.आर ती.ओ.ने केलेला पंचनामा काय आहे ते समजले नाही.

तुमच्या साक्षी ग्राह्य धरणार नाहीत का?

अत्रन्गि पाउस's picture

24 Jun 2015 - 8:59 pm | अत्रन्गि पाउस

तुमच्या मागे येणारी भारतीय जनता हि ८०% अडाणी, निरक्षर आणि म्हणून तुमच्या मागे आलेली आहे ...

....

उगीच आठवले ...नै आवडले तर डिलीट मारा

नूतन सावंत's picture

24 Jun 2015 - 9:26 pm | नूतन सावंत

हे अगदि खरे आहे.टिळकांनी.आधी शिक्षण आणि मग स्वातंत्र्य
असे सांगितले होते पण गांधीनी ऐकले नाही त्यातच खाजगी मालमत्ता असल्यासारखे भारत हे हिंदुराष्ट्र म्हणून जाहीर न करता हिंदुस्थानचे तुकडे केले.

अमितसांगली's picture

24 Jun 2015 - 9:29 pm | अमितसांगली

विषय भरकवट नाही पण गांधीनी हिंदुस्थानचे तुकडे केले नाहीत....चर्चिलच डोक आहे....

अत्रन्गि पाउस's picture

24 Jun 2015 - 11:00 pm | अत्रन्गि पाउस

चर्चिल फार नंतर आले ....फाळणीची बीजे खूपच आधी पेरली गेली होती ... गांधींच्या धोरणांनी त्यात भर घातली ...

अस्वस्थामा's picture

24 Jun 2015 - 9:33 pm | अस्वस्थामा

हा विनोदी प्रतिसाद देण्याचे कारण समजले नाही.. उपरोध नसेल तर कोणीतरी दुरुस्त्या सुचवता काय ? (म्हणजे टिळक काय म्हणाले, आगरकर काय म्हणाले, गांधीं ... जौ दे राव. सांगा कुणी नै तर द्या सोडून.)

प्यारे१'s picture

27 Jun 2015 - 8:20 am | प्यारे१

टिळक की आगरकर? आधी समाजसुधारणा नंतर स्वातंत्र्य असं आगरकर म्हणाले ना? बाकी (न) केलेला पण झालेला अपघात आणि त्यानंतरचा राडा बेक्कारच होता.

नूतन सावंत's picture

24 Jun 2015 - 9:28 pm | नूतन सावंत

यशो,ते आता कोर्टातच ठरेल ना?

स्वाती दिनेश's picture

24 Jun 2015 - 11:02 pm | स्वाती दिनेश

झालं ते फार दुर्दैवी आहे.. :(
स्वाती

देश's picture

26 Jun 2015 - 5:09 pm | देश

त्या चालकाला त्रास होऊ नये असे मनापासुन वाटते. झाले ते वाईट झाले. तुम्ही दाखवलेल्या चांगुलपणाची आणि सेवाभावाची "शिक्षा" त्या चालकाला मिळु नये म्हणजे झाले

देश

चिगो's picture

26 Jun 2015 - 11:15 pm | चिगो

तुम्ही दाखवलेल्या चांगुलपणाची आणि सेवाभावाची "शिक्षा" त्या चालकाला मिळु नये म्हणजे झाले

हेच म्हणतो.. स्पष्टच बोलायचे झाल्यास, अश्या परीस्थितीमध्ये चालकाचे (खास क्रुन व्यावसायिक असल्यास) ऐकून निर्णय घ्यावा. तो सल्ला त्याच्या भल्या-बुर्‍या अनुभवातून आलेला असतो.

मंदार कुमठेकर's picture

26 Jun 2015 - 5:15 pm | मंदार कुमठेकर

भयानक आहे, झुंडशाहीचा परिणाम आहे सगळा.

संदिप एस's picture

27 Jun 2015 - 12:34 am | संदिप एस

चिगो +१
हा लेख आणी स्व्तःचा जवळ जवळ १५ वर्षांचा ड्रायव्हींग चा अनुभव आणी ऑफीस च्या कॅब च्या ड्रायव्हरची रिक्वेस्ट या सगळ्यांचा एकत्रित परिणाम.. रात्री १ वाजता एक २ व्हीलर मागच्या बाजूने अरुंद गल्ली असून्ही अतीशय जोरात ओव्ह्र्र्टेक करत होता पण ओल्या रस्त्यावर त्याचा त्याचा च अतिशाय वेगात स्लीप झाला आणी आमच्यासमोर बाजूच्या गटाराच्या कॉर्नर वर डोके आदळून पडला, पण वेळ आणी तो एरीया गाववाल्यांचा अस्ल्याने नाही थांबलो आता वाटतय बरच केलं ते, नाहेतर उगाच आमचा ड्रायव्ह्र्र त्याची चूक नसतांना पण अडकला अस्ता, नंतर तो मला धन्यवाद देत होता मी सपोर्ट केला म्हणून.
गाडीत ऑफीस चे जे कलीग्ज होते ते म्हणत होते की थांबुया का असं तेव्हा त्यांना हा लेख सांगितला ते पण शांत झाले मग नंतर.

कपिलमुनी's picture

27 Jun 2015 - 1:28 am | कपिलमुनी

१००, १०८ ला कॉल केलात का"?

नूतन सावंत's picture

27 Jun 2015 - 10:21 am | नूतन सावंत

@कपिलमुनी

१००, १०८ ला कॉल केलात का"?

हो.पण ते पुण्याच्या कंट्रोल रूमला जात होते.

@देश आणि चिगो

त्या चालकाला त्रास होऊ नये असे मनापासुन वाटते. झाले ते वाईट झाले. तुम्ही दाखवलेल्या चांगुलपणाची आणि सेवाभावाची "शिक्षा" त्या चालकाला मिळु नये म्हणजे झाले

हो. ते तर आहेच. यापुढे एकटे असतानाच समाजसेवा करेन बहुधा.त्या चालकाला शिक्षा तर मिळालीच.त्याला त्या मूर्ख जमावाने मारहाण केलीच.पण त्याचा जबाब झाल्याशिवाय( तो तमिळ असल्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून.) आणि त्यालाही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत आम्ही दोघेही त्याच्यासोबत थांबलो होतोच..शिवाय जबाबही दिला आहे.यानंतर कधीही अशी वेळ आली तर व्यावसायिक चालकाचा सल्ला मानेन.

त्या चालकाला आता शिक्षा होणार नाही.आर.टी.ओ.चा पंचनामा आणि डॉक्टरांच्या जबाबामुळे केस बंद होईल असे कळते.त्यासाठी एकदा कोर्टात जावे लागेल.

काल मी व नवरा जाऊन त्या दुर्दैवी बाईला (जखमीच्या बायकोला) भेटून आलो.तिला इन्शुरन्सची रक्कम मिळेल असे गाडीमालंकाने सांगितले आहे.तिलाही परिस्थितीची कल्पना आली आहे.लवकर वैद्यकीय मदत मिळाली असती तर फरक पडला असता असे डॉक्टरानी तिला सांगितले होते.

त्या माणसाचा पुतण्या,,ज्याने जखमीला मदत करणे सोडून मारामारीला सुरुवात केली,त्याच्यावर आणि खोटी फिर्याद देणार्यावर पोलिस कारवाई होत आहे.ही जमेची बाब.यासाठी कितीही वेळा कोर्टात जावे लागले तरी चालेल.

योगी९००'s picture

27 Jun 2015 - 10:39 am | योगी९००

त्या माणसाचा पुतण्या,,ज्याने जखमीला मदत करणे सोडून मारामारीला सुरुवात केली,त्याच्यावर आणि खोटी फिर्याद देणार्यावर पोलिस कारवाई होत आहे.ही जमेची बाब.यासाठी कितीही वेळा कोर्टात जावे लागले तरी चालेल.
हे वाचून भारतात कायदा ही गोष्ट आहे याची खात्री पटली. त्या पुतण्याला चपलेने हाणला पाहिजे सर्वांसमोर..

बाकी तुम्ही केलेल्या मदतीबद्दल तुमचे कौतूक वाटते. इतके सगळे होऊन सुद्धा तुम्ही परत त्या गावात जाऊन मरण पावलेल्या माणसाच्या बायकोला भेटून आलात ह्यामुळे माणुसकी कोठेतरी आहे आणि उद्या दुर्दैवाने माझ्यावर वेळ आली तर तुमच्यासारखी लोकं मदत करतील याची खात्री पटली.

काळा पहाड's picture

27 Jun 2015 - 11:14 am | काळा पहाड

तिला इन्शुरन्सची रक्कम मिळेल असे गाडीमालंकाने सांगितले आहे.

हे कशासाठी? कारण तुमची गाडी या सगळ्या प्रकारात इन्व्हॉल्व्ह नव्हती.

नूतन सावंत's picture

27 Jun 2015 - 11:33 am | नूतन सावंत

हे कशासाठी? कारण तुमची गाडी या सगळ्या प्रकारात इन्व्हॉल्व्ह नव्हती.

@काळापहाड तुमचे बरोबर आहे.ते मालकाने आधी सांगितले होते.आता त्याला विचारून खात्री करून घेतली.त्याने तिला थोडे पैसे दिले आहेत,कारण तिनेही पहिले तेच सांगितले.लोकांसारखे पैशांसाठी खोटे बोलली नाही.उगाचच अडवून धरले नाही.

तुम्ही हा लेख वापरण्याची परवानगी मागितली होती.मिपावर ठीक आहे नावानिशी लिहिलं होतं;तुम्ही नावे दिलीट करून वापरत असाल तर चालेल; कारण नंतर तो कुठे कुठे जाईल तर व्याप वाढायला नकोत.

<उद्या दुर्दैवाने माझ्यावर वेळ आली तर तुमच्यासारखी लोकं मदत करतील याची खात्री
पटली./blockquote>

नकोहो,योगि९०० अशी वेळ येण्याची कल्पनासुद्धा करू नका.

कपिलमुनी's picture

30 Jun 2015 - 3:05 pm | कपिलमुनी

१००, १०८ वाला प्रतिसाद संदिप एस यांच्यासाठी होता .

gogglya's picture

30 Jun 2015 - 6:01 pm | gogglya

बरोबरच त्या माणसाच्या बायकोला ही माहीती पण द्यायला हवी की मदत मिळण्यास उशीर झाला नसता तर कदाचीत चित्र आज वेगळे असते. तसेच या उशीरास जबाबदार कोण हे सुध्धा कळणे महत्त्वाचे आहे.

काळा पहाड's picture

30 Jun 2015 - 7:00 pm | काळा पहाड

आता सगळं बोलून झाल्यावर एक सूचना. मदत करायचीच असेल तर गाडी विरुद्ध बाजूला त्या माणसाच्या पुढे १०० मीटर उभी करा. निदान हा माणूस रस्त्यात पडलेला होता आणि पाहिल्यावर मदत करायला थांबलो असं तरी सांगता येतं. जाणकारांनी या सूचनेवर प्रकाश टाकावा.

सुबोध खरे's picture

30 Jun 2015 - 7:14 pm | सुबोध खरे

सुरंगी ताई
प्रत्यक्षात त्या चालकाला पोलिस इतके खेटे मारायला लावतील कि कंटाळून त्याला पोलिसांना पैसे द्यावेच लागतील.जर त्या चालकाचा मालक यात पडला आणि मामला "निपटवला" तर ठीक. अन्यथा त्या चालकाच्या नशिबी रायगड जिल्ह्यात पोलिस स्टेशन आणि केस उभ राहिली कि न्यायालयात खेटे मारणे आले. हा प्रकार म्हणजे खाया पिया कुछ नही. दुसरेने ग्लास तोड उसका दस रुपया असे होते. याच साठी मी लिहिले होते कि तुम्ही अशा जागेपासून दोन किमी दूर जाऊन पब्लिक फोन वरून पोलिसांना फोन लावणे हाच उपाय आहे. (मोबाइल वरून लावलात तर पोलिस तुमच्या कडे येतील पैसे खायला).कारण पोलिसांची आणि समाजाची धारणा अशीच आहे कि या वाहनातील लोक थांबले म्हणजे त्यांनीच ठोकले आहे.नाही तर उगाच कशाला कोण मदत करायला जाईल. आता ते तसे नाही हे सिद्ध करणे हि तुमचीच जबाबदारी राहते.आणि कोर्टाची पायरी एकदा चढून पहा म्हणजे मी काय म्हणतो ते समजून येईल.हीच आज वस्तुस्थिती आहे. कितीही नैतिकतेचे आणि जबाबदार नागरिकत्वाचे धडे घेतले असले तरी यातच शहाणपण आहे हे बर्याच मेडिको लीगल केसेस पाहून म्हणावे लागते. समाजाचे प्रबोधन होईपर्यंत असे किती निष्पाप लोक बळी जातील याची गणती नाही.

नूतन सावंत's picture

30 Jun 2015 - 8:31 pm | नूतन सावंत

खरेसाहेब्,वर देश आणि चिगो याच्या प्रतिसादात सविस्तर लिहिले आहे.

@ gogglyaत्या माणसाची पत्नी घटनास्थळी थोड्या वेळाने आली होती.तिने सर्व स्वतःच पहिले होते.शिवाय डॉ.नी तिला सर्व कल्पना दिली.