कार लोन का होम लोन टॉपअप?

नागेश कुलकर्णी's picture
नागेश कुलकर्णी in काथ्याकूट
23 Jun 2015 - 11:45 am
गाभा: 

नमस्कार मिपाकर,
हा माझा मिपावरील पहिलाच प्रयत्न, त्यामुळे चुकभुल देणेघेणे

तर मित्रांनो,
माझा एक मित्र आहे तो नविन गाडी घेण्याचा विचार करत आहे. फायनान्सकरीता तो दोन पर्यायांचा विचार करीत आहे.

  1. कार लोन
  2. फायदे - कमी व्याजदर, मर्यादित काळ (५ ते ७ वर्ष)
    तोटे - मिळकत करात सवलत नाही

  3. होम लोन टॉपअप
  4. फायदे - मिळकत करात सवलत (कार आणी जागा घेतल्यास) , स्टेट बॅकेचे घेतल्यास मॅक्सगेनचा फायदा घेता येइल.
    तोटे - व्याजदर कार लोनपेक्षा थोडा जास्त

होम लोन टॉपअप मिळण्यासाठी पात्रता

१. तुम्ही होम लोन धारक असावे आणी कमीतकमी २/३ वर्षे हफ्ते वेळेवर भरलेले असावे.
२. अधिकतम टॉपअप रक्कम = घराची सध्याची बाजारातील किमत - आधी घेतलेले कर्ज
३. परतफेड होम लोनचा कालावधी असेपर्यन्त
४. मिळकत करातील सवलती - जर तुम्ही घराची डागडुजी अथवा घराची सजावट करणार असाल अथवा नविन घर अथवा जागा घेणार असाल तर

तर माझा मित्र थोडस जास्त कर्ज घेऊन, त्यात एक कार आणी योग्य संधी मिळाली कि जागा (प्लॉट) घ्यायच्या विचारात आहे.
तुमच्या पैकी कुणी अस केल आहे का? असल्यास यातील फायदे व तोटे नेमके कोणते?

प्रथमदर्शनी टॉपअप हा चांगला पर्याय वाटत आहे.

प्रतिक्रिया

उगा एकमेकात खिचडी करायची नाही म्हणुन कार लोन घेतले.
आणी फास्ट ट्रॅक मध्ये ते फेडण्याकडे लक्ष दिले.

त्यावेळी कार लोन १०.७५ टक्के दर होता.
ह्याच्यापेक्षा स्वस्त टॉप अप लोन मिळाल नसतच.
होम लोनच १०.७५ टक्के सुरु होत.

मला पैशाच गणित जास्त कळत नसल्याने सोप्पे मार्ग वापरतो मी.
मित्राला शुभेच्छा.
त्याचा निर्णय काय झाला आणि तो तसा का घेतला ह्याचा आढावा नंतर नक्की द्या.
इतरेजनांना फायद्याच होइल ते.

स्पा's picture

23 Jun 2015 - 12:09 pm | स्पा

आयड्या चांगली आहे,

सध्याचा कर लोन चा रेट किती आहे ते पाहायला हवे ,

होम लोन ९.८० पासून सुरु आहे.
एखाद टक्क्याचा फरक असेल तर मग गरज नाही , कारण होम लोन ची प्रोसिजर खूपच वेळखाऊ असते

नागेश कुलकर्णी's picture

23 Jun 2015 - 12:26 pm | नागेश कुलकर्णी

चालु होम लोनवरतीच हे टॉपअप असल्याने प्रोसिजरला वेळ लागणार नाही अस वाटतय?

बिहाग's picture

24 Jun 2015 - 10:26 am | बिहाग

सध्या इंटरेस्ट रेट खाली येण्याची दाट शक्यता आहे. कार लोन मध्ये प्री पेमेंट नसते आणि रेट फिक्स असतो . त्यामुळे टॉपअप हा चांगला पर्याय.

होम लोन ची प्रोसिजर खूपच वेळखाऊ असते -> असहमत

सुबोध खरे's picture

24 Jun 2015 - 11:35 am | सुबोध खरे

"कार लोन मध्ये प्री पेमेंट नसते"
असहमत
मी माझे ७ वर्षाचे कार लोन ४ वर्षात फेडले. एकही पैसा जास्त न देता. कर्ज देणाऱ्या कंपनीला विचारून घ्या लवकर फेडले तर दंड बसवणार का? आणि तसे लिहून घ्या. कर्ज देताना ते तुमच्या सर्व अटी मान्य करतात नंतर नाही.

झकासराव's picture

24 Jun 2015 - 11:58 am | झकासराव

मी सरकारी बॅन्केतुन कार लोन घेतले. (आमची शिन्डिकेट लै भारी)
एकही रुपया दन्डाखातर न भरता अधे मधे एक्स्ट्रा पेमेन्ट करत आहे.
शिवाय कार लोन हे डेली रिड्युसिन्ग बॅलेन्स वरच दिले आहे.

फिक्स रेट प्रायव्हेट बॅन्काचा असेल तर माहिती नाही.

बिहाग's picture

24 Jun 2015 - 10:12 pm | बिहाग

शिवाय कार लोन हे डेली रिड्युसिन्ग बॅलेन्स वरच दिले आहे.

- नवीन माहिती बद्द्ल धन्यवाद .

आदूबाळ's picture

24 Jun 2015 - 12:36 pm | आदूबाळ

४. मिळकत करातील सवलती - जर तुम्ही घराची डागडुजी अथवा घराची सजावट करणार असाल अथवा नविन घर अथवा जागा घेणार असाल तर

पण कार घेणं हे वरील निकषांत कसं काय बसतं?

नागेश कुलकर्णी's picture

24 Jun 2015 - 1:55 pm | नागेश कुलकर्णी

कार आणी घराची डागडुजी अथवा घराची सजावट अथवा नविन घर अथवा नविन जागा हे एकत्र केल्यास होउ शकेल

आदूबाळ's picture

24 Jun 2015 - 2:10 pm | आदूबाळ

तरीही नाही समजलं.

समजा रु. १०० चा होम लोन टॉप-अप केला. त्यातल्या रु.६० वापरून घर सजवलं, आणि रु. ४० वापरून कार घेतली, तरी करसवलत रु. १०० वर मिळेल.

तुमचं म्हणणं असं आहे का?

धर्मराजमुटके's picture

24 Jun 2015 - 1:07 pm | धर्मराजमुटके

माझ्या माहितीप्रमाणे टॉप अप लोनला करसवलत मिळत नाही. बरोबर माहितीकरीता तुमच्या कर सल्लागारास भेटा.

बँक वाले बसवून देऊ शकतात जर घर घॆउन १-२ वर्ष झाली असतील तर. .

नागेश कुलकर्णी's picture

24 Jun 2015 - 1:57 pm | नागेश कुलकर्णी

कार आणी घराची डागडुजी अथवा घराची सजावट अथवा नविन घर अथवा नविन जागा हे एकत्र केल्यास होउ शकेल

योगी९००'s picture

24 Jun 2015 - 7:01 pm | योगी९००

कार ही अ‍ॅसेट नसुन liability आहे. कार ही आपल्या कंफर्टसाठी घेण्याची गोष्ट आहे. कार घेऊन मेंटेनन्स, पेट्रोल असा खर्च आहे. कारची वॅल्यू कालांतराने कमी होत जाणारी आहे त्यामुळे अशा गोष्टी साठी लोन घेणे बरोबर वाटत नाही.

कार घेऊन जर ट्रॅवलचा धंदा करणार असाल आणि फायदा होत असेल तरच लोन घेऊन कार घ्यावी.

बाकी घराची डागडुजी अथवा घराची सजावट अशी खोटी बिले दाखवून त्यावर लोन मंजूर करून घेऊन त्याऐवजी कार घेणे ही गोष्ट पटत नाही.

मित्रहो's picture

24 Jun 2015 - 7:58 pm | मित्रहो

तेही तीन किंवा चार वर्षासाठी. लवकर फेडून कमी पैशात कार स्वतःची करता येते.