सगळेजण प्रवासाने थकले होते. मग प्रत्येकाने आपापल्या खोलीत आराम केला. हे हॉटेल फक्त निवासा करिता होते. रात्रौ ९.०० वाजता जेवायला थोडे अंदाजे ८०० मीटर अंतरावर असलेल्या एका दुसर्या हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे असे सांगितले गेले. पण कोणीचीही त्या बद्दल काहीच तक्रार नव्हतीच. उलट सगळे त्या आल्हादायक वातावरणात मस्तपैकी थंड हवेत (तापमान बहुतेक २५ असावे) आणि चांदण्यात फिरत फिरत तिथे पोहचले. जेवण रुचकर होते.
या हॉटेलात स्वागत कक्षाच्यासमोर असलेल्या बागेला पाणी घालण्यासाठी एकदम छोटा रहाट होता.
असा रहाट पुर्वी बैलांना / रेड्यांना जुंपुन ओढताना आपण सर्वांनी पाहिला असेल पण या रहाटाला एक मोटर जोडलेली होती. मला ती कल्पना अतिशय आवडली.
छोटा रहाट
जेवण झाल्यावर निवासी हॉटेलवर परत येताना पुन्हा तोच अनुभव घेतला. अंधुकश्या प्रकाशात हे ठिकाण चोहोबाजुंनी डोंगरांनी वेढलेले आहे असे दिसले. सकाळी ६.०० वाजता उठुन पाहिले तो खरंच हॉटेलच्या मागच्या बाजुला फटफटु लागलं होतं आणि सुर्यनारायण थोड्याच वेळात दर्शन देणार होते. वातावरण थंडगार होते. तोंडातुन वाफा बाहेर पडत होत्या.लहानपणी शाळेत असताना खुप थंडी पडली की आम्ही मुलं मग तोंडातुन वाफा बाहेर टाकत सिगारेट पिण्याचा अभिनय करायचो ते आज इतक्या वर्षानंतर अनुभवायला मिळाले. आताशा इतकी थंडी मुंबई ठाण्यात अनुभवता येत नाही. त्यामुळे माझ्या मुलाला त्याचे अप्रुप वाटले. डोंगराच्या कड्यांनी धुक्याची दुलई पांघरली होती.
हे आमच्या हॉटेलमधिल खोलीतुन दिसणारे दृष्य
मग चहा नाश्ता उरकुन आम्ही टी-कंन्ट्री या स्थ़ळावर चहा मळा पहाण्यासाठी गेलो. जाताना रस्ता नागमोडी जात होता व दोन्ही बाजुने चहाचे मळे, निलगीरी, सुरु सारखी दिसणारी झाडे होती.
वळणघाटाचा रस्ता-१
वळणघाटाचा रस्ता-२
या ठिकाणी स्थानिक चहापत्ती तोडणार्या महिलांच्या वेषात आमच्या बसमधल्या महिलांनी फोटोसेशन केले. एक फोटोचे प्रत्येकी ३० रुपये . तिथे सर्व फोटोग्राफर ही स्थानिक शाळा , कॉलेजात जाणारी मुलेच होती. पुढे बस मधुपट्टीला निघाली. स्पीडबोटींगचा थरार अनुभवायला.
चहाचा मळा
इथे काढलेल्या फोटोची प्रत मधुपट्टीहुन परत येताना घ्यायची होती. वाटेत चालत्या बसमधुन मोबाईलद्वारे काही फोटो काढले.
या फोटोत जी खाली हिरवी वनराई आहे ती सर्व झाडे वेलचीची आहेत.
ही बाकुशी छोटुशी रानटी फुले मला खुप आवडली.
मधुपट्टी येथे नदीचे पाणी धरणाद्वारे अडवल्यामुळे एक मोठासा जलायश तयार झाला आहे. त्याचा फायदा घेऊन स्पीड बोटींगची व्यवस्था तिथे केली गेली आहे. किमान ५ जण एका बोटीत बसतात. आजुबाजुला मस्त नैसर्गिक सौंदर्य आहे. इथे बोटींना खुप जोरात नदीच्या प्रवाहाच्या विरुध्दा बाजुला घेवुन जातात आणि परत येण्याच्या वेळेस बोट धक्क्याला लागायच्या शेवटच्या टप्प्यात मुद्दामहुन जोरात डावी उजवी कडे हेलकावे देतात.
कौटुंबिक २०/२५ माणसांसाठी वेगळी मोठी बोट सेवा उपलब्ध आहे.
जलाशय
बोटींग थरार आणि समोरिल धुक्याने वेढलेले डोंगर.
बोटींगला जाण्यासाठी धक्यावर तयार असणारी मंडळी.
त्यानंतर आम्हाला एको पॉईंटकडे नेण्यात आले. ही जागा म्हणजे एक नदीचे पात्र असुन त्याच्या समोरिल डोंगरावर सुरुची आणि माडांची दाट झाडी आहेत. आपण या तीरावरुन हाळी दिली की पलिकडच्या तीरावरिल झाडांमधुन त्याचा प्रतिध्वनी येतो. इथे निसर्ग खुप सुंदर आहे.
हीच ती जागा. त्या पलिकडच्या झाडांमधुनच प्रतिध्वनी एकु येतो.
या नदीतही बोटींगची सोय आहे.
मुख्य रस्त्यावर खाद्यपदार्थ, आणि विविध कलाकुसरीच्या वस्तुंची स्थानिक दुकाने आहेत. तिथली ही काही छायाचित्र.
हा मल्लिंगाचा जिरेटोप.
विविध रंगी मण्यांच्या, शिंपल्यांच्या माळा
इथुन पुढे आम्हाला एराविकुलम राष्ट्रीय उद्यान येथे नेण्यात आले. पण जाई पर्यंत ते राष्ट्रीय उद्यान बंद तर होणार नाही ना अशी धास्ती मॅनेजरला होती. या वरुन एकच कल्ला झाला की आधी राष्ट्रीय उद्यान करुन मगच इकडे आणायचे होते कारण एको पॉईंट काय माथेरानला पण पहाता आला असता. राष्ट्रीय उद्यानात पोहचेपर्यंत संध्याकाळचे ४.०० वाजुन गेले होते. राष्ट्रीय उद्यानाच्या प्रेवशद्वारापाशी गेलो तर ही भली मोठी रांग. सर्व जण रांगेत उभे राहीलो. काही इतर लोकही तिकिट मिळेल ना मिळेल या आशेवर रांगेत उभे होते. उद्यानात फिरण्यासाठी ४ मिनीबसची सोय आहे. हे पार्क ९७.०० किमी वर्ग परिसरात पसरले आहे. सांबर, कोल्हा, चित्ता असे प्राणी आहेत. पण खास वैशिष्ठय म्हणजे निलगिरी थार (Niligiri tahr) नावाची बकरी जी कोणत्याही अवघड डोंगर कपारीत, लहान जागेत सहज चढुन जाते.
आमची रांग हळुहळु पुढे सरकत होती. हुsssश अखेर ४.३० ला अम्हाला सर्वांना तिकिटे मिळाली....
क्रमशः
प्रतिक्रिया
18 Jun 2015 - 12:37 pm | कंजूस
मस्त फोटो.
18 Jun 2015 - 12:45 pm | टवाळ कार्टा
+१
18 Jun 2015 - 1:56 pm | गणेशा
हा भाग ही मस्त .. आवडला...
मुन्नार म्हणजे मराठीत त्रीवेणी- तीन नद्यांच्या संगम...
मुट्टुपुट्टु डॅम आम्ही गेलो होतो तेंव्हा खुप भरलेला होता... आता पावसाळ्यात तेथे खुप पाऊस होतो...
चहाच्या मळ्यांचा फोटो आवडला...
जुनी ट्रीप आठवली.. आणि पुन्हा तिकडे एकदा जाऊनच यावे असे वाटले तुमच्यामुळे... बघु... उटी साईड ची ट्रिप करताना मुन्नार करता येवु शकते, हे मी तेंव्हा केलेले अनुमान होते...
बाकी वातावरण खुप अल्हाद-मस्त असते ना तेथे .. मजाच एकदम..
18 Jun 2015 - 2:14 pm | वेल्लाभट
उत्तम ! ! !
आमची ट्रिप आठवली
18 Jun 2015 - 3:54 pm | अत्रुप्त आत्मा
लै मस्स्स्स्त फोटू आणि वर्णन.
तो रहाट लैच आवडला.
18 Jun 2015 - 3:59 pm | सूड
छान, ती छोटीशी रानटी फुले गंधारीची आहेत.
18 Jun 2015 - 4:16 pm | प्रमोद देर्देकर
माहितीसाठी धन्यवाद सुड पण आपल्या कोकणात अशी रानटी फुले येत नाहीत. सड्यावर गेल्यावर एकतर पांढर्या रंगाची असातात आणि एक निळ्या रंगाची असतात जी एवढीच छोटी असतात. ही निळ्या रंगाची बरोबर संध्या. ६.०० वाजता फुलतात. त्यावरुन म्हणे गुराखी घराकडे परतात.
अवांतर :- या फुलाची काही उपयोग आहे का ? म्हणजे काही वनौषोधी वगैरे.
गुरुजी मला ही तो राहाट खुपच आवडला आणि तो चांगल्या स्थितीत आहे. मोटर चालु केली की चालतो सुध्दा
18 Jun 2015 - 5:12 pm | रुस्तम
हे वाचा
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=655993627834139&id=514...
http://daytodaynature.wordpress.com/
।खल्ली
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=655993627834139&id=514...
http://daytodaynature.wordpress.com/
18 Jun 2015 - 4:30 pm | अजया
छान फोटो आणि वर्णन.
18 Jun 2015 - 5:29 pm | पद्मावति
छान वर्णन करताय आणि फोटो पण.
19 Jun 2015 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं चालली आहे सफर. फोटो आवडले !
19 Jun 2015 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं चालली आहे सफर. फोटो आवडले !
19 Jun 2015 - 8:13 pm | खटपट्या
खूप छान फोटो..