मागच्यावेळी "रानमळा"ला झालेल्या कट्ट्याला वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या मिपाकरांना बोलवायला जमले नाही...यावेळी काळ्या दगडावरची रेघ असणार्या मध्यवर्ती ठिकाणी होणार्या कट्ट्यामुळे पुणेकरांची जळजळ होऊ नये या उदात्त हेतूने पुण्यातसुध्धा कट्टा होऊन जाउदे असे ठरवले...अनायसे पनीर शेखसुध्धा पुण्यात होते (कट्टेवालोंको कट्टे का सिर्फ बहाना चाहिये). हा कट्टा करायचे ठरवले आणि त्यातच मुविंनी आकुर्डीच्या कट्ट्याची घोषणा केली त्यामुळे हा कट्टा होणार की नाही...झालाच तर मिपाकर येतील की नाही याची धाकधूक होतीच.
पण नुसता कट्टा करायचे असे म्हटले आणि काय तो पुणेकरांचा "उत"साह दिसला...चक्क ३ धागे आणि जवळपास साडेतीनशेपेक्षा जास्त प्रतिसाद...प्रतिसाद + सूचना यांचा भडिमार नुस्ता...एखादा नवखा मिपाकर कैच्याकै हुरळून जाईल अश्याने (मी अनुभवी होतो म्हणून ठिक आहे :D ) काही जणांचा उतसाह इतका की पक्षी+तीर्थ कट्ट्यासाठी शुध्द सात्विक शाकाहारी जेवण मिळण्याचे ठिकाण सुचवले गेले (आता हा पुणेरी खौचट्टपणा होता हे मी लग्गेच ओळखलेले llllllluuuullllluuuu)
बाकी सगळ्या हौश्या + नवश्या + गवश्यांनी भरलेल्या ३ धाग्यांच्या जवळपास साडेतीनशे प्रतिसादांत उपयोगाचे कैच नव्हते...यालाच पुण्यात चोखंदळपणा म्हणतात अशी जुनीच माहिती नव्याने समजली...काही अतीउतसाही मिपाकरांनी या चोखंदळपणाचा संबंध लग्गॆच पुण्यात (न झालेली) मेट्रो, पुण्यातले खड्डे याच्याशीही लावायचा प्रयत्न केला परंतू पुणेकरांनी त्यांना तितक्याच तत्परतेने फाट्यावर मारले...शेवटी पुणेकरच हो ते...स्वतःचा मुद्दा कितीही चुकीचा असो शेवटचे वाक्य स्वतःचेच असले पाहिजे हा अट्टहास =))
तर शेवटी कट्टा करण्यास काही टाळकी तरी जमली तर काहींनी व्यवस्थित टांग मारली त्यातील काही मानाचे टांगारू (पुराव्यासकट)
नाखू (http://www.misalpav.com/comment/691942#comment-691942)
मितान (http://www.misalpav.com/comment/692016#comment-692016)
देवांग (http://www.misalpav.com/comment/692055#comment-692055)
पिलीयन रायडर (http://www.misalpav.com/comment/692115#comment-692115)
ठरल्याप्रमाणे ६ तारखेला संध्याकाळी पनीर शेख सगाकडे पोहोचले आणि दोघांनी मिळून शेजारीच सूडच्या घराकडे कूच (मराठीतला) केले...मी फ़ूरसूंगीहून व्हाया स्वारगेट सगाकडे पोहोचायला PMPML च्या कृपेने फक्त १ तास लागला. सूडच्या घरी पोचत असतानाच २ चेहरे खिडकीच्या गजांमधून डोकावून माझ्या दिशेने हातवारे करताना दिसले...इतके अतिउत्साही लोक मिपाकर सोडून दुसरे कोणी असूच शकत नै याची खात्री होतीच :) सूडच्या घरी मात्र अगदी दोन शेजारी मिळून रोजच्या शिळोप्याच्या गप्पा कराव्या तश्या गप्पा रंगल्या
सूडचे घर म्हणजे खरोखर त्याने घरावर सूड उगवल्यासाराखेच आहे =)) मी जास्त काही सांगणार नै नाहीतर तो घर आवरायला लावेल ;) पण त्याच्याकडचे रसगुल्ले (पिणे अनिवार्य असणार्या पाकासकट) मात्र भन्नाट होते...बोलता बोलता असे समजले की सूड त्याच्या मावशीकडे(?) स्वारगेटला जाउन मग कट्ट्याला येणार होता. खाखोदेजा कारण १० मिनीटांत येतो सांगून तो जो सटकला ते जवळपास अर्ध्या-पाउण तासाने आला तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी सगाच्या घरी गप्पांचा अड्डा जमवला, बुवाबाजी करणारे एक अत्तरवाले सुध्धा विदाउट अत्तर आले (कदाचित अत्तरे खास लोक येणार असतील तेव्हाच जवळ बाळगीत असावेत :), आल्या आल्या लग्गेचच त्यांनी बूच लावण्याचे उपाय यावर एक काथ्या कुटला :)
पनीरबाबा अत्तरबुवांशी गप्पा मारत असतानाच अचानक सगा "अरे मला कोणीतरी मिस कॉल देत आहे" असे बोंबलला...त्या नंबरला फोन करताच "अर्रे (आळश्यांन्नो) कुठे (उलथला) आहात...पोचलात का (शिंच्यांन्नो)...माझा इथे (सद्गुणांचा) पुतळा झालाय" अशी आर्तमग्न मधुर वाणी ऐकू आली. नेमक्या त्याच वेळी माझ्या चतुरभ्रमणध्वनीवरसुध्धा तस्साच मेसेज आलेला आणि मग लक्षात आले...धाग्यावर येणार असे न सांगून एक मृत्युंजय असणारा पुणेकर (तो पुणेकर आहे हे त्याचे मत) शोरबामध्ये पोहोचलेला...मग मात्र आम्ही कट्ट्याच्या ठिकाणी कूच केली...या वेळेस तरी ती मिपाप्रसिध्ध उडनमांडी बघायला मिळेल या आशेने पनीरबाबा बुवांच्या activa वर स्थानापन्न झाले परंतू त्यांची ती इच्छा अपूर्णच राहीली आणि नंतर कदाचित मत्स्याहार व सोनेरी पाण्याच्या आस्वादाने ती इच्छा विसरली गेली असावी ;)
कट्टा सुरु करताना काही मिपाकरांची वेगवेगळ्या कारणांसाठी तीव्रतेने आठवण काढली गेली (मुवि, नाखू, वल्ली, औरंगजेब उचक्या लागलेल्या का?). सूड सुध्धा तोपर्यंत (एकदाचा) आला...मग जी धमाल सुरु झाली त्यातून शोरबाचे वेटरसुध्धा सुटले नाहीत :) प्रत्येकाने आपापल्या आवडीने सामिष/गवताळ खाणे आणि (झेपेल ते व झेपेल तितकेच) रंगीत पाणी मागवले...आणि मग आजकाल मिपावर सर्वांत लोकप्रिय असलेले गणपति व सरस्वती कसे आहेत याची चौकशी कथानायकाकडे करावी अशी बुवांना गळ घालण्यात आली (काही आगोबा मिपाकर यालाच गळाला लावणे असे बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही)...त्यातच ती सिंड्रेला आली आणि मग सिंड्रेलाची वैजू बनेल की बुवांचा पाद्री बनेल यावर एक दू दू संवाद रंगला :) पण बुवांनी विदेशी सिंड्रेला आणि विदेशी कार्बयुक्त पाणी एकमेकांत मिसळले की "लोहा ही लोहे को काटता है" या लॉजीकने विदेशी विदेशी क्यँसल होऊन ते देशी बनते असे शास्त्रीय कारण देऊन सिंड्रेलाची वैजू केली आणी तिचा आस्वाद घेतला (म्हणजे पेयाचा) ;)
बुवांनी शिताफीने वैजूच्या गोष्टींवरून गाडी हळूच कोकणावर वळवली आणि मग नेहमी प्रमाणे कोकणातल्या भुतांच्या गोष्टी सुरु झाल्या. बोलता बोलता नकळत कोकणातल्या एका holy ghost चा पर्दाफाश त्या दू दू भुताने स्वत:च केला =)). मग प्रत्येकाने आपापले सुपर नॅचरल अनुभव कथन केले पण त्यामुळे एक इब्लिस मिपाकर मात्र टरकला ;) आणि लगेच त्या रात्रीचा त्याचा मुक्काम सगाकडे असेल असे सगाला न विचारताच जाहिर केले :D. कट्टा सुरु असतानाच चिमणूचा फोन येउन गेला, लगेच सगाब्रोब्र काहीतरी कुजबुजसुध्धा करून घेतली...तीर्थकट्टा असल्याने कोणाचे विमान किती हवेत आहे याची जमिनीवरुनच चाचपणी करून मिपावरील तीर्थंकरांबद्दलचे त्याचे अज्ञान उघड केले.
या सगळ्या बरोबरच ह.भ.प.बुवांच्या सुरस कथा, गूळ पाडणे म्हणजे काय यांसारख्या कुतुहलांच्या विषयांबद्दल परिसंवाद झाले (तीर्थ म्हटले की असे विषय आपोआप येतात). गवताळ लोकांबरोबर बोलत असताना म्र्युत्युन्जय सगाचा गेल्या ३ वर्षांपासून शेजारी असल्याचा साक्षात्कार सगाला झाला :) न आलेल्या मिपाकरांपैकी काहीजण सक्काळपासून कोण येणार आहे, कोण आलेले आहेत असे सारखे थोड्या थोड्या वेळाने विचारात होते...पुढल्यावेळी त्यांनी कट्ट्याला कोण उपस्थित हवे आहे हे आधीच कळवावे...अपहरण फेम अन्या दातारांना वेळेत सुपारी पोचती केली जाईल :)
हे सगळे होत असतानाच सगळ्यांना आणखी एका चकमकीची उत्सुकता होती जी ७ च्या कट्ट्याला होणार होती...अस्मादिक व अनाहितांची ऐतिहासिक भेट :D कसे भेटावे काय बोलावे असे सल्लॆ मिळत असतानाच मघासच्याच (घाबरलेल्या) इब्लिस डोक्यातून एक सुपीक कल्पना निघाली की मी ७ च्या कट्ट्याला एखादा दुसरा आयडी बनून जावे आणि अनाहिता माझ्याबाबत काय काय बोलतात हे आयडीचे वेशांतर करून जाणून घ्यावे. कोणता आयडी कोणता आयडी ठरवता ठरवता सध्ध्या मिपावर गाजत असलेल्या "दमामि" हा (माझाच???) आयडी मुक्रर झाला ;)
(७ च्या कट्ट्याला काय काय झाले ते दुसर्या वृत्तांतात येईलच)
कट्ट्याची सांगता पानाच्या ऐवजी खत्री आईस्क्रीमने झाली...आईस्क्रीम संपवता संपवता "एकापेक्षा जास्त मुलांची अव्यवहार्हता" यावर एक छोटा परिसंवाद झाला...सर्व संवादपटूमात्र अविवाहित आहेत ;)
हा कट्टा पुण्यात झालेला तरीही तो नॉन-पुणेकरांचा* कट्टा होता...
*बुवांचा संचार इहलोकी सर्वत्र असतो त्यामुळे बुवांना आम्ही पुणेकर मानत नाही :D
प्रतिक्रिया
16 Jun 2015 - 10:40 am | टवाळ कार्टा
ते ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ असे आहे....लिहा पाहू १० वेळा =))
16 Jun 2015 - 10:43 am | प्रचेतस
इतकं करूनही टक्यानं घोळ घातलाच.
सिंहगड रोडवरचं ठिकाण ठरवलं. आम्ही १५ मैलांवरनं पुण्यात यायला तयार असतो पण अजून ५/६ मैल पुढं येणं म्हणजे...
16 Jun 2015 - 10:58 am | टवाळ कार्टा
मी आणि पनीर शेख कुठुन आलो हो? ल्ल्ल्लूऊऊऊउ
16 Jun 2015 - 11:01 am | प्रचेतस
तुम्ही संयोजक आणि आयोजकही होतेत. तुम्हाला येणं भागच होतं.
16 Jun 2015 - 11:47 am | टवाळ कार्टा
15 Jun 2015 - 12:11 pm | टवाळ कार्टा
तुम्ही पण तीर्थंकर का?
15 Jun 2015 - 12:21 pm | नाखु
तसली बात "सोडा"
फक्त हजेरीवाला
नाखु
16 Jun 2015 - 2:14 pm | मुक्त विहारि
कालच्या (१५ जूनच्या) कट्ट्याचे फोटो पण आले....
अद्याप पुण्याच्या ६ जूनच्या कट्ट्याचे फोटो नाहीत.
असो,
16 Jun 2015 - 2:34 pm | टवाळ कार्टा
६ च्या कट्ट्याचे फोटो गुर्जी आणी सूडकडे आहेत भौतेक
16 Jun 2015 - 4:26 pm | चिमी
१००
16 Jun 2015 - 4:35 pm | नाखु
१०० झाल्याबद्दल टवाळ कार्ट्याचा सत्कार, पुण्यातील कट्टा आयोजक सूचक मंडळांतर्फे "कांदा पोह्याच्या जागांचे अचूक पत्ते", एक आटोपशीर कट्टा आयोजन पुस्तीका व हवाबाण हरडे पाकीट व महाभ्रुंगराज प्रकाश माक्याचे तेलाची बाटली देऊन करण्यात येत आहे.
जेपी तर्फे अभामिपामांकामिम संचालीत
"पुणे कट्टा कुठेही भेट्टा" या संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते