नमस्कार!
माझा एक अत्यंत जिवलग मित्र (जो दिल्ली येथे रहातो) गेले काही महिन्यांपासून आजारी आहे व त्याच्यावर अॅलोपॅथिक उपचार चालू आहेत. मात्र अॅलोपॅथिक उपचारांनी पूर्ण बरा होण्याची हमी दिली नसल्यामुळे तो एखाद्या उत्तम आयुर्वेदिक/होमिओपाथिक वैद्य-डॉक्टरच्या शोधात आहे. त्या शोधात आपल्यापैकी कोणाची मदत होते का हे पहावे म्हणून हा धागा ...
आजाराचे नाव: Myelitis
आजाराची माहिती: आठेक महिन्यांपूर्वी त्याच्या spinal cordवर एक जखम (lesion) आढळून आली ज्यामुळे त्याच्या डाव्या पायातील ताकद गेली होती व चालण्यास त्रास होत होता. स्टेरॉईडस देऊन त्रास आटोक्यात आणला गेला. आता दीडेक महिन्यांपूर्वी त्याच्या उजव्या पायातील ताकद गेली व bladderवरील नियंत्रण सुध्दा कमी झाले होते. या खेपेस अशीच एक जखम त्याच्या मेंदूवर आढळली आहे. या आजारात आपल्या शरीरातील auto-immune system काही कारणामुळे आपल्याच systemsवर हल्ला करते, ज्यामुळे अशा अंतर्गत जखमा होतात. स्टेरॉईडस देऊन त्रास परत थोडाफार कमी झाला आहे. सध्या (स्वत:च्या व्यवसायाच्या) कामांमधून रजा घेऊन मित्र दीड महिना घरी आहे. पूर्णपणे बरा होण्यासाठी तो पर्यायी उपचारांसाठी एखाद्या उत्तम आयुर्वेदिक/होमिओपाथिक वैद्य-डॉक्टरच्या शोधात आहे.
हा धागा वैद्यकीय सल्ला मागण्यासाठी नसून अशा आयुर्वेदिक/होमिओपाथिक वैद्य-डॉक्टरच्या शोधात कोणाची काही मदत होत असल्यास पहावे यासाठी आहे. आजाराची एवढी सविस्तर माहिती एवढ्यासाठीच दिली की असाच आजार इतर कोणाला झाला असल्यास तिच्या-त्याच्या अनुभवाचा फायदा व्हावा. या आजाराच्या इतर एखाद्या पेशंटची कोणाला माहिती असल्यास त्याच्या अनुभवाची देखील माझ्या या मित्राला मदत व्हावी हा सुध्दा या धाग्याचा उद्देश आहे.
Just to prompt ... लोणावळ्यातील (वा जवळील) आयुर्वेदिक वैद्य डॉ. बालाजी तांबे यांच्याविषयी कोणाला काही माहिती वा अनुभव (इतर आजारासाठी असला तरी) आहे का? तसेच, उरळीकांचन येथे जे केंद्र (निसर्गोपचारांसाठी?) आहे त्याचा उपयोग या आजारात होऊ शकतो का? अन्य कोणत्या आयुर्वेदिक वा होमिओपाथिक वैद्य-डॉक्टरांची आपण शिफारस कराल? दिल्लीजवळ असल्यास उत्तम पण नसल्यास देखील चालेल.
आपल्याला कोणतीही माहिती वा टीप असल्यास व ती येथे दिल्यास प्रचंड आभारी राहीन.
- दिपोटी
प्रतिक्रिया
11 Jun 2015 - 12:02 pm | गवि
..मल्टिपल स्क्लेरॉसिस म्हणायचंय का?
....कृपया मॉडर्न मेडिसिनला धरुन रहा असं व्यक्तिगत मत सांगतो.
..पूर्ण क्युअर न होण्याची कबुली देण्याचा ओपननेस त्यांच्यातच असतो..त्यामुळेच योग्य प्रामाणिक स्टांडर्ड उपचार होतील.
11 Jun 2015 - 12:09 pm | दिपोटी
गवि,
लगेच दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आजाराचे नाव मी वर दिलेल्या नावाप्रमाणे 'मायलायटिस' हेच आहे. सेंट्रल नर्व्हस सिस्टीमचा हा एक आजार आहे.
- दिपोटी
11 Jun 2015 - 1:47 pm | दिपोटी
या धाग्याची लिंक मी माझ्या दिल्लीच्या मित्राला पाठवली आहे, जेणेकरुन त्याला direct updates मिळतील. त्याने हा धागा वाचून मी वर दिलेल्या त्याच्या आजाराच्या माहितीमध्ये थोडी सुधारणा केली आहे, ती अशी:
The last episode was Acute Transverse Myelitis -- demyelination of the spinal cord -- which caused 'foot drop' and paralysis of the left leg. This time there is a demyelination in the brain causing loss of sensation in the lower limbs and groin areas. No loss of movement though.
माझा हा पंजाबी मित्र मराठी थोडेफार वाचू शकतो पण लिहू मात्र शकत नाही, म्हणून त्याने केलेली सुधारणा इंग्रजीत आहे.
- दिपोटी
11 Jun 2015 - 3:59 pm | मयुर आपटे
वैद्य बागेवादिकर यान्ना भेता सोलापुर
11 Jun 2015 - 8:23 pm | सुबोध खरे
आगाऊ सल्ला
पहा
http://en.wikipedia.org/wiki/Transverse_myelitis.
Prognosis--
The prognosis for significant recovery from acute transverse myelitis is poor in approximately 66% of the cases; that is, significant long-term disability will remain.
Recovery from transverse myelitis is variable between individuals and also depends on the underlying cause. Some patients begin to recover between weeks 2 and 12 following onset and may continue to improve for up to 2 years. Other patients may never show signs of recovery.[12] However, if treated early, some patients experience complete or near complete recovery.
हा रोग किचकट, वेळखाऊ आणि सहज उपचारांना दाद न देणारा आहे तेंव्हा आपण ज्या आयुर्वेदाचार्य किंवा होमिओपथिच्या डॉक्टरना दाखवणार आहात ते अशा रोगाच्या उपचारांबाबत अनुभवी आहेत हे पहा. दुर्दैवाने आम्ही सर्वच रोगांवर उपचार करतो म्हणणारे फार आहेत. तेंव्हा ट्रायल आणि एरर होऊ नये असे वाटते. आपल्या मित्राला शुभेच्छा
11 Jun 2015 - 9:33 pm | नूतन सावंत
मुंबई येथे अंधेरी वेस्टला स्टेशन समोर डॉक्टर बास्ता हे होमिओपाथ आहेत.अशा रोगावर औषधे दिली आहेत का माहीत नाही .पण भेटून पेपर्स दाखवून ०२२ २६२८१४१७ किंवा फोन करून सल्ला घ्या.औषधदेता येईल की नाही हे पण सांगतात. नवरा बायको दोघेही होमिओपाथ आहेत.मी श्री.बास्तांविषयी सांगतेय.बसण्याची सोय मर्यादित असूनही खूप गर्दी असते.
12 Jun 2015 - 6:42 am | दिपोटी
मयुर आपटे, सुबोध खरे व सुरन्गी, धन्यवाद!
डॉ बालाजी तांबे वा अन्य कोणा आयुर्वेदिक/होमिओपाथिक वैद्य-डॉक्टरची कोणी माहिती देऊ (वा शिफारस करु) शकेल काय?
तसेच कोणाच्या माहितीत हा आजार झालेल्या एखाद्या व्यक्तीचा (म्हणजे त्या व्यक्तीच्या वैद्यकीय ट्रीटमेंटचा) अनुभव आहे काय?
-दिपोटी
12 Jun 2015 - 10:58 am | नूतन सावंत
बालाजी तांबे यांचा अनुभव चांगला नाही.हल्ली ते स्वतःफार कमी रुग्ण पाहतात असे कळते.
12 Jun 2015 - 8:48 pm | श्रीगुरुजी
मुंबईला डॉ. शहा हे होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांची वेबसाईट आहे - http://www.askdrshah.com/.
वेबसाईटवर त्यांची माहिती व संपर्क क्रमांक मिळतील. ते ऑनलाईन कन्सल्टिंग सुद्धा करतात.
14 Jun 2015 - 8:41 am | दिपोटी
आतापर्यंत मिळालेल्या सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
अजून काही प्रतिसाद मिळतात का हे पहावे म्हणून धागा वर काढीत आहे. लवकरच कोणत्या आयुर्वेदिक-होमिओपाथिक वैद्याकडे/डॉक्टरकडे जावे याबाबतीत निर्णय घेतला जाईल तेव्हा जेवढी अधिक माहिती मिळेल तेवढे उत्तम.
- दिपोटी
14 Jun 2015 - 11:32 am | गवि
..जे उपचार घ्यावेसे वाटतील ते घ्यावेत पण कृपया ते अॅडिशनल घ्यावेत.
...मॉडर्न मेडिसिनच्या "ऐवजी" नको अशी विनंती.
14 Jun 2015 - 3:26 pm | संदीप डांगे
रुग्णास लवकर बरे वाटावे ही मनापासून प्रार्थना.
15 Jun 2015 - 6:47 am | चतुरंग
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3665107/
इथे बर्या झालेल्या एका रुग्णाची फोटोंसकट आणि मेडिकल हिस्ट्रीसकट माहिती आहे.
लेखाकांना संपर्क करुन उपचार मिळण्याच्या दिशेने काही उपयोग होतोय का हे तपासून पाहता येईल.
तुमच्या मित्राला बरे होण्यासाठी शुभेच्छा!
-चतुरंग
15 Jun 2015 - 6:47 am | चतुरंग
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3665107/
इथे बर्या झालेल्या एका रुग्णाची फोटोंसकट आणि मेडिकल हिस्ट्रीसकट माहिती आहे.
लेखाकांना संपर्क करुन उपचार मिळण्याच्या दिशेने काही उपयोग होतोय का हे तपासून पाहता येईल.
तुमच्या मित्राला बरे होण्यासाठी शुभेच्छा!
-चतुरंग
15 Jun 2015 - 6:49 am | चतुरंग
लेखक हे दिल्लीतच स्थित असावेत असे दिसते त्यामुळे तातडीने संपर्क होऊ शकेल असे वाटते.
-रंगा
15 Jun 2015 - 4:12 pm | दिपोटी
सर्व प्रतिसादांबद्दल परत एकदा अगदी मनापासून धन्यवाद!
- दिपोटी