पंचकर्माविषयी माहिती हवी आहे

स्पा's picture
स्पा in काथ्याकूट
9 Jun 2015 - 7:18 am
गाभा: 

वय : ५५
आजार: शुगर,लठ्ठपणा, हाय बिपि, अस्थमा

जवळच्या नातेवाईकांना पंचकर्म करुन घ्या च , असा सल्ला वारंवार दिल्या गेल्या आहे.त्याबद्दल असे चित्र दाखवले आहे की थेट पोटात शिरुन रोगाचा खात्मा. detoxification.
इथे कोणाला पंचकर्माचा अनुभव आहे का?
हे प्रकरण कितपत रिस्की आहे?
याचा उपयोग खरच होतो का?
जालावर माहिती पेक्षा जाहिरातबाजीच जास्त दिसली.

मिपावर आधी यावर काही चर्चा झाली असल्यास क्रुपया लिंक द्यावी.

कळावे
- स्पावड्या

प्रतिक्रिया

सायन स्टेशनच्या बाहेर जवळच आयु्र्वेदिक कॅालेज +रुग्णालय(मोफत) आहे.सकाळी ८ ते १२ संध्याकाळी ५ ते ७ .रविवारी बंद योग्य सल्ला +औषधे मिळतात. रुगणास ठेवताही येते.

नीलकांत's picture

9 Jun 2015 - 10:01 am | नीलकांत

पंचकर्ममध्ये वासंतीक वमन केले आहे. गेली वर्षे नियमीत करतो आहे. पंचकर्म म्हणजे शरीरशुध्दी असे म्हणतात. माझ्या सोबतचे मित्र आयुर्वेदात एमडी केलेले आहेत त्यांच्या सल्ल्याने मी स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने हे केले आहे. यात वमन शिवाय विरेचन, बस्ती, आदी अन्य प्रकार सुध्दा आहेत.

मला एसीडीटीचा त्रास होता. त्यासाठी विरेचन करावे असे होते मात्र त्याचा काळ पावसाळ्यात असतो असे होते आणि नेमका पावसाळा शक्य होत नव्हतं. त्यामुळे वासंतीक वमन केले.

मी एक आठवडा रोज थोडं थोडं प्रमाण वाढवत तूप घेतले. माझ्या डॉक्टरने असे सांगीतले होते की तूप हे शरीरात सर्वत्र पसरते व अशुध्दी आपल्या पोटात जमा करते. असे करता करता सहाव्या दिवशी मात्र मला खुप डोकेदुखी व्हायला लागली होती. तेव्हा डॉक्टरने रक्तमोक्षण असा प्रकार केला म्हणजे थोडं रक्त काढलं. असं केल्यावर डोकेदुखी एकदम थांबली. त्यावर डॉक्टरचे मत असे होते की काढलेले अशुध्द रक्त होते म्हणून आराम पडला.

दुसरे दिवशी म्हणजे वमन करण्याच्या दिवशी सकाळी गरम करून थंड केलेले दुध प्यायला दिले. पोटभरून दुध पिल्यानंतर एक ग्लास दुधात मदनफळाचे चुर्ण मिसळून दिले. ते घेतल्यानंतर दहा मिनीटात आपोआप उलटीचे वेग यायला लागले. सगळे दुध परत आले... त्यानंतर मिठाचे कोमट पाणी दिले असे करता करता शेवटी जेव्हा पित्तं पडले तेव्हा डॉक्टरांच्या भाषेत पित्तांतक वमन झाले असे म्हणून वमन झाले असे घोषीत झाले. एवढं करता करता माझा जीव निघाल्यासारखा थकवा आला होता. खुप झोप आली होती. काही औषधे देऊन डॉक्टरने झोपण्यास परवाणगी दिली. रात्री पासून पुढची सात दिवस लघु आहार घ्यायला सांगीतला. म्हणजे तांदळाच्या लाह्या हळद मिठामध्ये भाजून खान्यास दिल्या. नंतर मुगाची खिचडी आदी दिला. पुढची दहा दिवस दुध पुर्णपणे बंद सांगीतले होते.
ह्या दरम्यान खुप हलके जाणवत होते. नंतर काही दिवसांनी सगळं पुर्वपदावर आलं. गेले तीन वर्षे वमन केल्याने नेमके काय सुधारले ते सांगता यायचे नाही. मात्र माझ्या अ‍ॅसीडीच्या त्रासामध्ये ८० टक्के आराम पडला. खुप जास्त प्रमाणात अ‍ॅसीडीटी होती. काही खाल्लं तरी आणि नाही खाल्लं तरी त्रास व्हायचा. आता तसे नाहीये. वर माझा अनुभव विचारल्यामुळे माझा अनुभव तेवढा दिला.

माझ्या आईने सुध्दा वमन करावे असे मला वाटत होते मात्र वमन म्हणजे उलटी करण्यात खुप थकवा येतो असे असल्यामुळे मी आमच्या ओळखीच्या डॉक्टरला विचारले त्या म्हणाल्या की त्यांच्या शक्तीला साजेसे वमन करता येईल. यावर्षी आईचे सुध्दा वमन उत्तम झाले. माझ्यासारखा त्रास झाला नाही.

पुण्यात अपोलो टॉकीज जवळ शेट ताराचंद हॉस्पीटल आहे. तेथे माझा मित्र रजिस्टार होता त्याने सांगीतले की तेथे पंचकर्म उत्तम पध्दतीने व मोफत केले जाते. अधिक माहीती तेथे मिळेल.

- नीलकांत

स्पा's picture

9 Jun 2015 - 10:21 am | स्पा

निल्स :)

विशाल कुलकर्णी's picture

9 Jun 2015 - 10:36 am | विशाल कुलकर्णी

रिस्क नक्कीच नाहीये. उपयोग होतो पण तो कायमस्वरुपी टिकत नाही कारण त्यानंतर सगळी पथ्ये पाळणे आपल्याला जमत नाही. खाण्या-पिण्यावर कंट्रोल ठेवता येणार असेल तरच पंचकर्म करुन घेण्यात अर्थ आहे नाहीतर काही दिवसात पुन्हा जैसे थे परिस्थिती होते.

मी अ‍ॅसिडीटीसाठी वमन, विरेचन आणि बस्तीचे काही सेशन करुन घेतले होते. तीन वर्ष काही त्रास झाला नाही. पण आता अ‍ॅसिडीटी परत डोके वर काढतीये. पण तीन वर्षे मिळाली हे ही नसे थोडके.

बाबा पाटिल हे अधिक माहिती देउ शकतील असे वाटतेय.

शिल्पा नाईक's picture

9 Jun 2015 - 12:39 pm | शिल्पा नाईक

सायटीका साठी हे (पंचकर्म) उपचार किति उपयोगी आहेत? कोणाला अनुभव आहे का?

पद्मावति's picture

9 Jun 2015 - 3:30 pm | पद्मावति

बालाजी तांबे यांचे कार्ला या गावात ( पुणे किंवा मुंबई च्या अजूबाजुला) केंद्र आहे. तिथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट खूप छान असतात असे ऐकले आहे. तिथे चवकाशी करू शकता.

कपिलमुनी's picture

9 Jun 2015 - 3:33 pm | कपिलमुनी

पिचू फेम तांबे यांच्यापासून लांबच रहा :)

अहो मुनिवर, ट्रीटमेंट काय तेवढीच असते का?
अनेक वर्षांपूर्वी केस गळू नयेत म्हणून मी त्यांची ट्रीटमेंट (पुण्यातील शाखेत) घेतली होती. खूप उपयोग झाला.

तांबेंच्या केंद्रात पंचकर्म साठी १४ ते १८ महिने waiting आहे.

रेवती's picture

9 Jun 2015 - 4:22 pm | रेवती

चांगल्या वैद्यांच्या सल्ल्याने, देखरेखीखाली पंचकर्म केल्यास्/करवून घेतल्यास खूप हलके, छान वाटते. तब्येतीच्या लहानसान तक्रारी बर्‍याच आवाक्यात येतात/ संपतात. माझ्या बघण्यात अनेक नातेवाईक हे उपचार घेतात. मीही २ दा पंचकर्म करून घेतले असता लाभदायक ठरले आहे. नक्की काय फरक पडला असे बोट दाखवून सांगता येणार नाही पण एकूणच बरे वाटले. अतिव्यायामाने मला काही त्रास सुरु झाला होता तो अक्षरश: जादू झाल्यासारखा संपला. माझी चूक लक्षात आली व व्यायाम बेतानेच सुरु केला. हे प्रत्येकासाठी वेगळे असावे असे वाटते.

स्पा's picture

9 Jun 2015 - 4:34 pm | स्पा

धन्स

ताय

स्पंदना's picture

9 Jun 2015 - 5:44 pm | स्पंदना

माझ्या आईंना करायला लावले होते. वमन हा प्रकार त्यात नसावा, पण मसाज, स्टिम आणि काढे असा एकूण प्रकार होता असे बोलण्यावरुन जाणवले. आईंचे वजन कमी होउन त्यांना हलके वाटले असे त्या म्हणतात. म्हणजे सुस्ती, अशक्त्पणा जाउन ताजे तवाने वाटते. चालताना त्रास होत नाही,दम लागत नाही इत्यादी.
एकूण पंचकर्म हल्ली जोरात आहे भारतात असा याचा अर्थ, पण एकदम छू मंतर वगैरे काही होत नाही हे लक्षात घेणे.

वैद्य विनय वेलणकर,

सी - ००१

भुषण अपार्टमेंट

सावरकर रोड,

डोंबोली

फोन नंबर : ०251 2449137

सिरुसेरि's picture

10 Jun 2015 - 5:23 pm | सिरुसेरि

बरेचदा आयुर्वेदातील जाणकार सांगतात की , साखरेचा वापर टाळा व त्याऐवजी मधाचे सेवन करा . याबद्दल शंका अशी आहे की - चहा बनविताना त्यामध्ये ( दुध+ चहापुड+पाणी यांचे आधण) साखरेऐवजी मध (द्रव स्वरुपातला) मिसळला तर चालेल का ? का मध तापविल्यास खराब होतो ? तसेच मध हा घन स्वरुपांमध्ये आयुर्वेदीक दुकानांमध्ये मिळतो का ?

संदीप डांगे's picture

10 Jun 2015 - 5:31 pm | संदीप डांगे

माझ्या मते चहाच टाळा. त्याऐवजी ग्रीन टी सुरू करा.

सिरुसेरि's picture

10 Jun 2015 - 6:13 pm | सिरुसेरि

"माझ्या मते चहाच टाळा. त्याऐवजी ग्रीन टी सुरू करा."

अगदी बरोबर . मी केवळ एक कुतुहल म्हणुन विचारले . ज्यांना चहाशिवाय चैनच पडत नाहे अशांसाठी , मी विचारलेल्या प्रश्नांवर काही माहिती आहे का ?

संदीप डांगे's picture

10 Jun 2015 - 6:49 pm | संदीप डांगे

अहो, मी त्याचसाठी ते सांगितलं होतं की चहा टाळा. लेमन अँड हनी वाली ग्रीन टी घ्या. फेश वाटेल चहासारखंच.

जर तुम्हाला मधुमेह किंवा तत्सम आजार ज्यात साखर चालत नाही नसतील तर साखरेने काही होत नाही. ज्यांना चहाशिवाय चैन पडत नाही त्यांनी चहात साखरेऐवजी मध टाकणे तेही आरोग्याच्या दृष्टीकोनातून हे जरा 'डायट कोक' पिण्यासारखे वाटते. बाकी काही नाही.

चहा करण्याच्या कैक पद्धती आहेत. पण कुतूहल असेल तर मधवाली पद्धत योग्य राहील, पण चहा नेहमीसारखा होणार नाही.

हे वाचा:
http://www.livestrong.com/article/473403-how-to-sweeten-tea-with-honey/
http://www.shape.com/healthy-eating/diet-tips/ask-diet-doctor-tea-honey-...
http://www.benefits-of-honey.com/tea.html

सिरुसेरि's picture

10 Jun 2015 - 7:33 pm | सिरुसेरि

धन्यवाद . थोडा या प्रश्नांवरही प्रकाश टाका -

१. ग्रीन टी मध्ये दुध मिसळत नाहीत असे आढळते . असे का ?
ग्रीन टी हा दुध व पाणी यांच्या मिश्रणाबरोबर घेतला तर चालतो का ?

२. मध हा घन स्वरुपांमध्ये आयुर्वेदीक दुकानांमध्ये मिळतो का ?