जय शिवराय !
शिवभक्तांनो,
छत्रपति शिवाजीराजे यांना माझे काही प्रश्न ....
राजे तुमचा राज्याभिषेक कधी करावा ?
राजे तुमची जयंती कधी करावी ? म्हणजे तिथीनुसार की आग्लं तारखेप्रमाणे ?
तुम्हीचं ते का नाही कोठे लिहून ठेवले नाही ?
बघा ना केवढे वाद होत आहेत ?
जो तो एकमेकांच्या उरांवर चढून आमचंच बरोबर कसे, असं म्हणू लागला आहे .
राजे तुमचा इतिहास आम्ही कसा मानू ?
तुमच्या हिरोजी इंदूलकरांनी जगदिश्वराच्या नगारखानाच्या बाजूला लावलेल्या शिलालेखात तिथी मांडली आहे ती मानू ? की हेन्री ऑक्झिँडनने लिहिलेली डायरीची पानं महत्वाची मानू ? हिरोजीने जेजे त्या शिलालेखात लिहिलं आहे तेते सत्य मानावे ? की आजच्या नविन इतिहासाकारांनी तुमचा इतिहास त्यांना हवा तसा लिहिला हे सत्य मानू ?
राज्याभिषेकाचा वाद नविन म्हणजे आता गेले चार पाच वर्षापासून चालू झाला आहे,
यात मी पडावे की त्रयस्थ राहून तुमच्या नावाने चाललेलं हे घाणेरडे राजकारण बघत बसू ?
राजे, तुमच्या जयंती आणि राज्याभिषेकालाच वाद का होतो ?
की तो जाणूनबजून केला जातोय ?
कारण तुमच्या आणि शंभूराजेंच्या पुण्यतिथीला वाद होत नाही .
राजे , असं तर नाही ना , की जयंती आणि राज्याभिषेकाला धांगडधिँगा करायला मिळतो , हवं तसं वागता येतं आणि हो वर्गणी काढून पैसे गोळा करता येतात ?
राजे, आता तुम्हीच मला मी काय करु ?
तुमच्या नावाने चालत असलेलं राजकारण उघड्या डोळ्याने पाहत राहू ? की याला विरोध करु ?
शिवभक्ती करत असताना कोणती तरी एक बाजू पकडलीच पाहिजे काय ?
राजे , आता मात्र तुम्ही मला सामोरे येऊन माझ्या प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजे !!
राजे, मी वाट पाहतोय.....!!
आपला शिवभक्त
शिव-दुर्गप्रेमी वांद्रे
प्रतिक्रिया
3 Jun 2015 - 5:33 pm | गणेशा
तिथी प्रमाणे माना किंवा तारखेप्रमाणे...भावना महत्वाची आहे... वाद राजकारणी करतात...आणि सामान्य माणुस त्यामध्ये भरकटला जातो ....
जो पर्यंत वाद संपत नाही.. या स्वराज्याचे सुराज्य होत नाही तोपर्यंत मी कशाचीही उत्तरे देणार नाही.. असेच शिवराय बोलत असतील असे वाटते...
शिलालेखातील तिथी मानली तरी ती खोटी नाही.. आणि डायरीच्या पानातील आंग्ल भाषेतील तारीख ही खोटी नाही... फक्त कोणी कोणती मानायची ही ज्याची त्याची इच्छा .. कारण मराठी तिथींवर प्रेम करणारे तिथी मानतात.. त्यात त्यांना एक आपलेपणा आपल्या तिथीवरील प्रेम वाटते... आणि इंग्रजी तारखेवर प्रेम करणारे.. सार्या जगाला हा दिवस माहिती असावा असा प्रामाणिक भाव ठेवुन त्या दिवशी उत्स्व साजरे करतात...
वाद मात्र स्वताशी प्रामाणिक असणारे लोक घालत नाही... इतिहास कीतीही पेरला तरी तो बदलत नाही.... मान्य तो सर्वांपर्यंत तितक्या त्याच पद्धतीने पोहचत नाही... पण त्याला आता आपण रोखु शकत नाही... मग इतिहासाने आपल्या पर्यंत पोहचण्यापेक्षा आपण त्याकडे वाटचाल केली पाहिजे.. आपल्याला जो भावेल जसा असेल तसा इतिहास समजुन घेतला पाहिजे...
असो... थांबतो ... या विषयाला अनेक कंगोरे आहेतच.. शिवाय आजकाल शिवराय आणि त्यांच्याबद्दल अनेक लेख येत आहेत.. असेही झाले नाही पाहिजे.. प्रत्येकाने शिवाजी महाराज आपल्या मनात शोधले पाहिजे...
3 Jun 2015 - 5:42 pm | ganeshpavale
अपेक्षित उत्तर गणेशा…। धन्यवाद…. !!
3 Jun 2015 - 7:47 pm | दमामि
तुम्ही दोघे गणेश, एकच आहात का?
3 Jun 2015 - 8:20 pm | विवेकपटाईत
भारतीय परंपरा मानायची असेल तर तिथी प्रमाणे आणि आंग्ल परंपरा मानायची असेल तर तारखे प्रमाणे. बाकी भारत सरकार आपले सण १५, २५, २ इत्यादी तारखे प्रमाणे करते. अर्थात महाराष्ट्र सरकार तारखे प्रमाणे आणि शिव भक्त तिथी प्रमाणे करत असतील तर दोन्ही ही रास्त आहे.
3 Jun 2015 - 10:29 pm | Hrushikesh Marathe
मला तुझी द्विधा स्थिति समजु शकते. पण सध्या जयंत्या आणि राज्याभिषेक साजरे करण्याएवजी छत्रपतींचे विचार समजून घेऊन ते आचरणात आणणे जास्त महत्वाचे आहे. छत्रपतींनी जे तत्व आणि जी मूल्य समाजासमोर ठेवली ती अंगी बाणवली पाहिजेत मग राजांच्या नावाखाली चालू असलेल्या सावळ्या गोंधळाला आपोआप चप बसेल.