कोकण वारी - २०१५

स्पा's picture
स्पा in भटकंती
29 May 2015 - 5:05 pm

नमस्कारम, मागच्या आठवड्यात दरवर्षीप्रमाणे कोकण दौरा झाला, यावर्षी उकाडा प्रचंड असल्याने ठरलेल्या प्लान मध्ये बरेच बदल झाले.मालवण /तारकर्ली करणार होतो, पण आयत्यावेळी ते रद्द केले. पर्यायी मार्ग मुंबई-पनवेल-टोळफाटा-मंडणगड-दापोली-दाभोळ बंदर –धोपावे(जेट्टी )- गुहागर(मुक्काम)- हेदवी-तवसाळ(जेट्टी)-जयगड-रीळ-मालगुंड-गणपतीपुळे- आरेवारे- रत्नागिरी- पावस –आडिवरे असा ठरला.

सकाळी नेहमीप्रमाणे ५ लाच सगळी तयारी करून बाहेर पडलो. वातावरणात अजिबात गारवा नव्हता. पनवेल सोडून मुंबई-गोवा महामार्गाला लागलो, रस्त्याची इतकी वाईट अवस्था कधीही पाहिलेली नव्हती, जी परिस्थिती २ वर्षांपूर्वी होती, तीच आजही होती. पनवेल –महाड पट्टा अतिशय भयाण अवस्थेत होता, सिंगल लेन सुरु होती, तीही खड्ड्यांनी भरलेली

सूर्योदय

xzf

माझी ब्याग मध्येच निघाली ती बांधताना सौरभ
dsd

नागोठण्याला नाश्त्याला थांबलो, अतिशय जळजळीत वडा उसळ कशीबशी पोटात ढकलली आणि सटकलो. टोळ फाट्याला, गोवा हायवेला बाय बाय करून आत वळलो, तिथेही तीच परिस्थिती. मंडणगड मार्गे दापोली गाठायला अडीज तास लागले. (६५ किमी) वाटेत हे फणस लगडलेले झाड दिसले
sad

दापोलीतून दाभोळ कडे निघालो. इथे रस्ता जरा तरी बरा होता. दाभोळ ला एक चंडिका देवीचे देऊळ पहिले. भुयारात आत जायचे होते, वाटेत मस्त समया ठेवलेल्या होत्या, त्यांच्या मंद प्रकाशात चंडिकेची उग्र मूर्ती सुरेखच उजळून निघालेली होती. तिथून निघालो सुदैवाने दाभोळ बंदरात लगेचच जेट्टी मिळाली.
सुवर्णदुर्ग शिपिंग कंपनी हि जेट्टी सेवा पुरवते, हि त्यांची साईट
http://carferry.in/

सद्द

dsads

धोपावे ला उतरलो आणि निघालो. सारखे घाट, उतार चढण, अचानक तीव्र वळण याने खूपच वेळ जात होता.रस्ते असून नसल्यासारखे होते.त्याशिवाय वाटेत काही अप्रतिम नजारे दिसत होते, मग सारखे थांबा , क्यामेरा बाहेर काढा यातही वेळ जायचा.

सेल्फी :)

घाग

fgfdg

dfd

df

hggh

गुहागरला पोचेस्तोवर दुपारचा १ वाजलेला होता. (२७० किमी) किसन ने “परमेश्वरी देवी” भक्त निवासाचा नंबर दिलेला होता त्यांना सांगून एक रूम बुक केलेली होती.

गफ

सामान टाकून जेवायला बाहेर पडलो. अन्नपूर्णा नावाचे अतिशय उत्तम हॉटेल म्हणून बर्याच जणांनी सांगितले होते. पण प्रत्यक्षात अतिशय टुकार निघाले.कसेबसे जेऊन परतलो. संध्याकाळी गुहागर बीचवर गेलो. रात्रीचे जेवण जेवण भक्त निवासातच झाले.

ज्क्ल

ह्घ

सकाळी व्याडेश्वरचे दर्शन घेतले गुहागरात बघण्यासारखे अजून भरपूर होते, पण रूम आज सोडायची असल्याने जाता जाता फक्त हेदवी, बामनघळ करू असे ठरले. नाश्ता आटपून परत सगळे समान बाईक वर बांधले आणि निघालो. उन्ह सॉलिडच होते. हेद्विला बामन घळ पाहिली, सुंदर जागा आहे, समुद्राचे पाणी पण एकदम निळेशार!

घ्घ

फ्ग्फ

ग्फ्ह

रस्त्यातले बरेच लोकं “MH०५” आणि आमचा अवतार बघून काय पोर उन्हात उद्योग करतायेत असले लुक देत होते, काही आपुलकीने चौकशी करत होते.  , रोलर कोस्टर सारख्या रस्त्यांवरून कसे बसे तवसाळ बंदरावर पोहोचलो. परत १५ मिनिटे जेट्टी प्रवास करून जयगड ला उतरलो.आता कधी एकदा आडीवर्याला पोचतो असे झालेले.गणपतीपुळ्यात घुसलो आणि एकदम मुंबईत असल्याचा फील आला, हे भयंकर ट्रॅफिकज्याम झालेले , सगळ्या मुंबई, पुण्याच्या गाड्या , देवळाकडे जाणारे रस्ते बंद केलेले, एकूण भर उन्हात भयंकर गोंधळ, या परिस्थितीत देवळात जाणे अशक्य होते. इथून पुढे दोन फाटे फुटतात एक निवळी मार्गे (५२ किमी) रत्नागिरी आणि एक आरे वारे मार्गे (२८ किमी). अर्थात आरे वारे चा रस्ता प्रेक्षणीय होता, कारण अथांग पसरलेला समुद्र सतत साथ देत होता.

sd (- श्रेय-सौरभ उप्स )

सडसड (- श्रेय-सौरभ उप्स )

घाटांचे भयंकर उतार असलेले रस्ते उतरून एकदाचे रत्नागिरीत पोहोचलो. एवढे ७७ किमी पार करायला आम्हाला चक्क ४ तास लागलेले होते, अर्थात हेदवी ला एक तास गेलेला होता. भिडे उपहार गृहात तडस लागेपर्यंत जेवलो, वर प्रत्येकी ३ ग्लास ताक ढोस्ल्यावर जीवात जीव आला. तरी अजूनही ३५ किमी चा प्रवास बाकी होता. चांदण्यातून तो कसा बसा पार पडला . आणि एकदाचे घरी पोहोचलो. महाकालीचे दर्शन घेतले
sdd

गेल्या गेल्या काकाने चहा दिला आणि तो पिऊन आंबे काढायला चला असा आदेशही सोडला. झक मारत कोकणी गड्याच्या वेशात बाहेर पडलो.

हज

फ्फ्ग

डफड

सहा च्या सुमारास साधारण तीनेकशे आंबे काढले,आणि परतलो.आता काहीही करायची इच्छा नव्हती मस्त अंघोळ केली, आणि बाहेर खुर्च्या टाकून रातकिड्यांचा आवाज ऐकत निवांत बसलो.

आमचे घर

ह्ग

नंतरचा दोन दिवसांचा कार्येक्रम साधारण असा असायचा सकाळी ७ वाजता उठायचे , चा पिऊन काकुस सोबत जांभीत काजूच्या बिया गोळा करायला जायचे, किंवा इतर छोटी मोठी कामे करावीत. दुपारी जेऊन वर सड्यावर जायचे, करवंदानी लगडलेल्या जाळ्या हेर्याव्या आणि मुकाट पुढील एक दोन तास पोटाला तडस लागेपर्यंत करवंद खावीत.
फ्गफ

घः

गर्ग

फगफ
-श्रेय सौरभ उप्स

खाली एक रायवळ आंब्यांनी लगडलेले झाड होते. त्याच्या आंब्यांचा खाली खच पडलेला असायचा, छोट्याश्या चेंडू सारखे दिसणारे ते आंबे, पण चव मात्र कहर, तेही चरायचे. संध्याकाळी वेत्त्ये किंवा गावखडी च्या समुद्रावर जायचे.येताना पेठेतल्या एकुलत्या एक कळकट हाटेलात निवांतपणे चहा घ्यावा आणि डुलत डुलत घरी यावे.रात्री काका तबला काढायचा मग मस्त गाण्यांची मैफिल जमवायची .

वेत्त्याचा समुद्र

54

sadsa

द्स्द

निघायचा दिवस आला तसा अचानक एकदम कंटाळाच आला, परत मुंबईत परतायचे,रोजचे लोकलचे धक्के, तीच टुकार नोकरी , आता जायचे तेही आता मुंबई गोवा हायवे ने. काका म्हणाला तुम्ही होतात ते ४ दिवस मजेत गेले, आता परत मी एकटाच...
गड्याने रात्री आमच्या गाड्यांवर सर्व समान कचकून बांधून दिले. त्यावर आम्ही सोबत आणलेल्या बंजी रोप लावल्या. भल्या पहाटे बरोब्बर ५ ला परतीच्या प्रवासाला निघालो, साधारण ६:३० रत्नागिरी सोडून हायवेला लागलो, महाड येईपर्यंत आता काळजी नव्हती, रस्ता एकदम मक्खन होता. आणि चक्क पूर्ण रस्ता रिकामा होता, मधलाच दिवस असल्याने कदाचित वाहतूक नव्हती.पहिल्यांदाच मनासारखी बाईक पळवायला मिळाली. ९ वाजता खेड ला पोचलो पण, कशेडी पण त्याच वेगात ओलांडून खाली आलो. पोलादपूर महाड ओलांडले आणि परत तो घाणेरडा रस्ता सुरु झाला. अपोआप वेग कमी झाला आणि साधारण २ च्या सुमारास रडत रडत घरी पोचलो.

टिपा : इतके भयंकर घाट रस्ते असूनही १५० सीसी च्या बाईक ने ५० चे माईलेज दिले, (२ वर्षांपूर्वी जेमतेम ४० दिलेला होता )
ज्यांना लेह लदाख ला जायचा सराव करायचा आहे त्यांनी पनवेल-महाड-मंडणगड-दापोली असा रूट करावा 
कार साठी जेट्टी प्रकार जाम डेंजर वाटला, जे कार चालवण्यात प्रो आहेत त्यांनीचे तो प्रकार करावा, जेट्टीत कार चढवणे आणि उतरवणे महाभयंकर काम आहे.

आमची मालगाडी

ssdsa

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

29 May 2015 - 5:11 pm | टवाळ कार्टा

तो निळा समुद्र कुठे आहे नक्की?

दापोली पासून पार रत्नागिरी पर्यंत :)

विशाल कुलकर्णी's picture

29 May 2015 - 5:47 pm | विशाल कुलकर्णी

झकास्स रे ! समुद्राचे सगळेच फोटो निव्वळ अप्रतिम आले आहेत....

झकासराव's picture

29 May 2015 - 5:14 pm | झकासराव

वाह!!!
काहि काहि फोटो वॉलपेपर म्हणुन ठेवण्यासारखे जबराट.

:)

प्रसाद गोडबोले's picture

29 May 2015 - 5:15 pm | प्रसाद गोडबोले

सुंदर !

प्रसाद गोडबोले's picture

29 May 2015 - 5:25 pm | प्रसाद गोडबोले

बाकी

सेल्फीमधे आपल्या वजनाने बाईक वाकलेली पाहुन फार आणंद झाला =))

नेहमीप्रमाणे सुंदर फोटो ... लेखन निवांत वाचतो ...

प्रियाजी's picture

29 May 2015 - 5:22 pm | प्रियाजी

प्रवास वर्णन व फोटो फारच छान.तुमच्या आनंदाच्या व कण्टाळ्याच्या भावना पुरेपूर पोचल्या. आम्ही दोघे कोकणात जाण्याच्या विच्यारात होतो पण आता परत एकदा विचार करावा लागेल.

कविता१९७८'s picture

29 May 2015 - 5:26 pm | कविता१९७८

मस्तच, प्रवास वर्णन आणि फोटोही.

पिलीयन रायडर's picture

29 May 2015 - 5:28 pm | पिलीयन रायडर

फार भाग्यवान आहात हो.. (आहेस रे.. हे बरं वाटतय!)
फोटो निव्वळ अप्रतिम!!! (हे आपलं उगाच.. सांगायची तशी काही गरज नाहीचे..)

अद्द्या's picture

29 May 2015 - 5:29 pm | अद्द्या

जबराट

खेडूत's picture

29 May 2015 - 5:32 pm | खेडूत

धन्यवाद.

कोकण कसं अत्ताच अंघोळ केल्यासारखं स्वच्छ आणि फ्रेश दिसतंय !

“परमेश्वरी देवी” भक्त निवासाचा नंबर दिलेला होता ''

तो कृपया इथे द्यावा. सगळ्यांना उपयोग होईल.

सूड's picture

29 May 2015 - 5:37 pm | सूड

ओके!!

विशाखा राऊत's picture

29 May 2015 - 5:40 pm | विशाखा राऊत

गाववाले मस्त लिहिलेत.. घरची आठवण आली

उदय के'सागर's picture

29 May 2015 - 5:42 pm | उदय के'सागर

एखाद्याचा हेवा वाटूनच जीव जावा एवढा हेवा वाटला तुझा.

कैलास गायकवाड's picture

29 May 2015 - 5:47 pm | कैलास गायकवाड

भारी आहे वृत्तान्त.

मृत्युन्जय's picture

29 May 2015 - 5:52 pm | मृत्युन्जय

झक्कास. तुझे घर एकदम झक्कास बघ. लय म्हणजे लयच आवडले.

मोहनराव's picture

29 May 2015 - 5:52 pm | मोहनराव

स्पांडुबा प्रवास वर्णन आवडल्या गेल्या आहे. आंबे पाहुन लाळ गाळली गेल्या आहे.

काळा पहाड's picture

29 May 2015 - 5:52 pm | काळा पहाड

फोटो नं ९ अप्रतीम. कॅमेरा कुठला?

निकॉन डी ३१००
१८-५५ मिमी

फारच आवडले.दुचाकी सर्व खड्डे मोजते का?

अनुप ढेरे's picture

29 May 2015 - 6:07 pm | अनुप ढेरे

मस्तं!

अरे व्हाट फोटो, व्हाट फोटो...!

स्वच्छंदी_मनोज's picture

29 May 2015 - 6:18 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्त फोटो..आडिवर्‍याच्या जरासेच पुढे आमचे गाव असल्याने अगदी गावाला जाऊन आल्याचा फिल आला.

तुषार काळभोर's picture

29 May 2015 - 6:19 pm | तुषार काळभोर

समुद्राचे सगळे फोटो....

दाभोळ ला एक चंडिका देवीचे देऊळ पहिले. भुयारात आत जायचे होते, वाटेत मस्त समया ठेवलेल्या होत्या, त्यांच्या मंद प्रकाशात चंडिकेची उग्र मूर्ती सुरेखच उजळून निघालेली होती.-----
गेल्या आठवड्यात ABP MAZA वर एक कार्यक्रम लागला होता तेव्हा हे मंदीर दाखवले......

आरे-- वारे मार्ग--------- अप्रतिम..

यशोधरा's picture

29 May 2015 - 7:39 pm | यशोधरा

मस्त रे स्पावड्या!

कोकणातले घर काय मस्तं आहे आणि दिनचर्या पण!फोटो तर बेस्टंच!

श्रीरंग_जोशी's picture

29 May 2015 - 10:26 pm | श्रीरंग_जोशी

सुंदर आहेत फोटोज. घर आवडले.

मजा आहे बुवा स्पाची.

बाकी मॉडेलिंगसाठी ऑफर येत असतील नक्कीच हे सेल्फिवाला फटु पाहून वाटले.

सांगलीचा भडंग's picture

29 May 2015 - 11:16 pm | सांगलीचा भडंग

एक नंबर फोटो आहेत आणि माहिती पण … समुद्राचे फोटो तर अप्रतिम . कोकणामध्ये जाऊन आलो असे वाटले एकदम

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2015 - 11:57 pm | अत्रुप्त आत्मा

@दुपारी जेऊन वर सड्यावर जायचे, करवंदानी लगडलेल्या जाळ्या हेर्याव्या आणि मुकाट पुढील एक दोन तास पोटाला तडस लागेपर्यंत करवंद खावीत. >>> खिक्क!!!

चेपु टू मिपा.. कित्ती तो बदल? ;)

मधुरा देशपांडे's picture

30 May 2015 - 1:28 am | मधुरा देशपांडे

अप्रतिम फोटोज.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 May 2015 - 1:44 am | डॉ सुहास म्हात्रे

लै भारी वर्णन आणि फोटो !

लहाणपणी मे महिन्यात कोकणातल्या आजोळात केलेली मज्जा आठवली !

प्यारे१'s picture

30 May 2015 - 12:11 pm | प्यारे१

स्पा आणि सौरभ उप्स चे फ़ोटो म्हणजे लाजवाब च!
बाकी अडिवरे आणि एकूणच कोकण पट्टा भन्नाट आहे.

सतिश गावडे's picture

30 May 2015 - 12:18 pm | सतिश गावडे

तुम्ही कोकणाचा आनंद घेण्यासाठी कोकणात जाता की कोकणचे फोटो काढून ते मिपावर टाकता यावेत म्हणून कोकणात जाता? :)

त्यांना दोन्ही करायचं असेल.

नाखु's picture

30 May 2015 - 12:25 pm | नाखु

हेदवीला मुक्काम करणे ठीक राहील का ?
लहान मुलांचे दृष्टीने समूद्र किनारा सुरक्षीत आहे ना.?
हेदवीतील मुक्कामासाठी काही संपर्क क्र्मांक दिल्यास मंडळ कच्चकन आभारी.

मूळ अवांतर : कोकणात सोत्ताच घर असणं आणि तिथे आवर्जून जायची ईच्छा असलेल्या, भाग्यवान "सौंदर्याप्रेमी" स्पाचे अभिनंदन.
लेखासाठी खास धन्यवाद.

नन्दादीप's picture

30 May 2015 - 2:05 pm | नन्दादीप

मंदीराजवळ भक्त निवास आहेच... आणी थोडसच लांब (Engineering कॉलेज जवळ) दोन चार हॉटेल्स आहेत बर्‍यापैकी...
अधिक चौकशी करून मग सविस्तर सांगतो..
पण वैयक्तिक मत विचाराल तर गुहागर्/रत्नागिरी मुक्कामास बरे पडेल...

नन्दादीप's picture

30 May 2015 - 1:07 pm | नन्दादीप

रत्नांग्रीस येवून सुद्धा आम्हास न भेटता गेल्याने जाहिर णिषेध.....

अतिशय सुंदर फोटो आणि तितकेच सुरेख वर्णन.

किसन शिंदे's picture

30 May 2015 - 1:33 pm | किसन शिंदे

अतिशय सुंदर फोटोज!!

गुनि's picture

30 May 2015 - 1:51 pm | गुनि

खुप मस्त ......You may have to visit Anjarle ( kadya varel Ganpati)
You are right , we are just suffering from one disease that is WORK ( MONEY MAKING ) ..... thanks for refreshment and taking me to my village

बिपिन कार्यकर्ते's picture

30 May 2015 - 1:54 pm | बिपिन कार्यकर्ते

लै भारी रं बाला!

वेल्लाभट's picture

30 May 2015 - 2:37 pm | वेल्लाभट

कडक फोटो !!!!!

नूतन सावंत's picture

30 May 2015 - 2:43 pm | नूतन सावंत

महेल, पुन:प्रत्ययाचा आनंद दिलास,गुहागर आजोळ दाभोळला आईची मावशी आणि रत्नागिरीला माहेर असल्याने इथे वारंवार खेपा व्हायच्या.हेदवी,गणपतीपुळे मालगुंड,पावस आडिवरे येथे जाऊन आल्यशिवाय दौरा संपत नसे.प्रकाशचित्रे तर अप्रतिमच.

त्रिवेणी's picture

30 May 2015 - 3:57 pm | त्रिवेणी

खुप खुप मस्त फोटो.

ज्योत्स्ना's picture

30 May 2015 - 4:19 pm | ज्योत्स्ना

फोटो अप्रतिम. सुंदर! वर्णन छान.

पॉइंट ब्लँक's picture

30 May 2015 - 5:06 pm | पॉइंट ब्लँक

झक्कास ट्रिप झाली आहे. फोटो आवडले :)

खूप छान फोटो आणि व्रुत्तांत..
मीही ११ मे ते २० मे या दरम्यान याच भागात भटकत होतो. आरेवारे येथील काही फोटो मीही काढले आहेत.
पनवेल महाड पट्ट्याची अवस्था गेल्या दोन वर्षात तसूभरही सुधारलेली नाही. याबद्द्ल सा.बा. खात्याकडून माहीती काढली असता असे कळाले की हे काम ज्या कंपनीने घेतले आहे त्यात प्रचंड अफरातफर झाली आहे. लवकरच काम परत सुरु होईल असे तो म्हणाला पण काम सुरु होईल असे वाटत नाही. कारण असे तो ६ महीन्यापुर्वीही बोलला होता. असो. आपण फक्त वाट पाहू शकतो.
अजुन एक माहीती अशी की जे काही दुपदरी रस्त्याचे काम झाले आहे तेवढेच राहणार आहे. बाकी खर्च सागरी महामार्गावर केला जाणार आहे. काय होणार देव जाणे.

मुंबई - गोवा मार्ग किमान दुभाजकासहीत व्हावा असे स्वप्न पहाणारा - खटपट्या.

फोटो आणि वृत्तांत दोन्ही खूप आवडले!

राही's picture

30 May 2015 - 9:49 pm | राही

फोटो झकास. विशेषतः ८ आणि ९.

के.पी.'s picture

30 May 2015 - 10:15 pm | के.पी.

मला नाही बा आजपर्यंत कधी अन्नपूर्णाचं जेवण टुकार वाटले आणि कधी ऐकिवात पण नाही आलं.
उलट तुम्ही म्हणताय त्या भिडे उपहारगृहाचा माझा अनुभव चांगला नाहीये:( असो:)
प्रवासवर्णन छान, आवडले :))

स्नेहानिकेत's picture

30 May 2015 - 10:40 pm | स्नेहानिकेत

सुंदर फोटोज आणि मस्त वर्णन.आवडले!!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 May 2015 - 10:34 am | ज्ञानोबाचे पैजार

समुद्राचे फोटो प्रचंड लाईकले गेले आहेत.

मागच्या वर्षभरात स्पावड्याची उंची बरीच वाढली आहे असे फोटो बघून वाटले.

खाली एक रायवळ आंब्यांनी लगडलेले झाड होते. त्याच्या आंब्यांचा खाली खच पडलेला असायचा, छोट्याश्या चेंडू सारखे दिसणारे ते आंबे, पण चव मात्र कहर, तेही चरायचे. संध्याकाळी वेत्त्ये किंवा गावखडी च्या समुद्रावर जायचे.येताना पेठेतल्या एकुलत्या एक कळकट हाटेलात निवांतपणे चहा घ्यावा आणि डुलत डुलत घरी यावे.रात्री काका तबला काढायचा मग मस्त गाण्यांची मैफिल जमवायची .

हे वाचून तुझा प्रचंड हेवा वाटला.

पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा's picture

31 May 2015 - 4:25 pm | अत्रुप्त आत्मा

खाली एक रायवळ आंब्यांनी लगडलेले झाड होते. त्याच्या आंब्यांचा खाली खच पडलेला असायचा, छोट्याश्या चेंडू सारखे दिसणारे ते आंबे, पण चव मात्र कहर, तेही चरायचे. संध्याकाळी वेत्त्ये किंवा गावखडी च्या समुद्रावर जायचे.येताना पेठेतल्या एकुलत्या एक कळकट हाटेलात निवांतपणे चहा घ्यावा आणि डुलत डुलत घरी यावे.रात्री काका तबला काढायचा मग मस्त गाण्यांची मैफिल जमवायची .

>> कोकणातली खरी मज्जा हीच तर आहे. बाकि निसर्ग वगैरे खूप ठिकाणी कोकणा इअतकाच नसला,तरी त्यापेक्षा वेगळ्या छटा दाखवणारा आणि काहि वेळा कोकणच्याही सवाई असतो!

मी माझ्या बहिनीच्या अजोळी राजापूर जवळ भालावली नावाच्या गावाला गेल्या ४ वर्षात ३/४वेळा गेलेलो आहे. मला तिथे आमच्या जुन्या हरिहरेश्वरचा फील येतो. अगदी ग्रामरचना,रहाणीमान आणि मुख्य म्हणजे ती तिथली लोकं! प्रंचंड वेड लागतं तीन/चार दिवस असलो की तिकडे.

अत्रुप्त आत्मा's picture

31 May 2015 - 4:27 pm | अत्रुप्त आत्मा

@बहिनीच्या अजोळी >>> हे 'वहिनीच्या अजोळी' ,असे वाचावे.

मुक्त विहारि's picture

31 May 2015 - 12:37 pm | मुक्त विहारि

गुहागर-हेदवी-वेळणेश्वर, ऐकले की मन भुतकाळांत जाते.(आम्ही पुळ्याला जात नाही.त्यापेक्षा कोळीसरे फार उत्तम)

गुहागर थोडी भर....

अन्नपुर्णा दोन्ही प्रकारच्या जेवणांत अयोग्य.(अगदी चिपळूण मधल्या "अभिषेक" सारखेच.चिपळूण मधल्या "दीपक"ला तोड नाही.)

गुहागरला अजून एका हॉटेल मध्ये नॉन-व्हेज खायचा क्षीण प्रयत्न केला.पण तिथेही वाईट अनुभव आला.(कदाचित आमची जीभ "दीपक"ला चटावली असेल.)

शेवटी, गुहागला गेलो की गपगुमान, परचुर्‍यांच्या हॉटेल मध्ये व्हेज जेवण जेवायचे आणि दीपकला येवून उट्टे काढायचे.हाच शिरस्ता होता.

दीपक चा पत्ता मिळू शकेल काय?

बाकी अलिबाग बस स्टॅण्ड च्या बाहेर असलेले फुलोरा पण कहर आहे, तोडच नाही त्याला

मुक्त विहारि's picture

31 May 2015 - 6:10 pm | मुक्त विहारि

चिपळूण मध्यवर्ती बस स्टँडच्या बाजूला.

बाद्वे,

चिपळूणला ३ बस स्टँड आहेत.

१. मुंबई-गोवा हाय-वे वर

२. मध्यवर्ती

३. जूना बस-स्टँड (गुहागर रोड)

अभय म्हात्रे's picture

31 May 2015 - 1:49 pm | अभय म्हात्रे

समुद्राचे फोटो खुप छन आहेत.

मनिमौ's picture

31 May 2015 - 4:46 pm | मनिमौ

फोटो अप्रतिम आहेत. (आत्ता लगेचच बॅग घेऊन निघावे या विचारात असलेली मनिमौ)

पद्मावति's picture

31 May 2015 - 4:55 pm | पद्मावति

काय सुंदर समुद्र दिसतोय. वर्णन आणि फोटो बघून लगेच कोकणात जावे असे वाटू लागलेय. बघू या कधी जमणार ते..

पैसा's picture

31 May 2015 - 5:22 pm | पैसा

मस्त लिहिलंस आणि फोटोबद्दल तर बोलायला नकोच!

खरे तर माझे काम तू केलेस. व्याडेश्वर आमच्या आईकडे कुलदैवत आहे. सगळे बापट मालगुंड गणपतीपुळे इथले आणि आरेवारे किनारा ज्या बसणी गावचा त्यात माझी पहिली १८ वर्षे गेली. मी स्वत:ला त्यासाठी प्रचंड नशीबवान समजते.

तुला फोन न लागल्यामुळे पुन्हा एकदा भेट चुकलीच, पण नंदादीपला का भेटला नाहीस?

त्यालाही फोन लावत होतोच, त्याचा लागत नव्हता, नंतर माझे नेटवर्क गेले, परतताना भल्या पहाटे ६ वाजता कसं काय भेटणार, सो राहूनच गेलं

प्रमोद देर्देकर's picture

2 Jun 2015 - 3:41 pm | प्रमोद देर्देकर

स्पा अरे तुला लिस्टमध्ये सांगितलेल्या गोष्टीतले गोपाळगड का नाही केलेस अतिशय सुंदर जागा आहे. १/२ तास जास्त गेला असता फारफार तर.

अल्पिनिस्ते's picture

2 Jun 2015 - 10:49 pm | अल्पिनिस्ते

टोटल जलन... ;)

अनन्न्या's picture

3 Jun 2015 - 5:31 pm | अनन्न्या

ज्या भिडे उपहारगृहात जेवलात तिथून आमचे दुकान १० पावलांवर आहे. आणि आडिवय्राला जाताना वाटेत माहेरचे गाव- कुर्धे. अगदी प्रदक्षिणा घालून गेलात.

सौंदाळा's picture

4 Jun 2015 - 12:27 pm | सौंदाळा

फोटो बघुन डोळे निवले.
वर्णन पण मस्तच.
अन्नपुर्णा एकदम बकवास आहे (मासे काही खास नव्ह्ते त्याच्याकडे, दोनदा गेलो होतो वेगवेगळे मासे मागवले होते पण तीच रड)
गुहागरला तीन्-चार हाटीलात खाणे झाले आहे पण अजुनपर्यंत चांगले हॉटेल मिळाले नाही.
जयगड, मालगुंडला केशवसुतांचे घर इकडे गेला नाही का?