भांबर्डे – नवरा, नवरी आणि वऱ्हाड

सतीश कुडतरकर's picture
सतीश कुडतरकर in भटकंती
25 May 2015 - 2:31 pm

भांबर्डे – नवरा, नवरी आणि वऱ्हाड

लोणावळ्यापासून विसेक किलोमीटरवर असलेल्या सालतर खिंडीच्या पलीकडे आहे एक अद्भुत विश्व. किल्ले घनगड, एखाद्या टेबलवर ठेवलेल्या पेपरवेटप्रमाणे भासणाऱ्या तैलबैलच्या कातळ भिंती, या भिंतींच सौंदर्य निरखत तिच्याच पायाखाली विसावलेला सुधागड, निळेशार पाणी असलेला मुळशी धरणाचा जलाशय, भांबर्डे गावातील नवरा, नवरी आणि वऱ्हाड सुळके आणि त्यांना चोहोबाजूने आपल्या कवेत घेऊ पाहणारे उंचच उंच कडे, हा परिसर पाहताना अक्षरशः डोळयांच पारणं फिटते.

१.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

२.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

अशाच एखाद्या डोंगररांगांच्या कुशीत प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या राष्ट्रीय ध्वजाची उब आपल्या अंगावर मिरवावी म्हणून आम्ही गिरीविराजकर २४ जानेवारी २०१५ च्या मध्यरात्री डोंबिवलीतून निघून २५ जानेवारीच्या गारठलेल्या सकाळी भांबर्डे गावात दाखल झालो. भांबर्डे गाव ज्या डोंगररांगेच्या कुशीत सामावलंय त्याच्या पश्चिम टोकाला आहे किल्ले घनगड आणि पूर्वेला नवरा, वऱ्हाड आणि नवरी सुळक्यांच्या कुटुंबाची मक्तेदारी. भांबर्डे गावाच्या टोकाला सुळक्यांच्या पायथ्यालाच आमचं बिऱ्हाड थाटल. इथून सुळक्यांच्या चढाईमार्गावर पोहोचण्यासाठी फारतर २०-२५ मिनिटे लागली असती.

३.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

४.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

सुळक्यांची उंची फार नाही. डावीकडून नवरा सुळका जेमतेम सव्वाशे फुट उंच आहे, मधला वऱ्हाड सुळका २०० फुट उंच आहे आणि उजवीकडील नवरीची उंची साठेक फुट आहे. सर्व तयारी करून नवरा सुळक्याच्या डाव्या हाताला असणाऱ्या धारेवर चढायला सुरुवात केली. वाट अशी नाही, भुसभुशीत मातीने भरलेल्या वाटेवर चालताना एकदोन ठिकाणी तारांबळ उडाली. आमच आजच लक्ष होत नवरा आणि नवरी सुळका. सर्वप्रथम नवरा सुळक्यावर चढाई करण्यासाठी धारेवरून वर आल्यावर नवऱ्याला वळसा घालून नवरा आणि वऱ्हाड सुळक्याच्या बेचक्यात पोहोचलो. थोडे इकडेतिकडे पाहिल्यावर नवरा सुळक्यावर चढाई करण्यासाठी पाठीमागून मार्ग असल्याचे जाणवले.

४अ
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

वासुदेवने चढाईची सूत्र आपल्या हाती घेतली आणि हितेश त्याला बिले देण्यासाठी सेकंडमॅनच्या भूमिकेत शिरला. सुरुवातीचा १५-२० फुटांचा टप्पा लीलया पार केल्यावर वासुदेव नवऱ्याच्या मुख्य चढाईच्या भागात पोहोचला. तिथेच असलेल्या बोल्टच्या आधारे त्याने हितेशला वर बोलावून घेतले आणि स्वतः सुळक्यावर चढाईसाठी पुढे सरसावला. मार्गात एक बोल्ट सापडला त्यातून रोप पास केल्यावर वर सरकत साधारण ३०-४० फुटांची उंची गाठली आणि तिथेच एक पिटॉन ठोकल्यावर त्यातून रोप पास केला, खरतर मार्गातला प्रस्तर ठिसूळ होता त्यामुळे या पिटॉनवर विसंबणे धोक्याचे होते. त्याच्या डोक्यावर एका झुडुपाची मुळी दिसत होती, सर्व साहस एकवटून त्याने ते झुडूप गाठलं आणि त्याला रोपस्लिंग बांधून स्वतःचा रोप पास केला, तेंव्हा कुठे आमच्याही जीवात-जीव आला. वरील चढाईच आव्हानही दहा मिनिटांत संपवून नवरा सुळका सर केला गेला.

५.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

५अ
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

आता नवरी सुळक्यावर चढाई करण्यासाठी वऱ्हाड सुळक्याला वळसा घालून नवरीच्या पायथ्याला गोळा झालो. पुढील मोठी आव्हाने पेलण्याच्या दृष्टीने तुषार परबला हि जबाबदारी देण्यात आली. तुषारनेही मिळालेल्या संधीच सोन करीत १० मिनिटातच नवरी सुळका सर केला.

६.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

वऱ्हाड सुळक्यावर चढाईचा बेत दुसऱ्या दिवसासाठी राखीव होता. २६ जानेवारीच्या सकाळी परत एकदा नवरा आणि वऱ्हाड सुळक्यांच्या बेचक्यात पोहोचलो. हितेशने पारंपारिक मार्गाने चढाईला सुरुवात करून जवळपास साठेक फुटांची उंची गाठली आणि तिथेच अडकला.

७.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

कारण काळाच्या ओघात संपूर्ण मार्गाची पडझड झाली होती आणि anchoring प्रस्तर योग्य नव्हता. खूप प्रयत्न केल्यावर सुद्धा त्याला वर जाता येईना. प्रस्तर योग्य नसल्यामुळे प्रस्तरारोहक जवळपास १०० फुटांचा आडवा Traverse मारून माथ्यावर जाणाऱ्या तिरकस धारेवर पोहोचतात आणि माथा गाठतात. अशा तऱ्हेने माथा गाठणे आम्हाला आव्हानात्मक वाटलं नाही म्हणून या मार्गाचा नाद सोडून देण्यात आला.

वेगळ्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी आता वऱ्हाड आणि नवरी सुळक्याच्या बेचक्यात पोहोचलो. यावेळेस इथून नवीनच मार्गाने चढाई करण्यासाठी अनुभवी किशोरला सूत्रे सोपवण्यात आली. त्यानेही anchoring साठी फक्त पिटॉनच्या साहाय्याने तासाभरात वऱ्हाड सुळक्याचा माथा गाठला आणि तिरंगा फडकवल्यावर आमच्याही माना मानवंदना देण्यासाठी आपोआप झुकल्या. पण या मार्गातही अगदी तुळतुळीत प्रस्तर लागल्याने आणि वेळही नसल्याने किशोरने आडवा traverse मारून तिरकस धारेवरूनच माथा गाठला.

८.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

तिन्ही सुळक्यांच आव्हान पार केल होत पण वऱ्हाड सुळक्याने दिलेल्या पहिल्या दणक्याने आमच मन कुठेतरी खट्टू होत. तेंव्हा वऱ्हाड सुळक्यावर सर्वात कठीण मार्गाने चढाई करण्याची योजना तिथेच आखली. हि योजना अंमलात आणण्यासाठी महिन्याभराच्या विश्रांतीनंतर घरी ०५ मार्चला मध्यरात्री होळी पेटवून धुळवड खेळण्यासाठी १५२ व्या मोहिमेसाठी पुन्हा एकदा भांबर्डे गावात दाखल झालो.

हि संपूर्ण चढाई नवप्रशिक्षित मंडळीकडून करण्याचे ठरवले होते. वऱ्हाड सुळक्यावर यावेळेस आम्ही निवडलेला चढाईचा मार्ग भांबर्डे गावाच्या दिशेने होता. सुळक्याच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी नेहमीचा धारेवरून जाणारा धोपट मार्ग न पकडता नाकासमोर दिसणाऱ्या रानातून घळीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. पंधरा मिनिटात सुळक्याच्या पायथ्याला पोहोचलो.

९.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

या मार्गाने कोणीच चढाई केलेली नसल्याने, पुढे कोणत आव्हान असेल याची काहीच कल्पना नव्हती. हितेशने कंबरेला हार्नेस बांधला आणि प्रदीपच्या मार्गदर्शनाखाली चढाईला सुरुवात केली. सुरुवातीला फ्री-मूव्ह करीत त्याने साधारण ३० फुटांची उंची गाठली. उंची वाढलेली असल्याने आणि मार्ग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने त्याने अॅरन्करिंगसाठी पहिला बोल्ट ठोकला. त्यानंतर परत १५-२० फुटांची फ्री-मूव्ह केल्यावर त्याला मार्गात एकदम तुळतुळीत प्रस्तर लागला. त्यामुळे तिथेच लागोपाठ दोन बोल्ट ठोकले.

१०.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

१०आ
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

दरम्यान, दुर्बिणीतून निरीक्षण करताना जाणवले कि तिथे कपारी आहेत ज्यात anchoring साठी पिटॉन ठोकून त्याच्या आधारे फ्री-मूव्ह करता येतील. कदाचित हितेश थकलेला असल्याने त्याला पुढे चाल करता येत नसेल. म्हणून मग सेकंडमॅन मोरेश्वरला त्याची जागा घ्यायला सांगितली, पण त्यालाही खूप प्रयत्न केल्यावर काही जमेना, इथे खालून दुर्बिणीतून पाहताना तिथे कपारी असल्याचं चांगल दिसत तर होत, पण मोरेश्वरलासुद्धा त्याचा कसा उपयोग करावा याच कोड सुटत नव्हत. शेवटी एक अनावश्यक बोल्ट ठोकून त्यालासुद्धा खाली उतरवलं. अनुभवी प्रदीप तिथेच खाली लेजवर होता, त्याने सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली आणि मोरेश्वरने ठोकलेल्या शेवटच्या बोल्टवर पोहोचला.

प्रदीपने पुढच्या दहा मिनिटातच पिटॉनचा व्यवस्थित वापर करून त्या पॅचवर मात केली आणि कड्यापासून थोडा विलग झालेल्या एका खडकावर पोहोचला. इथे अॅन्करिंगसाठी एक बोल्ट ठोकल्यावर दिवसभराची चढाई थांबवण्यात आली.

११.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

१२.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

१२आ
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

१२ब
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

१२़़क
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

दुसऱ्या दिवशी किशोरच्या मार्गदर्शनाखाली वासुदेवने प्रदीपने काल चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून प्रारंभ केला. एखाद्या कसलेल्या खेळाडूप्रमाणे वासुदेवने हाsहा म्हणता सत्तरेक फुटांची उंची गाठली आणि माथ्यापासून पन्नासेक फुट खाली एका कपारीपाशी पोहोचला.

१३.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

१४.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

१५.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

१५आ
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

१५ब
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

१६.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

त्या कपारीतूनच मार्ग काढून त्या कपारीच्या वर पोहोचला. उंची खूपच वाढलेली असल्याने आणि मध्येच कुठेही भक्कम अॅन्कर नसल्याने इथे एक बोल्ट ठोकला. बोल्ट ठोकून झाल्यावर किशोरला त्याने वर बोलावून घेतले आणि स्वतः उरलेली चढाई संपवण्यासाठी पुढे झेपावला. वरची उरलेली तीसेक फुट चढाई लीलया संपवून वासुदेवने अपेक्षेपेक्षा लवकरच माथ्यावर पाय ठेवला.

१७.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

१७अ
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

१८.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

१९.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

२०.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

२१.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

२२.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

२३.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

From Bhambarde 26 jan & 05 march 2015

माथ्यावर भक्कम अॅन्कर नसल्याने मग वासुदेव ज्या प्रकारे वर चढला त्याच दिशेने परत खाली उतरला (Climb Down) आणि किशोरजवळ येऊन शेवटच्या बोल्टवरूनच वाईंड-अप करण्यात आले.

२४.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

संपूर्ण चढाई दरम्यान अॅन्करींगसाठी ६ बोल्ट्स, ८ पिटॉन आणि १ पेग यांचा वापर करण्यात आला.

२५.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

हे स्थानिक गावकरी शंकर दिघे मामा. दुर्बिणीच्या एव्हढे प्रेमात पडले की निघायलाच तयार नव्हते. यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी या सुळक्यांची गमतीदार कथा सांगितली ती अशी -

या डोंगराच्या मागे असलेल्या 'घुटके' गावातील एक मुलाचे लग्न 'भांबर्डे' गावातील एक मुलीशी ठरले होते, त्याचं वऱ्हाड या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलं आणि सगळे वऱ्हाडकरी तिथेच नाचत राहिले. लग्नाची वेळ टळून गेली तरी वरात पुढे जाण्यास तयार नव्हती. म्हणून मग मुलीकडील मंडळी मांडव सोडून या वऱ्हाडाला सामील झाले आणि डोंगराच्या पायथ्याशीच त्यांचे लग्न झाले. पण यात काहीतरी बिनसले गेल्याने वऱ्हाड अदृष्य झाले आणि या सुळक्यांच्या रुपात डोंगरात प्रकटले. मी त्यांना गंमतीने या कथेच्या सत्यतेविषयी विचारलं तर त्यांनीच ते खोडून टाकल. "अस, ह्वतंय का कधी, आवं गावात दुसर काय हाय आमच्यासाठी मनरंजन. असाच कुणातरी आजाने आपल्या नातवाला काहीतरी सांगितलं आसल आणि कुणतरी बेण सगळीकडे सांगत सुटलं".

प्रदीप म्हात्रे आणि किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत खालील मंडळीनी सहभाग घेतला.
किरण अडफडकर, सतीश कुडतरकर, संजय गवळी, राधेश तोरणेकर, दर्शना तोरणेकर, राकेश गायकवाड, प्रवीण घुडे, मोरेश्वर कदम, विजय अय्यर, वासुदेव दळवी, हितेश साठवणे, दर्शन एडेकर, उमेश विरकर, तुषार परब.

२७.
From Bhambarde 26 jan & 05 march 2015

-सतीश कुडतरकर

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

25 May 2015 - 2:41 pm | जयंत कुलकर्णी

मस्तच !

नेहमीप्रमाणेच अप्रतिम...

दिपक.कुवेत's picture

25 May 2015 - 2:44 pm | दिपक.कुवेत

तुमचे कितीतरी लेख वाचून तो थरार अनुभवायचा आहे. प्रत्यक्ष जाण तर जमणारच नाहि.

सविता००१'s picture

25 May 2015 - 2:50 pm | सविता००१

त्या चढाईतला थरार इथे बसून जाणवतोय. मस्तच.

लिहित राहा! आम्ही वाचुन तरी माथ्यावर जाऊन पोहोचतो मग वेगवेगळ्या कड्यांच्या!

पाटील हो's picture

25 May 2015 - 3:07 pm | पाटील हो

अप्रतिम -

वेल्लाभट's picture

25 May 2015 - 4:08 pm | वेल्लाभट

क्याच बात है !
जब्बरदस्त वर्णन व फटू सतीशदादा
१५२ मोहिमांचे १५२ धागे काढलेत तरी वाचायला एकदाही कंटाळा येणार नाही.

क्लास ! तुम्ही सगळेच कमाल आहात.

नाखु's picture

25 May 2015 - 5:02 pm | नाखु

१५२+

किमान एक तरी ट्रेक अनुभवायची इच्छा असलेला

मदनबाण's picture

25 May 2015 - 4:24 pm | मदनबाण

जबराट !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailer

खुशि's picture

25 May 2015 - 6:13 pm | खुशि

तू सी ग्रेट हो.

उमा @ मिपा's picture

25 May 2015 - 7:08 pm | उमा @ मिपा

थरारक! जबरदस्त वर्णन!

दुर्गविहारी's picture

25 May 2015 - 9:22 pm | दुर्गविहारी

+१

प्रचेतस's picture

26 May 2015 - 8:44 am | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच थरारक लेख.

हा भाग भटकण्यासाठी अत्यंत आवडीचा. कित्येकदा निवे-पिंपरी- बार्पे-भांबर्डे- सालतर- आंबवणे- लोणावळा ह्या भागातून भटकलोय. खुप आठवणी निगडित आहेत ह्या भागाची.

श्रीरंग_जोशी's picture

26 May 2015 - 8:52 am | श्रीरंग_जोशी

नेहमीप्रमाणेच जबरदस्त.

दिघे मामांनी सांगितलेली कथा पण आवडली :-) .