फोटो १
फोटो २
फोटो ३
फोटो ४
आपल्याकडे तयार मिळणाऱ्या लांब बाह्यांच्या शर्टसच्या खिशास फ्लॅप नसतो.बंद करता आल्यास प्रवासात फार सोयीचं पडतं.
१)फ्लॅपसाठी हवा असलेला त्याच कापडाचा तुकडा मनगटपट्टीच्या आतल्या बाजूचा काढला आहे आणि त्याजागी एक अस्तरचे कापड लावले.
२)तो तुकडा उलट बाजू वर करून जोडीस अस्तराचे कापड आणि खिशाच्या रुंदीचा कागदाचा आकार एकत्र पिन केलेत.
३)वरील कापड शिवताना कागदाचा गाइड म्हणून उपयोग होतो.उलट करून आणखी एक दिखाऊ शिवण घातल्यावर फ्लॅप असा दिसेल.
४)काज्याच्या जागी कात्रीने काळजीपुर्वक कापून काजटाके घातल्यावर फ्लॅप शिवून बटण लावले.
प्रतिक्रिया
24 May 2015 - 2:50 pm | आदूबाळ
काका दोन प्रश्न
१. फ्लॅपसाठीचं कापड शर्टाच्या कोणत्या भागातून कापलं?
२. काजं कसं पाडलं?
24 May 2015 - 4:17 pm | कंजूस
काज जिथे करायचे असेल तिथे खडूने खूण करायची.ती एक उभी रेघ असेल.कापडास इथे अशी घडी घालायची की रेघ अर्धी होइल मग कात्रीने तेवढेच कापायचे.दुसय्रा एका कापडावर हा प्रयोग करून पाहायचा.चुकीने मोठी चीर गेल्यास कापड वाया जाईल.
24 May 2015 - 4:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फ्लॅप आवश्यक झालंय खिशातून अनेकदा मोबाईल पडतो.
प्रयोग आवडला.
-दिलीप बिरुटे
24 May 2015 - 9:41 pm | पैसा
बेश्ट आयडिया! अनेकदा बारीक सारीक दुरुस्त्यांसाठी आवश्यक कापड कुठून मिळवावे हा प्रश्न असतो. त्याचे सोपे उत्तर आणि अगगदी डिटेलमधे लिहिलंत! छान वाटलं.
24 May 2015 - 10:55 pm | श्रीरंग_जोशी
या उपयुक्त माहितीकरता धन्यवाद.
25 May 2015 - 2:52 pm | एस
मस्तच की.
काजा-बटने करायचा दांडगा अनुभव असलेला.. :-)
25 May 2015 - 6:03 pm | दिपक.कुवेत
पण हल्ली बहुतेक सगळे रेडिमेड शर्ट घेतात सो फ्लॅप साठि तेच कापड कुठुन आणि कस मिळवायचं?
25 May 2015 - 7:06 pm | कंजूस
दिपक, हाताच्या मनगटपट्टीच्या जागी डबल कापड असते त्यातला आतला भाग काढलेला पहिल्या फोटोत दाखवलं आहे. दोन खिसे असतील तर दोन मनगटपट्ट्यांतून दोन कापडाचे तुकडे सहज मिळतात.
25 May 2015 - 8:51 pm | मस्त कलंदर
सही आहे हा ही उद्योग!!
25 May 2015 - 9:56 pm | कंजूस
हे काम ऑल्ट्रेशन करणारे बाजारातले टेलर करतील याबद्दल शंकाच आहे कारण वेळखाऊ काम आहे.
आगामी उद्योग-
नवीन चांगल्या ड्रेस/साडी /शर्टला खोंबारा लागून फाटले तर रफू कसं करायचं हे पण लिहिण्याचा विचार करतोय. {रफु करून वापरावे का नाही हा मुद्दा ज्याचा त्याचा प्रश्न असेल} तंत्र देणे हा उद्देश आहे.
26 May 2015 - 8:13 am | झकास
मला तरी वाटतं कि alteration करणारे tailors नक्की हे काम करतील. कारण ते collar फिरवून लावून देतात. (collar चा मळलेला भाग खाली आणि स्वच्छ भाग वर येतो.)
आणि ते रफूचं नक्की लिहा. एक फार्फार आवडत्या dressला लवकरच रफूची गरज भासणार आहे.
26 May 2015 - 8:38 am | चौथा कोनाडा
भारी आयडिया आहे ! वरच्या खिशाला फ्लॅप असेलतर सेफ वाटते. खिश्यातील वस्तु. कागद खाली पडेल अशी चिंता लागुन रहात नाही. प्रवासात तर मस्टच !
छान, हो कंजुसभाऊ !
22 Aug 2023 - 9:22 am | निनाद
आवडले आहे. खिशाला फ्लॅप आवश्यक आहे.
पण फ्याशन पाई वाटोळे नावाचा नाग मनात वेटोळे घालून बसलेला आहे त्याला घालवावा लागेल आधी! :)