करियर मार्गदर्शन

लालगरूड's picture
लालगरूड in काथ्याकूट
24 May 2015 - 12:34 pm
गाभा: 

मी सध्या mechanical diploma च्या द्वितीय वर्षाला आहे. मी degree करावी का नाही या गोंधळात आहे. कोणता पर्याय चांगला आहे? डिग्री की जॉब ? आधीच लोक इंजीनियरिंग बद्दल काही चांगल बोलत नाहीत :'(

प्रतिक्रिया

लॉर्ड फॉकलन्ड's picture

24 May 2015 - 2:26 pm | लॉर्ड फॉकलन्ड

डीग्रीच करा.बर्‍याचश्या मास्टर डीग्री कोर्सना (उदा. एम्बीए) डिप्लोमा चालत नाही.त्यासाठी कोणत्याही शाखेची बॅचरलची डीग्री लागते.जॉब संभाळूनही डिग्री घेता येते.

लालगरूड's picture

24 May 2015 - 2:34 pm | लालगरूड

_/\_

टवाळ कार्टा's picture

24 May 2015 - 2:28 pm | टवाळ कार्टा

डिग्री लगेच करावी...गॅप न घेता

लालगरूड's picture

24 May 2015 - 2:32 pm | लालगरूड

धन्यवाद टकाभाऊ

लालगरूड's picture

24 May 2015 - 2:38 pm | लालगरूड

मिपा वर इंजिनियर ची कमी आहे वाटत :)) :)) :)) :))

तुषार काळभोर's picture

24 May 2015 - 6:22 pm | तुषार काळभोर

आज ऐतवार हाय ना...
वाईच कळ काढा. उद्या येत्याल.

लालगरूड's picture

24 May 2015 - 7:36 pm | लालगरूड

हा . आठवड्यातला एक दिवस जगू द्या त्यांना

रिम झिम's picture

24 May 2015 - 7:17 pm | रिम झिम

डिग्री कराच पण चांगल्या कॉले़जमधून करा. माझे काही डिग्री वाले मित्रांना माझ्यापेक्षा ही कमी पगार आहे कारण त्यांचे कॉलेज...

नसेल तर डिप्लोमा वर नोकरी करायला हरकत नाही..

लालगरूड's picture

24 May 2015 - 7:34 pm | लालगरूड

काहिंना डिग्री करून सुद्धा कमी पगार मिळतो ही वस्तुस्थिति आहे :))

सदस्यनाम's picture

24 May 2015 - 7:44 pm | सदस्यनाम

आधीच लोक इंजीनियरिंग बद्दल काही चांगल बोलत नाहीत.

आधीच इंजिनिअर लोक इंजीनियरिंग बद्दल काही चांगल बोलत नाहीत. दुसर्‍याना ईंजिनिरिंग बद्दल वाईट बोलू देत नैत.
तुम्ही व्हा ईंजिनिअर. येईल तुमच्यात पण ते. ;)

लालगरूड's picture

24 May 2015 - 8:02 pm | लालगरूड

हा ते तर होणार आहे. engineering करून कोण कोणत्या स्पर्धा परीक्षा देता येतात?

स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर बी.ए किंवा बी.कॉम करा ते उत्तम,आणि जर तुम्हाला काही नवीन निर्माण करायचं आहे किंवा जे आहे त्यामधे बदल करायचे असल्यास इंजिनियरींग उत्तम.आणि हो कोणी सांगत आहे इंजिनियरिंग कर म्हणून करत असल्सास करू नये.

लालगरूड's picture

25 May 2015 - 8:15 am | लालगरूड

_/\_

mechanical diploma पुर्ण केल्यावर degree मध्ये mechanical , ऑटोमोबाईल , प्रॉडक्शन , असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत . पण सध्यातरी तुम्ही द्वितीय वर्ष व नंतर तिसरया वर्षावरच (अभ्यासावरच) पुर्ण लक्ष द्या .
लोकांकडे दुर्लक्ष करा कारण ते काही तुमची फी भरायला येणार नाहीत.

लालगरूड's picture

25 May 2015 - 8:14 am | लालगरूड

_/\_ └(^o^)┘

खटपट्या's picture

25 May 2015 - 8:30 am | खटपट्या

बहुतेक मोठ्या कंपन्यांमधे डीग्री मस्ट असते. डिप्लोमावाले पण उच्च पदावर जातातच. वर सांगीतल्याप्रमाणे एमबीए सारख्या कोर्सेसना डीग्री लागतेच. गॅप न घेता करणे चांगले कारण एकदा जॉब चालू केल्यावर डीग्री लांबते..

मुक्त विहारि's picture

25 May 2015 - 8:40 am | मुक्त विहारि

त्यामुळे सध्या तरी फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रीत करा.

पाटील हो's picture

25 May 2015 - 9:52 am | पाटील हो

हाच प्रश्न माज्या डोक्यात ८ वर्षा पूर्वी आलेला ( mechanical डिप्लोमा संपल्यावर )
Common Entrance Test मध्ये चांगले गुण मिळून सुधा मी माजा दुसरा रस्ता निवडला .
बाकी सगळे मित्र B.E. रेगुलर चालू केले आणि मी आपला Design soft ( Unigraphics & Catia ) केलो .
नंतर जोब करत Part time degree केलो .
बाकी हाच माझा turning पोइन्त ठरला . ३ वर्ष नंतर degree complete झाली & ३ वर्ष्याचा design मधला अनुभव पण सोबत होत.
सांगायचा मुद्दा येवडाच होता कि … रेगुलर Degree संपवून आल्याल्या फ्रेशर मुलान्पेक्ष्य जास्तीच काहीतर होता आणि त्यामुळेच त्यांच्यापेक्ष्य पुडे जात आला, बाकी ८ वर्षा नंतर सुद्धा मागेवळून पाहिलातर मज निर्णय मला बरोबर वटतो .
certificate & college ह्याबद्दल सांगायचा तर ते फक्त सुरवातीला न तेपण जर कॅम्पस interview असेल तरच उपयोगात येत . त्यानंतर जे असेल ते फक्त आणि फक्त आपला knowledge . ( आज्पारीयंत मलातर कोणीही कंपनी मध्ये कोणत्या कॉलेज मधून डेग्री आणि किती % मार्क्स विचारालेपण नाही , २ MNCs मध्ये काम करून आता तिसर्या OEM मध्ये आहे.)

बागा माजा अनुभव तुमच्या काय कामाला येतो का .
सध्यातरी आभ्यासावर लक्ष द्या .

वरील अनुभव मज आहे …। सगळेच ह्याच्याशी साहत असावेत असा काही नाही :)

तुषार काळभोर's picture

25 May 2015 - 10:48 am | तुषार काळभोर

certificate & college ह्याबद्दल सांगायचा तर ते फक्त सुरवातीला न तेपण जर कॅम्पस interview असेल तरच उपयोगात येत . त्यानंतर जे असेल ते फक्त आणि फक्त आपला knowledge . ( आज्पारीयंत मलातर कोणीही कंपनी मध्ये कोणत्या कॉलेज मधून डेग्री आणि किती % मार्क्स विचारालेपण नाही , २ MNCs मध्ये काम करून आता तिसर्या OEM मध्ये आहे.)

+(१११^१११)

पण...
जॉब करत अभियांत्रिकीची पदवी पुर्ण करणं प्रत्येकाला जमेलच असे नाही. आणि एक ठराविक वेळ निघून गेली की शिक्षण 'घेण्यात' तितका रस राहिलच असे नाही. (रट्टा मारून पास होता येईल कदाचित.) म्हणून गॅप न घेता लगेच पदवी शिक्षण सुरू करावे हे उत्तम (जॉब करा वा नका करू).

लालगरूड's picture

25 May 2015 - 1:33 pm | लालगरूड

हा . मला पण डिग्री सोबत काहीतरी वेगळे करावेसे वाटते.

बाबा पाटील's picture

26 May 2015 - 12:14 pm | बाबा पाटील

राजा घरची शेती किती आहे ? आणी बारमाही पाण्याची काही व्यवस्था आहे का ?

संदीप डांगे's picture

26 May 2015 - 12:18 pm | संदीप डांगे

मनातलं बोललात पाटील... :-)

पाटील शेती नाही. पण आयुष्यात शेती करणार. इथे पिं-चिं मधे कुठे राहिलिये शेती नुसत्या बिल्डिंग्स :-(

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 May 2015 - 8:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी स्वतः डिप्लोमानंतर नोकरी करत करत मेकॅनिकल इंजिनिअरिंग पुर्ण केलयं. भरपुर त्रास होतो. पण त्याचं फळ मात्र खुप चांगलं मिळतं हे लक्षात घे. मेकॅनिकल संबंधी काही माहिती लागली तर कधीही विचार.

टवाळ कार्टा's picture

26 May 2015 - 8:12 pm | टवाळ कार्टा

बाब्बौ

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 May 2015 - 8:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

काय झालं रे तुला?

टवाळ कार्टा's picture

26 May 2015 - 8:22 pm | टवाळ कार्टा

इंजिनीअरींग...ते पण मेक...ते पण जॉब करून...ते पण पुणे उनीवरशीटीतून...ते पण रँक घेउन
एकटाच असशील...गिनिज बुकात नाव टाक

चिमणरावांबद्दल आदर थोड्डासा वाढला आहे असे नमूद करतो.. ;)

बादवे, डिप्लोमा करुन जॉब करत करत डिग्री करणे महा कठिण काम आहे असे आम्ही इतरांच्या पाहिलेल्या उदाहरणांवरुन सांगू शकतो.
आम्ही पार्ट-टाईम जॉब करत मास्टर्स केलं तर आमचा भुगा पडला, त्यामुळे अशा प्रकारे डिग्री करणार्‍यांबद्दल खूपच आदर आहे. :)

टवाळ कार्टा's picture

26 May 2015 - 8:36 pm | टवाळ कार्टा

थोडासा???

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 May 2015 - 8:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

उलटा जॉब करत शिकल्याचा फायदा झाला रे. मॅन्युफॅक्च्रिंग टेक्न. च्या एकाही पेपराला कधी अभ्यास केला नाही रादर करावा लागला नाही =))

मोहनराव's picture

26 May 2015 - 8:21 pm | मोहनराव

मीसुद्धा प्रथम डिप्लोमा केला. कंपन्यांचे ऑफर्स हाती असुनसुद्धा डिग्रिला प्राधान्य दिले. मास्टर्स केलं व याचा उपयोग मला खुप चांगला होत आहे.
तसेच आजकाल डिप्लोमाचा काय डिग्रीलाही किंम्मत कमी झाली आहे. कारण कंपन्यांना कँडिडेट्सची कमी नाही. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आपल्या आवडीच्या विषयात जास्तीत जास्त शिक्षण मिळवणे कधीहि चांगलेच.
आणी हो एकदा जॉब चालु केलास की एकुणात परत काही शिकण्याची इच्छा कमी होते म्हणुन आधी शिक्षण पुर्ण कर.

लालगरूड's picture

26 May 2015 - 8:50 pm | लालगरूड

हो नक्कीच. सध्या इंग्लिश बोलण्याचा खुप प्रॉब्लम आहे. समोरचा काय बोलतो ते कळते सर्व काळाच्या वाक्यरचना ही येतात पण बोलायचे वांदे . न्यूनगंड निर्माण झालाय इंग्लिश बद्दल . कोणी मदत करेल काय?

संदीप डांगे's picture

26 May 2015 - 9:38 pm | संदीप डांगे

हम है ना... :-)

सर्वात पहिले ते व्याकरण, टेन्स वैगेरे सगळं विसरून जा. ते भाषा साहित्य लिहिणार्‍या आणि अभ्यासणार्‍यांसाठी असते. आपण मराठी बोलायला शिकलो तेव्हा कुठलं व्याकरण आपल्याला माहित होतं. (आताही कुठे माहित असतं म्हणा).

आपला उद्देश बोलीभाषा, अर्थज्ञान आणि रसग्रहण.

१. रोज किमान एक इंग्रजी चित्रपट बघा. चित्रपट निवडतांना शक्यतो ब्रिटीश इंग्लीशवाला निवडा. त्यांचे उच्चार अमेरिकनांपेक्षा जास्त स्पष्ट आणि स्लँग कमी असते. ब्रीटीश व अमेरिकन इंग्लीश दोन्हीची ओळख व्यवस्थित होईल. सबटायटलवर बघा. तीन महिन्यांनी सबटायटल ऑफ करून बघा.

२. चित्रपट निवडतांना जुने, नवे, ऐतिहासिक, वैज्ञानिक, ड्रामा, चरित्रे असं सगळं मिक्स-वेज ठेवा. वेगवेगळ्या प्रकारचं इंग्रजी कानावर पडून सवय होईल.

३. अमेरिकन इंग्लीश सीरिअल बघा. त्या मात्र नव्या बघा. मागच्या २-३ वर्षात आलेल्या.

४. इंग्रजी वर्तमानपत्रं विशेषतः परदेशीमधे The Huffington Post, द टेलिग्राफ आणि देशी मधे हिंदू, इंडियन एक्प्रेस बरे आहेत. रोज सकाळी फक्त इंग्रजी वर्तमानपत्र किमान सहा महिने तरी वाचा. संपादकीय, विशेष स्तंभ यावर भर असावा. आपल्याला समजत असलेल्या विषयांपासून सुरुवात करा. जसे खेळ, बॉलीवूड इत्यादी.

५. साहित्य वाचनासाठी आठवड्यातून एक कादंबरी. सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींच्या पुस्तकांपासून करा. चरित्रे, विज्ञान-कथा यांच्यावर भर द्या. ओळखीच्या विषयांबद्दल वाचा.

६. एक चांगला विश्वासू इंग्रजी व्यवस्थित येणारा मित्र-नातेवाईक-सहकारी निवडा. त्याला आपल्या उपक्रमाबद्दल व्यवस्थित सांगून रोज अर्धा-एक तास तरी त्याच्याशी वेगवेगळ्या विषयांवर रोजच्या गप्पा मारा. कुठे चुकत असेल तर त्याला सांगायला लावा. तुम्ही कुठेही बोलतांना 'मी कुठे चुकेन का किंवा हा आता काही चूक सांगेल का' या भीतीला सोडून द्या. बिंदासपणा फार आवश्यक आहे. कुणीच नाही मिळालं तर मी वेळ काढेन तुमच्यासाठी अर्धा तास तरी.

वरचे उपाय रोज करा. सहा महिन्यात चांगलाच फरक जाणवेल. तुम्हाला स्वतः कळणार नाही तुम्ही केव्हा बोलू लागलात ते. ज्ञान ही खरी शक्ती आहे. भीती ही ज्ञान मिळवण्यातली सगळ्यात मोठी धोंड आहे. एवढं लक्षात ठेवा. इंग्रजीचं योग्य ज्ञान आल्यावर सर्व न्यूनगंड पळून जाईल.

करा उद्यापासून सुरुवात. अनेक शुभेच्छा!

लालगरूड's picture

26 May 2015 - 9:55 pm | लालगरूड

हो चालू करतो आजपासून _/\_ आभारी आहोत .

कपिलमुनी's picture

27 May 2015 - 2:46 pm | कपिलमुनी

बरेच जण आधी वाक्याची जुळणी मराठी मधून करून मग इम्ग्रजीमधे भाषांतरीत करतात.
उदा : एका गाडीचे वर्णन करायला सांगितले तर आधी मराठीमधून तयार करतात आणि मग भाषांतरीत करतात याने चुका वाढतात आणि लिहायचा / बोलायचा वेग कमी होतो.

त्यामुळे इंग्रजीमध्ये विचार करायला शिका :)

लालगरूड's picture

27 May 2015 - 3:02 pm | लालगरूड

हे खुप महत्तवाचे आहे
इंग्लिश बोलायचे म्हणजे विचार पण इंग्लिश मधून केला पाहिजे

इंग्लिश बोलायचे म्हणजे विचार पण इंग्लिश मधून केला पाहिजे

त्यासाठी इंग्रजी शब्दसंग्रह वाढला पाहिजे.

हा प्रतिसाद वाचल्याक्षणापासून तुम्हाला दिसेल त्या वस्तुला इंग्रजी शब्द शोधायला सुरू करा. रस्त्यावर आहात तर रस्त्यावरच्या वस्तू.. आपल्या शरिराचे वेगवेगळे अवयव.. शेतात आहात तर माती पासून ते झाडांच्या पानाफुलांपर्यंत गोष्टींची नावे शोधा.
उदा. झाडाची मुळे, खोड, फांदी, पाने, देठ, वाळलेल्या फांद्या यांना इंग्रजीत काय म्हणतात? "झाड डेरेदार आहे" हे इंग्रजीत कसे सांगाल?

हळूहळू काठिण्यपातळी वाढवत न्या.. टेकडी, डोंगर, पर्वत यांच्या इंग्रजी शब्दांमधील अर्थछटांमधला फरक..
उदा. - खडे, दगड आणि खडक यांमधला फरक - Pebbles, Stone, Rock असा काहीसा..

शब्द जितक्या लवकर सापडतील तितका आत्मविश्वास लवकर वाढेल.

काळा पहाड's picture

27 May 2015 - 6:47 pm | काळा पहाड

"झाड डेरेदार आहे"

या वाक्याचा उपयोग नक्की कुठे होईल बरे?

या वाक्याचा उपयोग नक्की कुठे होईल बरे?

एखाद्या डेरेदार झाडाचे वर्णन करताना.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 May 2015 - 7:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

डेरेदार झाडांवर प्रेम करा झाडाखाली नको. कर भाषांतर झंप्या!!!

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 2:52 pm | टवाळ कार्टा

"झाड डेरेदार आहे"
काळा पहाड - Wed, 27/05/2015 - 18:47
"झाड डेरेदार आहे"

या वाक्याचा उपयोग नक्की कुठे होईल बरे?

...रात्रीच्या वेळी कॉलसेंटरच्या कॅबमधून जाणारी ती...पारावरच्या मुंज्याने तिला पहाताच त्याच्या मनात आले...झाड डेरेदार आहे...

;)

टीपीके's picture

27 May 2015 - 7:45 pm | टीपीके

अगदी बरोबर
जमले तर TuneIn radio download करा मोबाईल वर आणि BBC World Service ऐकत जा. प्रवासात पण ऐकू शकाल, British इंग्लिश ऐकून सराव होईल, वेळ वाचेल आणि जनरल नॉलेज पण वाढेल

लालगरूड's picture

27 May 2015 - 10:11 pm | लालगरूड

;-)

झकासराव's picture

27 May 2015 - 2:25 pm | झकासराव

डिग्री पुर्ण कराच राव.
डिप्लोमा तयार करण्याच्या फॅक्तर्‍या दोन शिफ्ट मध्ये सुरु आहेत.
त्यामुळे डिप्लोमा होल्डर मायंदाळ झालेत.
कॅम्पस इन्टर्व्ह्यु मधुन जॉब मिळाला तरच चांगल मिळेल अथवा पिक अप घ्यायला वेळ लागेल.
चांगल्या कॉलेजातुन डिग्री कराच..

प्रसाद गोडबोले's picture

27 May 2015 - 2:30 pm | प्रसाद गोडबोले

असा ही विचार करुन पहा

“Careers are a 21st century invention and I don’t want one” (Penn, 2007).

http://www.christophermccandless.info/

सिरुसेरि's picture

28 May 2015 - 2:12 pm | सिरुसेरि

इंग्लंडात जाउनच डिग्री करा . म्हणजे , डिग्रीही मिळेल व इंग्लिशचाही चांगलाच सराव होइल .

लालगरूड's picture

28 May 2015 - 3:09 pm | लालगरूड

पुणेकर :-Dदिसताय