गाभा:
कुणी अर्जंट मदत करू शकतं काय?
माझं होस्टींग आहे बिगरॉकवर. हरामखोर हॅकर्स नी हल्ला केलाय. एकूण १२-१५ वेबसाईट्स आहेत माझ्या त्यावर. एक एक गिळंकृत करत चाललेत. मी सगळे पासवर्ड्स बदलूनही काही उपयोग होत नाहीये. बिगरॉक सकाळपर्यंत सपोर्ट देणार नाहीये.
कुणाला काही माहिती आहे का?
प्रतिक्रिया
6 May 2015 - 10:48 pm | सौन्दर्य
ह्या विषयी काहीच माहित नाही.
6 May 2015 - 11:07 pm | उगा काहितरीच
बिगरॉक नका हो वापरत जाउ , त्यापेक्षा तर godaddy बरं आहे.
6 May 2015 - 11:51 pm | पिंगू
मला तरी वाटतं की वेब सर्वर हॅक केला असल्याने तुम्ही पासवर्ड कितीही वेळा बदलला तरी तुम्हाला बिगरॉकचे सिस्टम अॅड्मिनच मदत करु शकतील.
तुम्ही फक्त वेबसाईटचा डेटाबेस बॅकअप घेऊन ठेवा. सध्या तरी तुमच्या कडून एवढेच शक्य आहे.
7 May 2015 - 12:43 am | संदीप डांगे
धन्यवाद!
असंच काही झालंय. वेबसाईट नाहीतर त्यांनी सगळा सर्वरच हॅक केलाय. सगळ्या फाईल्स करप्ट झाल्यात. डोक्याला ताप. दुष्काळात तेरावा महिना.
7 May 2015 - 1:11 am | स्रुजा
सॉरी यातुन बाहेर कसं पडायचं नाही सांगता येणार. पण बिग रॉक चा सपोर्ट फार च वाईट आहे हो. तुम्हाला ही ते या प्रसंगातुन कळलं असेल. गोडॅडी चा चांगला आहे अनुभव गेले २-३ वर्षं.
एकदा आमच्या इथे पण मी चौकशी करून सांगते काय करता येईल ते. टाकुन ठेवलाय प्रश्न. मला पण कुतुहल वाटायला लागलय आता.
7 May 2015 - 1:21 am | संदीप डांगे
धन्यवाद!
खरंच २४/७ सपोर्टची गरज आज कळली. राउंड-द-क्लॉक सपोर्ट असेल तर अशा गोष्टी लवकर नियंत्रणात येतात. शिफ्ट करायला लागेल गोडॅडीला असं वाटतंय. हे आजचे हॅकिंग सोडले तर मला पण गेले ३-४ वर्ष काही तशी समस्या नाही उद्भवली. फक्त एकदा सगळे इ-मेल घालवले होते त्यांनी. लई ताप झाला वता.
उद्या यांच्या सपोर्टसोबत प्रेमळ संवादाचे क्षण साजरे करावे लागतील बहुतेक.
7 May 2015 - 4:04 am | स्रुजा
आता खरं तर या माहितीचा फार उपयोग नाही कारण तुमचा डेटा आधीच करप्ट झालाय. तुम्ही तुमच्या वेबसाईट कंटेंटसाठी वर्ड् प्रेस वापरताय का? वर्ड प्रेस फार व्हल्नरेबल आहे सध्या. XSS व्हल्नरॅबिलिटी चे पण सारखे ईमेल्स येत आहेत खास करून वर्ड्प्रेस च्या जुन्या व्हर्जन्स साठी. हा प्रश्न सुटल्यावर तुम्ही आधी वर्डप्रेस अपग्रेड करा. ऑटो अपग्रेड पण सेट केलं नसेल तर सेट करून ठेवा. आणि हो, गोडॅडी दुपटीने महाग आहे बिग रॉक पेक्षा.
7 May 2015 - 8:47 am | भक्त प्रल्हाद
सध्या काय स्टेट्स?आहे? अजुन मदत हवि आहे काय?
7 May 2015 - 8:50 am | सतिश गावडे
अशा प्रकारांमध्ये काय करता येऊ शकते यावर सविस्तर लिहा ना. इतरांनाही कधी अशी समस्या आली तर मदत होईल.
7 May 2015 - 9:47 am | भक्त प्रल्हाद
अहो इतके काही सांगन्यासारखे नाही.
वेगवेगळी कारणे शोधन्यासाथी मदत करु शकतो, इतकेच. मशिनवरचे लॉग बघुन काही प्रयत्न केले असते.
7 May 2015 - 10:05 am | द-बाहुबली
भविष्यात क्रोन जॉब शेड्युल करुन ठेवा. सर्व बॅकप व्यवस्थीत राहतो. पाहिजे तेंव्हा रिस्टोर करता येते. अजुनही मला आशावाटते की बिगरॉकने आपला डाटा नक्किच कुठेतरी बॅकप घेउन ठेवला असावा. जरा जुना असेल पण डाटा नक्किच परत मिळेल. त्यांच्या सपोर्टचे काय उत्तर आलयं ?
7 May 2015 - 11:01 am | संदीप डांगे
अॅड्मिनकडून बॅकअप आलाय. बघतो डाउनलोड करून किती उपयोगाचा आहे ते...
7 May 2015 - 11:02 am | संदीप डांगे
Dear Customer,
We have identified that your website hosted on our server is running a version of
Wordpress which is vulnerable to attack.
With the latest version of WordPress, 4.2, a critical security flaw was detected
that made all WordPress sites running versions 4.2, 4.1.2, 4.1.1, 4.1.3, and
3.9.3 vulnerable to hacking. This XSS vulnerability allows an attacker to inject
a JavaScript code into comments and hack your site.
A fix has been posted, and is available with WordPress 4.2.1. The fix has has
begun to roll out as an automatic background update for sites that support
those. We urge all of you to head over to your WordPress dashboards and update
to the latest release immediately. As an added safety measure we recommend
deleting any suspicious comment you've received.
7 May 2015 - 11:17 am | संदीप डांगे
बॅक-अप पाठवण्यापुर्वीचा अॅडमिन मेसेज:
On checking I could see that below mentioned domains are currently resolving to a hack page.
-----
veroconsulting.in
veroestates.in
verogroupindia.com
veroproperties.in
veroservices.in
veroadvisors.in
verocapital.in
-----
As of now I have disabled that hacked index page and uploaded a test index.html page in each of your hacked domain's document root.
On further checking I could see that hackers have placed few pages with malicious content in your domain's document root. Below are the list of infected files
-----
http://pastebin.com/s2A49B1m
-----
Please remove these infected files from cPanel interface. Also please scan your domain using cPanel Virus Scanner and remove all the infected files from your domain's document root.
Once your website is free from any infected files, you can unblock your domain's outgoing port using cPanel "Port 80" plugin. Refer the link below :
-----
http://manage.bigrock.in/kb/answer/2411
-----
Currently I am generating backup for your website. We will update you with the website backup once it gets completed. You can restore your website from the given backup.
Note that even if we do find a backup file, we cannot say for certain if it is usable. We will do our best to give whatever files we have to you. However, if we are unable to find any usable content, we're afraid, nothing can be done from our end.
I would request you to look into the following points regarding our backup policy:
1. We do not promise the customers for providing the backups.
2. We take the backups on rotational basis and we keep the incremental backups for the last 7 days as an additional service. Also this is for our purpose and it is not compulsory.
So we always recommend the customers to take the backups of their site contents, databases and emails at their end.
Thank you.
7 May 2015 - 11:23 am | माहितगार
विकिपीडिया आणि बंधुप्रकल्पांमध्ये जावा(स्क्रीप्ट) आधारीत विवीध गॅजेट आणि विस्तार सुविधा वापरल्या जातात. त्या जावा(स्क्रीप्ट) व्ह्ल्नरेबल अथवा वापरणार्यांसाठी असुरक्षीत नाहीत याची खात्री करण्याचे काही मार्ग उपलब्ध आहेत का ?
आवांतरा बद्दल क्षमस्व
7 May 2015 - 11:30 am | द-बाहुबली
ओके थोडक्यात इथे बिगरॉकची कोणतीही चुक नसुन वर्डप्रेस(कमेंट)मधुन क्रॉस साइट स्क्रिप्ट चा धोका निर्माण झाला होता. बहुतांश सर्वीस प्रोव्हायडर नियमीत बॅकप ठेवतातच व काही प्रॉब्लेम आला तर नाममात्र फि घेउन डेटा रिस्टोर केला जातो त्यामुळे ९७% डेटालॉसची चिंता करायची गरज नसते. बहुतेक ईंडी युजरना या गोष्टीची कल्पना नसल्याने आपले पॅनीक होणे चुक नाहीच.
बहुदा तुमचे विषेश नुकसान झाले नसणार अगदीच लेटेस्ट काही ज्याचा ऑटो बॅकप घेतला गेला नसेल तेच कदाचीत परत मिळणार नाही. आपणास कोणताही चार्ज न लावता ते सहकार्य करत आहेत ही समाधानाचीच बाब आहे.
7 May 2015 - 11:52 am | संदीप डांगे
सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद!
हा सगळा घोटाळा माझ्या फ्रीलान्स डेवलपर मित्राकडून झालाय असं उघडकिस आलंय. तो जी वर्डप्रेस थीम वापरतोय बहुधा तिच्यातच काही समस्या आहे असं वाटतंय. या आधी एका युके क्लायंटची वेबसाईट तीच थीम वापरून केलेली. ती वेबसाईट क्लायंटच्या सर्वरवर होती. त्या सर्वर अॅडमिन ने सतत एरर मेसेज पाठवणे सुरु केले होते, कैक वेळा साईट डाऊन सुद्धा केली होती. आमचा प्रश्न असा होता तेव्हा की बुवा, बिगरॉकवर आम्हाला काही समस्या येत नाहीये, क्लायंट सर्वर कदाचित जुन्या फाईल्स ना वायरस समजत असेल. त्यामुळे थीम अपडेट करून बघितली, अजुन काय काय केले त्यांनी आणि आम्ही मिळून. क्लायंटचा सर्वर बिगरॉकपेक्षा प्रचंड अॅडवान्स्ड असला पाहिजे हे आज कळले.
त्याच फॉल्टी थीमने आज तमाशा केला बिगरॉकवर.
वर्डप्रेसशिवाय जास्त सुरक्षा असणारं काही आहे काय? किंवा वर्डप्रेससाठी काय काळजी घेता येईल?
मी वेबसाईट डीझाईन करतो, एचटीमल जमतं पण पीएच्पी, जावा वैगेरे बॅक-एन्ड टेक्नॉलॉजीमधे गती नाही. त्यासाठी दुसर्यांवर अवलंबून राहायला लागतं आणि तिथं डेवलपर काय म्हणतोय त्यावरच विश्वास ठेवावा लागतो. या परिस्थितीतून कसे बाहेर पडता येईल?
7 May 2015 - 1:28 pm | द-बाहुबली
सर्वप्रथम कोणतीही गोष्ट इग्नोर करायला अजिबात शिकु नका. "दुर्लक्ष" हा गाढवपणा आहे अथवा बिंडोक व्यक्तींचे हत्यार आहे हे नेहमी ध्यानात ठेवा. क्लायंटला एरर्/मेसेज/ वॉर्नींग वारंवार येत असुनही हे घडले म्हणजे अक्षम्यताच आहे. आपल्याला सेटप त्याच्या एनवाइरमेंट मधे कार्यन्वीत ठेवायचा आहे त्यामुळे माझ्या मशिनवर सर्व व्यवस्थीत आहे हा समज पुरेसा नाही.
डेवलपर्स हे इंट्रोवर्ट असतात. म्हणजे लोकात मिळुनमिसळुन न वागणारे न्हवे तर सर्व सुरळीत चालु असेल तर तंत्रज्ञानातील बदलापासुन लांब लांब राहणारे असतात. म्हणून एखादे फ्रेमवर्क, प्लॅट्फॉर्म, वर्शन बदल करणे यांना रुचत नाही, ते त्यांच्या कोषातच राहुन काम करणे कंफर्ट फिल करतात.
जसे आपल्या मित्राच्या वर्डप्रेस थिमचे जे वर्शन आहे त्यात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत त्याची झळ पोचायच्या आतच ते वर्शन अपडेट करणे अथवा त्याचा वापर न करणे अथवा त्याबाबत सतत अपडेट राहुन काही त्रुटी उमजल्यास वेळीच फिक्स करणे हे त्याचे कर्तव्य होते...
... पण बरेचदा कामाचा ताण व वर उल्लेखलेला इंट्रोवर्टपणा घातक ठरतो. म्हणून याबाबत तुम्हीच अधुन मधुन तो जे फ्रेमवर्क वपरतो (वर्डप्रेस्,पिएच्पी, जावा) त्यांची वर्शन महित करुन घेणे व त्यात काही त्रुटी सापडल्या आहेत का याकडे त्याला लक्ष द्यायला भाग पाडावे. आपण डिजैनर आहात तर तुम्हाला तांत्रीक बाबतीत कमी माहिती असणे शक्य आहे याचा गैरफायदा घ्या, डोक्यावर बसा.
एकावर अवलंबुन रहायचे नाही. सतत दुसर्यासोबत (छुपा) संवाद चालु ठेउन पहिल्याला नकळत क्रॉस चेक करत रहायचे. मित्र असला तरी कामाच्या बाबतीत आपल्याशी काहीही बोलताना त्याची फाफलली पाहिजे :)
(जाहिरात सुरु)
अन हे सर्व अपणास जमणार नसेल तर मी आहेच प्रोजेक्ट मॅनॅजर :)
(जाहिरात समाप्त)
7 May 2015 - 4:02 pm | संदीप डांगे
_/\_ दंडवत...
अमूल्य मार्गदर्शनाबद्दल शतशः धन्यवाद!
7 May 2015 - 11:43 am | आनन्दा
परवा माझी जूमलाची साईट हॅक झाली, आणि त्यात काहीतरी अॅडवेर टाकून ठेवले गेले.. अर्थात माझे व्हर्जन केवळ आऊटडेटेड नाही, तर आदमकाळातले आहे. पण सध्या सीझन चालू असल्यामुळे उपडेट करायची रिस्क घेता येई ना.. शेवटी अॅण्टीव्हायरस टाकला. अर्थात गोडॅडी.
7 May 2015 - 12:07 pm | पगला गजोधर
तुमच्या साईटवरून पेमेंट गेटवे जोडणारी नाळ आहे का नाही ? समजा असल्यास, साईट हॅक झाली, तर त्या साईटचे ग्राहक भविष्यात 'मँन इन मिडल' प्रकारच्या फसवणुकीला सामोरे जाऊ शकतात का ?
7 May 2015 - 12:14 pm | संदीप डांगे
नाही, माझ्या कुठल्याही वेबसाईटवर आत्तातरी पेमेंट गेटवे नाही.
ह्या मॅन इन मिडल बद्दल काही म्हाईत नाही बुवा.. कुणी जाणकार अधिक सांगू शकतील.
7 May 2015 - 5:42 pm | अद्द्या
समजा . तुम्ही एखाद्या मध्यस्था करवी एखादी प्रोपर्टि विकत घेताय . पण प्रत्यक्ष त्या माणसाला किंवा ग्राहकाला तुम्ही बघितलेलं नाहीये . सगळा व्यवहार दोन्ही कडून (तिन्ही ) फक्त फोन वर चालू आहे . .
जेव्हा प्रत्यक्ष पैसे घ्यायची वेळ येते . तेव्हा तुमच्या मध्यस्थाच्या जागी दुसराच माणूस तो पैसे घेऊन गायब होतो . ग्राहक म्हणतो पैसे दिले . तुम्ही म्हणता पैसे नाही दिले . मध्यस्त म्हणतो मी काही केलंच नाही . .
आता हेच सगळं नेट्वर्किंग / सर्वर्स च्या भाषेत आपल्या शब्दात ट्रान्सलेट करून घ्या
7 May 2015 - 3:10 pm | मास्टरमाईन्ड
आधी अश्या plugins चा अभ्यास करून ती वापरली तर हॅकींगचा धोका थोडा कमी होऊ शकतो.
मी PHP, MySQL, Wordpress मध्ये काम करतो.
माझं वैयक्तीक मत असं आहे, जर वर्डप्रेस मेंटेन करणे शक्य असेल तरच त्यात वेबसाईट बनवून घ्यावी. अन्यथा PHP मध्ये customized CMS पण बनवता येते.
customized website हॅक करायला बर्याच वेळेस अवघड असते. पण वर्डप्रेस, जुमला वगैरे FREE, Open Source systems हॅक करणे तुलनेने सोपे आहे कारण त्यांचा source code हा open to public असल्याने बरेचदा हॅकर आपण किती हुशार आहोत हे दाखवण्यासाठी अशा Open source systems चा अभ्यास करून आपले कर्तॄत्व दाखवतात.
Freelance Developer कडून आलेले काम व्यवस्थित चेक करणे उत्तम. पण पैसे वाचवण्याच्या नादात आपण ते विसरतो. बर्याच वेळेस थीम FREE किंवा cracked असते.
7 May 2015 - 4:10 pm | संदीप डांगे
PHP मध्ये customized CMS बनवली तर ती वेगवेगळ्या वेबसाईटसाठी वापरता येईल का की प्रत्येक वेबसाईटला नविन लागते?
एकच वर्डप्रेस थीम वेगवेगळ्या वेबसाईटला वापरू शकतो तसे काही? म्हणजे एकच दणकट फ्रेम बनवून घ्यावी म्हणतो.
एक अजून गंमत इथे नमूद करायची की काही थीम्स किंवा टेम्पलेटस विकत घेतल्यावर कळतात की ते मुस्लिम देशांतल्या लोकांनी बनवलेत. यात काही छुपा धोका आहे असं जाणवतंय. आताच काही दिवसांपुर्वी मी थीमफॉरेस्ट वरून एक थीम घेतली. तिच्या सोबत आलेल्या डॉक्युमेंटेशनवरून कळले की ती एक पाकड्याने बनवली आणि थीमफॉरेस्टवर विक्रीस ठेवली. आपला व्यवहार थीमफॉरेस्टशी होत असल्याने हे सगळं आधीच कळत नाही.
7 May 2015 - 4:37 pm | नीलकांत
खरं तर खुपच कस्टमाईज गरज नसेल तर अशी सिएमएस बनवून घेण्याचा सल्ला मी देणार नाही. ओपन सोर्स खुप चांगले पर्याय उपलब्ध आहेत. ते नकोच असतील तर एखादा पेड पर्याय बघा. हे का सांगतोय तर आंतरजालावर होणारे बदल खुप वेगात होतात. तुम्ही आयटी रिलेटेड नसाल तर त्यावेगाशी जुळवून घेणे शक्य होत नाही.
एकच थीम तांत्रीक दृष्ट्या अनेक साईट्स ना लावता येते. मात्र जर ती पेड थीम असेल तर त्याच्या वापरावर काही मर्यादा असतात.
तुम्ही म्हणता तश्या दणकट फ्रेम आधीच तयार आहेत. त्यापैकी एखादी निवडून त्यावर रंगरंगोटी केल्यास उत्तम. त्यामुळे नियमीत अपडेट्स सुध्दा येतील व बर्यापैकी पर्सनलाईज्ड अनुभव देता येईल.
मुस्लीम देशातील लोक थीम मधून काही गडबड करीत असतील असे वाटत नाही. कारण घरी बसल्या काम करून डॉलर मध्ये पैसा कमावण्याची संधी थीम डीझायनरना थीम फॉरेस्टसारख्या साईट्स देतात. तुम्ही नियमीत ग्राहक असाल तर डिझायनरची चौकशी करता येईल.
https://mythemeshop.com/ सारख्या साईट्स भारतीय लोकांच्या आहेत असे लक्षात येते. त्यांचे फॉलोअप ईमेल्स सुरज नावाने येतात.
7 May 2015 - 4:56 pm | संदीप डांगे
तुमच्या दोन्ही माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद, नीलकांत!
माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाने मी असे ठरवले की वर्डप्रेस थीम्सवर जरा शिकावे. कारण योग्य किंमतीत चांगल्या थीम्स मिळतात ज्या भरपूर वैविध्य असलेल्या असतात. त्या हाताळालायला माझ्यासारख्या नॉन-टेक्निकल माणसाला फार जड जाणार नाही शक्यतो.
माझे वेबसाईट बनवून द्यायचे काम मर्यादित आहे. एखाद दोन महिन्यातून एखादी वेबसाईट येते. त्यातून बेसिक एचटीएमएल वेबसाईट्स मीच बनवतो. आता पूर्ण तयार पण भयंकर कस्टमायजेबल पीएचपी थीम्स विकत मिळत असल्याने त्याही वापराव्यात असा विचार चाललाय. म्हणजे छोट्या-मोठ्या वेबसाईट्स मलाच हाताळता येतील.
मोठ्या टीमची गरज असलेल्या वेबसाईट्साठी नेहमीच प्रोफेशनल वेंडर्सचे सहकार्य घेत असतो. मिपावर याबाबतीतही मदत मिळण्याची शक्यता आहे असे दिसतंय. :-)
7 May 2015 - 4:59 pm | मास्टरमाईन्ड
आणी थोडंफार front end customization लागू शकतं.
लक्षात घ्या, वर्डप्रेस आणी इतर कोणत्याही टेम्पलेट बेस्ड systems चे आपापले pros & cons आहेत.
एकच थीम वेगवेगळ्या वेबसाईटला वापरणं सहज शक्य आहे. फक्त रंगसंगती वगैरे कडे लक्ष द्यावे लागेल.
माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की प्रॉब्लेम मुस्लीम देशांचा नाहीये. फक्त
मला middle east मधल्या clients चे अनुभव (तिथल्या मूळ लोकांचे) आतापर्यंत तरी बरे आहेत.
Themeforest वगैरे मार्केट मधून खरेदी जरूर करा, पण प्रत्येकवेळी व्हायरस, ट्रोजन वगैरे चेक करावेच लागेल. (व्यवसायाच्या आणी डिलीव्हरीच्या गड्बडीत आपण या गोष्टी विसरतो किंवा टाळतो हे मला माहिती आहे. पण एक दोनदा झटका खाल्ल्यावर मी शहाणा व्हायचा प्रयत्न करतोय)
7 May 2015 - 4:05 pm | नीलकांत
नमस्कार,
सर्वप्रथम तुमचा डेटा परत मिळाला हे उत्तम झाले. कारण सर्व्हरचा बॅकअप घेतला नसेल तर सेवादात्याच्या बॅकअप पॉलीसीवरच आपण अवलंबून असतो.
तुमच्या बाबत जे घडलं ते दुर्लक्ष केल्यामुळे घडलेलं दिसतंय. वर्डप्रेसची अपग्रेडेशन पध्दत तुलनेने सोपी आहे. त्यामुळे तुम्ही नियमीत वापरता तो ईमेल तुम्ही त्याच्या अॅडमीन खात्याला जोडला पाहिजे जेणे करून तुमच्या साईटसाठी नवीन सिक्युरीटी किंवा जनरल अपडेट उपलब्ध झाल्यावर त्याचा लागलीच ईमेल येतो. जे लोक आयटीमध्ये नाही त्यांना व्हर्जन अपग्रेडेशनचा ट्रॅक ठेवता येत नाही त्यांच्यासाठी ही सुविधा आहे.
एखादे वेळी फिचर अपडेट केला नाही तरी चालेल मात्र सिक्युरिटी अपडेट केलाच पाहिजे.
बॅकअपची पॉलीसी ठेवा. म्हणजे तुमच्या खात्यातून जर तुम्हाला शेल अॅक्सेस (Command Line) मिळत असेल तर किमान आठवड्यातून एकदा डेटाबेस डम्प करून त्याची झीप फाईल व कोअर फाईल्सचा डेटा झीप करून रिमोट सर्व्हरवर जाईल असा क्रॉन जॉब सेट करून ठेवा. रिमोट सर्व्हरला शक्य नसेल तर तुमच्या लोकल मशीनला घ्या.
तुम्ही तुमच्या व्यवसायाची किंवा प्रतिष्ठाणाची साईट मेंटेन करीत असाल तर तुलनेने नवीन साहित्य तयार होण्याचा वेग कमी असतो. त्यामुळे बॅकअप घेण्याचा कालावधी वाढवता येईल. पंधरवडा किंवा महिण्यातसुध्दा बॅकअप घेता येईल.
सेवादाता चांगल्या दर्जाचा असला पाहिजेच. त्यांच्या बॅकअप पॉलीसी उत्तम पाहिजेत. सध्यातरी मी तुम्हाला यापुढे वर्डप्रेस सारखी लोकप्रिय सिएमएस वापरत असाल तर सिक्युरिटी अपडेटेड रहा आणि नियमीत बॅकअप घेत रहा असा सल्ला देईल.
याशिवाय काही मदत लागल्यास कळवा.
- नीलकांत
13 May 2015 - 7:37 pm | विकास
वर्डप्रेस तुम्ही ऑटोअपडेट देखील करू शकता. त्याचे मेसेज येतात की आता साईट अमुक अमुक वर्जनला अपडेट झाली आहे म्हणून.