तोरणा / प्रचंडगड रात्रीचा ट्रेक

नितिन५८८'s picture
नितिन५८८ in भटकंती
6 May 2015 - 10:37 am

आकाश खोत यांचा तोरणा रात्रीचा ट्रेक वाचत असताना दुपारचे १:३० वाजले (आमची ऑफिस मधली जेवणाची वेळ ). जेवताना गिरीश ने कुठे तरी ट्रेक काढ असे सुचवले, मी सुद्धा लगेच तोरणा रात्रीचा ट्रेक (१ रात्रीचा ) आणी तोरणा ते रायगड (२ दिवसाचा ट्रेक ) सुचवला. आमच्या दोघांसाठी हा दोन्ही ट्रेक नवीनच …।
मि.पा. वरून आकाश खोतचा पूर्ण लेख वाचला. गुगल जालावरून सुद्धा माहिती गोळा केली, परत दुसऱ्या दिवशी जेवताना सर्वांसमोर विषय छेडला, तर बहुतेक जणांनी रात्रीचा ट्रेक अवघड कसा, चकवा कसा होतो हेच सांगितले. पण आमचा निश्चय दृढ होता, काहीही झाले तरी ट्रेक करायचा.
तर ठरले आधी तोरणा रात्रीचा ट्रेक करायचा यातून आपला शारीरिक चाचणी पण होईल नंतर (पावसाळ्याच्या आधी) तोरणा ते रायगड. मी आणी गिरीश दोघेच तयार झालो, हळू हळू बातमी ऑफिस मध्ये पसरवली आणी आम्ही ६ जणांचा ग्रुप तयार झाला. सागर, स्वप्नील, पंकज, प्रसाद, गिरीश आणी मी. ट्रेकच्या सामानाची यादी तयार करून सर्वाना इमेल वर पाठवली.

ठिकाण : तोरणा / प्रचंडगड
वार: गुरुवार ३० एप्रिल २०१५
वेळ: ५ वाजता
परतीचा दिवस: शुक्रवार १ मे २०१५

आवशयक सामग्री
वैयक्तिक:
१) ३ लि. पाणी
२) बॅटरी (प्रकाश पाडणारी )
३) स्वताचे अंथरूण व पांघरून
४) बूट, टोपी ( सकाळी गड उतरताना लागेल )
५) ताट, ग्लास (आवशक्यता असल्यास )
६) कॅमेरा
७) काही आजार असल्यास त्यावरील औषधे
८) बिस्कीटे (शक्यतो ग्लुकोज (पारले) )
९) तोंड धुण्यासाठी (पेस्ट, ब्रश) / लिंबाची काडी

सामुहिक साहित्य (४-५ लोकांसाठी)
१) पातेले + मोठा चमचा
२) काडेपेटी (३-४)
३) चाकू
४) तांदूळ (२ कि. )
५) पोहे (१ कि. )
६) कांदे (१२-१५)
७) बटाटे (५-७)
८) तेल (गरजेप्रमाणे )
९) मसाले (गरजेप्रमाणे )
१०) लिंबू (१२-१५)
११) मीठ (गरजेप्रमाणे )
१२) चहा हवा असल्यास, चहापत्ती + साखर + दुध पावडर
१३) प्लास्टिक ग्लास
१४) पाणी (वैयक्तिक ३ लिटर मधुन अर्धा लि.)

तर ठरल्याप्रमाणे आम्हाला निघता नाही आले, तब्बल २ तास उशिराने औंध (पुणे ) येथून सायकांळी ७ वा. निघालो आणी ९ वा. वेल्हे गावात पोहचलो.

इथे पोलिस स्टेशन बाहेर गाडी पार्क करून किल्याकडे कूच केले.

सागर, प्रसाद आणी स्वप्नील यांना रस्ता माहित होता त्यामुळे रस्ता चुकण्याचा काही संबध नव्हता.

खूप दिवसांनी ट्रेक करत असल्यामुळे आमची चांगलीच दमछाक झाली प्रचंड थंडीमध्ये तब्बल ८ ठिकाणी थांबत आणी ३ तासांच्या चढाई नंतर अखेर आम्ही मुख्य दरवाज्यापाशी पोचलो.

लवकरच तोरणा ते रायगड ट्रेकचा plan करतोय
कोणीतरी एक सल्ला द्यावा फोटो अपलोड करताना लांबी रुंदी किती ठेवावी जेणेकरून फोटो पुर्वनिरीक्षण करताना दिसतील
फोटो अपलोड करता न आल्यामुळे खाली दुवा देत आहे

https://plus.google.com/photos/102980100298257510834/albums/614561677030...

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

6 May 2015 - 10:53 am | किसन शिंदे

धागा चुकून पडलाय का?

आकाश खोत's picture

6 May 2015 - 12:17 pm | आकाश खोत

वाह, तुम्हाला माझा लेख वाचून या ट्रेकला जाण्याची इच्छा झाली, हे वाचून खूप छान वाटले. मिसळ पाव आणि इथल्या लेखांचा प्रभाव चांगलाच आहे. :)

कंजूस's picture

6 May 2015 - 12:41 pm | कंजूस

सांपल फोटो screen shots sample photos
1)

2)

अरर्र... ट्रेक शुरु होते हि खतम हो गया..... तोरणाला उगाचच प्रचंडगड म्हणतात राव......

कंजूस's picture

6 May 2015 - 12:57 pm | कंजूस

फोटो लांबी-रुंदी ?
आडव्या फोटोसाठी width ६०० पेक्षा जास्ती नको( maximum 640),height चा चौकोन रिकामा सोडा.
उभ्या अथवा पोर्ट्रटसाठी width 400 /500 ठेवा ,(maximum 640),heightचा चौकोन रिकामाच ठेवा.
कोणताही फोटो aspect 3:2/1:1/16:9/4:3 असला तरी width maximum 640 pixels ठेवा आणि height येथे रिकामा ठेवा.करून पाहा सोपे आहे.

रोहन अजय संसारे's picture

6 May 2015 - 2:35 pm | रोहन अजय संसारे

तोरणा ते रायगड ट्रेकला याय्चा विचार करत आहे.

नितिन५८८'s picture

6 May 2015 - 3:21 pm | नितिन५८८

तुमचा gmail चा इमेल id द्या, योजना आखली कि तुम्हाला update करतो. माझा इमेल nitin588@gmail.com आहे

रोहन अजय संसारे's picture

7 May 2015 - 10:49 am | रोहन अजय संसारे
राजेंद्र मेहेंदळे's picture

11 May 2015 - 7:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

तुम्हाला राजगड म्हणायचे आहे का?

नितिन५८८'s picture

12 May 2015 - 11:14 am | नितिन५८८

तोरणा ते रायगड हा २-३ दिवसांचा ट्रेक आहे, मी २ दिवसांचे plan करतोय पण माझ्या team मधून बरेच जणांना जमत नाहीये.