भोगानंदिश्वरा: काही प्रश्न

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in भटकंती
3 May 2015 - 1:53 am

भोगानंदिश्वरा:
याबद्दल पॉइंट ब्लँक यांनी इथेआधीच सविस्तर माहिती दिलेली आहे पण मला मूर्ती आणि त्यामागचे अर्थ यांचे आजिबातच ज्ञान नसल्याने काही प्रश्न पडले आहेत.
इथे त्या प्रश्नांचे निरसन करू शकणारी बरीच मंडळी आहेत त्यामुळे खाली काही फोटो चिटकवत आहे.

या चित्रात कोणीतरी घोड्यावर बसलेला दिसत आहे तसेच त्या खाली हत्तीदेखील दिसत आहे. मंदिराच्या समोरच्या भागातील दोन खांबावर हे शिल्प आहे. याचा काही विशेष अर्थ आहे का?
pic1

हे शिल्प नक्की कशाचे आहे? बऱ्याच ठिकाणी हे पाहण्यात आले आहे.
pic2

या चित्रात मोरावर आरूढ असलेला कार्तिकेय आहे का? आणि असल्यास त्याला तीन तोंड का आहेत?
pic3

या चित्रात काही व्यक्तींना चार हात आहेत तर काहीना दोन! तसेच एक गाय हि आहे जिला कलशामधील पाणी(हा माझा अंदाज! ) दिले जात आहे. उजव्या बाजूला एक व्यक्ती हातामध्ये एक कलश घेऊन उभी आहे, हा प्रसंग कोणता आहे? मुळात, कोरलेले प्रत्येक शिल्प काही इतिहास दर्शवते का?
pic4

आतापर्यंत गोमुख पहिले होते पण इथे मगरीसारखा(डोळ्यांवरून अंदाज लावला आहे ) प्राणी दिसत आहे आणि तिचे तोंड कोणीतरी उघडले आहे, असे का?
pic5

काही प्रश्न अत्यंत बाळबोधसुद्धा असतील कदाचित पण खरोखर याविषयी काहीच माहिती नसल्याने उत्सुकतेपोटी विचारले आहेत! :)

प्रतिक्रिया

पाहिले आणि दुसरे जनरल शिल्प आहेत. तत्कालीन घोडेस्वार पहिल्या शिल्पात तर दुसऱ्या शिल्पात सिंह मुख असलेला हायब्रिड मनुष्य आहे.

तिसऱ्या शिल्पात डावीकडे नंदीवर आरुढ शंकर, मध्ये गरुडवाहन विष्णू तर त्याचे शेजारी हंसावर आरुढ चतुर्मुखी ब्रह्मा.

चौथ्या शिल्पात परत हेच त्रिदेव असून सर्वात उजवीकडे ऋषी आहे.

पाचव्या शिल्पात मकरमुख आहे. मकर सुद्धा गायीसारखाच पवित्र प्राणी मानला जातो.

पॉइंट ब्लँक's picture

5 May 2015 - 4:48 pm | पॉइंट ब्लँक

मस्त माहिती दिलीत. :)

अनुप ढेरे's picture

5 May 2015 - 6:05 pm | अनुप ढेरे

धन्यवाद. मला पहिला कल्की वाटला होता.

अनुप कुलकर्णी's picture

6 May 2015 - 11:47 am | अनुप कुलकर्णी

हे मंदिर मुळात होयसाळांनी बांधले नसले तरी त्यांनी त्यात भर घातली असे कुठे तरी वाचले होते.

होयसाळा मंदिरांमध्ये हत्ती, सिंह, मोर, मकर, अश्व असे स्तर दिसतात. त्यात हत्ती स्थैर्याचे, सिंह शौर्याचे, अश्व प्रगतीचे प्रतिक आहे
मंदिर जेवढे सुबत्तेच्या काळात बांधले गेले तेवढे स्तर जास्त आहेत. उदा हळेबीड-बेलूर च्या मंदिरांमध्ये ८ स्तर दिसतात.

बाकी दुसर्या फोटोमधील नरसिंह आणि चौथ्या फोटोमधील ऋषी हे लेपाक्शी येथील नरसिंह आणि ऋषींच्या प्रतिमांशी फारच मिळते जुळते आहेत.

शब्दबम्बाळ's picture

3 May 2015 - 12:55 pm | शब्दबम्बाळ

बरीच माहिती मिळाली पण एक अजून शंका आहे!
फक्त गरुडच मनुष्य रुपात का दाखवला आहे?

पॉइंट ब्लँक's picture

5 May 2015 - 4:47 pm | पॉइंट ब्लँक

गरूड बहुदा सर्व मंदिरांमध्ये मनुष्य रुपातच दाखवतात.
http://en.wikipedia.org/wiki/Garuda
इथे "Births and Deeds" ह्या भागात थोडी माहिती दिली आहे.

प्रचेतस's picture

5 May 2015 - 4:48 pm | प्रचेतस

हो मनुष्यरूपातच. नाक मात्र टोकदार, गरुडासारखे आणि हाताचे खालचे बाजूस बरेचदा पंख दाखवतात.

शब्दबम्बाळ's picture

6 May 2015 - 6:52 pm | शब्दबम्बाळ

या निमित्ताने चांगली माहिती कळाली. :)

सुधीर कांदळकर's picture

5 May 2015 - 6:21 am | सुधीर कांदळकर

म्हणू नका. आम्ही मित्रमंडळी प्रवास करतांना एक अशोकस्तंभ दिसला. तेव्हा एकजण म्हणला की तो बघ तीन सिंहांचा सत्यमेव जयते मधला खांब. त्याच्या डोक्यामागे एक सणसणीत चापट बसली.

कवितानागेश's picture

8 May 2015 - 9:51 am | कवितानागेश

जुन्या इजिप्शियन चित्रात सुद्धा गरुड मनुष्य रुपात आहे.
http://www.wallcoo.net/paint/david_roberts_egypt_painting_2/DavidRoberts...
https://www.google.co.in/search?q=old+egyptian+paintings+ra&biw=600&bih=...

शब्दबम्बाळ's picture

9 May 2015 - 9:34 pm | शब्दबम्बाळ

एजिप्शिअन संस्कृतीमध्ये असे बरेच अर्धमानव देव देवता आहेत.
आपण दिलेला "रे" हा त्यांचा सर्वात प्राचीन आणि शक्तिशाली देवता आहे.
इथे त्यांची माहिती मिळेल.
"रे" ला Isis ने फसवले आणि Osiris ला राजा केलं असे दिसतंय.
नवीन काहीतरी वाचायला मिळेल आता, धन्यवाद! :)
माझा एक प्रयत्न! ;)
ra