एक खंडप्राय देश होता आणि तिथे नानाविध प्रकारेचे लोक भाषा परंपरा वगैरे जपत होते ... मुद्दा होता गोड पदार्थांचा ...
त्या देशात शास्त्रोक्त पद्धतीने अनेक उत्तमोत्तम गोड पदार्थ मिठाया बनवल्या जात ... त्या बनवायला वेळ लागत असे आणि पचायलाही ..पण लोक मजेत होते त्या मिठायांमध्ये चोष्य लेह्य खाद्य असे अनेक प्रकार होते ...
एके दिवशी त्या देशात काही फिरंगी लोक आले त्यांनी त्यांची संस्कृती आणली आणि त्यात त्यांच्या मिठाया पण होत्या... त्यात होता एक पदार्थ केक ...बनवायला सोपा ....दिसायला सुंदर... चवीला रुचकर ..फारच छान ..त्या देशवासीयांनी केकला चाखले ..स्वीकारले आणि आपलेसे केले ....पुढे पुढे तो पदार्थ वाढदिवसाचा अविभाज्य घटक झाला आणि एके दिवशी लोकांना लक्षात आले कि अरे गोडच एन्जॉय करायचे तर मग आपलेही पदार्थ आहेतच कि ...त्यातून बघितले कि आपले चिरोटे तिकडे बकलावा म्हणून खातात ... आपल्या खरवसा सारखे त्यांची जेली असते ...पण लोक सगळेच पदार्थ आपापल्या परीने एन्जॉय करू लागले ...पण एक झाले कि जेवणात श्रीखंड पुरी / बासुंदी तर संध्याकाळच्या पार्टीत केक ... जेवणात केक नाही आणि संध्याकाळी बासुंदी नाही ...ज्याची गरज जेव्हा तेव्हा तो कुणालाच काही तक्रार नव्हती ...
पण मग ..एक दिवस ...केकवाला बिघडला ...म्हणायला लागला ...तुमची बासुंदी हा पदार्थच नव्हे ...श्रीखंड १० ठिकाणी १० प्रकारे बनवतात त्यामुळे त्याचे प्रमाणीकरण नाही ..सबब हा पदार्थ खाद्यच नाही ... तुमच्या गुलाबजाम ला ओव्हन कुठे लागतो ? आणि हे मुळात दुध आटवून खवा हे अशास्त्रीय आहे ..कारण ते कंडेन्स मिल्क नाही ... आणि दिवस भर तुम्ही तुमचे पदार्थ चाखून संध्याकाळी केकच खाता नं ...मग कशाला येता केक खायला ? केकचे भाव वाढवले ...काही बेक्रीवाल्यांनी तर ५० रुपयांचा केक ५ हजाराला विकायला सुरुवात केली ...त्यात केकमध्ये भेसळ ..शिळे केक काय आणि काय लोकं भडकले .. अहो केक आम्ही वाढदिवसाला म्हणून नेतो ...वाटेल तेवढे पैसे मोजतो निदान नीट तर द्याल कि नै ... पण नै ... घ्ययचे तर हेच घ्या सकाळची बासुंदी बंद करा .... श्रीखंड कशाला खाता ..केकच खा सकाळ दुपार संध्याकाळ ... आणि ती फिरनी बिरणी तर अजिबात खाऊ नका म्हणे ..त्यापेक्षा राईस पुडिंग घ्या ते हि गोडच असते ...
पुढे पुढे तर केकवाले म्हणायला लागले कि तुमची मिठाई मुळात गोड नाहीच (मैं परिमल हि नाही स्टाईल) .. गोड खाल्ल्याचा नुसता आभास आहे मानसिक समाधान आहे म्हणे ...कारण का तर त्यात केक सारखी प्रोसेस नाही म्हणे ....
शेवटी काय लोकं आपल्या बुद्धीनेच वागायला लागले ... हवे ते खायचे ...म्हणजे सकाळी शिरा, जेवणात गुलाबजाम / बासुंदी वगैरे ...संध्याकाळीच केक ...रात्री खरवस वगैरे ... कधी नुसताच केक नाही तर कधी कधी केक नाही म्हणजे नाहीच ....
केक वगैरे घ्यायचे म्हणा पण केकवाल्याने फसवले कि जे हतबल होते ते करवादायचे....पण गावगुंड, पाटील, किंवा राजे लोकांची फसवणूक झाली कि दुकान बेकरी आणि केकवाला ह्यांची धुलाई ..फटकावून काढायचे ...फसवले गेलेले हतबल लोक थोडे सुखवायचे ...सुद्न्य लोक हळहळ व्यक्त करायचे ...
काही केकवाल्यान्पायी सगळे शिव्या खायचे आणि काही गुंडान्पायी सगळे केकवाले सरसकट सगळ्या लोकांना जबाबदार धरून भ्रष्ट केकवाले अजूनच महाग / भेसळ वाले केक विकायचे ....चांगले केकवाले चांगले केक विकायचे ...
...गोंधळ सुरूच राहिला ..वाढतच राहीला आणि अजून बराच वेळ चालूच राहील असे वाटते ...
प्रतिक्रिया
24 Apr 2015 - 11:36 am | कोंबडी प्रेमी
चितळे विरुद्ध मोन्जीनीज कि काय ?
24 Apr 2015 - 11:55 am | संदीप डांगे
अहो हे वैद्यकिय सेवेबद्दल सुरु असलेल्या दिव्य चर्चेवरचं रुपक
जबराट हां अत्रंगी पाऊस.... __/\__
24 Apr 2015 - 12:29 pm | मृत्युन्जय
वाटलेच होते :)
27 Apr 2015 - 2:35 pm | कोंबडी प्रेमी
पण रूपक लैच झ्याक !!
24 Apr 2015 - 11:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
चांगलं 'केक'टलं आहे.
24 Apr 2015 - 12:19 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो. उत्तम केकावली.
24 Apr 2015 - 6:47 pm | हाडक्या
+१
बादवे, केकावली कोण ? म्हंजे काय अर्थ आहे या शब्दाला की काही रेफ. (ते संस्कृत, पुराण वगैरे) आहे रे ?
24 Apr 2015 - 6:50 pm | अत्रन्गि पाउस
http://ek-kavita.blogspot.in/2009/01/blog-post_7855.html
हे घ्या
24 Apr 2015 - 10:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
केकावली म्हणजे मोराचे ओरडणे. त्यावरूनच मोरोपंतांनी त्यांच्या काव्याचे नाव केकावली ठेवले.
26 Apr 2015 - 3:20 am | हाडक्या
अरे वा..!! धन्यवाद.. चांगली माहिती. :)
24 Apr 2015 - 12:25 pm | नेत्रेश
शाल + जोडे
24 Apr 2015 - 10:21 pm | सौन्दर्य
तुमच्या लेखावरून मेरवानच्या केक्सची आठवण झाली. ग्रँटरोड स्टेशन समोरील मेरवानचे हॉटेल बंद झाल्याचे ऐकून वाईट वाटले.
26 Apr 2015 - 9:41 am | नूतन सावंत
नाही,सौंदर्य मेरवान अजून चालु आहे.आणि त्याच गर्दीत चालू आहे.मावाकेकला तर पर्यायाच नाहीये.
27 Apr 2015 - 7:26 pm | सौन्दर्य
आनंदाची बातमी. पुढच्या वेळेस भारतात आल्यावर नक्की भेट देईन. आणि इतकी चांगली बातमी कळवल्याबद्दल तुमच्यासाठी देखील केक घेईन, मुंबईत राहत असाल तर घरपोच डिलिवरी मिळेल.
27 Apr 2015 - 1:27 pm | शिल्पा नाईक
___/\____ भन्नाट...
आधी कळलच नाहि. संदीप यांच्या प्रतिक्रिये नंतर परत वाचले.
मनापासुन पटले.
27 Apr 2015 - 2:36 pm | कोंबडी प्रेमी
+1