नावात काय आहे ????

नितिन शेंडगे's picture
नितिन शेंडगे in राजकारण
20 Apr 2015 - 7:35 pm

नमस्कार !!

नावात काय आहे , असे कुणीतरी म्हणून गेले आहे. पण खरेच का हो नावात काहीच नाही ????
खूप लोकांना आपल्या नावाचा अभिमान असतो, कारण काही ना काही असतेच हो. तसेच आपल्या गावाचा हि अभिमान असतोच, कितीही लहान गाव असू देत पण परमुलुखात त्याचे नाव निघाले की लई म्हणजे लई भारी वाटते . ह्या सोमवारी मुंबई वरून येताना गावाला जाणारी येष्टी मिळाली, म्हटले चला जावू त्याच गाडीने. लहानपण आठवले हो लगेच, प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच गाडीने गावाला जाणे होत होते. एकदम भन्नाट प्रवास असायचा, तो खंडाळ्याचा घाट, लोणावळा चिक्की आणि भिगवण ला जेवायला थांबणे… नुसता सुवर्णकाळ आठवत होतो.

सहप्रवासी मात्र पावसातील गांडूळ असल्यासारखा वळवळत होता. एकतर तो माज्या पेक्षा जास्त अवाढव्य होता, आणि महामंडळाच्या सीट इतक्या आकारमानाच्या लोकांसाठी नसतात. मी स्वताला गोगलगायी प्रमाणे आकसून घेत निद्रा देवीला जवळ केले. हळूहळू प्रवास चालू होता आणि त्याच्या एका प्रश्नाने मात्र गोगल गायीचा बैल झाला !!

भैया बॉम्बे वापस जाने के लिये शाम को आखरी बस कब है ?????

त्याने हिंदी बोलले किंवा मला भैय्या म्हटले त्याचा नाही तर त्याने मुंबई चा उल्लेख बॉम्बे केला ह्याचा.

ह्याच विषयावरून माझा खूप लोकांशी वाद झालेला आहे, ह्यांच्या काय बोबड्या वळतात काय मुंबई बोलायला ? आमच्या जुन्या ऑफिस मधील मार्केटिंग वाल्या गुज्जू सोबत तर रोज ह्या विषयावरून वाजायचे. ती नेहमी बॉम्बे असा नामोल्लेख करत आणि मी तिला चार गोष्टी सुनावत असे.

जास्त कशाला अजूनही काही लोकांना मुंबई पेक्षा बॉम्बे म्हणणे स्टेटस सिम्बॉल वाटते.

पण आम्ही अजूनही त्यांना चार गोष्टी सुनावून मुंबई म्हणा असे बोम्बलत असतो.

साला त्या एका प्रश्ना मुळे खंडाळा द्रुतगती महामार्गावर निद्रा देवी साथ सोडून गेली आणि त्या अजस्त्र मानवासोबत संवाद चालू राहिला. आणि त्या येष्टी मधील काही पाहनीय (प्रेक्षणीय नाही) स्थळ माज्याकडे विस्फारित नजरेने पाहू लागली.

प्रतिक्रिया

द्या टाळी! मी पण कोणी 'बॉम्बे' म्हटलं की लय चिडतो. मग त्याला त्याचे नाव विचारतो. उदा. 'प्रकाश'. मग म्हणतो, 'अरे पॅकी..' मग त्ये चिडलं का त्याला समजावतो, मुंबैचं 'बॉम्बे' करणं का चुकीचंय ते.

श्रीरंग_जोशी's picture

20 Apr 2015 - 8:16 pm | श्रीरंग_जोशी

माझे जेवढेही बंगाली मित्र आहेत एकाच्याही तोंडून मी कॅलकटा सोडून दुसरा उच्चार ऐकला नाही. त्यांच्याशी बोलताना मी कधीही कोलकाता सोडून दुसरा उच्चार कधी केला नाही.

बाकी मुंबईपासून अडीच तीन तासांवर राहणारे पण कुणी कुठचे आहात विचारल्यावर 'बॉम्बे' असं ठासून सांगणारे मराठी मातृभाषा असलेले लोक आजही भेटतात.

नगरीनिरंजन's picture

20 Apr 2015 - 7:55 pm | नगरीनिरंजन

तुम्ही बॉम्बेला राहता का?
ठाण्यात म्हणे प्रेक्षक नसल्यामुळे राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या मराठी चित्रपटाचा खेळ रद्द होतो. मग मुंबईत काय होत असेल? मग त्याला मुंबई म्हणलं काय आणि बॉम्बे म्हणलं काय, मराठी माणसं भिकार** ती भिकार**च राहणार.

नितिन शेंडगे's picture

20 Apr 2015 - 7:56 pm | नितिन शेंडगे

दादा मी मुंबई ला राहतो पण रोजगारी करायला पुणे येथे असतो

तुमच्या मनातील भावना समजू शकतो. पण नुसत्या शिव्या घालून काय होणार दादा ??

नगरीनिरंजन's picture

20 Apr 2015 - 8:05 pm | नगरीनिरंजन

शिव्या नाही हो. अशा लोकांना तोच शब्द आहे त्याला काय करणार? बाकी बॉम्बेला मुंबई म्हटल्याने तरी काय होणार भाऊ??

नितिन शेंडगे's picture

20 Apr 2015 - 8:13 pm | नितिन शेंडगे

आपण असे काही करू शकतो ज्या मधून १०० पैकी एक जरी सुधारला तरी खूप मोठे काम झाले असे म्हणू. आणि बॉम्बे आणि मुंबई या विषयी म्हणाल तर तुमच्या घरी आलेल्या कुणीही तुम्हाला इतर नावाने म्हटले तर चालेल का ??

नगरीनिरंजन's picture

22 Apr 2015 - 7:57 am | नगरीनिरंजन

मला वेगळ्या नावाने हाक मारली तर मला कळणारच नाही ना मला हाक मारताहेत. साहेबाने बॉम्बे म्हटल्यावर कळले की नाही लोकांना तो मुंबईबद्दल बोलतोय म्हणून? आता उगीच कशाला आव आणायचा?

मुंबै,मुंबई,बॉंम्बे,बंबई,
भेंडी जिथपर्यंत उपनगरी रेल्वे धावते तो आपल्याला मुंबई हाय

यसवायजी's picture

22 Apr 2015 - 8:44 pm | यसवायजी

हे बघा

इट्स फxन्ग मुंबाई? :))

सुबोध खरे's picture

24 Apr 2015 - 3:40 pm | सुबोध खरे

जास्त कशाला अजूनही काही लोकांना मुंबई पेक्षा बॉम्बे म्हणणे स्टेटस सिम्बॉल वाटते.
हे मात्र १०० % खरंय
विशेषतः मुंबईच्या बाहेरच्या लोकांना.
किंवा sobo (SOuth BOmbay) मधल्या शोभा डे सारख्या अर्धवट लोकांना

श्रीरंग_जोशी's picture

27 Apr 2015 - 11:01 pm | श्रीरंग_जोशी

इथे अमेरिकेत १०-१२ वर्षांपूर्वी स्थायिक झालेल्या दादरकरांना किंवा विलेपार्लेकरांनाही ठसक्यात (इतर मराठी लोकांशी बोलताना) बॉम्बे असे म्हणताना पाहिलेय. काही वेळा ते अमेरिकनांपेक्षाही अधिक अमेरिकन झालेले आढळतात ;-).

हेमन्त वाघे's picture

27 Apr 2015 - 11:18 pm | हेमन्त वाघे

SoBo stands for son of bitches ... ha . ha .. ha

हेमन्त वाघे's picture

27 Apr 2015 - 11:18 pm | हेमन्त वाघे

SoBo stands for son of bitches ... ha . ha .. ha

रावसाहेब म्हणत्यात's picture

4 Apr 2017 - 10:14 pm | रावसाहेब म्हणत्यात

शिव्या घालणे किंवा son of bitches याउपर काही मुद्दा आहे?

मी मुंबईत राहिलेला-वाढलेला. मुंबई बॉम्बे असताना पण बऱ्याच वेळेला बॉम्बेला मुंबई म्हणायचो. पण नंतर अमेरिकेला अमेरिकन लोकांशी बोलताना मुंबई म्हन्तल्यानंतर म्हणजे ते पूर्वीचे बॉम्बे वैगेरे म्हंटले आहे. पण कुणी बॉम्बे म्हंटले तर मला प्रॉब्लेम नाहीय. उलट मी समजू शकतो.

बॉम्बे म्हणण्यात काही लोकांचा nostalgia वाटत असेल. बॉम्बेला एक इतिहास आहे, काही आठवणी ते जगले असतील. त्या जर त्यांना जपावास्या वाटत असेल तर मला त्यात काही गैर वाटत नाही. स्टेटस वाटत असेल किंवा दुसरे काहीही असेल. ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

पण मुंबई म्हणावं हा वाद का? जेव्हा नाव बॉम्बे होते, तेव्हा मुंबई म्हंटलेले तर चालायचे.

मराठी_माणूस's picture

5 Apr 2017 - 5:09 pm | मराठी_माणूस

ते टाईम्स वाले अजुनही बाँबे टाईम्स नावाची पुरवणी छापतात.