* भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६ कोर्ट केसेस मध्ये बर्याचदा नमुद केलेल दिसते, पण प्रत्यक्षात बचाव पक्षास व्यवस्थीत बचाव होऊ शकलेल्या केसेसची संख्या वस्तुतः कमीच असावी (माझा व्यक्तीगत अंदाजा चुभूदेघे).
एसएमएसने खेळांचे रिझल्ट कळवणे, फाँटचे टाईप फेस इत्यादी बद्दल कॉपीराईट लागू होतो अथवा नाही अशा बाबींबद्दल कलम १६ अन्वये कॉपीराईट बोर्डापुढे अथवा न्यायालयात युक्तीवाद केले जाताना दिसतात.
या कलमा खाली क्रिकेट कॉमेंट्री संदर्भाने स्टार इंडीया आणि BCCI असलेली दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल (30 August, 2013) दिलेली क्रिकेटच्या प्रत्येक बॉल सोबत कायद्याचा अंदाज देणारी एक रोचक केस वाचण्यात आली. मी ती http://indiankanoon.org/doc/66104323/ या दुव्यावर वाचली (बहुधा सुप्रीम कोर्टापुढे पुढील सुनावणीसाठी प्रलंबीत आहे तरीही तुर्तास दिल्ली हायकोर्टाचा निर्णय वाचण्या जोगा वाटतो). (दुवे स्वसंपादनाने बदलले) दिल्ली उच्चन्यायालयाच्या संस्थळावरही उपलब्ध असण्याची शक्यता आहे. (पुढे सर्वोच्च न्यायालयात गेली कि नाही या बद्दल कल्पना नाही, Copyright act section 16 असा शोध http://indiankanoon.org वर घेतल्यास अजूनही काही केसेस वाचण्यास मिळू शकतात)
अशा या कलम १६चा मराठी अनुवाद करण्यास खाली घेतला आहे. मला या अनुवादात आणि पंक्च्युएशन संदर्भाने उपयूक्त सुधारणा सुचवून हव्या आहेत.
भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६ चा इंग्रजी मसुदा
* No copyright except as provided in this Act No person shall be entitled to copyright or any similar right in any work, whether published or unpublished, otherwise than under and in accordance with the provisions of this Act or of any other law for the time being in force, but nothing in this section shall be construed as abrogating any right or jurisdiction to restrain a breach of trust or confidence.
* माझा अनुवाद प्रयत्न
(भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७) या कायद्यात उल्लेखीत उपलब्धते व्यतरीक्त प्रताधिकार नाही; (भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७) या कायद्यातील अथवा, त्या त्या काळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यातील नमुद तरतुदींचे व्यतरीक्त, इतर कोणत्याही प्रकाशित अथवा अप्रकाशित (प्रताधिकार कायद्यात विशीष्ट अर्थ) कामात (प्रताधिकार कायद्यात विशीष्ट अर्थ) कुणीही व्यक्ती प्रताधिकार किंवा कोणतेही समकक्ष अधिकारास (हक्कास) पात्र असणार नाही; परंतु या कलमातील कोणतीही गोष्ट, न्यासभंग अथवा विश्वासघात निरोधी कोणतेही अधिकार अथवा क्षेत्राधिकाराधिकारक्षेत्र (jurisdiction), रद्दबातल करणारी समजली जाणार नाही.
* अनुवादात सध्यावापरलेल्या लेखात वापरलेल्या इंग्रजी मराठी विकि संज्ञा,
** copyright प्रताधिकार
** except as provided in this Act कायद्यात उल्लेखीत उपलब्धते व्यतरीक्त
** entitled हक्कास पात्र
** for the time being in force त्या त्या काळी अंमलात असलेल्या
** nothing in this section shall be construed as abrogating या कलमातील कोणतीही गोष्ट......रद्दबातल करणारी समजली जाणार नाही.
** to restrain a breach of trust or confidence न्यासभंग अथवा विश्वासघात निरोधी
** any right or jurisdiction क्षेत्राधिकाराधिकारक्षेत्र (jurisdiction)
** similar right समकक्ष अधिकार
** काही पारिभाषिक शब्दार्थ संदर्भ :http://www.marathibhasha.org/ येथून
* उत्तर दायकत्वास नकार : उपरोक्त कलम अथवा अनुवाद किंवा केस संबंधी उल्लेखांच्या अचुकते बाबत मी अथवा या धाग्यावर प्रतिसाद देणारी कोणतीही व्यक्ती कोणतीही जबाबदारी घेत नाही. मी किंवा इतर कुणीही कायदे विषयक सल्ला देत नाही. दुसरे तर कायदे नियम आणि न्यायिक निकाल सातत्याने उत्क्रांत होत असतात अशा कोणत्याही महत्वपुर्ण बदलांची आम्हास कल्पना नसण्याची शक्यता आहे, म्हणून कायदे विषयक सल्ल्याची जरूरी असणार्यांनी परवानाधारी ज्ञानवंत सल्लागारांचा सल्ला घेणे अधिक उचित असते.
* हा धागा विकिप्रकल्पांसाठी असल्यामुळे आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.
* अनुवाद सुधारणा आणि शब्द सुचवणीसाठी आणि चर्चा सहभागासाठी धन्यवाद
* अवांतर टाळण्यासाठी धन्यवाद
** (स्वसंपादीत)
प्रतिक्रिया
22 Apr 2015 - 7:30 pm | पैसा
अजून सोपी भाषा नाही का वापरता येणार?
"उपलब्धते व्यतिरिक्त" हा शब्द आवश्यक आहे का? "उल्लेखाव्यतिरिक्त अन्य" एवढे पुरेसे ठरेल. इतरही काही दुसरे सोपे शब्द वापरता येतात का बघा!